*डॉ. संजय डी. पाटील: एक दूरदर्शी कुलपती!*

*डॉ. संजय डी. पाटील: एक दूरदर्शी कुलपती!

प्रा. रवी मा. सातपुते, तळसंदे

 

 

 वयाच्या फक्त अठराव्या वर्षात मा. डॉ. डी. वाय. पाटील साहेबांनी बावडा इंजिनीअरिंग कॉलेजची जबाबदारी मा. कुलपती यांच्याकडे दिली होती. नवीन जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे पेलेल याची त्यांना पूर्ण खात्री होती. कारण जिद्द आणि चिकाटी हे दोन्ही पैलू व्यक्तिमत्वात झळकत होते. लहानपणापासूनच आई-वडिलांकडून स्व कर्तृत्वाचे धडे मिळाले होते. ध्येयवादी कर्माची उर्जा नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. हे सर्व एकत्र येऊन त्यातून जे काही निर्मित झालं ते नेत्रदीपक, अद्भूत आणि अलौकिक आहे.“डी. वाय. पाटील संस्था मोठी होण्यामागे फक्त माझे कष्ट नसून संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आहे. सर्वांच्या सहकार्याने आणि शुभ आशीर्वादाने घडलेले आहे.” असे स्पष्ट मत डॉ. संजय डी. पाटील यांचे आहे. याचा उल्लेख करायला ते कधीच विसरत नाहीत. समूहाच्या सुरुवातीच्या काळात २००-३०० लोकं काम करत होती. आज हाच आकडा ४५०० च्या घरात गेलेला आहे. याचे सर्व श्रेय ते समूहातील सर्व लोकांना देतात. घराची आणि व्यवसायाची घडी बसवत असताना अनेक संकटे आली. कित्येकदा मन निराश झालं. पण आपल्याला यातून काहीही करून पुढे जायचं आहे हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.   सध्या समूहाची धुरा अध्यक्ष तथा कुलपती सन्माननीय डॉ. संजय डी. पाटील सांभाळत आहेत. तसेच मा. उपाध्यक्ष म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे मार्गदर्शक आणि छोटे बंधू मा.सतेज उर्फ बंटी डी. पाटील आहेत. “संजय-सतेज” म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी! मोठा भाऊ म्हणून वडीलधारा माणूस, मार्गदर्शक, गुरु आणि एक चांगला मित्र या सर्व भूमिका एकाच वेळीपार पाडत आलेले आहेत. व्यवसायापेक्षा शेतीत आवड असल्याने चांगल्या शेतीच्या शोधात असताना ‘इच्छा असेल तर मार्ग दिसेल’ या उक्तीनुसार कोल्हापूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर वाठार नजीक असलेल्या ‘तळसंदे’ गावात शेती घेतली. शेती घेणे मोठी गोष्ट नव्हती पण त्या जमिनीचा विकास करणं हेच खूप मोठं आश्वासन त्यांच्यापुढे आवासून उभं होतं. कारण, ही जमीन पक्क्या स्वरुपाची नव्हती. फक्त माळरान असल्याने सुपिकतेचा गंध देखील नव्हता. तसेच ही २०५ एकर जमीन कुणा एका मालकीची नव्हती.

अनेक लोकांना एकत्र आणून मनातील विचार पटवून देणं अवघड होतं. अगदी सुरुवातीच्या काळात या माळरानावर एक इंच देखील मातीचा थर पाहायला मिळत नव्हता. यावर उपाय म्हणून शेकडो मातीचे ढीग ओतून हि उणीव दूर केली. गतकाळात याच खडकाळ माळाचे रुपांतर डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे मध्ये करून कृषी, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक क्षेत्रात खूप मोठा सकारात्मक बदल केला गेला. या ठिकाणी हजारों विद्यार्थ्यांचे भविष्य फुलताना दिसत आहे. हाच खडकाळ माळ आज प्रभावी शिक्षण, हजारों तरुणांच्या हाताला काम आणि शेकडो संसारांना हातभार लावत आहे. त्या काळात ‘तळसंदे’ च्या माळ रानावर ‘कृषी विज्ञान केंद्र’ उभारून पुढील काळात जागतिक दर्जाचे कृषी विद्यापीठ असाव अशी मनी मनीषा बाळगली. डॉ. पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार देखील देण्यात आले. शासनाच्या विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी बघून ‘वनश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आलं. डॉ. पाटील शेतीची सुरुवातीपासून त्याना आवड असल्याने त्यांनी हे शिवधनुष्य पेललं. १९९४ साली पाण्याचो सोय करून खडकाळ मातीला जीवित करण्याचं काम केलं. शेतीचे नवनवीन प्रयोग करून अशक्य गोष्टी शक्य केल्या. डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे खूप कमी काळात प्रसिद्धीस उतरल्याने महाराष्ट्रातील विविध भागातील लोक भेट देऊन मार्गदर्शन घेत आहेत. कुणी विचारही केला नसेल कि या जाग्यावर एक ‘कृषी विद्यापीठ’ उभा राहू शकतं. मा. कुलपती आठवणी सांगताना म्हणतात की, “ या सर्व गोष्टी सत्यात आणत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे”. पण मी थांबलो नाही. काम करत राहिलो; मार्ग मिळत गेला.” संपूर्ण राज्यभर पसरलेल्या समूहाचे सर्वेसर्वा असून देखील अंगी आहे कमालीची नम्रता!

डी. वाय. पाटील समूह दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात आपले अधिपत्य गाजवत आहे. जगाच्या पाठीवर कोल्हापूर जिल्हा ‘अतिथी आदरतिथ्य’ या बाबतीत नेहमीच पुढे असतो.. ‘अतिथो देवो भवं!’ या उक्तीला प्रमाण मानून पंचतारांकित ‘हॉटेल सयाजी’ची स्थापना करण्यात आली. इथं देखील जास्तीत जास्त तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा हाच ध्यास होता. जगाच्या सबंध भागातून येणाऱ्या अतिथी वर्गाला उत्तम सेवा देण्यात सयाजी कधीही मागे हटले नाही. हे सर्व घडत असताना ‘ऋणानुबंध’ हा निकष अग्रभागी होता. एका बाजूला प्रगतीची नवनवीन शिखरे सर करत असताना समाजाप्रती असणारे ऋण अदा करण्यासाठी डी. वाय . पाटील प्रतिष्टानची (ट्रस्ट) स्थापना केली. लहान मुले ,तरुण, वृध्द या सर्वच वयोगटातील लोकांना कैक मार्गाने आधार देण्याचं काम प्रतिष्टान करत असते. कोल्हापूर जिल्ह्यातील मुलांना मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी पुणे, मुंबई किंवा बेळगाव अशा ठिकाणी जावं लागायचं. समाजातील ही उणीव भरून काढण्यासाठी सन १९८९ साली कसबा बावडा, कोल्हापूर येथे ‘डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजची स्थापना केली. डॉक्टर आणि संशोधक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही संस्था निमित्त झाली. गेल्या तीन दशकात हजारों डॉक्टर्स या कॉलेजने घडवले. देशात आणि परदेशात संस्थेचे प्रतिनिधित्व करत आहेत. सन २००३ साली कोल्हापूर येथील कदमवाडी येथे ‘स्वार्थ आणि परमार्थ’ या दोन तत्वावर ८१० बेडचे सुसज्ज आणि अत्याधुनिक हॉस्पिटल उभारले. मा. कुलपती यांचे योग्य व्यवस्थापन, अचूक मार्गदर्शन आणि भक्कम आधार यामुळे डी. वाय. पाटील हॉस्पिटल पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर मानलं जातं. लाखो लोकांच्या जीवनात नव संजीवनी देण्याचं काम या हॉस्पिटलने करत आलेलं आहे. मेडिकल कॉलेज, कसबा बावडा सुरुवातीच्या काळात खूप तोटा सहन करावा लागला. या पडत्या काळात माझ्या लोकांनी मला आधार दिला म्हणूनच मी आज यशस्वीपणे उभा आहे. त्या सर्व व्यक्तींचे मानावे तितके आभार कमीच आहेत. आज देशाच्या विविध राज्यात आणि परदेशात आपले विद्यार्थी आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ज्यावेळेस आपल्या महाविद्यालायातून शिकून गेलेला विद्यार्थी खूप मोठं यश संपादन करतो त्याचवेळी काम करण्यास आणखी हुरूप येतो. आयुष्यात मोठं होण्यासाठी संयमी असणं किती गरजेची आहे याचं जीवंत उदाहरण म्हणून डॉ. पाटील यांच्याकडे पाहता येईल. विदेशी गाड्यांचा ताफा सोबत शेकडो ड्रायव्हर असताना देखील स्वतः गाडी चालवताना बहुतांश वेळा दिसत असतात. जगाच्या इतिहासात ज्या ज्या व्यक्ती यशस्वी झालेल्या आहेत. त्यांची कार्ये आणि वर्तन आपल्याला अचंबित करत असतात. एखाद्या कर्मचारी सोबत जिव्हाळ्याचे सबंध कसे असावेत याची कल्पना येते. यासाठी कष्ट आहेच पण सर्वात महत्वाची इथे नमूद करणं गरजेची आहे ती म्हणजे ज्या ज्या वेळी डॉ. संजय डी. पाटील आपल्या भाषणात समूहाचा उल्लेख करत असताना ‘माझा समूह’ न म्हणता ‘आपला समूह’, आपला ग्रुप, आपले कॉलेज, आपले हॉस्पिटल असाच उल्लेख करतात. परिणामी, समूहात काम करत असणाऱ्या लोकांना देखील आपुलकी वाटते, त्यांना समूह आपला वाटतो. डी. वाय. पाटील समूह एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे आपण सर्वजण सदस्य आहोत. या कुटुंबात कोणीही मोठा नाही, कोणीही लहान नाही. संस्थेत काम करत असताना संस्थापक म्हणून कायद्यावर बोट असतं; पण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला प्रेरणेची शाबासकी नेहमीच मिळत असते. आपण सर्वजण समान आहोत. या सर्व गोष्टी त्यांच्या बोलण्यातून नेहमीच अनुभवण्यास मिळतात. आपल्या कुटुंबाबरोबरच डी. वाय. पाटील समूहाचा पालक म्हणून नेटाने जबाबदरी पेलत आहेत. शैक्षणिक , सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली कामाचा ठसा उमटवत आहेत.

फक्त आर्थिक पाठबळामुळे कित्त्येक विदयार्थी- विद्यार्थिनी अभियांत्रिकी शिक्षणापासून आज देखील वंचित आहेत. याला कायम स्वरूपी पर्याय म्हणून मा. चेअरमन यांच्या ‘सामाजिक तळमळ’ कल्पनेतून जन्मलेली ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’ म्हणजे होतकरू आणि कष्टाळू विदयार्थ्यांना त्यांच्या कष्टाची मिळालेली पोच पावती म्हणावी लागेल. फक्त मेरीटला महत्व देऊन यासारख्या होतकरू विद्यार्थी वर्गाला, न्याय देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डी. वाय. पाटील समूहाचे मा. विश्वस्त आणि कोल्हापूर दक्षिणचे लाडके आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून ही करोडो रुपयांची स्कॉलरशिप सन २०२२ सालापासून चालू केली आहे. आज देखील डी. वाय. पाटील समूहाच्या इतिहासात ज्या-ज्या विद्यार्थ्यांना शिकायचं आहे, शिकण्याची इच्छा खूप आहे पण परिस्थिती आड येत असेल पैशाविना धाडस करता येत नाही. मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो की माणुसकी आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची तळमळ पाहून अनेक विद्यार्थ्यांना फ्री मध्ये प्रवेश दिल्याचे दाखले संस्थेच्या इतिहासात आहेत. पण मा. अध्यक्ष यांच्याकडून या ‘निस्वार्थी’ गोष्टींचा उल्लेख देखील केला जात नाही कारण डॉ. संजय डी. पाटील यांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष पाहिला आहे. शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे. आपल्या कष्टाच्या सामर्थ्यावर एवढं सगळं साम्राज्य निर्माण करून देखील ‘पाटील’ कुटुंबातील प्रत्येक सदस्याने “Down to Earth” या सिद्धांताला कधीही फाटा दिलेला नाही. असामान्य व्यक्तिमत्वे असून देखील सामान्यच राहणे नेहमी पसंत केलं आहे. एक वेळ अशी होती की कसबा बावड्यातील श्रीराम सोसायटीच्या समोरील चौकात उभारून विकलेल्या उसाच्या वाड्याच्या पेंड्या या सर्व गोष्ट आज देखील स्मरणात आहेत. त्यामुळे आपल्यामुळे कुणी वंचित राहता कामा नये याकडे जास्त लक्ष असतं. भूतकाळ विसरणारी मानसं भविष्यकाळ सोनेरी करूच शकत नाही. एकेकाळी बजाज कंपनीची M-AT दुचाकी ते करोडो रुपयांच्या गाड्या ताफ्यात आल्या तरी ‘माणूस’ मात्र बदलला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *