भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन
आशा भोसले यांना आदरांजली कोल्हापूरकरांना संगीताचा अनुभव घेण्याचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी :.भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी, कोल्हापूर यांच्या वतीने स्वरसमराज्ञी स्वर्गीय आशा भोसले यांच्या अमर गीतांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वर आशा’ या विशेष गीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा श्रद्धांजली कार्यक्रम आज शनिवार, दिनांक २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता भाजप जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात भाजप सांस्कृतिक आघाडीचे पदाधिकारी आशा भोसले यांच्या अजरामर सुरांनी सजलेल्या गीतांचे सादरीकरण करतील. हा कार्यक्रम भारतीय संस्कृती आणि संगीताचा गौरव करणारा असून, सर्वसामान्यांना आपल्या समृद्ध वारशाशी जोडण्याचा एक प्रयत्न आहे. या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर शहरातील सर्व संगीतप्रेमी रसिक श्रोत्यांना या अनोख्या मैफिलीचा आनंद घेण्यासाठी आणि महान गायिका आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

