कोल्हापूरच्या शिवाय महेशवर शितोळे यास आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त
कोल्हापूर/प्रतिनिधी : नेपाळ, काठमांडू येथील बहुउद्देशीय ज्युडो स्टेडियम, लॅनचोर येथे शनिवार दिनांक १५ व १६ मे २०२६ रोजी ११ वी ज्युनिअर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत कोल्हापूरचा शिवाय महेशवर शितोळे याने रौप्य पदक प्राप्त केले आहे. तसेच याची निवड श्रीलंका येथे होणाऱ्या कराटे स्पर्धेसाठी झाली आहे.सदर स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून टनेल डोजो कराटे असोसिएशन नेपाळचे चिफ, मा . नरेश श्रेष्ठ , बागमती प्रदेश पूर्व सामाजिक विकास मंत्री मा. हरी प्रभा सदगी, नेपाळ राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू संघ अध्यक्ष मा. दीपक श्रेष्ठ , शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष मा. सिहान रमेश पिसाळ अविनाश पाटील उपस्थीत होते .
यामध्ये नेपाळ ,भारत , भूतान , बांगलादेश सह इतर देशातील ६०० हून अधिक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.यामध्ये भारत देशातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.शिवाय शितोळे हा न्यु माॅडेल इंग्लिश स्कूल, कोल्हापूरचा दुसरीचा विद्यार्थी आणि शोतोकाॅन कराटे डो – असोसिएशनचा खेळाडू असून त्याला अध्यक्ष रमेश पिसाळ, सचिव सुषमा पिसाळ, आई डाॅ. अक्षरा शितोळे , वडील डाॅ.महेशवर शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले .

