कोल्हापूर/प्रतिनिधी:
मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पाहीजे, फरार आरोपींचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.पोलीस अधीक्षक यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांनी त्यांचे शाखेकडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांची पथके तयार करून पाहीजे, फरार आरोपींची माहिती काढून कायदेशीर कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या.
जुना राजवाडा पोलीस ठाणे गु.र.नं. 552/2021 भा.द.वि.स. कलम 364(1), 384, 386,388,397,327, 452,120 (ब) सह मोका कलम कलम 3(1), (2), 3(2), 3(4) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे विजय रामचंद्र गौड रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर हा गुन्हा घडलेपासून गेले चार वर्षापासून मिळून येत नव्हता. सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक आरोपी नामे विजय रामचंद्र गौड रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर याचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना त्यांचे गोपनिय बातमी मिळाली की, आरोपी नामे विजय रामचंद्र गौड हा तलवार चौक, सानेगुरूजी वसाहत, कोल्हापूर येथे उभा आहे. सदर बातमीचे अनुषंगाने पथकाने पुष्कराज वाईन शॉपी समोर तलवार चौक, सानेगुरूजी वसाहत, कोल्हापूर येथे जावून सापळा लावून आरोपी नामे विजय रामचंद्र गौड व.व. 42, रा. राम गल्ली, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांस दिनांक 06/01/2026 रोजी 21.00 वा. चे सुमारास ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईकामी जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक साो, श्री. योगेश कुमार व मा. अपर पोलीस अधीक्षक , श्री. डॉ. बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, राम कोळी, रूपेश माने, विनोद कांबळे, सचिन पाटील, अमित मर्दाने यानी केली आहे.

