पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मण उद्योजकांची सर्वात मोठी परिषद ब्रह्म ऊर्जा २०२५ आज होणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मण उद्योजकांची सर्वात मोठी परिषद ब्रह्मऊर्जा २०२५ ही आज हॉटेल सयाजी येथे पाहायला होत आहे. या परिषदेमध्ये
व्यवसायिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, नेटवर्किंग सेशन्स उत्कृष्ट उद्योमशीलता पुरस्कार यशस्वी उद्योजक आणि तज्ञांचे मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे.या काळात परिषदेसाठी क्रिकेट समीक्षक श्री सुनंदन लेले आणि श्री अर्जुन देशपांडे स्टार्टर्स सक्सेस मार्गदर्शन करणार आहेत.
ब्राह्मण उद्योजकांनी एकत्र येऊन रचनात्मक कार्य करावे यासाठी गेल्या आठ वर्षापासून अविरत काम करणारे संस्था ब्राह्मण बिजनेस फोरम दरवर्षी संपन्न होणारी ब्रम्हऊर्जा ही उद्योग परिषद हा त्याचाच एक भाग असून उद्या ३० नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या परिषदेमध्ये श्री नितीन वाडीकर, श्री विजय पत्की,डॉक्टर रोहिणी परांडेकर, श्री सचिन शानबाग,श्री सुहास जोशी आदींना पुरस्कृत केले जाणार आहे.असे ब्राम्हण बिझनेस फोरमचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी,उपाध्यक्ष नरेंद्र जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सेक्रेटरी अजिंक्य देशपांडे, जॉईंट सेक्रेटरी अभिजीत कुलकर्णी, संचालक संजय पंडित, ट्रेझरर शैलेश देशपांडे, पराग जोशी शैलेश देशपांडे राजेश छत्रे प्रदीप कुमार लिंगसुर आदी उपस्थित होते.

