Friday, October 17, 2025
spot_img
Homeमाय मराठीथॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत सिने अभिनेते जॅकी श्रॉफ करणार सहकार्य

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत सिने अभिनेते जॅकी श्रॉफ करणार सहकार्य

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत सिने अभिनेते जॅकी श्रॉफ करणार सहकार्य

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट

मुंबई/कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदी सिनेमा सृष्टीतील नामवंत कलाकार जॅकी श्रॉफ यांनी आज आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट घेतली. थॅलेसिमिया या रक्ताच्या अनुवंशिक असलेल्या गंभीर आजाराविषयी जॅकी श्रॉफ हे संवेदनशील असून त्याबाबत समाजा मध्ये प्रबोधन करण्याच्या कामात शासनास सहकार्य करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अभिनेते जॅकी श्रॉफ मागिल काही वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून थॅलेसेमिया विषयावर सातत्याने काम करत आहेत. या आजारावर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी, सेवाभावी संस्थां, संघटनांनी, प्रतिष्ठित नागरिकांनी व डॉक्टर्सनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र शासनाच्या ‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी शासनास सहकार्य करण्याबाबत यावेळी अनौपचारिक चर्चा झाली. या आजाराविषयी अधिक चांगली जनजागृती आणि या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप यावे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.या भेटीवेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम पुरी, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, गजेन्द्रराज पुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments