लक्षवेधी फलक म्हैसवर लिहिलेले गोकुळ वाचवा शब्द, आणि लाखो शेतकरी असेच चित्र जिल्हाधिकारी कार्यालयाचे

लक्षवेधी फलक म्हैसवर लिहिलेले गोकुळ वाचवा शब्द, आणि लाखो शेतकरी असेच चित्र जिल्हाधिकारी कार्यालयाचे

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : मलाही संचालक करा संघर्ष, गोकुळ वाचविण्यासाठी संघर्ष मोर्चा असे म्हैसवर लिहिलेले गोकुळ वाचवा आणि संघर्ष मोर्चा शब्द आणि लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा आज लक्षवेधी ठरला. कोल्हापुरातील दसरा चौक जिल्हाधिकारी कार्यालय शेतकऱ्यांनी खचाखच भरलेला रस्ता असे चित्र दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी आज पहावयास मिळाले.गोकुळ दूध संघात शासननियुक्त ४ संचालकांची नियुक्ती केल्याने त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालीली राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या वतीने आज सोमवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. सकाळी दहा वाजता दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली.या मोर्चात राज्यभरातील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी ।छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला सुरुवात झाली. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर मंडप
सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके बसत असल्याने त्यापासून सरंक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर मंडप उभारण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *