अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या विवाहसह तिचा शारिरीक छळ केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात पीडितेचा पती,आई-वडील आणि इतर जवळचे नातेवाईक यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुलगी अल्पवयीन असल्याचे जरी माहिती असले तरी संशयीतांनी संगनमत करुन तिचा विवाह अरबाज हिम्मत मकुभाई (रा.इटकरे ,जि.सांगली) यांच्या सोबत लावला.विवाहनंतर पीडितेच्या संमतीशिवाय शारिरीक संबंध ठेवण्यात आले,
ज्यामुळे ती सुमारे ३० आठवड्याची गर्भवती आहे.
पीडित मुलीने बाल कल्याण संकुलच्या अधीक्षिका आरती पिंगळे यांच्या मदतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या तक्रारीवरुन पती अरबाज मकुभाई याच्यासह पीडितेची आई,चुलता,चुलती आणि एका मध्यस्थाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढ़ील तपास सुरु आहे.

