राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता मा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार यांच्या समवेत शाहू प्रेमी यांची संयुक्त पाहणी राजश्री शाहू महाराज शाहू मिल येथे केली.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी पाहणी केल्यानंतर कोल्हापुरातले लोकप्रतिनिधी मंत्री आमदार खासदार महापौर उपमहापौर यांची एकत्रित बैठक न्यू पॅलेस येथे २८ मार्च २०२६ रोजी बोलवण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वांशी चर्चा करून शासनाकडे पाठपुरावा करता येईल आणि त्याबाबत सर्व मंत्री लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर चर्चा होणार आहे. त्याबाबत सर्व लोकप्रतिनिधी मंत्री आमदार खासदार यांना पत्रव्यवहार झालेला आहे. तसेच समितीतील काही सदस्य प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींची भेटी घेणार आहेत. सर्वांना आमंत्रित करणार आहेत.
आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासोबत शिवप्रेमी अँड.बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, विजय देवणे, बाबा पार्टी, शिवाजीराव कवाळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *