Grid Posts

View All
माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

Thumbnail

View All
My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

Tile List

View All
माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन कोल्हापूर (जिमाका) : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी…

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

माय मराठी

येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

List Posts

View All
माय मराठी

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक भुये (ता. करवीर) : जोतिबा चैत्र…

My Marathi

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र…

My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला! कोल्हापूर/प्रतिनिधी: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड…

My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा कोल्हापूर/प्रमोद पाटील  : "चांगभलं" च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून…

Thumbnail

View All
My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या १२ विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’ मध्ये निवड

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या १२ विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’ मध्ये निवड तळसंदे/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कृषी व…

माय मराठी

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या* १२  विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’ मध्ये निवड

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या* १२  विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’ मध्ये निवड तळसंदे/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कृषी व…

माय मराठी

डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मान

डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा* ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मान -कझाकिस्तानमधील परिषदेत अमृता फडणवीस यांच्याहस्ते पुरस्कार -डॉ. राजेश ख्यालप्पा, अजित पाटील यांनी…

माय मराठी

एलेन करियर इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्रात आणखी एक पाऊल कोल्हापुरात ऑफलाइन क्लासरूम सेंटर सुरू

एलेन करियर इन्स्टिट्यूटचे कोल्हापुरात ऑफलाइन क्लासरूम सेंटर सुरू एलेन करियर इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्रात आणखी एक पाऊल  एलेन शार्प द्वारे दि. २१…

माय मराठी

बाटलीतून पेट्रोल विक्री केल्यास कायदेशीर कारवाई

बाटलीतून पेट्रोल विक्री केल्यास कायदेशीर कारवाई कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्व पेट्रोल/डिझेल पंप चालकांनी पेट्रोल पंपावर बाटलीतून पेट्रोल देणे तात्काळ बंद…

माय मराठी

चेतना अपंगमती विकास संस्था व इनरव्हील मुव्हमेंट ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन

चेतना अपंगमती विकास संस्था व इनरव्हील मुव्हमेंट ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा…

माय मराठी

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक; दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक; दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड  …

माय मराठी

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचामध्ये सहभाग

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचामध्ये सहभाग कोल्हापूर/प्रतिनिधी: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. प्रमोद…

माय मराठी

एनआयटीमध्ये ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न

एनआयटीमध्ये ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये डिग्री इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांमधील…

माय मराठी

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या २४ विद्यार्थ्यांची ‘K12 टेक्नो सर्व्हिसेस’मध्ये निवड

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या २४ विद्यार्थ्यांची ‘K12 टेक्नो सर्व्हिसेस’मध्ये निवड तळसंदे/प्रतिनिधी :  डी. वाय. पाटील कृषी व…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या १२ विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’ मध्ये निवड

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या १२ विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’ मध्ये निवड

तळसंदे/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठच्या बी. टेक. एग्री. च्या अंतिम वर्षाच्या १२ विद्यार्थ्यांची निवड ‘क्रॉप क्रेझ अ‍ॅग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रतिष्ठित कंपनीमध्ये निवड झाली आहे. क्रॉप क्रेझ अ‍ॅग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही पुणे स्थित कंपनी असून अत्याधुनिक उपायांसह शेतीला सक्षम बनवन्यायासाठी कार्यरत आहे.उच्च दर्जाचे कृषी उत्पादन विक्री, शाश्वत वाढीसाठी तज्ञ सल्लागार सेवा कंपनीद्वारे पुरवली जाते. या कंपनीच्यावतीने विद्यापीठात कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन पात्र विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. त्यातून 12 विद्यार्थ्यांची कंपनी अधिकाऱ्याकडून निवड करण्यात आली.
यामध्ये प्रणील पाटील, संकेत जाधव, साहिल मगदूम, आदित्य काटे, अभिजीत पाटील, संदेश सरगर, ओंकार पाटील, व्यंकटेश मोहिते, सुयश पाटील, स्नेहा चव्हाण, तन्वी पाटोळे, श्रद्धा पाटील यांची निवड झाली आहे. प्लेसमेंट ऑफिसर प्रदीप पाटील व स्वराज पाटील, विभाग प्रमुख मंगल पाटील, विभाग समन्वयक अमोल घाडगे यांचे या विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, आधुनिक कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून आमच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’सारख्या नावाजलेल्या अॅग्री-टेक कंपनीमध्ये झालेली निवड ही त्यांच्या कौशल्याची मोठी पावती आहे. संशोधनाधारित आणि प्रयोगाधारीत शिक्षणामुळे विद्यार्थ्याना कृषी क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यांनी मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्याचे कुलपती डॉ.संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, वित्त अधिकारी सुजित सरनाईक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या* १२  विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’ मध्ये निवड

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या* १२  विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’ मध्ये निवड

तळसंदे/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठच्या बी. टेक. एग्री. च्या अंतिम वर्षाच्या १२ विद्यार्थ्यांची निवड ‘क्रॉप क्रेझ अ‍ॅग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रतिष्ठित कंपनीमध्ये निवड झाली आहे.क्रॉप क्रेझ अ‍ॅग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही पुणे स्थित कंपनी असून अत्याधुनिक उपायांसह शेतीला सक्षम बनवन्यायासाठी कार्यरत आहे.उच्च दर्जाचे कृषी उत्पादन विक्री, शाश्वत वाढीसाठी तज्ञ सल्लागार सेवा कंपनीद्वारे पुरवली जाते. या कंपनीच्यावतीने विद्यापीठात कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन पात्र विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. त्यातून १२ विद्यार्थ्यांची कंपनी अधिकाऱ्याकडून निवड करण्यात आली.                                                                  यामध्ये प्रणील पाटील, संकेत जाधव, साहिल मगदूम, आदित्य काटे, अभिजीत पाटील, संदेश सरगर, ओंकार पाटील, व्यंकटेश मोहिते, सुयश पाटील, स्नेहा चव्हाण, तन्वी पाटोळे, श्रद्धा पाटील यांची निवड झाली आहे. प्लेसमेंट ऑफिसर प्रदीप पाटील व स्वराज पाटील, विभाग प्रमुख मंगल पाटील, विभाग समन्वयक अमोल घाडगे यांचे या विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, आधुनिक कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून आमच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांची ‘क्रॉप क्रेझ’सारख्या नावाजलेल्या अॅग्री-टेक कंपनीमध्ये झालेली निवड ही त्यांच्या कौशल्याची मोठी पावती आहे. संशोधनाधारित आणि प्रयोगाधारीत शिक्षणामुळे विद्यार्थ्याना कृषी क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यांनी मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्याचे कुलपती डॉ.संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, वित्त अधिकारी सुजित सरनाईक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मान

डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा*
‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मान

-कझाकिस्तानमधील परिषदेत अमृता फडणवीस यांच्याहस्ते पुरस्कार
-डॉ. राजेश ख्यालप्पा, अजित पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी :
लाखो रूग्णापर्यंत सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या कदमवाडी येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टीटयूटचा ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मान करण्यात आला. कझाकिस्तान येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स समिट’ मध्ये बँकर अमृता फडणवीस यांच्याहस्ते ‘आऊटस्टँडिंग मेडिकल एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्विसेस इन वेस्टर्न महाराष्ट्र’ पुरस्काराने हॉस्पिटलचा गौरव करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्यावतीने मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा आणि सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कझाकिस्तानच्या अल्माटी शहरामध्ये माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप “नवभारत”च्यावतीने ‘ग्लोबल एक्सलन्स समिट’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या चर्चासत्रामध्ये उच्च शिक्षण, वैद्यकीय, कृषीसह विविध क्षेत्रातील तज्ञ सहभागी झाले होते. यावेळी भारतातील माजी राजदूत बलुत सार्सेनबाये, ‘नवभारत’चे संचालक वैभव माहेश्वरी उपस्थित होते.
या परिषदेत उच्च शिक्षण आणि कृषी क्षेत्रात ‘कझाकिस्तान आणि भारत यांच्यातील सहकार्याच्या संधी’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात डॉ. राजेश ख्यालप्पा यांनी सहभाग घेतला. मेडिकल शिक्षणासाठी कझाकिस्तान आणि भारतीय संस्थांमध्ये सहकार्य करार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी व प्राध्यापक यांची देवाण-घेवाण, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुप पुढाकार घेण्यास तयार आहे. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सिम्युलेशन लॅब विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हॉस्पीटलला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी अतिशय आनंद व्यक्त केला. गेल्या दोन दशकापासून रुग्णसेवेत आम्ही देत असलेल्या योगदानाचा हा गौरव आहे. गेल्या काही वर्षापसून हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत उपचार सुविधा दिली जात आहे. यापुढेही प्रत्येक गरजवंत रूग्णापर्यत आरोग्यसेवा पोहचविण्यासाठी आम्ही कार्यरत राहू अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, उपधिष्ठता डॉ. पद्मजा देसाई, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे सर्व प्राध्यापक, डॉक्टर्स, परिचारिका, सहाय्यक, सर्व कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

एलेन करियर इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्रात आणखी एक पाऊल कोल्हापुरात ऑफलाइन क्लासरूम सेंटर सुरू

एलेन करियर इन्स्टिट्यूटचे कोल्हापुरात ऑफलाइन क्लासरूम सेंटर सुरू

एलेन करियर इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्रात आणखी एक पाऊल 

एलेन शार्प द्वारे दि. २१ डिसेंबर रोजी रोख बक्षिसे आणि ९०% पर्यंत शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील आघाडीची अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. एलेन करियर इन्स्टिट्‌यूट प्रायव्हेट लिमिटेड संस्थेने राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्रापैकी एक असलेल्या कोल्हापुरात त्यांचे ऑफलाइन क्लासरूम सेंटर सुरु करीत असल्याचे जाहीर केले. रविवारी हॉटेल द फर्न, कोल्हापूर येथे आयोजित उद्‌द्घाटन समारंभ आणि पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.या कार्यक्रमात ‘एलेन’चे संचालक श्री. नवीन माहेश्वरी, झोनल प्रमुख आणि उपाध्यक्ष श्री आशुतोष हिसारिया, उपझोनल प्रमुख आणि एलेन पुर्ण सेंटर प्रमुख श्री अरुण जैन, एलेनचे माजी वि‌द्यार्थी, स्थानिक शाळांचे मुख्याध्यापक आणि पालक उपस्थित होते. समारंभात, मान्यवरांनी संयुक्तपणे एलेन कोल्हापूरचे अधिकृत पोस्टर अनावरण केले. या नव्या शाखेसह एलेन महाराष्ट्रात आपले अस्तित्व मजबूत करत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, नाशिक, लातूर, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर येथे पूर्वीपासून ऑफलाइन केंद्रे चालवत आहेत.कार्यक्रमात बोलताना संचालक श्री. नवीन माहेश्वरी म्हणाले, “एलेन चे ध्येय प्रत्येक विद्यार्थ्यांला दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे आहे. आमच्या प्रमुख वर्ग केंद्रांमध्ये प्रवास करू न शकणाऱ्या वि‌द्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. कोल्हापुरात जागरुक आणि आकांक्षी पालक समुदाय आहे, जो त्यांच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही कोल्हापुरात हा प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहोत. वि‌द्यार्थी आणि पालक संपूर्ण महाराष्ट्रात एलेन वर असलेला विश्वास वाढवतील अशी आम्हाला खात्री आहे.”नवीन केंद्राब‌द्दल माहिती देताना, झोनल प्रमुख श्री. आशुतोष हिसारिया यांनी सांगितले की एलेन कोल्हापूर कार्यालय रीजेंट टॉवर, २२३-E वॉर्ड, ताराबाई पार्क येथे सुरू झाले आहे. वि‌द्यार्थी प्रवेश आधीच सुरु झाले आहेत. सुरुवातीच्या बॅचमध्ये प्रवेश घेणान्या वि‌द्यार्थ्यांना दुप्पट शिष्यवृत्ती लाभ, मागील फी रचनेनुसार प्रवेश आणि एलेन शार्प मधील कामगिरीवर आधारित अतिरिक्त शिष्यवृत्ती मिळणार आहे, जी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. एलेन शार्प द्वारे, वि‌द्यार्थ्यांना आकर्षक रोख बक्षिसांसह एलेन शुल्कावर 90% पर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते.एलेन कोल्हापूर इयत्ता ७ वी ते १२ वी उत्तीर्ण वि‌द्यार्थ्यासाठी तसेच १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध अभ्यासिका कार्यक्रम आयोजित करेल. या अभ्यासक्रमांमध्ये JEE (मेन्स व अॅडव्हान्स), NEET-UG, MHT-CET, ऑलिंपियाड आणि PNCF (प्री-नर्चर आणि करियर फाउंडेशन) यांचा समावेश असेल.

एलेन करियर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड ब‌द्दल

१८ एप्रिल १९८८ रोजी स्थापन झालेली एलेन करियर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील आघाडीची कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. जी सध्या २४ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमधील ७६ शहरांमध्ये अभ्यास केंद्रां‌द्वारे कार्यरत आहे. तसेच ७ देशांमध्ये कार्यरत आहे. एलेन चे संपूर्ण भारतात ३०० हून अधिक वर्ग कॅम्पस आणि ४०० हून अधिक कोचिंग क्लासेस आहेत. स्थापनेपासून, एलेन ने ४० लाखांहून अधिक वि‌द्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. ही संस्था प्री-इंजिनिअरिंग (जेईई मेन्स आणि अॅडव्हान्स्ड), प्री-मेडिकल (नीट-यूजी), आणि प्री-नर्चर अॅड करियर फाउंडेशन (इयत्ता ६ वी ते १० वी आणि ऑलिंपियाड) साठी प्रशिक्षण देण्यात अग्रेसर आहे. गेल्या १६ वर्षात २७ एलेन वि‌द्यार्थ्यांनी प्रतिष्ठित अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये ऑल इंडिया रैंक-१ मिळवला आहे.

बाटलीतून पेट्रोल विक्री केल्यास कायदेशीर कारवाई

बाटलीतून पेट्रोल विक्री केल्यास कायदेशीर कारवाई

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्व पेट्रोल/डिझेल पंप चालकांनी पेट्रोल पंपावर बाटलीतून पेट्रोल देणे तात्काळ बंद करावे अन्यथा बाटलीतून पेट्रोल विक्री केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
बाटल्या, कॅन (जे विशेषतः इंधन साठवण्यासाठी प्रमाणित केलेले नाहीत) किंवा तत्सम कोणत्याही असुरक्षित व अप्रमाणित कंटेनरमधून इंधनाची (पेट्रोल/डिझेल) विक्री आणि वितरण करणे हे अत्यंत धोकादायक आणि पूर्णपणे निषिद्ध आहे.

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल/डिझेल पंप चालकांनी खालीप्रमाणे दक्षता घ्यावी.

तात्काळ बंदीची अंमलबजावणीः आजपासून, जिल्ह्यातील आपल्या अखत्यारीतील सर्व पेट्रोल/डिझेल पंपांवर बाटलीतून किंवा इतर असुरक्षित कंटेनरमधून इंधन विक्री पूर्णपणे थांबवण्याची तातडीने व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. विक्री अधिकाऱ्यांची जबाबदारी आपण आपल्या क्षेत्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर भेट देऊन, या नियमाचे उल्लंघन होत नाही ना याची खात्री करावी. नियमांचे उल्लंघनः नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही पेट्रोल पंप चालकास तातडीने कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावावी आणि आवश्यकतेनुसार त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी. यात परवाना रद्द करण्याची शिफारस देखील समाविष्ट असेल.जनजागृतीः पेट्रोल पंप चालकांनी पंप परिसरात याबाबत स्पष्ट सूचना प्रदर्शित कराव्यात, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने परिपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

चेतना अपंगमती विकास संस्था व इनरव्हील मुव्हमेंट ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन

चेतना अपंगमती विकास संस्था व इनरव्हील मुव्हमेंट ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतामधील सर्व इनरव्हील क्लबच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कोल्हापुरातील सर्व इनरव्हील क्लब (ज्याला इनरव्हील मुव्हमेंटऑफ कोल्हापूर असं संबोधिता येईल) व चेतना अपंगमती विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील अपंगांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व शाळांमधील वि‌द्यार्थ्यांच्या एक दिवसीय मैदानी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. छ. संभाजी महाराज क्रीडा संकुल मंगळवार पेठ या ठिकाणी शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता उ‌द्घाटनानंतर स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेत कोल्हापुरातील बौद्धिक अक्षम मुलांसाठी कार्य करणाऱ्या ११ शाळा याच मुलांसाठी कार्य करणाऱ्या ७ कार्यशाळा, कर्णबधिर मुलांसाठी कार्य करणाऱ्या ७ विशेष शाळा व अंधांसाठी कार्य करणारी १ अशा एकूण २६ शाळांमधील ४५० च्या आसपास विद्यार्थी विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
कोल्हापुरातील प्रसिद्ध उ‌द्योजक मा. संग्राम पाटील व मा. संदीप पाटील यांच्या माव्र्व्हलस इंजिनियर्स प्रा. ली. यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
इनरव्हील क्लबच्या असोसिएशन प्रेसिडेंट मा. ज्योती महिपाल, कोल्हापूरच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन मा. उत्कर्षा पाटील, कन्व्हेनर मा. राधिका शिरगावकर डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट कमिटी चेअरमन मा. नंदा झाडबुके व चेतना अपंगमती विकास संस्थेचे अध्यक्ष मा. नरेश बगरे यांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या स्पर्धेला कोल्हापुरातील सर्व क्रीडाप्रेमीनी उपस्थित राहून या मुलांना प्रोत्साहन द्यावे व त्यांचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात येत आहे..

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक; दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश
सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक; दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरच्या बोर्डिंग विभागातील विद्यार्थ्यांनी सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शन २०२५–२६ मध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे. ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम ’ या थीम अंतर्गत पुणे येथील हडपसरच्या अमनोरा स्कूलमध्ये हे विभागीय विज्ञान प्रदर्शन पार पडले.
इयत्ता ८ वीतील संस्कृती लांबटे आणि विश्वजीत शिंदे या बोर्डिंग विभागातील विद्यार्थ्यांनी “थर्ड आय” हा अभिनव प्रोटोटाइप सादर केला.‘शाश्वत शेती’ या विषयाअंतर्गत सादर केलेल्या या मॉडेलला कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. शेतजमिनीवर येणाऱ्या वन्यप्राण्यांचा शोध घेऊन त्यांना मोठ्या आवाजाच्या सिग्नलद्वारे हुसकावून लावणारी ही एआय-आधारित यंत्रणा या विद्यार्थ्यांनी तयार केली होती. ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि मीडिया- कम्युनिकेशन व्यावसायिक डॉ. त्रिवेणी गोस्वामी माथुर यांच्या हस्ते झाले. परीक्षक मंडळातही मान्यवरांचा समावेश होता. महाराष्ट्र, गोवा, दीव आणि दमण येथील एकूण १४५ सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांनी सात विविध विषयांत आपली मॉडेल्स सादर केली.
शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन, गणितीय मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंधारण, उदयोन्मुख तंत्रज्ञान,हरित ऊर्जा या विषयांवर विद्यार्थ्यांनी मॉडेल सादर केले.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विभागाच्या विद्यार्थ्यांच्या या
उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची निवड आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे.
या विद्यार्थ्यांना श्री संतोष हिरेमठ व सौ. साक्षी चौगुले यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे चेअरमन श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले व बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. नवीन महाबळेश्वर, उपप्राचार्या सौ. शोभा नवीन तसेच सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्याधारित उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल कौतुक केले.

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचामध्ये सहभाग

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचामध्ये सहभाग

कोल्हापूर/प्रतिनिधी:
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. प्रमोद एस. पाटील आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रविण पी. पवार यांची ‘इमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह (इस्त्रीच्ल्या२०२५)’ साठी अनुक्रमे वरिष्ठ विज्ञान व तंत्रज्ञान लीडर आणि युवा विज्ञान व तंत्रज्ञान लीडर म्हणून निवड झाली.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, तसेच १२ मंत्रालयांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे ३ ते ५ नोव्हेंबर २०२५ हि परिषद झाली.
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व उदयोन्मुख क्षेत्रे जाणून घेण्यासाठी हि परिषद आयोजित करण्यात आली. संपूर्ण भारतातून निवडलेले संशोधक, शैक्षणिक लीडर, उद्योगपती, निधी पुरवठा संस्था, धोरणकर्ते, स्टार्ट-अप्स आणि विद्यार्थी हे ‘विकसित भारत २०४७ या संकल्पनेशी संबंधित तंत्रज्ञान हस्तांतरण, सहकार्य, संधी, संशोधन सहकार्य इत्यादी विषयांवर चर्चा करण्यासाठी सहभागी झाले होते. यामध्ये डॉ. पाटील यांनी संशोधन विषयक विविध मुद्दे मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नोबेल विजेते भौतिकशास्त्रज्ञ प्रा. आंद्रे गाइम, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजयकुमार सूद, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, नोबेल विजेते, जागतिक तज्ज्ञ, धोरणकर्ते, शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सत्रात ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान-नवोपक्रम दृष्टिकोनावर प्रकाश टाकण्यात आला.
प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांची शैक्षणिक लीडर म्हणून निवड झाली, ही डी. वाय. पाटील विद्यापीठासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बाब ठरली. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी डॉ. पाटील व डॉ. पवार यांचे अभिनंदन केले आहे.

एनआयटीमध्ये ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न

एनआयटीमध्ये ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये डिग्री इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांमधील सुप्त संशोधक वृत्तीला चालना आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांना तांत्रिक व आर्थिक पाठबळ देण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नाॅलाॅजीकल विद्यापीठाकडून ही स्पर्धा भरवली जाते. मानव्यविद्या; भाषा; ललित कला, नैसर्गिक विज्ञान, शेती; पशुपालन, अभियांत्रिकी; तंत्रज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र अशा सहा विभागातील ५७ प्रकल्पांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. पर्जन्यमान, माती परीक्षण, आस्थापना व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, सांगीतिक उपचार अशा विविथ विषयांतील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पातून सादर केली. या अविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना समाजातील समस्यांची नाविन्यपूर्ण संकल्पनांनी उकल करत स्टार्टअप सुरू करण्यास चालना मिळेल असे एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी सांगितले. आरिफ इद्रासी, सना मुल्ला, स्नेहा सुतार, अर्पित कांबळे, हेतवी सुतार यांच्या ग्रुपच्या प्रकल्पांना प्रथम क्रमांक तर राजवर्धन जाखले, मैत्रेयी पाटील, समर्थ केसरकर, कृतिका सिंधी, स्नेहा जाधव यांच्या ग्रुपच्या प्रकल्पांना द्वितीय क्रमांक मिळाला. प्रा. महेश घोसाळकर यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. स्पर्धेसाठी विभागप्रमुख संग्रामसिंह पाटील, प्रा. प्रविण जाधव, डाॅ. विवेक माने आदींनी परिश्रम घेतले.

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या २४ विद्यार्थ्यांची ‘K12 टेक्नो सर्व्हिसेस’मध्ये निवड

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या २४ विद्यार्थ्यांची ‘K12 टेक्नो सर्व्हिसेस’मध्ये निवड

तळसंदे/प्रतिनिधी :  डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठच्या एमबीए व बीबीए विभागातील २४ विद्यार्थ्यांची निवड ‘K12 टेक्नो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रतिष्ठित कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना४ ते ५ लाख रुपये वार्षिक पॅकेज ऑफर करण्यात आले आहे.शैक्षणिक सेवा पुरवणारी कंपनी आहे. शाळांना अकादमिक सपोर्ट, प्रशिक्षण, शिक्षणतंत्रज्ञान व शैक्षणिक सोल्यूशन्स प्रदान करते. कंपनीचे बंगळूर येथे मुख्यालय असून अनेक शहरामध्ये कार्यालये आहेत. या कंपनीच्यावतीने विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हद्वारे ही निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन पात्र विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. त्यातून २४ विद्यार्थ्यांची कंपनी अधिकाऱ्याकडून निवड करण्यात आली.           यामध्ये एमबीए द्वितीय वर्षाच्या सिद्धी गोंडकर, नंदिनी जाधव, श्रद्धा कराडे, महेक सिरकाजी, शोएब पेंधारी, रविराज शिंदे, स्वलेहा पाटील, वरदराज गोऱपाडे, प्रतीक पाटील, सूरज बटगेरी, वैशान्वी मोरे, श्रुतिका हेबळे, तस्नीम देसाई, श्रुती सांकपाळ, यश कांबळे, निराज लाड, ओमकार गांचरी, रोहन पाटील, रोहित जवळदेकर, प्रथमेश जाधव, योगिता चव्हाण तर बीबीए तृतीय वर्षाच्या क्षितिजा पाटील व भक्ती खोत यांची निवड झाली आहे.                                                    निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, आमच्या विद्यापीठाच्या एमबीए, बीबीए विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतानाच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरही भर दिला जातो. विद्यापीठात विविध परीक्षांची तयारी, मुलाखत, विविध प्रशिक्षणही दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंटसाठी फायदा होत आहे.                  निवड झालेल्या विद्यार्थ्याचे कुलपती डॉ.संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, अधिष्ठाता प्रा.डॉ.मुरली भूपती, ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक प्रा. प्रदीप पाटील, प्रा स्वराज पाटील व विभाग समन्वयक शिवानी जंगम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.