वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित आहे. याची माहिती .कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणूक लढवणारी राजकीय ताकद नसून, शोषित, कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य चळवळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत सां नगरपरिषदा, महानगरपालिका स्तरावर मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेले आहे. बहुजन आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर आध पारदर्शक आणि संघर्षशील राजकारणाचा पर्याय कोल्हापूरच्या मतदारांसमोर ठेवणार पक्षाच्या उमेदवारांची निवड ही सामाजिक प्रतिनिधित्व, कार्यक्षमता आणि स्थानिक प्रश्नांवरील लढाऊ भूमिका यावर आधारित असेल. या अनुषंगाने दिनांक १७ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा चौक येथे जाहीर ‘विजयी संकल्प महासभा’ आयोजित करण्यात आली आहे. या ‘विजयी संकल्प महासमेला’ वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याच्या देशाध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर, प्रा, मा. अंजलीताई आंबेडकर, युवा नेते मा. सुजात आंबेडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा प्रभारी मा. डॉ. क्रांती सावंत, राज्य उपाध्यक्ष प्रवक्ता मा. सोमनाथ साळुंखे, राज्य उपाध्यक्ष प्रवक्ता मा. सिध्दार्थ मोकले, राज्य उपाध्यक्ष प्रवक्ता मा. इम्तियाज नदाफ, जिल्हा अध्यक्ष, कोल्हापूर दक्षिण मा. श्री बाबूराव आयवाळे, कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर उत्तर मा. जनार्दन गायकवाड, जिल्हाध्यक्ष दक्षिण मा. बाबुराव आयवाळे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून येणारे वंचित बहुजन आघाडीचे शेक्रेडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

