Grid Posts

View All
माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

Thumbnail

View All
My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

Tile List

View All
माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन कोल्हापूर (जिमाका) : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी…

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

माय मराठी

येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

List Posts

View All
माय मराठी

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक भुये (ता. करवीर) : जोतिबा चैत्र…

My Marathi

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र…

My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला! कोल्हापूर/प्रतिनिधी: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड…

My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा कोल्हापूर/प्रमोद पाटील  : "चांगभलं" च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून…

Thumbnail

View All
My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

कोल्हापरमध्ये विकासाचे व्हिजन घेऊन मख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कटटयावर’साधला कोल्हापूरकरांशी संवाद

कोल्हापरमध्ये विकासाचे व्हिजन घेऊन मख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कटटयावर’साधला कोल्हापूरकरांशी संवाद कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने मिसळ कट्रा च्या…

माय मराठी

चार वर्षापासून फरार असलेला मोकातील आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई

कोल्हापूर/प्रतिनिधी:मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पाहीजे, फरार आरोपींचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.पोलीस…

माय मराठी

तंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ चे स्वप्न लवकरच सत्यात : प्रा. टी जी सीताराम

आय.एस.टी. ई.’ ग्लोबल टेक कॉन २०२६’ चा शुभारंभ -डी. वाय. पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि आय.एस.टी. ई. नवी दिल्लीकडून…

माय मराठी

एनआयटी’ ला ‘नेशन्स प्राईड’ राष्ट्रीय पुरस्कार

एनआयटी’ ला ‘नेशन्स प्राईड’ राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट ठेवून लष्कर, शिक्षण, न्याय क्षेत्रातील दिग्गजांनी स्थापन…

माय मराठी

वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा

वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात होऊ…

माय मराठी

गोकुळ हा राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड’ ठरावा ! वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ

‘गोकुळ हा राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड’ ठरावा ! वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ गोकुळ’चा विस्तार ही शेतकऱ्यांच्या भविष्यातील गुंतवणूक :…

माय मराठी

तपोवन मैदानावर आजपासून सतेज कृषी प्रदर्शनाला होणार प्रारंभ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

*तपोवन मैदानावर आजपासून सतेज कृषी प्रदर्शनाला होणार प्रारंभ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार उद्घाटन ,तीन फुटाची राधा नावाची…

माय मराठी

पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मण उद्योजकांची सर्वात मोठी परिषद ब्रह्म ऊर्जा २०२५ आज होणार

पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मण उद्योजकांची सर्वात मोठी परिषद ब्रह्म ऊर्जा २०२५ आज होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मण उद्योजकांची सर्वात मोठी…

माय मराठी

श्री. स्वामी समर्थ दत्तभक्त मंडळ नेहरूनगर तर्फे दत्त जयंती उत्सवाचे आयोजन

श्री. स्वामी समर्थ दत्तभक्त मंडळ नेहरूनगर तर्फे दत्त जयंती उत्सवाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री.स्वामी समर्थ दत्त भक्त मंडळ नेहरूनगर तर्फे…

कोल्हापरमध्ये विकासाचे व्हिजन घेऊन मख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कटटयावर’साधला कोल्हापूरकरांशी संवाद

कोल्हापरमध्ये विकासाचे व्हिजन घेऊन मख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कटटयावर’साधला कोल्हापूरकरांशी संवाद

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने मिसळ कट्रा च्या अनोख्या व्यासपीठावरून मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायतीच्या प्रचारा बरोबरच कोल्हापूर शहर आणि जिल्हयाचे प्रश्न आणि विकास याबाबत ठोस भमिका मांडली.त्यांनी या मिसळ कट्टा च्या माध्यमातून साधला संवाद रस्ते, हद्दवाढ पंचगंगा प्रद्षण, महापूर, उद्योग, विमानतळ, खेळ आणि कला, सांस्कतीक परंपरा याबाबत निर्णय आणि नियोजन याबाबतची दिशा स्पष्ट केली कोल्हापूरातील महायुतीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या मिसळ कट्रयावर विविध क्षेत्रातील शहर आणि जिल्हयातील शेकडो निमंत्रित मान्यवरांच्या साक्षीने म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बी न्यूज वृत्त वाहीनीचे संपादक चारूदत्त जोशी, खासदार पुत्र युथ आयकान कृष्णराज महाडिक, सिने अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी प्रकट मुलाखत घेतली
कोल्हापर शहरातील रस्त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की शहरातील रस्ते चांगले झाले पण त्याबरोबरच सर्व नागरीकांच्यावर टोलचा बोजा पडणार होता. त्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र निधी देऊन कोल्हापूर शहराला टोल मक्त केले. याबरोबरच हद्दवाढीबाबत बोलताना ते म्हणाले की कोणत्या शहराची हद्दवाढ झाल्यानंतर त्या शहराचा विकास झाला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहराचा विकास होण्यासाठी हद्वाढ झालीच पाहिजे अशी माझी व्यक्तिगत तसेच सरकारची भमिका आहे पण हद्दवाढीला ‘ येथील अनेक राजकीय नेत्यांनी संबधीत गावानी प्रखर विरोध केला त्यामळे हद्दवाद करता आली नाही. तसेच प्रस्तावित गावांना करवाढी बाबतची भीती निर्माण झाली आहे
आता सरकारने निर्णय घेतला आहे की हह् वाढ झाल्यानंतर प्रस्तावित गावांना पाच वर्षे कोणतीही कर वाढ केली जाणार नाही त्यामळे आता ही भीती बाळगण्याचे कारण नाही.. तसेच ज्यांचा विरोध आहे त्यांच्याशी सविस्तर चचा करून हद्द वाढोबाबत सकारात्मक प्रातिसाद दिला तरच मी ताबडतोब हद्दवाढ करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
पंचगंगा नदीचे प्रद्षण रोखण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की कोल्हापुर, इचलकरंजीसह काही प्रमख शहर आणि गावांचे सांडपाणी नाल्याद्वारे नदीत मिसळते त्याबरोबरच काही औद्योगिक क्षेत्राचेही पाणी नदीत येते त्यामळे नदीचे प्रदरषण मोठ्या प्रमाणात होते. हे रोखण्यासाठी या साडपाण्यावर प्राक्रेया करण्याचे प्रकल्प उभा केले पाहिजेत ‘ काही प्रमाणात’ ते केले असन आणखी याप्ढेही सर्व शंभर टक्के हे सांडपाणी रोखण्या साठी प्रयत्न केले जातील त्यासाठी आवश्यक तो सर्व निर्धी दिला जार्डल असेही त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच ने =्पूर शहर आणि परिसराला होणारा महापूराचा विळखा रोखण्यासाठी आता नदीजोड प्रकल्पावर भर देण्यात आला असन त्यात्न कोल्हापर जिल्ह्यातून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी मराठवाडा भागात वळवण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत ते लवकरच पूर्ण होतील त्यानंतर कोल्हापूर शहराला मोठ्या महापूराचा धोका कधीही उद्भवणार नाही असेही त्यांनी सांगितले उद्योग क्षेत्रातील समस्या बाबत बोलताना ते म्हणाले की कोल्हापूर शहरात फौंड्री हब तसेच अनेक चांगले उद्योग आहेत पण त्याचा विस्तार करण्यासाठी आता जागांचा प्रश्न निर्माण झाले आहे नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण होत असन या ठिकाणी आयटी सह इतर उद्योग विस्तारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामळे हा प्रश्न मार्गी लागेल. तसेच पणे बेंगलोर कॅरिडॉर मळे ही येथील अनेक संधी उपलब्ध होणार असन त्याचा उपयोग कोल्हापर जिल्ह्यातील विकासासाठी होणार आहे. कष्णाराज महाडिक यां्न कोल्हापूर जिल्ह्याला खेळाची मोठी परंपरा आहे अनेक राष्ट्रीय, ऑलिम्पिक, आंतरराष्ट्ीय दर्जाचे खेळाड्र निर्माण झाले आहेत यापुढेही असेच खेळाचा विकास व्हावा यासाठी काय करणार असे विचारले असता त्यांनी केंद् शासनाच्या खेलो डंडियासह अनेक राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात खेळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असे सांगितले. अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी कोल्हापर जिल्ह्यात कला आणि संस्कती परंपरा जपण्यासाठी फिल्म इन्स्टिट्यूट आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांच्या शाखा सुरू कराव्यात अशी मागणी केली यावर ते म्हणाले की चित्रपट क्षेत्रासह इतर सर्व कला आणि सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी काही शैक्षणिक आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल
यावेळी पालक मंत्री प्रकाश आबिटकर,मंत्री हसन मश्रीफ, चंद्रकांत दादा पाटील, खा. धनंजय महाडिक आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके आदींसह महायतीचे नेते, उमेदवार, सहकार, उद्योग सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

चार वर्षापासून फरार असलेला मोकातील आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई

कोल्हापूर/प्रतिनिधी:
मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पाहीजे, फरार आरोपींचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.पोलीस अधीक्षक यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांनी त्यांचे शाखेकडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांची पथके तयार करून पाहीजे, फरार आरोपींची माहिती काढून कायदेशीर कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या.
जुना राजवाडा पोलीस ठाणे गु.र.नं. 552/2021 भा.द.वि.स. कलम 364(1), 384, 386,388,397,327, 452,120 (ब) सह मोका कलम कलम 3(1), (2), 3(2), 3(4) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे विजय रामचंद्र गौड रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर हा गुन्हा घडलेपासून गेले चार वर्षापासून मिळून येत नव्हता. सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक आरोपी नामे विजय रामचंद्र गौड रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर याचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना त्यांचे गोपनिय बातमी मिळाली की, आरोपी नामे विजय रामचंद्र गौड हा तलवार चौक, सानेगुरूजी वसाहत, कोल्हापूर येथे उभा आहे. सदर बातमीचे अनुषंगाने पथकाने पुष्कराज वाईन शॉपी समोर तलवार चौक, सानेगुरूजी वसाहत, कोल्हापूर येथे जावून सापळा लावून आरोपी नामे विजय रामचंद्र गौड व.व. 42, रा. राम गल्ली, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांस दिनांक 06/01/2026 रोजी 21.00 वा. चे सुमारास ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईकामी जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक साो, श्री. योगेश कुमार व मा. अपर पोलीस अधीक्षक , श्री. डॉ. बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, राम कोळी, रूपेश माने, विनोद कांबळे, सचिन पाटील, अमित मर्दाने यानी केली आहे.

तंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ चे स्वप्न लवकरच सत्यात : प्रा. टी जी सीताराम

आय.एस.टी. ई.’ ग्लोबल टेक कॉन २०२६’ चा शुभारंभ

-डी. वाय. पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि आय.एस.टी. ई. नवी दिल्लीकडून आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी:
भारतामध्ये मिळणारे अभियांत्रिकी शिक्षण हे अतिशय उच्च दर्जाचे असून त्या जोरावर आज जागतिक पातळीवर भारत तांत्रिक नेतृत्वकडे वाटचाल करत आहे. भारताच्या या तंत्रज्ञान सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ हे आता स्वप्न राहिलेले नसून लवकरच ते सत्यात उतरेल असे प्रतिपादन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (ए. आय. सी. टी. ई) चे माजी चेअरमन प्रा. टी जी सिताराम यांनी केले. डी वाय पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी. ई.) नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आय.एस.टी. ई. ग्लोबल टेक कॉन २०२६’मध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात या जागतिक परिषदेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील व प्रा. टी. जी. सिताराम यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, आय.आय. आय. टी.एम. ग्वाल्हेरचे संचालक प्रा. एस. एन. सिंह,कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, आय.एस. टी. ई.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, महाराष्ट्र गोवा अध्यक्ष डॉ. रणजीत सावंत, कार्यकारी समिती सदस्य डॉ. महादेव नरके, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, आय.क्यू.ए.सी. डायरेक्टर डॉ. शिवानंद शिरकोले आदी उपस्थित होते.
प्रा. सीताराम म्हणाले, रिसर्च, इनोव्हेशन, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट यावर भर दिला तर भारत जगाला विकासाची नवी दिशा देऊ शकेल. ए. आय. असो किंवा कोणतेही नवे तंत्रज्ञान त्याचा स्वीकार करून अधिक चांगले काम करा. आपण जेवढे सक्षमपणे समस्या सोडवण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तेवढे देशाचे भविष्य उज्वल बनेल. तंत्र शिक्षण हे केवळ पदवीप्रथम मर्यादित नसून समस्या सोडवणारे उद्योजकता घडवणारे असावे. नोकरी त्यातून नोकरी देणारे विद्यार्थी घडावेत यासाठी भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी डी. वाय पाटील ग्रुपच्या विस्ताराबाबत माहिती देऊन तंत्रशिक्षणात केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला.माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, आर्थिक, संरक्षण आणि शिक्षण या तीन गोष्टी सध्याच्या काळात महत्त्वाच्या आहेत. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जपान आणि युएसए कडून आपण बरेच काही शिकू शकतो. टेक्नॉलॉजी बाहेर नाही तर आपल्या आत मध्ये विकसित केली पाहिजे.
डॉ. जी डी. यादव म्हणाले, आपल्याकडे खूप संधी व अनेक क्षमता आहे. शैक्षणिक पॉलिसी मध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे.डॉ. प्रतापसिंह देसाई म्हणाले,.नवीन पिढीमध्ये क्षमता आहे, नवनवीन संकल्पनातून हे जीवन बदलू शकतात. नवनवीन गोष्टी तंत्रज्ञान शिकणे, आत्मसात करण्याची संधी या परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे याचा फायदा घ्यावा.
प्रा. एस एन सिंग म्हणाले,
तंत्रज्ञान गतीने बदलत आहे. त्या पद्धतीचे शिक्षण आणि अशा परिषदांची गरज आहे. ए. आय. मुळे नोकऱ्या जातील हा निव्वळ गैरसमज आहे. तंत्रज्ञानाच्या युगात टाईम मॅनेजमेंट हा यशाचा मार्ग आहे.स्टार्ट अप मार्गदर्शक सचिन कुंभोजे म्हणाले, अभियांत्रिकी करत असतानाच स्टार्टअप वर भर द्यावा. त्या माध्यमातून विकासाला अधिक चालना मिळेल. प्रा. शुभदा यादव, प्रा. शारोन काळे
सूत्रसंचालन केले. डॉ. शिवानंद शिरकोले यांनी आभार मानले.

जिल्हा परिषद अंतर्गत ५४ शाळांमध्ये दर्जेदार स्वच्छता ग्रहांची उभारणी,कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स”ची संकल्पना अस्तित्वात : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एस कार्तिकेएन यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : एका विद्यार्थिनीला शाळेत योग्य स्वच्छता सुविधा न मिळाल्यामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे आणि शिक्षण विभागाचे लक्ष वेधले गेले. “शाळेची इमारत महत्त्वाची आहेच, पण एका विद्यार्थिनीला शाळेत योग्य स्वच्छता सुविधा न मिळाल्यामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी स्वच्छता सुविधा त्याहूनही अधिक महत्त्वाच्या आहेत.”यातूनच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकूण 54 शाळांमध्ये स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेएन एस, आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेने ठोस टिकाऊ आणि संवेदनशील आराखडा तयार केला आणि त्यातूनच जिल्हा परिषद ५४ शाळांमध्ये दर्जेदार स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. मीना शेंडकर उपस्थित होत्या.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर, नाम. श्रीमती माधुरी मिसाळ, राज्यमंत्री कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स या प्रकल्पासाठी मा. नाम. प्रकाश आबिटकर, मंत्री नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक व औकाफ तथा सहपालकमंत्री कोल्हापूर, मा. नाम. श्री. हसन मुश्रीफ, मंत्री वैद्यकीयकीय शिक्षा विशेष सहाय्य, महाराष्ट्र राज्य या सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून १५ व्या वित्त आयोग (जि.प. सिर) निधीतून हा उपक्रम राबवला गेला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एस. कार्तिकेयन यांनी सांगितले. यामध्ये एकूण शंभर शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
हा निधी ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि विशेषतः मुलींची उपस्थिती जास्त आहे, त्या शाळांमध्ये आधुनिक स्वच्छता सुविधा निर्माण करण्यासाठी वापरला गेला असून निकषानुसार हेल्थ कॉम्प्लेक्सचे तीन प्रकार निश्चित करणेत आले. यात २०० पेक्षा जास्त विद्यार्थी), १०० ते २०० विद्यार्थी आणि १०० पेक्षा कमी विद्यार्थी या प्रकल्पात वापरलेले साहित्य केवळ टिकाऊच नाही तर सौंदर्यपूर्ण आहे व नामवंत कंपनीचे वापरणेत आलेले आहे.असेही यावेळी सांगण्यात आले.
पाण्याच्या लाईन्ससाठी फिनोलेक्स टाकी,जैन, किसान पाईप्स वापरण्यात आले आहेत.
विद्युत कामासाठी पॉली कॅब, एपीएर वायर्स वापरण्यात आले आहेत. प्रकाश योजनेसाठी फिलिप्स सिस्का बल्ब, फ्लोअरिंग आणि डॅडोसाठी कजारिया जॉन्सन सिम्प्लो टाइल्स वापरण्यात आले आहेत.
युरिनल्समधील विभाजनासाठी ग्रॅनाईट पार्टीशन करण्यात आले आहे. दरवाजे टिकाऊ आणि जलरोधक केले आहेत.सुरक्षिततेसाठी लॉक्स अँड हँगस करण्यात आले आहेत.
कमोड, बेसिन, युरिनल पॅन, शॉवर्स आणि कॉकसाठी जग्वार कोल्हार टोटो कंपनीचे नळ बसविण्यात आले आहेत.प्रत्येक स्वच्छतागृहामध्ये सुव्यवस्थित सुविधा,आरसा,
हॅन्ड वॉश, एअर फ्रेशनर, पेपर डिस्पेन्सर सुविधा करण्यात आल्या आहेत.
मुलींच्या आरोग्य आणि सन्मानाचा विचार करून वेंडिंग मशीन सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर, इनक्लीनरटर बसविण्यात आले या सुविधेमुळे मुलींचा आत्मविश्वास वाढला,शाळेत उपस्थिती वाढली आणि शिक्षणात सहभाग अधिक झाला आहे असे शेंडकर यांनी नमूद केले.या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय निर्माण झाली. शाळेचा दर्जा उंचावला आणि शाळेचे वातावरण अधिक आनंदी झाले आहे.प्रकल्पाची वैशिष्ट्यपूर्णता म्हणजे बांधकाम, सौंदर्य, शिस्त आणि संवेदनशीलता या चारही गोष्टींचा उत्तम संगम यात दिसतो.प्रकल्पाचे सर्व आराखडे, खर्च आणि बांधकाम नुसार पूर्ण करण्यात आले. यासाठी कोणताही जादा निधी उपलब्ध करावा लागला नाही. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली, शिक्षण अधिकारी (प्राथमिक), कार्यकारी अभियंता (समग्र शिक्षा) आणि कनिष्ठ अभियंता (समग्र शिक्षा) यांच्या संयुक्त देखरेखीखाली गुणवत्ता कायम ठेवली गेली आहे.
हेल्थ कॉम्प्लेक्सची नियमित स्वच्छता व देखभाल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांचे माध्यमातून करणेचे नियोजन केले आहे.”कोल्हापूर स्टाईल हेल्थ कॉम्प्लेक्स” हा विद्यार्थ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाचा उत्सव. “स्वच्छ शाळा म्हणजे आरोग्यदायी समाज!” या मंत्राने जिल्हा परिषद कोल्हापूर शाळांना आरोग्यदायी, सुरक्षित आणि सन्मानपूर्ण वातावरण देण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी यावेळी सांगितले आहे.यावेळी जिल्हा परिषद समग्र शिक्षाचे एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर श्री. अमोल पाटील ज्युनिअर इंजिनिअर समग्र शिक्षा हेड ऑफिस सौ.सुप्रिया जोगळेकर आदी उपस्थित होते.

एनआयटी’ ला ‘नेशन्स प्राईड’ राष्ट्रीय पुरस्कार

एनआयटी’ ला ‘नेशन्स प्राईड’ राष्ट्रीय पुरस्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट ठेवून लष्कर, शिक्षण, न्याय क्षेत्रातील दिग्गजांनी स्थापन केलेल्या ‘व्हेटरन्स इंडिया’ या संस्थेने शिक्षणेतर उपक्रमांतून राष्ट्रवाद, देशभक्ती व राष्ट्रनिर्माण यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शैक्षणिक संस्थांना दिला जाणारा ‘नेशन्स प्राईड’ हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) काॅलेजला प्राप्त झाला. नवी दिल्ली येथे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ‘विजय दिवस मानवंदना’ या कार्यक्रमात हे पुरस्कार वितरण झाले. एनआयटीतर्फे संचालक डाॅ. संजय दाभोळे व विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला.
भारतीय वायुसेनचे निवृत्त अधिकारी डाॅ. बिनयकुमार मिश्रा यांनी स्थापन केलेली व्हेटरन्स इंडिया ही अराजकीय संस्था आहे. सेना पदक व विशिष्ट सेवा पदक विजेते मेजर जनरल (निवृत्त) गगन दीप बक्षी, एआयसीटीईचे माजी चेअरमन आणि नॅक व एनबीएचे विद्यमान चेअरमन डाॅ. अनिल सहस्त्रबुद्धे, एआयसीटीईचे विद्यमान चेअरमन डाॅ. टी. सीतारामन, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष प्रा. विनयकुमार पाठक, ऑलिंपिक पदक विजेते व अर्जुन पुरस्कार सन्मानित हाॅकी खेळाडू अशोक ध्यानचंद, इज्युकेशन प्रमोशन सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डाॅ. एम. आर. जयराम, केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश पी. एन. रविंद्रन, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेचे अधिष्ठाता डाॅ. सुनिल पारीक, सामाजिक कार्यकर्ते रोशनकुमार सिंह हे दिग्गज या संस्थेचे आश्रयदाते व पुरस्कर्ते आहेत. भारतीय नागरिकांमध्ये देशभक्ती व राष्ट्रवाद वृद्धिंगत व्हावा आणि नागरिकांनी विकसित भारत २०४७ व आपत्ती व्यवस्थापनात योगदान द्यावे यासाठी ही संस्था कार्यरत आहे. संस्थेने यासाठी विशेषकरून उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांची ‘व्हाॅलेंटिअर पॅट्रिऑटिक रिझर्व फोर्स’ सदस्य म्हणून नोंदणी सुरू केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना यापुढे विविध प्रशिक्षण दिले जातील, नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स व स्टार्टअप संकल्पना यांना प्रोत्साहन दिले जाईल.
एनआयटी संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी सदर पुरस्कार श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूरचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांना सुपूर्द केला. डाॅ. के. जी. पाटील यांनी सर्व स्टाफ व विद्यार्थी यांचे अभिनंदन करत हा अभिमानाचा क्षण असल्याचे प्रतिपादन केले. या नोंदणीसाठी विशेष परिश्रम घेतलेले कर्मचारी रंगराव उर्फ राहूल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे, शैक्षणिक समन्वयक प्रा. प्रविण जाधव, प्रशासकीय अधिकारी संदीप पंडे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा

वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित आहे. याची माहिती .कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणूक लढवणारी राजकीय ताकद नसून, शोषित, कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य चळवळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत सां नगरपरिषदा, महानगरपालिका स्तरावर मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेले आहे. बहुजन आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर आध पारदर्शक आणि संघर्षशील राजकारणाचा पर्याय कोल्हापूरच्या मतदारांसमोर ठेवणार पक्षाच्या उमेदवारांची निवड ही सामाजिक प्रतिनिधित्व, कार्यक्षमता आणि स्थानिक प्रश्नांवरील लढाऊ भूमिका यावर आधारित असेल. या अनुषंगाने दिनांक १७ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा चौक येथे जाहीर ‘विजयी संकल्प महासभा’ आयोजित करण्यात आली आहे. या ‘विजयी संकल्प महासमेला’ वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याच्या देशाध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर, प्रा, मा. अंजलीताई आंबेडकर, युवा नेते मा. सुजात आंबेडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा प्रभारी मा. डॉ. क्रांती सावंत, राज्य उपाध्यक्ष प्रवक्ता मा. सोमनाथ साळुंखे, राज्य उपाध्यक्ष प्रवक्ता मा. सिध्दार्थ मोकले, राज्य उपाध्यक्ष प्रवक्ता मा. इम्तियाज नदाफ, जिल्हा अध्यक्ष, कोल्हापूर दक्षिण मा. श्री बाबूराव आयवाळे, कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर उत्तर मा. जनार्दन गायकवाड, जिल्हाध्यक्ष दक्षिण मा. बाबुराव आयवाळे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून येणारे वंचित बहुजन आघाडीचे शेक्रेडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

गोकुळ हा राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड’ ठरावा ! वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ

‘गोकुळ हा राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड’ ठरावा !
वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ

गोकुळ’चा विस्तार ही शेतकऱ्यांच्या भविष्यातील गुंतवणूक : आमदार सतेज पाटील

गोकुळ’च्या मुंबई येथील नवीन दही उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न

मुंबई/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वाशी शाखा (नवी मुंबई) येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानने उभारण्यात आलेल्या ‘१५ मे.टन क्षमतेच्या नवीन दही उत्पादन प्रकल्पाचे’ उद्‌घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ, मुंबईचे दूध वितरक प्रतिनिधी, गोकुळचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थित गोकुळ डेअरी वाशी (नवी मुंबई) येथे संपन्‍न झाला. या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळने गुणवत्तेच्या जोरावर साधलेली अभूतपूर्व प्रगती ही कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी, पशुपालक, वितरक आणि संघातील कर्मचाऱ्यांच्या निष्ठा व कष्टांचे फलित आहे. शेतकऱ्यांनी दूध उत्पादन वाढवले आणि गोकुळने त्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली. त्यामुळे गोकुळ आज राज्यातील अग्रगण्य व विश्वासार्ह दुग्ध ब्रँड ठरला आहे. मुंबईतील गोकुळची विक्रीव्यवस्था स्वर्गीय आनंदराव पाटील (चूयेकर) आणि आदरणीय तात्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनातून सन १९८८ साली सुरू झाली. त्यानंतर पुणे बाजारपेठही गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या बळावर भक्कम केली. आज या दोन्ही महानगरांमध्ये गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी संकलन व दूध संकलन वाढवण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुश्रीफ म्हणाले की, “बाजारपेठ विस्तार, गुणवत्ता सुधारणा आणि दूध संकलन वाढ ही काळाची गरज आहे. संघाकडून राबवल्या जाणाऱ्या अनुदान योजना, सेवा-सुविधांचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.” कर्नाटक सरकार दूध उत्पादकांना प्रतिलिटर रु. ५ अनुदान देते. त्यामुळे त्या राज्यात दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्र सरकारनेही दूध उत्पादकांना अनुदान दिल्यास दुग्धव्यवसाय आणखी मजबूत होईल आणि महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर येईल, असा विश्वास व्यक्त केला. नवीन दही प्रकल्पामुळे गोकुळची मुंबई बाजारपेठेतील क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा उल्लेख करत मंत्री मुश्रीफ म्हणाले, “गोकुळ हा परंपरा, गुणवत्ता आणि विश्वासाचा प्रतीक आहे. त्याला राज्याचा अधिकृत ब्रँड घोषित केल्यास तो राज्यभर अधिक उजळून निघेल.” गोकुळची दीर्घ परंपरा, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग, आधुनिक उत्पादन सुविधा आणि व्यापक ग्राहकवर्ग यांच्या आधारे गोकुळला राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड दर्जा मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे आहे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, “गोकुळ हा केवळ दुग्धव्यवसायिकांचा ब्रँड नसून लाखो दूध उत्पादक शेतकरी, वितरक, कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्या कष्ट, विश्वास आणि सहकार्याचा परिणाम आहे. गेल्या ४० ते ५० वर्षांत ‘लिक्विड मिल्क’ विभागात गोकुळने निर्माण केलेला विश्वास आज दुग्धजन्य प्रदार्थ (बायप्रॉडक्ट्स) क्षेत्रातही विस्तारत आहे.” ते पुढे म्हणाले, काळाबरोबर बाजारपेठ बदलत आहे. नवी पिढी, आधुनिक डिझाईन, आकर्षक पॅकेजिंग आणि गुणवत्ता या सर्वबाबी आज महत्त्वाच्या आहेत. नवनवीन दुग्धजन्य उत्पादने आणि गुणवत्ता दोन्ही जपण्याचा सातत्याने प्रयत्न गोकुळ करत आहे.मुंबईमध्ये थेट बाजारपेठेशी जोडणारे गोकुळचे प्रकल्प उभे राहतील व त्या विस्तारासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाटील म्हणाले,“गोकुळ ब्रँड टिकून राहणे म्हणजे शेतकरी कुटुंबांच्या भविष्याचे संरक्षण आहे. शेतकऱ्यांनी दूध उत्पादन टिकवले, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुणवत्ता जपली आणि सर्वांनी मिळून हा ब्रँड राज्यातून देशभर नेण्याचे काम केले हेच गोकुळचे बळ आहे. दूध व दुग्धजन्य उत्पादनांचा बाजार कधीही कमी होणार नाही. पुढील पिढ्यांपर्यंत गोकुळची सावली टिकून राहावी हेच आपले ध्येय आहे.”
या कार्यक्रमावेळी प्रास्ताविक करताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, हा दही प्रकल्प गोकुळच्या विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. सहा कोटी रुपयांत उभारलेल्या या अत्याधुनिक प्रकल्पाची उत्पादन क्षमता १५ मेट्रिक टनांपर्यंत असून या प्रकल्पातून दरमहा जवळपास २५ लाख रुपयांची बचत होणार असल्याने गोकुळच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुणवत्तेबाबत गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे. मुंबई-पुणे बाजारात दर्जेदार दही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी आपण सज्ज आहोत. मार्केटिंगच्या गरजा ओळखून नवनवीन उत्पादने बाजारात आणण्याचे काम सुरू असून लवकरच गोकुळचे आईस्क्रीमदेखील ग्राहकांना भेटणार आहे, असे श्री मुश्रीफ सांगितले. गोकुळच्या प्रगतीची दोन चाके म्हणजे उत्पादक आणि ग्राहक आहेत. त्यांच्या विश्वासावरती जास्तीत जास्त दूध संकलन व विक्री टप्पा साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “गोकुळ म्हणजे गुणवत्ता” ही ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.
स्वागतपर भाषणात संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील म्हणाले हा दही प्रकल्प गोकुळच्या ब्रँड मजबुतीचा नवा टप्पा आहे. दूध उत्पादकांचा विश्वास हे आमचे भांडवल असून, गोकुळच्या प्रत्येक प्रकल्पामागील प्रेरणा हा शेतकरीच आहे. नामदार मुश्रीफ व आमदार सतेज पाटील व आघाडीचे सर्व नेते यांचे मार्गदर्शन आणि संचालक मंडळाचे सामूहिक प्रयत्न यामुळे गोकुळचा वेग सातत्याने वाढत आहे. या कार्यक्रमाचे स्वागत संघाचे संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी केल तसेच प्रास्‍ताविक चेअरमन नविद मुश्रीफ यांनी मनोगत व्‍यक्‍त केल तर आभार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले. या प्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम.हसन मुश्रीफ यांचे स्‍वागत माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी केले व माजी गृहराज्‍यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे स्‍वागत संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.
यावेळी प्रमुख मान्‍यवर वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम. हसन मुश्रीफ, माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, नवी मुंबई (वाशी) व्यवस्थापक दयानंद पाटील, संघाचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मुंबई परिसरातील दूध वितरक,संघाचे कर्मचारी अदि उपस्थित होते.

तपोवन मैदानावर आजपासून सतेज कृषी प्रदर्शनाला होणार प्रारंभ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

*तपोवन मैदानावर आजपासून सतेज कृषी प्रदर्शनाला होणार प्रारंभ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार उद्घाटन ,तीन फुटाची राधा नावाची म्हैस असणार खास आकर्षण*

*विविध नामांकित कंपन्यांसह,पशुपक्षी,जातिवंत जनावरे यांचा सहभाग*

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०२५ आजपासून सुरू होत आहे ते ८ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रदर्शन चालू राहणार आहे. येथील तपोवन मैदान येथे हे प्रदर्शन चार दिवस भरविण्यात आले असून या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. याच बरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन,तांदूळ महोत्सव, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान,नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.या प्रदर्शनात तीन फुटाची राधा नावाची म्हैस खास आकर्षण असणार आहे.
या प्रदर्शनासाठी संयोजक विनोद पाटील,सुनील काटकर,धीरज पाटील, जयवंत जगताप सर कृषी विज्ञान केंद्र तळसंदे,जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे,डॉ.सुनील कराड विभागीय संशोधन संचालक,नामदेवराव परीट, उपसंचालक कृषी विभाग, डॉ.प्रमोद बाबर पशु विभाग जिल्हा परिषद,नगरसेवक दुर्वासबापू कदम, कोल्हापूर,गोकुळचे हणमंत पाटील, डॉ.साळुंखे,युवराज पाटील तालुका कृषी अधिकारी, डी डी पाटील, महादेव नरके डी. वाय. पी.,स्काय स्टार इव्हेंट चे स्वप्नील सावंत आदींनी परिश्रम घेत आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या शुक्रवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावेळी माजी खासदार श्री राजू शेट्टी साहेब,आमदार सतेज पाटील,आमदार जयंत आसगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील दादा यांची उपस्थिती असणार आहे.तरी चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असे संयोजक यांनी आवाहन केले आहे.

प्रदर्शनाचे २०२५ हे ७ वे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, १५० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल,लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे.
गोकुळ, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी, संजय घोडावत ग्रुप, चितळे डेअरी, यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे.त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,आत्मा,पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद,पणन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत.

या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या कृषी क्षेत्रातील विविध संस्था सहभागी होत आहेत. यामध्ये गोकुळ दूध संघ, जय इंडस्ट्रीज, मयुरेश टेकनॉलॉजी, गोविंद मिल्क सातारा, बिगमार्क इंडस्ट्रीज, फिनोलेक्स, समृद्धी प्लास्टिक,वरद इंडस्ट्रीज, सिद्धिविनायक ड्रीप इरिगेशन, वनिता ऍग्रो, शक्तिमान रोटर, कुबोटा ट्रॅक्टर, महिंद्रा, पाटील ऑईल मशीन,प्रथम पेस्ट,ओंकार बंब, रॉयल एनफिल्ड, EV बाईक & मोटर्स,, कागल बंब, पेरु नर्सरी स्टॉल, बळीराजा आटा चक्की, रोनिक, सागर ऑटोमोबाईल, आदी नामवंत कंपन्या आपले उत्पादन सोबत या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.
याचबरोबर विविध बी-बियाणे शेतीची अवजारे, खते औषधे आदी उत्पादने पहावयास मिळणार आहेत. शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळणार आहेत.
प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, जनावरे स्पर्धा,खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. याचबरोबर काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा पशुस्पर्धांची बक्षीसही दिले जाणार आहेत. याहीवर्षी तांदूळ महोत्सव भरविण्यात आला असून यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी तांदूळ,हळद,नाचणी शेतकऱ्यांकडून थेट उपलब्ध केले आहेत. त्याची विक्री होणार आहे. तसेच प्रदर्शनात पाचट व्यवस्थापन ए आय तंत्रज्ञानचा वापर करून स्मार्ट शेती उपयोग, ड्रोनद्वारे फवारणी सेंसरचा वापर कृत्रिम रेतन ए.आय किटचा वापर याबाबत प्रदर्शनात मार्गदर्शन होणार आहे. प्रदर्शनामध्ये काळा आणि लाल पेरू काळा ऊस पाहावयास मिळणार आहे.
या प्रदर्शनात विविध प्रकारचे जनावरे पशुपक्षी पहावयास मिळणार आहेत.तीन दिवस शेतीविषयक तज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत.तरी या प्रदर्शनास शेतकऱ्यांसह नागरिकांनी भर द्यावे असे आवाहन आमदार सतेज पाटील आणि आयोजकांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मण उद्योजकांची सर्वात मोठी परिषद ब्रह्म ऊर्जा २०२५ आज होणार

पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मण उद्योजकांची सर्वात मोठी परिषद ब्रह्म ऊर्जा २०२५ आज होणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मण उद्योजकांची सर्वात मोठी परिषद ब्रह्मऊर्जा २०२५ ही आज हॉटेल सयाजी येथे पाहायला होत आहे. या परिषदेमध्ये
व्यवसायिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, नेटवर्किंग सेशन्स उत्कृष्ट उद्योमशीलता पुरस्कार यशस्वी उद्योजक आणि तज्ञांचे मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे.या काळात परिषदेसाठी क्रिकेट समीक्षक श्री सुनंदन लेले आणि श्री अर्जुन देशपांडे स्टार्टर्स सक्सेस मार्गदर्शन करणार आहेत.
ब्राह्मण उद्योजकांनी एकत्र येऊन रचनात्मक कार्य करावे यासाठी गेल्या आठ वर्षापासून अविरत काम करणारे संस्था ब्राह्मण बिजनेस फोरम दरवर्षी संपन्न होणारी ब्रम्हऊर्जा ही उद्योग परिषद हा त्याचाच एक भाग असून उद्या ३० नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या परिषदेमध्ये श्री नितीन वाडीकर, श्री विजय पत्की,डॉक्टर रोहिणी परांडेकर, श्री सचिन शानबाग,श्री सुहास जोशी आदींना पुरस्कृत केले जाणार आहे.असे ब्राम्हण बिझनेस फोरमचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी,उपाध्यक्ष नरेंद्र जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सेक्रेटरी अजिंक्य देशपांडे, जॉईंट सेक्रेटरी अभिजीत कुलकर्णी, संचालक संजय पंडित, ट्रेझरर शैलेश देशपांडे, पराग जोशी शैलेश देशपांडे राजेश छत्रे प्रदीप कुमार लिंगसुर आदी उपस्थित होते.

श्री. स्वामी समर्थ दत्तभक्त मंडळ नेहरूनगर तर्फे दत्त जयंती उत्सवाचे आयोजन

श्री. स्वामी समर्थ दत्तभक्त मंडळ नेहरूनगर तर्फे दत्त जयंती उत्सवाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री.स्वामी समर्थ दत्त भक्त मंडळ नेहरूनगर तर्फे ३० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर असा दत्त जयंती उत्सव साजरा होत असून या उत्सव काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी सकाळी अभिषेक आणि आरती सायंकाळी आरती होणार आहे.या उत्सव काळामध्ये ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री सूक्त पठण आणि रात्री ८ वाजता श्री दत्त माऊली महिला भजनी मंडळ नेहरूनगर यांचे भजन होणार आहे. १ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता श्री वसंतराव अर्दळकर प्रस्तुत तुझे गीत गाण्यासाठी हा बहारदार गीतांचा कार्यक्रम होणार आहे.२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता रोहिणीज कथक स्टुडिओ प्रस्तुत नृत्याविष्कार सादर होणार आहे. ३ डिसेंबर रोजी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक भजनी मंडळ वडणगे यांचे भजन सादर होणार आहे.तर ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पालखी सोहळा ६ वाजता श्री.दत्त जन्मकाळ सोहळा आणि रात्री ७ वाजता प्रसाद वाटप होणार आहे. तर ५ डिसेंबर रोजी महाप्रसादाचे नियोजन विधायक युवक संघटना तर्फे करण्यात आले आहे या सर्व उत्सवासाठी किरण रणदिवे, पुरुषोत्तम कुलकर्णी,अतुल हासूरकर,चारुदत्त रणदिवे,गजानन शिंदे,अतुल हसुरकर, किरण रणदिवे,विजय चव्हाण,जयसिंग राऊत,प्रसाद उगवे आदींनी परिश्रम घेतले आहे.