Skip to content
July 17, 2026
  • Twitter
  • Facebook
  • LinkedIn
  • Instagram
  • YouTube
  • Telegram
My Marathi

My Marathi

आपली बातमी, आपल्या भाषेत

Bigyapaan Image
  • प्रीमियम
  • ताज्या
  • मुख्य
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश
  • ग्लोबल
  • माय मराठी
  • Home
  • भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज  जल्लोषी स्वागत
  • Screenshot_20260301_070108_Drive

Screenshot_20260301_070108_Drive

Post navigation

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज  जल्लोषी स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Formal News

Mymarathinews.co.in (My Marathi) is a digital news platform that provides coverage on a variety of local and national topics in the Marathi language. As of January 2026, the site primarily serves as a news portal focusing on regional developments in Maharashtra, particularly the Kolhapur district.

List Posts
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी – लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे. परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.

My Marathi July 6, 2026
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप

My Marathi July 6, 2026

Recent Posts

  • मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
  • पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी
  • गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ
  • संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान
  • संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान
Links
  • Twitter
  • Facebook
  • LinkedIn
  • Instagram
  • YouTube
  • Telegram

Copyright © 2026 My Marathi Designed by XorTechs | Formal News by Ascendoor | Powered by WordPress.