श्री. स्वामी समर्थ दत्तभक्त मंडळ नेहरूनगर तर्फे दत्त जयंती उत्सवाचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री.स्वामी समर्थ दत्त भक्त मंडळ नेहरूनगर तर्फे ३० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर असा दत्त जयंती उत्सव साजरा होत असून या उत्सव काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी सकाळी अभिषेक आणि आरती सायंकाळी आरती होणार आहे.या उत्सव काळामध्ये ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री सूक्त पठण आणि रात्री ८ वाजता श्री दत्त माऊली महिला भजनी मंडळ नेहरूनगर यांचे भजन होणार आहे. १ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता श्री वसंतराव अर्दळकर प्रस्तुत तुझे गीत गाण्यासाठी हा बहारदार गीतांचा कार्यक्रम होणार आहे.२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता रोहिणीज कथक स्टुडिओ प्रस्तुत नृत्याविष्कार सादर होणार आहे. ३ डिसेंबर रोजी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक भजनी मंडळ वडणगे यांचे भजन सादर होणार आहे.तर ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पालखी सोहळा ६ वाजता श्री.दत्त जन्मकाळ सोहळा आणि रात्री ७ वाजता प्रसाद वाटप होणार आहे. तर ५ डिसेंबर रोजी महाप्रसादाचे नियोजन विधायक युवक संघटना तर्फे करण्यात आले आहे या सर्व उत्सवासाठी किरण रणदिवे, पुरुषोत्तम कुलकर्णी,अतुल हासूरकर,चारुदत्त रणदिवे,गजानन शिंदे,अतुल हसुरकर, किरण रणदिवे,विजय चव्हाण,जयसिंग राऊत,प्रसाद उगवे आदींनी परिश्रम घेतले आहे.

