सिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा पंकज मुंडे यांच्या हस्ते येत्या गुरुवारी होणार

सिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा पंकज मुंडे यांच्या हस्ते येत्या गुरुवारी होणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री सिद्धगिरी मठ संस्थान तर्फे स्थापन करण्यात आलेल्या खाजगी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा लोकार्पण सोहळा आणि भव्य पशुपालक मेळावा येत्या गुरुवारी दिनांक ३ सप्टेंबर रोजी कणेरी मठ परिसरात आयोजित करण्यात आला आहे. ह्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल खात्याच्या मंत्री माननीय नामदार पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प पू काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी दिली.
कणेरीच्या सिद्धगिरी अध्यात्म संस्थानातर्फे धार्मिक, सामाजिक, कृषी, आरोग्य, शिक्षण, आपत्ती निवारण, ग्रामविकास आधारित उपक्रमेम राबवली जातात, याचाच महत्त्वाचा टप्पा देशी गोवंशाच्या समृद्ध विकासासाठी पशुवैद्यकीय उपचार सेवेच्या माध्यमातून आणि पदवी शिक्षणाच्या अभ्यासक्रमातून करण्यासाठी “श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाची ” स्थापना करण्यात आली आहे. भारतीय पशुचिकित्सा परिषदेच्या सर्व कायदेशीर अटी आणि शर्तींची पूर्तता करून महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या शिफारसीनुसार या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रचली आहे.
येत्या गुरुवारी दिनांक ३ सप्टेंबर रोजी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते आणि सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रियाताई महेश शिंदे, विधानसभेचे सदस्य आमदार अमल महाडिक, उत्तर प्रदेशच्या पंडित दीनदयाल उपाध्य पशुचिकित्सा विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. कृष्ण मुरारीलाल पाठक, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालयाचे संयोगी अधिष्ठाता डॉ. विकास वासकर, गोकुळचे प्रशासकीय सदस्य डॉ. चंद्रकांत परूळेकर, चितळे उद्योग समूहाचे संचालक विश्वास चितळे आणि जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कोल्हापूर डॉ. प्रमोद बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
महाविद्यालयाच्या बोधचिन्हांचे प्रकाशन आणि पशु सर्व चिकित्सालयाच्या उपचार सेवा विस्तारीकरणासाठी गोकुळ दूध संघाशी सामंजस्य करार संपन्न होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. मुरुगप्पा यांनी दिली. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पशुपालक मेळाव्यासाठी उपस्थित होणाऱ्या दूध उत्पादकांना देशी गोवंश प्रदर्शन आणि गोवंश चलीत कृषी यंत्रांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र सिंग यांनी कळवले आहे. या संस्थांनचे कार्यकारी संचालक डॉ. यशोवर्धन बारामतीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जी पी वड्ड, श्री विक्रम पाटील व श्री प्रल्हाद जाधव यांच्यासह संस्थांच्या सर्व संचालक मंडळाकडून आणि नियोजनाची तयारी सुरू आहे.
या निमित्याने श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालय विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, चितळे डेअरी चे संचालक गिरीश चितळे यांच्या मार्गदर्शनात भव्य पशुपालक मेळावा आयोजित करण्यात आला असून समृद्ध पशुपालन आणि सक्षम दूध व्यवसायासाठी डॉ. सुनील राऊतमारे, डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. अंकुश परिहार, डॉ. प्रशांत योगी, डॉ. दिनेश टाकळीकर, डॉ. विनोद पाटील, पांडुरंग काळे, डॉ. पुष्पनाथ चौगुले, डॉ. कैवल्य देशमुख, डॉ. राऊ भांगे या तज्ञांकडून उपस्थितांना मार्गदर्शन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *