Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘एक्सलंट’ श्रेणी

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'एक्सलंट' श्रेणी कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांना महाराष्ट्र…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी – लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे. परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख -- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यात "एकात्मिक आरोग्यवर्धिनी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय पशु चिकीत्सा परिषद (VCI)) आणि केंद्र सरकारच्या मंत्स्यपालन,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान पुणे/प्रतिनिधी : संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती…

Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य कोल्हापूर/प्रतिनिधी : काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे…

My Marathi माय मराठी

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला   कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा…

My Marathi

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात…

My Marathi

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई   कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.३ राजारामपुरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत…

My Marathi

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती…

My Marathi

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुंबई

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर   कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या काही वर्षात…

My Marathi

गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील…

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार

नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. संघटन सृजन अभियाना अंतर्गत या बैठका दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत ज्या त्या तालुक्यात घेण्यात येणार आहेत. या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्यावतीने संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
या आढावा बैठकांना पक्षातर्फे मुख्य निरीक्षक जय शंकर पाठक यांच्या समवेत कोल्हापूर ग्रामीण साठी सहनिरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव नंदकुमार कुंभार, कोल्हापूर शहरसाठी राहुल गायकवाड, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुनील मलके आणि राहुल वरदा उपस्थित राहणार आहेत.
या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य

कोल्हापूर/प्रतिनिधी : काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा उद्या १२ एप्रिलला होणारा वाढदिवस विविध उपक्रम राबवून लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा संकल्प कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला आहे. या वाढदिवसानिमित्त दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट कार्यकर्त्यांनी ठेवले आहे. पदाधिकाऱ्यांनी विविध उपक्रम राबवत सतेज पाटील यांच्या वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा मानस काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

देऊया गरजूंना साथ सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात

देऊया गरजूंना साथ सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात हे ब्रीद घेऊन जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना, आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृद्धाश्रम फळे वाटप, विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीसाठी विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अपंग, निराधार मुलांना अल्पोपहार, गुणवंत कामगार संघटनेमार्फत काव्य संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये वृक्षारोपण, फुटबॉल, करवीर सतेज चषक स्पर्धा, लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा तसेच तालुका स्तरावरही विविध सामाजिक उपक्रम राबण्यात येणार आहेत.
आमदार सतेज पाटील यांनी वाढदिवसानिमित्त हारतुरे, पुष्पगुच्छ न स्वीकारता गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या भेट देण्याचा उपक्रम २००७ पासून सुरु आहे. या सामाजिक उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये झाली आहे. यंदाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या ३८ नगरसेवकांच्या माध्यमातून आमदार पाटील यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त ५४ हजार वह्या देण्याचा संकल्प महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांनी केला आहे. जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या १५ सदस्यांंच्या माध्यमातून ५४ हजार वह्या भेट देण्याचा संकल्प जाहीर केला. युवराज गवळी यांनी गवळी समाजाच्या माध्यमातून ११ हजार वह्या भेट देत पाचगावमध्ये म्हैस शर्यत स्पर्धा आयोजित करणार असल्याचे सांगितले, तसेच जिल्ह्यातील सर्वच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामदैवताला अभिषेक घालून आमदार पाटील यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. यंदा दहा लाख वह्यांचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे.
तसेच युथ काँग्रेसच्या माध्यमातून २५ हजार वह्या देण्यात येणार आहेत.आमदार सतेज पाटील हे वाढदिनी दुपारी ४ नंतर कसबा बावड्यातील त्यांच्या यशवंत निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
आमदार जयंत आसगावकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते राजू लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, गोकुळचे संचालक चेतन नरके, संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे, शशिकांत खोत, माजी नगरसेवक भूपाल‌ शेटे, भारती पोवार, तौफिक मुल्लानी, युवराज गवळी, बाळासाहेब सरनाईक, अक्षय शेळके, भरत रसाळे, संपतराव पाटील, संजय पोवार – वाईकर, मंगल खुडे, सरलाताई पाटील, उज्ज्वला चौगले, हेमा पाटील, नगरसेवक संजय मोहिते, दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, अर्जुन माने, अमर समर्थ, सुभाष बुचडे, विनायक कारंडे, अजित पोवार, सचिन चौगले, संतोष जरग, दिपाली घाटगे यांच्यासह आजी माजी नगरसेवक यांनी वह्या संकलनाचे उद्दिष्ट केले आहे.

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे बालरोगशास्त्र विभागात GBS हा गंभीर आजार झालेमुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण कु.आर्यन भगवान म्हातूगडे वय वर्षे १२ रा.सावर्डे, ता. भुदरगड , जि.कोल्हापूर. या रुग्णास दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी बालरोगशास्त्र विभागात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. सदर रुग्ण गंभीर असल्यामुळे त्याला बालरोगशास्त्र विभागातील डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले.
सदर रुग्णावर IVIG इंजेक्शन सुरू करण्यात आली. बालरोगशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.संगीता कुंभोजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रुग्णावर यशस्वीरित्या उपचार सुरू करण्यात आले. सदर उपचारादरम्यान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सदानंद भिसे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर रुग्णावर करण्यात आलेले सर्व उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आले आहेत.यावेळी रुग्णाचे पालक श्री.भगवान म्हातुगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “माझ्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बालरोगशास्त्र विभागातील सर्वच डॉक्टरांनी खूप परिश्रम घेतले तसेच अहोरात्र सर्व डॉक्टरांनी प्रयत्न करून माझ्या मुलाचे प्राण वाचवले असल्याचे सांगितले. बालरोगशास्त्र विभागातील सर्व स्टाफच्या या परिश्रमामुळेच माझ्या मुलाला मी आज सुखरूप घरी घेऊन जात असल्याबद्दलचा त्यांनी आनंद व्यक्त केला.
सदर रुग्णास दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ.संगीता कुंभोजकर, वैद्यकीय अधीक्षक, डॉ.भूषण मिरजे, सहयोगी प्राध्यापक डॉ.शिशिर मिरगुंडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ.महेश्वरी जाधव, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, इन्चार्ज सिस्टर सौ.मीना पंडित, सौ.मीना डिसूजा तसेच विभागातील सर्व नर्सिंग स्टाफ समाजसेवा अधीक्षक श्री.अजित भास्कर रुग्णालयाकडून सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी माजी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून सायंकाळी ४ वाजता कार्यभार स्वीकारला. कोल्हापूरात दुपारी आगमन झाल्यानंतर डॉ. रोजंद्र भारुड यांनी प्रथम अंबाबाई मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर महापालिकेत येऊन त्यांनी अधिकृतपणे आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन महापालिकेच्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव उपस्थित होते. त्यानंतर आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी आयुक्त कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ व किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे व स्वाती दुधाणे, सहा. संचालक (नगररचना) प्रशांत भोसले, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, लेखापाल संजय सरनाईक, प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार, उप-शहर रचनाकार एन.एस. पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येणार

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने मित्र संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (MRDP) हा प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मान्यता देण्यात आली. यासाठी २ हजार २४० कोटी अर्थसाहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. एकूण ३ हजार २०० कोटींचा हा प्रकल्प असून, ९६० कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ७ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बैठकीत ‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्यासाठी आणि पूरप्रवण क्षेत्रांमधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी आखण्यात आला आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
यामध्ये पुढे म्हंटले आहे कि, मंत्रिमंडळाच्या झालेल्या निर्णयात महत्वाची बाब म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात खाजगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा उभारला जाणार आहे. यात जागतिक बँकेकडून १६५ कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. या अर्थसहाय्यातून आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना गृह कर्जात सवलत दिली जाईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी (MSME) कर्जासाठी सवलत आणि विशेष विमा सुरक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार केले जातील. कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी यांसारख्या शहरांमध्ये पुराच्या पाण्याचा वेगाने निचरा व्हावा यासाठी मास्टर प्लॅन आणि उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी राज्याची क्षमता वाढली जाणार असून, नागरिकांना आपत्कालीन स्थितीत दिलासा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.३ राजारामपुरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी ३ शेड, ६ स्टँण्ड बोर्ड, ४ लाकडी व लोखंडी टेबल, ६ लोंखडी पार्किंग जाळी, ३२ शीट कव्हर मँट नग व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई वेळी काही हातगाडया मालकांनी स्वता:हून काढून घेतल्या.
सोमवारी झालेल्या जनता दरबारमध्ये अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाच्या अनुषंगाने व महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागामार्फत हि कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, उप-शहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व विभागीय कार्यालय क्र.३ कडील कर्मचा-यांच्या पथकाकडून संयुक्तीक करण्यात आली.

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची कामे, सर्व इमारतींचे अंतर्बाह्य सुशोभीकरण तसेच अनुषंगिक दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. या कामांच्या दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उद्या ७ एप्रिल २०२६ पासून रुग्णालयाच्या मुख्य कमानीचे काम सुरू करण्यात येणार असल्याने गोदावरी इमारतीजवळील प्रवेशद्वार तात्पुरते बंद करण्यात येत आहे. गोदावरी गेटचे काम पूर्ण होईपर्यंत अपघात विभागासमोरील गेट रुग्णालयात प्रवेशासाठी खुले ठेवण्यात येणार असून, बाहेर जाण्यासाठी कुंभी गेटचा वापर करण्यात येणार आहे.या कालावधीत रुग्णसेवेमध्ये कोणताही निष्काळजीपणा होणार नाही, याची प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली.

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात गोकुळचे शिल्पकार माजी चेअरमन स्व. आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व संचालक यांच्या हस्ते स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्‍या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.
यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळ दूध संघाच्या उभारणी व वाटचालीत स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे मोलाचे योगदान आहे. १९६३ साली अवघ्या ७०० लिटर दूध संकलनापासून सुरू झालेल्या गोकुळ दूध संघाने आज २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठला आहे. या सर्व प्रगतीमध्ये चुयेकर साहेबांचे योगदान कदापि विसरता येणार नाही.
दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ व त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय यामुळेच गोकुळ आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गावोगावी धवल क्रांती निर्माण करून गोकुळच्या माध्यमातून ग्रामीण जीवन समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या आचार-विचारांवरच गोकुळची भविष्यातील वाटचाल सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एम.पी.पाटील यांनी केले.
याप्रसंगी चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक युवराज पाटील, संभाजी पाटील, बाळासो खाडे, संचालिका अंजना रेडेकर, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, डॉ. प्रकाश दळवी, धनाजी पाटील, के.डी.आमते, बाजीराव मुडूकशिवाले, अशोक पुणेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या काही वर्षात उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलेल्या निधीतून ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याची भुरळही कोल्हापूर वासियांसह पर्यटकांना पडत असून, रंकाळा तलावास भेट देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासह खवय्यांचीही गर्दी होत आहे. या परिसरातील स्थानिक नागरिक याच उदरनिर्वाहावर अवलंबून आहेत. परंतु, रंकाळाचे विद्रुपीकरण करून, सौंदर्यात बाधा येत असेल तर त्यास आपण पाठीशी घालणार नाही, रंकाळा तलावाचे सौंदर्य अबाधित राखण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे प्रसिद्धीपत्रक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
यात पुढे म्हंटले आहे कि, काही दिवसांपूर्वी रंकाळा तलाव परिसरातील नागरिकांनी सदर ठिकाणी फेरीवाले संघटना स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार सदर संघटनेच्या उद्घाटनाकरिता सदर ठिकाणी गेलो असता सांगण्यात आलेली बाब आणि प्रत्यक्षात करण्यात आलेली कृती वेगळी असल्याचे निदर्शनास आल्याने सदर अतिक्रमणास कोणत्याही प्रकारे मी मान्यता दिली नाही. यावेळी स्थानिक नागरिकांनी परप्रांतीय लोक याठिकाणी व्यवसाय करतात. या ठिकाणी गाळे घेवून व्यवसाय करण्यास मर्यादा असल्याचे गाऱ्हाणे मांडले. *रंकाळा तलाव ही कोल्हापूरची अस्मिता आहे. नागरिकांनाही व्यवसायासाठी योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात येईल. परंतु, सौंदर्याला बाधा पोहचेल असे कोणतेही अतिक्रमण करू नये, अशा सूचना संबधित स्थानिक नागरिकांना दिल्या आहेत.आगामी काळात अशा प्रकारचे कोणतेही अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही प्रशासनास दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी रंकाळ्यात कचरा, नासाडी झालेले अन्न टाकण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. याबाबतीतही आपण संबधितांची बैठक घेवून तलावाचे कोणतेही नुकसान किंवा प्रदूषण फेरीवाल्यांच्या कृतीमुळे होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. रंकाळा तलावाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासह निधीच्या माध्यमातून असेल, नाविन्यपूर्ण अशी विद्युत रोषणाई, म्युझिकल फौंऊटेन, सेल्फी पाँइंट आदी प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटनवृद्धीसाठी आपले नेहमीच प्रयत्न सुरु आहेत. पूर्वीचा रंकाळा आणि आताच रंकाळा यात अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी या पत्रकात म्हंटले आहे.

गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी साडेसहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड व त्यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री गायकवाड यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पाळणा, रुद्राभिषेक व भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.या कार्यक्रमास संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील यांच्यासह पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, बाजीराव पाटील, निवास पाटील, बाळासो वायदंडे, संकेत खाडे, नितीन तोडकर,सुभाष नाळे, सर्वेश जाधव, अर्जुन पाटील, विनोद पाटील, बाळासो खांडेकर व इतर अधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.