अश्विन शुद्ध प्रतिपदा शारदीय नवरात्रोत्सव च्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची नंदादेवी रूपात पूजा

अश्विन शुद्ध प्रतिपदा शारदीय नवरात्रोत्सव च्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची नंदादेवी रूपात पूजा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ झाला कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचा नवरात्रोत्सव सुरू झाला असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या अंबाबाई देवीच्या नऊ दिवस वेगवेगळ्या पूजा बांधल्या जातात.शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके १९४८ ची आज प्रतिपदा तिथी आज नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर अवतार धारण केलेल्या नंदकन्या नंदादेवी या रूपात सजली होती. दुर्गा सप्तशतीच्या अकरावा अध्यात देवांना शुंभनिशुंभाच्या वधा नंतर वर देताना देवी सांगते की पुन्हा वैवस्वत मन्वंतराच्या २८ व्या द्वापार युगात शुंभ आणि निशुंभ पुन्हा जन्माला येतील तेव्हा तुम्ही नंद गोपाच्या घरी जन्म घेऊन लक्ष्मी श्री इंदिरा कमला या नावाने प्रसिद्ध होईन.
त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी देवकीच्या उदरी जन्म घेतल्यानंतर माता योगमाया यशोदेच्या पोटी जन्माला आली. भगवान श्रीकृष्णांना गोकुळात ठेवल्यानंतर ही कन्या घेऊन वसुदेव कंसाच्या कारागारात आले तिथून कंसाच्या हातून निसटून ही कन्या विंध्याचल पर्वतावर जाऊन विराजमान झाली म्हणून हिला विंध्यवासिनी असेही म्हणतात मध्य प्रदेशातील देवीचे हे स्थान प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विंध्यवासिनीची स्थाने आहेत. पाली खंडोबाच्या लग्नात करवली ची भूमिका बजावणारी ही इंजाई अनेकांची कुलस्वामिनी देखील आहे. सुवर्ण वर्णाची ही देवी वस्त्रे देखील तशीच सोन्याच्या रंगाची घालते हातामध्ये कमळ पाश अंकुश आणि शंख ही चार आयुधे धारण करणारी ही देवी सोन्याच्या रंगाच्या कमळावर विराजमान असते.आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई याच रूपात विराजमान आहे.
सोन्याप्रमाणे अंगकांती असलेली, सोन्याप्रमाणे सुंदर वस्त्र धारण केलेली, सुवर्णवर्णाची आणि उत्तम सुवर्णालंकारांनी अलंकृत असलेली देवी आहे.
कमळ, अंकुश, पाश आणि शंख धारण करणारी, चतुर्भुजा, सोन्याच्या कमळावर विराजमान असलेली इंदिरा, कमला, लक्ष्मी, श्री या नावांनी ओळखली जाणारी देवी अशी तिची महती वर्णन केली आहे.
नंदा देवीचे स्वरूप वर्णन
देवीमाहात्म्य अंतर्गत मूर्तीरहस्यामध्ये नंदा देवीचे स्वरूप वर्णन केलेले आहे. त्यानुसार नंदा देवी ही सोन्यासारखी कांती असलेली, सुवर्णमय वस्त्रे व आभूषणे धारण केलेली आहे. ती चतुर्भुज असून तिच्या चार हातांत कमळ, अंकुश, पाश आणि शंख आहेत.
या देवीची नंदजा, कमला, इंदिरा, श्री आणि लक्ष्मी अशी इतर नावे आहेत. मूर्तीरहस्यानुसार या देवीची स्तुती, पूजन व ध्यान केल्याने तीनही लोक वश होतात.
ही पूजा अजिंक्य मुनिश्वर,
वेदांग मुनिश्वर,सोहम दिलीप मुनिश्वर,रवी माइणकर
यांनी बांधली. आज पहिल्याच दिवशी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती.संस्कृत मध्ये या पूजेचा अर्थ कनकोत्तम कान्ति: सा सुकान्तिकनकाम्बरा ।
देवी कनकवर्णाभा कनकोत्तमभूषणा ॥
कमलाङ्कुशपाशाब्जै: रलंकृता चतुर्भुजा ।
इन्दिरा कमला लक्ष्मी: सा श्रीरुक्मांबुजासना ॥ असा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *