लक्षतीर्थ वसाहत येथील गवळी कुटुंबीयांचा गणेश ठरत आहे अनेक सेलिब्रिटी आणि गवळी कुटुंबियांसाठी महत्वपूर्
कोल्हापूर/प्रतिनिधी : अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लक्षतीर्थ वसाहत येथील गवळी कुटुंबीयांनी २० वर्षापूर्वी दोन फुटापासून गणेश मूर्ती बसवण्यास सुरुवात केली. या गणेशाच्या आगमनाने गेल्या २० वर्षात गवळी कुटुंबियांसोबतच वसाहत आणि अनेक सेलिब्रेटींचा उद्घार झाला. त्याच्या दर्शनाने जीवन बदलण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. या गणेशाच्या चरणी लिन होण्यासाठी अनेक सेलिब्रेटीं इथे येतात. शनिवारी या मंडळाच्या गणेशाचे मालिकांमधित कलाकार आणि राजकारण्यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने जल्लोषात आगमन झाले. गणेशाच्या दर्शनासाठी लक्षतीर्थ वसाहत लोटली होती.
कोल्हापूरच्या पश्चिम दिशेला पूर्वीचा तोफेचा माळ. शहराचा विस्तार झाला आणि या तोफेच्या माळावर झोपड्या मारून लोकं राहू लागली. याच परिसराला लक्षतीर्थ वसाहत अस देखील म्हटल जात. अतिशय पुण्यभूमी असलेल्या या वसाहतीत झोपडपट्टीमुळ सामाजिक जीवन अस्थिर बनले होते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि शिक्षणाच्या अभावामुळे अनेकजण खून, मारामारी, चोऱ्यामाऱ्याकडे वळले. त्यामुळे समाजात वसाहतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. या परिसराची ओळख गुन्हेगारांची वसाहत अशी बनली. याच परिसरात गवळी कुटुंबियांचं घर. अविनाश आणि मनोज हे दोघेजण कष्ट करून कुटुंब सांभाळत होते. परिस्थितीत नसतानाही त्यांनी दोन फुटी श्री गणेशाच्या मूर्तीची २० वर्षापूर्वी प्रतिष्ठापना केली.
त्यानंतर अविनाश गवळी यांच्या मूर्तीची दरवर्षी उंची वाढत गेली. परिस्थिती बदलण्यासाठी गोवा इथं गेलेला मनोज गवळी यांन तिथं सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात आपला जम बसवला. दरम्यान या गणपतीमुळे अनेकांच्या जीवनाच कल्याण झालं, अशी भावना निर्माण झाल्याने,अनेक जण या उत्सवासाठी कोल्हापुरात येऊ लागले. गवळी कुटुंबियांनी चक्क २० फुटी गणेश मूर्ती श्री प्रेमी मंडळात बसवण्यास सुरुवात केली.
नवसाचा श्री गणेश अशी ख्याती झाल्यामुळे नाट्य, मालिका, चित्रपट, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक जण या गणेशाच्या दर्शनाला दरवर्षी याठिकाणी येतात. सुवर्णालंकार जडीत या गणेश मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतात.
यंदा या श्री गणेशाची आगमन मिरवणूक जल्लोषात निघाली. देव माणूस… या मालिकेतील अभिनेत्री वैशाली कल्याणकर आणि अभिनेते किरण गायकवाड तसेच साताऱ्याचे नगरसेवक पंकज चव्हाण, उद्योजक मनोज गवळी, अविनाश गवळी यांच्या हस्ते या गणेशाचे पूजन झाले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीला प्रारंभ झाला.
विद्युत झोतात निघालेल्या गणेशाच्या आगमन मिरवणूकीत सहभागी होण्यासह गणेशाचे दर्शन आणि सेलिब्रिटींच्या भेटण्यासाठी अवघी लक्षतीर्थ वसाहत या मिरणूकीकडे लोटली होती.नागरिक आणि गणेश भक्तांनी मनोभावे श्रीं प्रेमींच्या गणेशाचे दर्शन घेतले. सामाजिक अस्वस्थता आणि आर्थिक अस्थिरता असलेल्या या परिसरात या श्रींच्या प्रतिष्ठापनेमुळ तरुण पिढी गैरमार्ग सोडून भक्ती मार्गाकडे वळली आहे.

