Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – हिंदु जनजागृती समिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

श्री एकमुखी दत्त देवस्थान वतीने २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन – जुन्या आध्यात्मिक परंपरेचा पुन प्रारंभ

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

Thumbnail

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर भारतात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा;…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन २ ऑक्टोबरला कोल्हापुरात

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

लक्षतीर्थ वसाहत येथील गवळी कुटुंबीयांचा गणेश ठरत आहे अनेक सेलिब्रिटी आणि गवळी कुटुंबियांसाठी महत्वपूर्

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

भारतातील सर्वोच्च न्यूरो संस्था SCTIMST, त्रिवेंद्रम कडून न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना सर्वोच्च “अवॉर्ड ऑफ एक्सलन्स” प्रदान

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

सिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा पंकज मुंडे यांच्या हस्ते येत्या गुरुवारी होणार

सिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा पंकज मुंडे यांच्या हस्ते येत्या गुरुवारी होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री सिद्धगिरी मठ संस्थान तर्फे स्थापन…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा

ऑलिपिकवीर खाशाबा चरित्र सर्वांना नेहमी प्रेरणादायी - पै . विष्णु जोशीलकर कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग…

My Marathi महाराष्ट्र मुख्य मुंबई

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता कुटुंबीयांची घालमेल, शोधासाठी नागरिकांना पोलिसांचे आवाहन राजापूर/प्रतिनिधी : राजापूर, जि. रत्नागिरी : राजापूर…

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण 

ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण  कोल्हापूर/प्रतिनिधी : ट्युमरचे तात्काळ निदान करून रुग्णांना काही…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप

डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप कोल्हापूर/प्रतिनिधी : शिक्षण घेत असतानाच स्वतःच्या कल्पनेला व्यावसायिक स्वरूप देत उद्योजकतेची नवी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन २ ऑक्टोबरला कोल्हापुरात

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन २ ऑक्टोबरला कोल्हापुरात कोल्हापूर/प्रतिनिधी : इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

लक्षतीर्थ वसाहत येथील गवळी कुटुंबीयांचा गणेश ठरत आहे अनेक सेलिब्रिटी आणि गवळी कुटुंबियांसाठी महत्वपूर्

लक्षतीर्थ वसाहत येथील गवळी कुटुंबीयांचा गणेश ठरत आहे अनेक सेलिब्रिटी आणि गवळी कुटुंबियांसाठी महत्वपूर्   कोल्हापूर/प्रतिनिधी : अतिशय प्रतिकूल परिस्थितीत…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

भारतातील सर्वोच्च न्यूरो संस्था SCTIMST, त्रिवेंद्रम कडून न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना सर्वोच्च “अवॉर्ड ऑफ एक्सलन्स” प्रदान

भारतातील सर्वोच्च न्यूरो संस्था SCTIMST, त्रिवेंद्रम कडून न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना सर्वोच्च “अवॉर्ड ऑफ एक्सलन्स” प्रदान श्री चित्रा संस्थेच्या…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

सिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा पंकज मुंडे यांच्या हस्ते येत्या गुरुवारी होणार

सिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा पंकज मुंडे यांच्या हस्ते येत्या गुरुवारी होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री सिद्धगिरी मठ संस्थान तर्फे स्थापन…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा

ऑलिपिकवीर खाशाबा चरित्र सर्वांना नेहमी प्रेरणादायी – पै . विष्णु जोशीलकर कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग…

My Marathi महाराष्ट्र मुख्य मुंबई

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता कुटुंबीयांची घालमेल, शोधासाठी नागरिकांना पोलिसांचे आवाहन राजापूर/प्रतिनिधी : राजापूर, जि. रत्नागिरी : राजापूर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – हिंदु जनजागृती समिती

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – हिंदु जनजागृती समिती आधी राज्याच्या मुख्यालयातील…

ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण

ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण 

कोल्हापूर/प्रतिनिधी : ट्युमरचे तात्काळ निदान करून रुग्णांना काही क्षणात रिपोर्ट देणाऱ्या अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण सोहळा सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे निमान्सच्या (NIMHANS) न्यूरोपॅथॉलॉजी विभागाच्या विभागप्रमुख आणि जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिता महादेवन यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, पॅथॉलॉजी प्रमुख डॉ.प्रतिमा मरजक्के प्रमुख उपस्थित होते.शस्त्रक्रियेदरम्यान काढलेला ट्युमर कर्करोगाचा आहे की नाही किंवा कर्करोगाचा संपूर्ण भाग काढला गेला आहे की नाही, या महत्त्वाच्या प्रश्नाला डॉक्टराना (शल्यचिकित्सकांना) अनेकदा सामोरे जावे लागते. असा काढलेला ट्युमर सर्वसाधारण पॅथॉलॉजी प्रक्रियेला अहवाल (रिपोर्ट) तयार करण्यासाठी ३ ते ४ दिवस लागू शकतात, तर क्रायोस्टॅट मशीन वापरून फ्रोजन सेक्शन तंत्रज्ञानाद्वारे अंदाजे १०-१५ मिनिटांत आवश्यक माहिती मिळते. त्यामुळे शस्त्रक्रिया करत असतानाच डॉक्टर रुग्णावर आवश्यक ते पुढील उपचार तात्काळ करू शकतात व रुग्णाला दिलासा मिळू शकतो. यामुळे ट्यूमरचे स्वरूप आणि सर्जिकल मार्जिनबद्दल त्वरित निर्णय घेण्यास मदत होते. म्हणूनच क्रायोस्टॅटला खऱ्या अर्थाने “सर्जिकल पॅथॉलॉजीसाठीचे आपत्कालीन साधन” म्हटले जाऊ शकते.
मेंदूचे ट्यूमर ३०० पेक्षा जास्त प्रकारचे आहेत, ते अनेकदा एकमेकांसारखेच दिसतात. केवळ एच अँड ई (H&E) स्टेनिंगद्वारे ट्यूमरचे अस्तित्व कळू शकते, तर आयएचसी (IHC) त्याचा प्रकार, ग्रेड आणि उपचारासंबंधी महत्त्वाची माहिती अधिक अचूकपणे निश्चित करण्यास मदत करते. इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री किंवा आयएचसी (IHC) न्यूरोपॅथॉलॉजीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावते. डॉ. अनिता महादेवन या बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस (NIMHANS) मध्ये न्यूरोपॅथॉलॉजी विभागाच्या विभागप्रमुख आणि प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकशास्त्र आणि संशोधन क्षेत्रात त्यांचा व्यापक अनुभव आणि महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या विशेष प्राविण्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये न्यूरोपॅथॉलॉजी, न्यूरोइन्फेक्शन, अपस्माराशी संबंधित न्यूरोपॅथॉलॉजी, पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि मेंदूच्या ऊतींवरील संशोधन व ब्रेन बँकिंग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. त्यांच्या हस्ते ह्या मशीनचा लोकार्पण सोहळा विशेष महत्वपूर्ण आहे.
डॉ. शिवशंकर मरजक्के ह्यांनी सिद्धगिरी हॉस्पिटल येथील न्युरो विभागाला जागतिक स्तरावर नेले आहे, ह्या मशीनमुळे अशा स्वरूपाच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेला अधिक स्पष्टता येणार आहे. ह्या अत्याधुनिक मशीन ट्रस्ट श्रेणीत कोल्हापुरात पहिल्यांदा सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित होत आहे. अशा टेस्ट करिता सर्वसाधारणपणे १५ हजारांचा खर्च येतो पण ह्याच तपासणी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर केवळ ५ ते ६ हजारात होणार असून गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पॅथॉलॉजी प्रमुख डॉ.प्रतिमा मरजक्के यांनी यावेळी केले. या लोकार्पण सोहळ्याला सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकश भरमगौडर, डॉ. अंकुश पार्टे, डॉ. तनिष पाटील, डॉ. प्रशांत नाडेकर, डॉ. शंतनू पालकर, डॉ. सचिन पाटील, डॉ. विशाल खलाटे यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप

डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिक्षण घेत असतानाच स्वतःच्या कल्पनेला व्यावसायिक स्वरूप देत उद्योजकतेची नवी वाट चोखाळणाऱ्या कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांनी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला आहे. संगणक विज्ञान व अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या निखिल चव्हाण आणि सिद्धेश धुंदरे यांच्या ‘श्रावणी नेक्सटेक’ या आयटी सेवा पुरविणाऱ्या स्टार्टअपला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.डी. वाय. पाटील पॉलिटेक्निककडून नेहमीच विद्यार्थ्यांना नवसंकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यातूनच निखिल आणि सिद्धेश यांना स्टार्टअपची संकल्पना सुचली. वडिलांच्या मित्रांना जाणवणाऱ्या विविध आयटीविषयक गरजा लक्षात घेऊन त्यांनी त्यावर तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्यास सुरुवात केली. संकल्पनेला प्रत्यक्ष व्यवसायाचे रूप देत त्यांनी ‘श्रावणी नेक्सटेक’ची सुरुवात केली असून, आता त्यांना विविध प्रकल्पांची कामेही मिळू लागली आहेत.
‘श्रावणी’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘ऐकणे आणि शिकणे’ असा होतो. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार तंत्रज्ञानाधारित सेवा देणे, हे या स्टार्टअपचे वैशिष्ट्य आहे. वेबसाईट डिझाइन, डिजिटल मार्केटिंग, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजना अशा विविध सेवा येथे दिल्या जातात. या कामासाठी विविध २० हून अधिक तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे.प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले, डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करून विद्यार्थी दशेतच स्टार्टअप सुरू करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते भविष्यात सक्षम उद्योजक बनू शकतात.
भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून समाजोपयोगी सेवा आणि नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यावर भर देणार असल्याचे निखिल चव्हाण व सिद्धेश धुंदरे यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. महादेव नरके, संगणक विभागप्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. शीतल साळोखे व शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्यन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी निखिल व सिद्धेश यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन २ ऑक्टोबरला कोल्हापुरात

असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक ‘मॅपकॉन’ अधिवेशन २ ऑक्टोबरला कोल्हापुरात

कोल्हापूर/प्रतिनिधी : इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट महाराष्ट्र चॅप्टरचे ४७ वे वार्षिक अधिवेशन ‘मॅपकॉन २०२६’ यावर्षी कोल्हापूरमध्ये होता आहे. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या पॅथॉलॉजी विभागातर्फे या २ ते ४ ऑक्टोबर या कालावधीत हॉटेल सयाजी येथे या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पॅथॉलॉजी विभागाप्रमुख आणि संयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ सुचिता देशमुख, सचिव डॉ. आर. एस. पाटील व खजिनदार डॉ. आर. एम. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘नेक्सट जनरेशन पॅथॉलॉजी’ या थीमवर या निमित्ताने प्रथमच ‘हरित परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स, डिजिटल पॅथॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि प्रिसिजन मेडिसिन या भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शुक्रवार दि. २ ऑक्टोबर रोजी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, उपाध्यक्ष डॉ. राजीव राव, सचिव डॉ. चंद्रशेखर भाले, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत महाराष्ट्रासह देशभरातून ६०० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर, संशोधक, आणि पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
परिषदेत देश-विदेशातील नामवंत तज्ज्ञ, ख्यातनाम पॅथॉलॉजिस्ट आणि विषयतज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने व विशेष सत्रे होणार असून प्रगत निदान तंत्रे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व प्रत्यक्ष अनुभव, युवा पॅथॉलॉजिस्टना संशोधन, नवकल्पना आणि शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी शोधनिबंध व पोस्टर सादरीकरण, पुरस्कार, त्याचबरोबर पॅथॉलॉजी क्षेत्रातील सध्याची आव्हाने, बदलती मार्गदर्शक तत्त्वे आणि भविष्यातील वाटचाल यावर तज्ज्ञांची चर्चा होणार आहे.

*पहिली हरित परिषद*
‘मॅपकॉन’च्या इतिहासात प्रथमच ही परिषद ‘ग्रीन कॉन्फरन्स’ म्हणून आयोजित केली जात आहे. यामध्ये डिजिटल ॲब्स्ट्रॅक्ट बुक, ई-प्रमाणपत्रे, क्युआर कोडद्वारे नोंदणी केली जाणार आहे. प्लास्टिक बाटल्या आणि फ्लेक्स बॅनरचा वापर पूर्णपणे टाळून सीड-पेपर बॅग, ज्यूट बॅगचा वापर केला जाईल. कागद वाचवण्यासाठी डिजिटल पोस्टर सादरीकरण, प्रत्येक नोंदणीसाठी एक वृक्ष लागवड असे उपक्रम राबवले जाणार आहेत. वैद्यकीय परिषदेचा कार्बन फूटप्रिंट कमी करणे आणि भावी पिढीच्या पॅथॉलॉजिस्टमध्ये पर्यावरणपूरक वैद्यकीय प्रॅक्टिसची जाणीव निर्माण करणे हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.यावेळी संयोजन समितीसह विविध समितींचे प्रमुख व सदस्य उपस्थित होते.

लक्षतीर्थ वसाहत येथील गवळी कुटुंबीयांचा गणेश ठरत आहे अनेक सेलिब्रिटी आणि गवळी कुटुंबियांसाठी महत्वपूर्

लक्षतीर्थ वसाहत येथील गवळी कुटुंबीयांचा गणेश ठरत आहे अनेक सेलिब्रिटी आणि गवळी कुटुंबियांसाठी महत्वपूर्

कोल्हापूर/प्रतिनिधी : अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लक्षतीर्थ वसाहत येथील गवळी कुटुंबीयांनी २० वर्षापूर्वी दोन फुटापासून गणेश मूर्ती बसवण्यास सुरुवात केली. या गणेशाच्या आगमनाने गेल्या २० वर्षात गवळी कुटुंबियांसोबतच वसाहत आणि अनेक सेलिब्रेटींचा उद्घार झाला. त्याच्या दर्शनाने जीवन बदलण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. या गणेशाच्या चरणी लिन होण्यासाठी अनेक सेलिब्रेटीं इथे येतात. शनिवारी या मंडळाच्या गणेशाचे मालिकांमधित कलाकार आणि राजकारण्यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने जल्लोषात आगमन झाले. गणेशाच्या दर्शनासाठी लक्षतीर्थ वसाहत लोटली होती.
कोल्हापूरच्या पश्चिम दिशेला पूर्वीचा तोफेचा माळ. शहराचा विस्तार झाला आणि या तोफेच्या माळावर झोपड्या मारून लोकं राहू लागली. याच परिसराला लक्षतीर्थ वसाहत अस देखील म्हटल जात. अतिशय पुण्यभूमी असलेल्या या वसाहतीत झोपडपट्टीमुळ सामाजिक जीवन अस्थिर बनले होते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि शिक्षणाच्या अभावामुळे अनेकजण खून, मारामारी, चोऱ्यामाऱ्याकडे वळले. त्यामुळे समाजात वसाहतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. या परिसराची ओळख गुन्हेगारांची वसाहत अशी बनली. याच परिसरात गवळी कुटुंबियांचं घर. अविनाश आणि मनोज हे दोघेजण कष्ट करून कुटुंब सांभाळत होते. परिस्थितीत नसतानाही त्यांनी दोन फुटी श्री गणेशाच्या मूर्तीची २० वर्षापूर्वी प्रतिष्ठापना केली.
त्यानंतर अविनाश गवळी यांच्या मूर्तीची दरवर्षी उंची वाढत गेली. परिस्थिती बदलण्यासाठी गोवा इथं गेलेला मनोज गवळी यांन तिथं सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात आपला जम बसवला. दरम्यान या गणपतीमुळे अनेकांच्या जीवनाच कल्याण झालं, अशी भावना निर्माण झाल्याने,अनेक जण या उत्सवासाठी कोल्हापुरात येऊ लागले. गवळी कुटुंबियांनी चक्क २० फुटी गणेश मूर्ती श्री प्रेमी मंडळात बसवण्यास सुरुवात केली.
नवसाचा श्री गणेश अशी ख्याती झाल्यामुळे नाट्य, मालिका, चित्रपट, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक जण या गणेशाच्या दर्शनाला दरवर्षी याठिकाणी येतात. सुवर्णालंकार जडीत या गणेश मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतात.
यंदा या श्री गणेशाची आगमन मिरवणूक जल्लोषात निघाली. देव माणूस… या मालिकेतील अभिनेत्री वैशाली कल्याणकर आणि अभिनेते किरण गायकवाड तसेच साताऱ्याचे नगरसेवक पंकज चव्हाण, उद्योजक मनोज गवळी, अविनाश गवळी यांच्या हस्ते या गणेशाचे पूजन झाले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीला प्रारंभ झाला.
विद्युत झोतात निघालेल्या गणेशाच्या आगमन मिरवणूकीत सहभागी होण्यासह गणेशाचे दर्शन आणि सेलिब्रिटींच्या भेटण्यासाठी अवघी लक्षतीर्थ वसाहत या मिरणूकीकडे लोटली होती.नागरिक आणि गणेश भक्तांनी मनोभावे श्रीं प्रेमींच्या गणेशाचे दर्शन घेतले. सामाजिक अस्वस्थता आणि आर्थिक अस्थिरता असलेल्या या परिसरात या श्रींच्या प्रतिष्ठापनेमुळ तरुण पिढी गैरमार्ग सोडून भक्ती मार्गाकडे वळली आहे.

भारतातील सर्वोच्च न्यूरो संस्था SCTIMST, त्रिवेंद्रम कडून न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना सर्वोच्च “अवॉर्ड ऑफ एक्सलन्स” प्रदान

भारतातील सर्वोच्च न्यूरो संस्था SCTIMST, त्रिवेंद्रम कडून न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना सर्वोच्च “अवॉर्ड ऑफ एक्सलन्स” प्रदान

श्री चित्रा संस्थेच्या ५० वर्षांच्या इतिहासात (१९७६-२०२६) पहिल्यांदाच | न्यूरोसर्जरीतील नाविन्यपूर्ण शोध आणि उद्योजकीय दूरदृष्टीचा सन्मान

त्रिवेंद्रम/प्रतिनिधी : अत्यंत अभिमानाच्या क्षणी, जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना “अवॉर्ड ऑफ एक्सलनस” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. न्यूरोसर्जरी आणि रुग्णसेवेतील अग्रगण्य नाविन्य, उद्योजकीय दृष्टी आणि ट्रान्सलेशनल उत्कृष्टता यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.हा पुरस्कार त्यांची मातृसंस्था SCTIMST, त्रिवेंद्रम (श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी – Institute of National Importance) कडून प्रदान करण्यात आला आहे. ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत येणारी एकमेव केंद्र सरकारी संस्था आहे आणि हृदय व मेंदूसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे स्वदेशातच विकसित करणारी भारतातील एकमेव संस्था आहे – खरा Make in India चा आदर्श.

डॉ. मारजक्के यांची प्रतिक्रिया:

“हा वैयक्तिक सन्मान नाही. हा माझ्या आवड, चिकाटी, सातत्य, जिद्द, रुग्णसेवेतील करुणा, माझ्या संपूर्ण टीम आणि ‘Work is Worship’ या संकल्पनेचा सन्मान आहे. परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचे आशीर्वाद, मार्गदर्शन आणि पाठबळ हेच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. “मला नेहमीच श्री चित्रा सारखी प्रॅक्टिस करायची होती – जागतिक दर्जाची सुविधा, गुंतागुंतीची प्रकरणे, फक्त शुद्ध न्यूरोसर्जरी. कणेरी गावातील सिद्धगिरी हॉस्पिटल येथे 13 वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर आज मला वाटते की मी गावातच एक मिनी-श्री चित्रा तयार केली आहे – तिथलीच कार्यसंस्कृती, न्यूरोरेडिओलॉजी रीडिंग, सविस्तर डिस्चार्ज समरी, कडक ICU कंट्रोल आणि न्यूरोपॅथॉलॉजी चर्चा.”

डॉ. शिवशंकर मारजक्के यांच्याविषयी:

दुहेरी सुवर्णपदक विजेते डॉ. मारजक्के हे त्यांच्या अपवादात्मक शस्त्रक्रिया कौशल्य, अचूक निदान आणि रुग्ण-प्रथम दृष्टिकोनासाठी जगभरात ओळखले जातात. त्यांनी जगातील पहिल्या अनेक ब्रेन बायपास शस्त्रक्रिया केल्या आहेत – जी भारतात मोजकेच न्यूरोसर्जन करू शकतात.एका लहानशा गावातील शेतात जन्म, दूध विकून मोठे झाले, हायस्कूलपर्यंत घरात वीजही नव्हती. गेल्या १३ वर्षांपासून ते ग्रामीण भागातील एका धर्मादाय रुग्णालयात सेवा देत आहेत आणि त्याचे रूपांतर त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रगत न्यूरोसर्जरी केंद्रात केले आहे.
त्यांचे जीवनतत्त्व: _”जेव्हा तुम्ही तुमच्या कामाची पूजा करता, तेव्हा ईश्वर तुमच्या हातून काम करून घेतो. आपण फक्त निमित्तमात्र आहोत.”_
हा सन्मान सिद्ध करतो की “उत्कृष्टतेला कोणतेही पोस्टकोड नसते.”

सिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा पंकज मुंडे यांच्या हस्ते येत्या गुरुवारी होणार

सिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा पंकज मुंडे यांच्या हस्ते येत्या गुरुवारी होणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री सिद्धगिरी मठ संस्थान तर्फे स्थापन करण्यात आलेल्या खाजगी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा लोकार्पण सोहळा आणि भव्य पशुपालक मेळावा येत्या गुरुवारी दिनांक ३ सप्टेंबर रोजी कणेरी मठ परिसरात आयोजित करण्यात आला आहे. ह्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल खात्याच्या मंत्री माननीय नामदार पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प पू काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी दिली.
कणेरीच्या सिद्धगिरी अध्यात्म संस्थानातर्फे धार्मिक, सामाजिक, कृषी, आरोग्य, शिक्षण, आपत्ती निवारण, ग्रामविकास आधारित उपक्रमेम राबवली जातात, याचाच महत्त्वाचा टप्पा देशी गोवंशाच्या समृद्ध विकासासाठी पशुवैद्यकीय उपचार सेवेच्या माध्यमातून आणि पदवी शिक्षणाच्या अभ्यासक्रमातून करण्यासाठी “श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाची ” स्थापना करण्यात आली आहे. भारतीय पशुचिकित्सा परिषदेच्या सर्व कायदेशीर अटी आणि शर्तींची पूर्तता करून महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या शिफारसीनुसार या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रचली आहे.
येत्या गुरुवारी दिनांक ३ सप्टेंबर रोजी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते आणि सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रियाताई महेश शिंदे, विधानसभेचे सदस्य आमदार अमल महाडिक, उत्तर प्रदेशच्या पंडित दीनदयाल उपाध्य पशुचिकित्सा विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. कृष्ण मुरारीलाल पाठक, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालयाचे संयोगी अधिष्ठाता डॉ. विकास वासकर, गोकुळचे प्रशासकीय सदस्य डॉ. चंद्रकांत परूळेकर, चितळे उद्योग समूहाचे संचालक विश्वास चितळे आणि जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कोल्हापूर डॉ. प्रमोद बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
महाविद्यालयाच्या बोधचिन्हांचे प्रकाशन आणि पशु सर्व चिकित्सालयाच्या उपचार सेवा विस्तारीकरणासाठी गोकुळ दूध संघाशी सामंजस्य करार संपन्न होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. मुरुगप्पा यांनी दिली. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पशुपालक मेळाव्यासाठी उपस्थित होणाऱ्या दूध उत्पादकांना देशी गोवंश प्रदर्शन आणि गोवंश चलीत कृषी यंत्रांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र सिंग यांनी कळवले आहे. या संस्थांनचे कार्यकारी संचालक डॉ. यशोवर्धन बारामतीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जी पी वड्ड, श्री विक्रम पाटील व श्री प्रल्हाद जाधव यांच्यासह संस्थांच्या सर्व संचालक मंडळाकडून आणि नियोजनाची तयारी सुरू आहे.
या निमित्याने श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालय विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, चितळे डेअरी चे संचालक गिरीश चितळे यांच्या मार्गदर्शनात भव्य पशुपालक मेळावा आयोजित करण्यात आला असून समृद्ध पशुपालन आणि सक्षम दूध व्यवसायासाठी डॉ. सुनील राऊतमारे, डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. अंकुश परिहार, डॉ. प्रशांत योगी, डॉ. दिनेश टाकळीकर, डॉ. विनोद पाटील, पांडुरंग काळे, डॉ. पुष्पनाथ चौगुले, डॉ. कैवल्य देशमुख, डॉ. राऊ भांगे या तज्ञांकडून उपस्थितांना मार्गदर्शन होणार आहे.

कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा

ऑलिपिकवीर खाशाबा चरित्र सर्वांना नेहमी प्रेरणादायी – पै . विष्णु जोशीलकर

कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा

कोल्हापूर/प्रतिनिधी : फक्त खेळाडूच नव्हे तर जीवन संघर्ष करणाऱ्या प्रत्येकांना ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे चरित्र नेहमी प्रेरणादायी ठरेल असे मनोगत वस्ताद विष्णू जोशीलकर यांनी व्यक्त केले . ध्रुवतारा फाउंडेशनच्यावतीने
प्रा. संजय दुधाणे लिखित
ऑलिम्पिकवीर खाशाबा पुस्तक कुस्तीगीरांना भेट देऊन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.जुन्या मोतीबाग तालमीत महाराष्ट्र केसरी विष्णु जोशीलकर व लेखक प्रा. संजय दुधाणे यांच्या हस्ते कुस्तीगीरांना पुस्तक देण्यात आले. याप्रसंगी
राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी साळुंखे, राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव अशोक पवार, कुस्ती संघटक बाबा महाडिक, क्रीडा संघटक दत्तात्रय वरूटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रांरभी ज्येष्ठ वस्ताद बाळ गायकवाड यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली .
कुस्तीगीर खाशाबा जाधवांनी १९५२ हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. या ऐतिहासिक कामगिरीला उजाळा देत खाशाबांचे चरित्र पुस्तक प्रकाशित केले आहे. खाशाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांसह १६६ पानांनी पुस्तक सजले असून दिवगंत जेष्ठ लेखक य.दि. फडके यांनी पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. प्रा. संजय दुधाणे यांनी सखोल संशोधन करीत हे जीवन चरित्र शब्दचित्रित केले आहे.
महाराष्ट्रातील नामवंत तालमींना ऑलिंपिकवीर खाशाबा पुस्तक भेट देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूरातील राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी साळुंखे, धैयशील पुंगावकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र पाटील, कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे, क्रीडा संघटक दत्तात्रय वरूटे यांनीही खेळाडूंसाठी पुस्तक भेट उपक्रम राबविणार आहेत.
खाशाबांनी जिंकलेल्या पदकाच्या कामगिरीला संजय दुधाणे यांनी उजाळा दिला. पदकाचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून या निमित्ताने हे पुस्तक नव्या रूपात वाचकांच्या हाती देताना आनंद होत असल्याचे लेखक दुधाणे यांनी सांगितले आहे. खाशाबा हे आम्हा कुस्तीगीरांचे दैवत असून लेखक संजय दुधाणे यांच्यामुळे खाशाबांची कामगिरी जगापुढे सर्वप्रथम आली याबद्दल त्यांचे कौतुक तेवढे कमी आहे असे महाराष्ट्र केसरी विष्णु जोशीलकर यांनी सांगितले.
खाशाबासारखे ऑलिम्पिकवीर कोल्हापुरातून घडविण्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी असल्याचे शिवाजी साळुंखे यांनी नमूद केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मकोटे यांनी केले तर आभार सागर ठाणेकर यांनी मानले. मोतीबाग तालमीतील पैलवान तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते .

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना विविध नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून १८५ हून अधिक जॉब ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. हेवलेट-पॅकार्ड (एच पी ) कंपनीमध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना ८.५ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे.लॉन्च्ड ग्लोबल या कंपनीने सर्वाधिक ४३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्याखालोखाल अनलॉक्स अकॅडमीने २०, वॉलस्टार टेक्नॉलॉजीजने १९, इन्फोसिसने १३, टेस्टयंत्रा सॉफ्टवेअर सोल्युशन्सने १०, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ९, एज्यू व्हर्सिटी बंगळुरू ८, सायबर सक्सेस ६, आणि एक्सेलआरने ५ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, फोक्सवॅगन इंडिया प्रा. लि., , फॉक्स सोल्युशन्स, मायक्रोलाइज आणि पेगासससह विविध कंपन्यांनीही विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली.
विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून आकर्षक पॅकेज मिळाले असून एचपीमध्ये ८.५ लाख रुपये, टीसीएसमध्ये व लॉन्च्ड ग्लोबल ७ लाख, अनलॉक्स अकॅडमीमध्ये ६ लाख, पेगासस ५.५ लाख रुपये, फॉक्स सोल्युशन्समध्ये ५.४६ लाख, ४.८ लाख, हेक्सावेअरमध्ये ४ लाख, तर इन्फोसिसमध्ये ३.६ लाख रुपये पॅकेज ऑफर केले आहे.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, कोडिंग प्रॅक्टिस, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, करिअर काउन्सेलिंग तसेच प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण दिले जाते. उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर भर दिल्याने त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी मिळत आहेत.
नुकतेच महाविद्यालयाला वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (NBA) मानांकन प्राप्त झाले असून, शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जाही मिळाला आहे. या मान्यतांमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी मिळाली असून, भविष्यात नामांकित कंपन्यांकडून कॅम्पस प्लेसमेंटसाठी अधिक पसंती मिळण्यास मदत होणार आहे.
या निवडीसाठी अधिष्ठाता प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, सीएसई विभागप्रमुख डॉ. राधिका ढणाल , प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता

कुटुंबीयांची घालमेल, शोधासाठी नागरिकांना पोलिसांचे आवाहन

राजापूर/प्रतिनिधी : राजापूर, जि. रत्नागिरी : राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २२ ऑगस्ट २०२६ रोजी कमालुलुद्दीन दाऊद वाडकर (वय अंदाजे ६५ ते ७० वर्षे) हे बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्याने परिसरात चिंता व्यक्त होत असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाडकर यांची उंची अंदाजे ५ फूट ४ इंच असून शरीरयष्टी सडपातळ आहे. रंग सावळा असून केस पांढरे व टकलाकडे आहेत. तसेच त्यांची मिशी पांढरी आहे. बेपत्ता होताना त्यांनी फिकट निळा/पांढरा शर्ट आणि गडद रंगाची पँट परिधान केली होती.
माहिती मिळताच तात्काळ संपर्क करा
कमालुलुद्दीन वाडकर हे कोणाला आढळून आल्यास किंवा त्यांच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास विलंब न करता खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सागर खंडागळे : 9270363328
अमित यादव : 9273926420
नागरिकांनी ही माहिती आपल्या परिसरातील नागरिक, मित्रमंडळी आणि विविध संपर्कगटांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे बेपत्ता व्यक्तीचा शोध लागण्यास मोठी मदत होऊ शकते.

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – हिंदु जनजागृती समिती

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – हिंदु जनजागृती समिती

आधी राज्याच्या मुख्यालयातील अन्नाचा दर्जा कधी सुधारणार ?

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेशोत्सव व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षेचा बडगा दाखवताना, केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांतील ‘महाप्रसाद’ आणि ‘भंडारा’ यांचाच विशेष उल्लेख करून कारवाईचा इशारा दिला आहे. अन्न सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक परंपरांना परवाने, नोंदणी आणि नियमांच्या जंजाळात अडकवण्याचा हा प्रयत्न अत्यंत पक्षपाती व प्रशासकीय दुटप्पीपणाचे उत्तम उदाहरण आहे. बकरी ईद, रमझान ईद, इफ्तार पार्ट्या, नाताळ (ख्रिसमस) किंवा गुड फ्रायडे यांसारख्या इतर धर्मीयांच्या सणांच्या वेळी शिजवले जाणारे अन्न आणि होणारे सार्वजनिक अन्न वितरण एफडीएला दिसत नाही का? त्या वेळी अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जाते का, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे. इतर धर्मीयांच्या सणांनाही हे नियम लागू करून त्यावर कारवाई केली जाणार का, हे एफडीएने जाहीर करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले आहे.तुकाराम मुंढे हे चांगले काम असले, तरी केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य करण्याची भूमिका अजिबात स्वीकारली जाणार नाही, असेही श्री. घनवट यांनी नमूद केले आहे.
श्री. घनवट पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ नुसार कायदा सर्वांना समान लागू झाला पाहिजे, तसेच अनुच्छेद १५ अनुसार शासनाला धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. असे असताना केवळ हिंदूंच्या श्रद्धेशी जोडलेल्या अन्नदानावर आणि भंडाऱ्यांवरच कडक कारवाईची भाषा करणे हा पक्षपात आहे. जनतेला अन्नाच्या दर्जाचे धडे देणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या इमारतींमधील अस्वच्छता दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. राज्याचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालय, आमदार निवास आणि विधान भवन येथील कँटीनमधील अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत खुद्द लोकप्रतिनिधींनीच वारंवार तक्रारी केल्या आहेत. कँटीन व्यवस्थापनाशी आमदारांचे हातघाईवर आल्याचे प्रसंगही महाराष्ट्राने पाहिले आहेत. शासकीय रुग्णालये आणि वसतिगृहांमध्ये रुग्ण व विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न अत्यंत सुमार दर्जाचे असते. स्वतःच्या शासकीय व्यवस्थांमध्ये सुरक्षित अन्न पुरवू न शकणारे अधिकारी निष्काम सेवाभावाने तयार होणाऱ्या ‘महाप्रसादा’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हा संतापजनक प्रकार आहे.
अन्न सुरक्षेचे नियम लागू करायचे असतील, तर ते सर्व धर्मीयांच्या सण-उत्सवांतील अन्न वितरणाला समान रीतीने लागू करावेत. एफडीएने सर्वप्रथम मंत्रालय, आमदार निवास आणि सर्व शासकीय कँटीन्सची झाडाझडती घेऊन तिथल्या अन्नाच्या दर्जाचा अहवाल सार्वजनिक करावा. हिंदूंची मंदिरे, गणेशोत्सव आणि नवरात्रीतील सार्वजनिक मंडळांना परवान्यांच्या नावाखाली त्रास देण्याचा प्रकार करू नये. तसेच अन्नदानाच्या सेवाभावी प्रक्रियेत बाधा निर्माण करू नये, असेही श्री. घनवट यांनी शेवटी म्हटले आहे.