शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील टायर आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन कळंबा येथे झाले. कळंबा रोडवरील तारालक्ष्मी संकुल तपोवन समोर येथे ही दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे. गेली बारा वर्षे उद्यमनगर येथील पहिल्या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानंतर आता ग्राहकांसाठी ही दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे. या शोरूमचे उद्घाटन एम.आर.एफचे विभागीय व्यवस्थापक अभिनय लघाटे यांच्या हस्ते झाले. जिल्हा व्यवस्थापक आशिष सिंग, न्यू आर. एम. टायर्स चे संचालक शिरीष मुळीक,सौरभ मुळीक आणि प्रणाली सौरभ मुळीक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या नवीन शोरूम मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे टायरची सर्व कामे एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. येथे एम.आर.एफ टायरची संपूर्ण रेंज उपलब्ध असून ॲटोमेटेड टायर चेंजिंग, कॉम्प्युटर व्हील बॅलन्सिंग आणि अलाइनमेंट, ट्यूबलेस टायर रिपेरिंग तसेच नायट्रोजन फिलिंग यासारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. एम.आर.एफ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून दर्जेदार सेवा आणि वातानुकूलित शोरूम मधील सुखद अनुभव हे या शाखेचे वैशिष्ट्य असणार आहे.
एम.आर.एफ ही भारतातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टायर उत्पादक कंपनी आहे, जी तिच्या मजबुतीसाठी आणि टिकाऊपणासाठी ओळखली जाते. १९४६ मध्ये स्थापन झालेली चेन्नई मुख्यालय असलेली ही कंपनी दुचाकी, कार, ट्रॅक्टर आणि अवजड वाहनांचे टायर बनवते. फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवलेली ही एक अग्रगण्य जागतिक ब्रँड असल्याचे एम.आर.एफचे कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक अभिनय लघाटे यांनी बोलून दाखवले.
के.एम. मॅमेन मॅप्पीलाय यांनी मद्रास येथे टॉय बलून (खेळण्यातील फुगे) बनवणारी कंपनी म्हणून सुरुवात केली होती, जी आज टायर उत्पादनात किंग बनली असल्याचे जिल्हा व्यवस्थापक आशिष सिंग यांनी बोलून दाखवले. शिवाय आर.एम टायर्सच्या वतीने गेली बारा वर्षे ग्राहकांसाठी चांगली सुविधा दिली जात असून आता त्यांची दुसरी शाखा कळंबा येथे सुरू झाली आहे. ग्राहकांनी या ठिकाणी भेट द्यावी असे आवाहन केले.
यावेळी स्वागतपर बोलताना सौरभ मुळीक यांनी उद्यमनगर येथे आम्ही ग्राहकांना गेली बारा वर्ष आम्ही सेवा देत आहोत त्या ठिकाणी आम्हाला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे त्यांच्या या आग्रहाखातरच आम्ही आता कळंबा येथे नवीन शाखा सुरू केली असून ग्राहक या ठिकाणी भेट देतील अशा विश्वास व्यक्त केला. तर प्रणाली मुळीक यांनी एम.आर.एफ ही टायर ग्राहकांना नेहमीच आवडीची ठरली आहे. ग्राहकांच्या गाड्यांसाठी ही टायर अत्यंत टिकाऊ आहे त्यामुळे आम्ही ग्राहकांना सेवा देण्यासाठी ही दुसरी शाखा सुरू केल्याचे सांगितले.आभार प्रणाली मुळीक यांनी मानले, सूत्रसंचालन सुखदा मुळीक यांनी केले.

