जिल्हा परिषद अंतर्गत ५४ शाळांमध्ये दर्जेदार स्वच्छता ग्रहांची उभारणी,कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स”ची संकल्पना अस्तित्वात : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एस कार्तिकेएन यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : एका विद्यार्थिनीला शाळेत योग्य स्वच्छता सुविधा न मिळाल्यामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे आणि शिक्षण विभागाचे लक्ष वेधले गेले. “शाळेची इमारत महत्त्वाची आहेच, पण एका विद्यार्थिनीला शाळेत योग्य स्वच्छता सुविधा न मिळाल्यामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी स्वच्छता सुविधा त्याहूनही अधिक महत्त्वाच्या आहेत.”यातूनच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकूण 54 शाळांमध्ये स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेएन एस, आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेने ठोस टिकाऊ आणि संवेदनशील आराखडा तयार केला आणि त्यातूनच जिल्हा परिषद ५४ शाळांमध्ये दर्जेदार स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. मीना शेंडकर उपस्थित होत्या.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर, नाम. श्रीमती माधुरी मिसाळ, राज्यमंत्री कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स या प्रकल्पासाठी मा. नाम. प्रकाश आबिटकर, मंत्री नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक व औकाफ तथा सहपालकमंत्री कोल्हापूर, मा. नाम. श्री. हसन मुश्रीफ, मंत्री वैद्यकीयकीय शिक्षा विशेष सहाय्य, महाराष्ट्र राज्य या सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून १५ व्या वित्त आयोग (जि.प. सिर) निधीतून हा उपक्रम राबवला गेला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एस. कार्तिकेयन यांनी सांगितले. यामध्ये एकूण शंभर शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
हा निधी ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि विशेषतः मुलींची उपस्थिती जास्त आहे, त्या शाळांमध्ये आधुनिक स्वच्छता सुविधा निर्माण करण्यासाठी वापरला गेला असून निकषानुसार हेल्थ कॉम्प्लेक्सचे तीन प्रकार निश्चित करणेत आले. यात २०० पेक्षा जास्त विद्यार्थी), १०० ते २०० विद्यार्थी आणि १०० पेक्षा कमी विद्यार्थी या प्रकल्पात वापरलेले साहित्य केवळ टिकाऊच नाही तर सौंदर्यपूर्ण आहे व नामवंत कंपनीचे वापरणेत आलेले आहे.असेही यावेळी सांगण्यात आले.
पाण्याच्या लाईन्ससाठी फिनोलेक्स टाकी,जैन, किसान पाईप्स वापरण्यात आले आहेत.
विद्युत कामासाठी पॉली कॅब, एपीएर वायर्स वापरण्यात आले आहेत. प्रकाश योजनेसाठी फिलिप्स सिस्का बल्ब, फ्लोअरिंग आणि डॅडोसाठी कजारिया जॉन्सन सिम्प्लो टाइल्स वापरण्यात आले आहेत.
युरिनल्समधील विभाजनासाठी ग्रॅनाईट पार्टीशन करण्यात आले आहे. दरवाजे टिकाऊ आणि जलरोधक केले आहेत.सुरक्षिततेसाठी लॉक्स अँड हँगस करण्यात आले आहेत.
कमोड, बेसिन, युरिनल पॅन, शॉवर्स आणि कॉकसाठी जग्वार कोल्हार टोटो कंपनीचे नळ बसविण्यात आले आहेत.प्रत्येक स्वच्छतागृहामध्ये सुव्यवस्थित सुविधा,आरसा,
हॅन्ड वॉश, एअर फ्रेशनर, पेपर डिस्पेन्सर सुविधा करण्यात आल्या आहेत.
मुलींच्या आरोग्य आणि सन्मानाचा विचार करून वेंडिंग मशीन सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर, इनक्लीनरटर बसविण्यात आले या सुविधेमुळे मुलींचा आत्मविश्वास वाढला,शाळेत उपस्थिती वाढली आणि शिक्षणात सहभाग अधिक झाला आहे असे शेंडकर यांनी नमूद केले.या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय निर्माण झाली. शाळेचा दर्जा उंचावला आणि शाळेचे वातावरण अधिक आनंदी झाले आहे.प्रकल्पाची वैशिष्ट्यपूर्णता म्हणजे बांधकाम, सौंदर्य, शिस्त आणि संवेदनशीलता या चारही गोष्टींचा उत्तम संगम यात दिसतो.प्रकल्पाचे सर्व आराखडे, खर्च आणि बांधकाम नुसार पूर्ण करण्यात आले. यासाठी कोणताही जादा निधी उपलब्ध करावा लागला नाही. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली, शिक्षण अधिकारी (प्राथमिक), कार्यकारी अभियंता (समग्र शिक्षा) आणि कनिष्ठ अभियंता (समग्र शिक्षा) यांच्या संयुक्त देखरेखीखाली गुणवत्ता कायम ठेवली गेली आहे.
हेल्थ कॉम्प्लेक्सची नियमित स्वच्छता व देखभाल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांचे माध्यमातून करणेचे नियोजन केले आहे.”कोल्हापूर स्टाईल हेल्थ कॉम्प्लेक्स” हा विद्यार्थ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाचा उत्सव. “स्वच्छ शाळा म्हणजे आरोग्यदायी समाज!” या मंत्राने जिल्हा परिषद कोल्हापूर शाळांना आरोग्यदायी, सुरक्षित आणि सन्मानपूर्ण वातावरण देण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी यावेळी सांगितले आहे.यावेळी जिल्हा परिषद समग्र शिक्षाचे एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर श्री. अमोल पाटील ज्युनिअर इंजिनिअर समग्र शिक्षा हेड ऑफिस सौ.सुप्रिया जोगळेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *