शिवशस्त्रशौर्यगाथा या भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्रप्रदर्शनाचे उद्या उद्घाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त मराठा योद्ध्यांकडून वापरली गेलेली शस्त्रे यांना अभिवादन म्हणून शिवशस्त्रशौर्यगाथा या भव्य मराठाकालीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापुर येथे करण्यात आले आहे. या भव्य मराठाकालीन शस्त्रप्रदर्शनाचे उद्घाटन माननीय नामदार ॲङ आशिष शेलार, मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व जिल्ह्यातील मंत्री आणि खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत दिनांक २८ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी. ९.३० वा. संपन्न होत आहे.
या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय लंडन येथुन करार तत्वावर आणण्यात आलेली “वाघनख” असून या प्रदर्शनामध्ये ज्येष्ठ शस्त्रसंग्राहक व अभ्यासक दिवंगत गिरीशराव जाधव यांच्या महाराष्ट्र शासनाने संपादित केलेल्या शस्त्र संग्रहातील निवडक शस्त्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. हे प्रदर्शन जन सामान्यांना पाहण्याकरिता उद्या दिनांक २८.१०.२०२५ पासुन दिनांक ०४.०५.२०२६ पर्यंत खुले राहणार आहे.
तरी या प्रदर्शनाचा सर्व जन सामान्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडून करण्यात येत आहे.







