महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळातर्फे नागाळा पार्कमध्ये आज १९ ऑक्टोबरला भव्य दांडिया सोहळा!

महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळातर्फे नागाळा पार्कमध्ये आज १९ ऑक्टोबरला भव्य दांडिया सोहळा!

गेल्या दहा वर्षांपासून अविरत परंपरा; नागाळा पार्क परिसरातील सर्वात मोठ्या दांडिया सोहळ्याचे आयोजन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नागाळा पार्क येथे भव्य दांडिया सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून मंडळाच्या वतीने हा सोहळा अविरतपणे आयोजित केला जात असून, यंदाही मोठ्या उत्साहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नागाळा पार्क परिसरातील सर्वात मोठ्या आणि भव्य दांडिया सोहळ्यांपैकी एक म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.
भारतीय संस्कृती आणि पारंपरिक दांडिया-गरबा यांचा वारसा जपण्यासोबतच नागरिकांना सांस्कृतिक मनोरंजनाची संधी उपलब्ध करून देणे, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने या सोहळ्याचे आयोजन करून मंडळाने परिसरातील नागरिकांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दांडिया सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी आयोजकांकडून नियोजन करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणत सांस्कृतिक परंपरा जोपासण्यावर भर दिला जाणार आहे.नागाळा पार्क परिसरातील नागरिकांसह कोल्हापूर शहरातील दांडिया आणि गरबाप्रेमींनी या भव्य सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचा तपशील

आयोजक : महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळ
अध्यक्ष- स्वप्नील माने
उपाध्यक्ष- सूरज साळोखे
सचिव- केतन मोरे
आणि कार्यकर्ते- ओंकार भोसले, मयूर मोर.संदीप पाटील, शेखर पाटील, मयूर भोसले,अमोल बोडके,विनायक पाटील, ओम् गुहागरकर,विश्वेश पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते
दिनांक : सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ सायंकाळी ६ वाजता
भव्य दांडिया सोहळा,स्थळ विशाळगडकर कंपाऊंड, नागाळा पार्क, कोल्हापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *