कोल्हापूर येथे अनुसूचित जाती व जमाती (अ.प्र.) कायद्याच्या प्रभावी अंमलबाजावणी आणि जनजागृतीच्या अनुषंगाने नागरीक कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर /प्रतिनिधी : नागरी हक्क संरक्षण विभाग, म.रा. मुंबई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने “अनुसुचित जाती व जमाती (अप्र) अधि. १९८९, सुधारीत अधि. २०१५ या कायद्याच्या प्रभावी अंमलबाजावणी, जनजागृतीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हयामधील नागरीकांच्या करिता दि.०२/०७/२०२६ रोजी नागरीक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
आज २ जुलै रोजी सकाळी ०९.३० ते ०५.३० या वेळेत छत्रपती ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर या विभागाच्या वतीने दुस-या एक दिवसीय नागरीक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, सदर कार्यशाळा ही श्रीमती अश्वती दोर्जे, मा.अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती, या नागरीक कार्यशाळेसाठी अॅड. श्री गणेश शिरसाट, सदस्य बार कौन्सील, महाराष्ट्र व गोवा राज्य हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, अॅड. श्री गणेश शिरसाट, यांनी प्रशिक्षणार्थी नागरीक यांना अनुसूचित जाती व जमाती (अ.प्र.) कायद्याची व अनुषांगिक कायद्याच्या प्रभावी अंमलबाजावणी, जनजागृतीच्या अनुषंगाने मौलीक मार्गदर्शन केले, तसेच श्रीमती ज्योती क्षीरसागर, पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी स्वागत आणि प्रस्तावना करुन, कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी नागरीक यांना “कायद्यातील तरतुदीनुसार पिडीतांना केले जाणारे अर्थ सहाय्य व संरक्षण याबाबत माहिती देउन, “सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे स्वातंत्र आणि हाताने मैला साफ करण्यापासून प्रतिबंध” या कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळया पोलीस पाटील २२, महिला बचत गट सदस्या ४०, विद्याथी ३३ व इत्यादी प्रशिक्षणार्थी नागरीक म्हणून उपस्थित होते. उपस्थितांना (१) श्री. सचिन साळे, सहा. अयुक्त समाजकल्याण विभाग, कोल्हापूर (२) श्री. निहाल निजामुदीन अत्तार, संचालक व व्यवसस्थापक, बिजनेस सस्केस मंत्रा, कोल्हापूर, (३) अॅड. श्री. सिध्दार्थ राजेंद्र कांबळे, विधी अधिकारी गट अ, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कार्यालय, (४) डॉ. श्री. मनोहर दादु कोळी, सेवानिवृत्त सहा. पोलीस निरीक्षक, कोल्हापूर, असे विधी तज्ञ व अनुभवी, तसेच शासकीय सेवेतील वक्ते या कार्यशाळेस लाभले.
कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक वक्ते यांचे मार्गदर्शनानंतर प्रशिक्षणार्थी नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले, त्यामुळे “अनुसुचित जाती व जमाती (अप्र) अधि. १९८९, सुधारीत अधि. २०१५ या कायाद्याच्या प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती व गुणवत्तापूर्ण तपासाबाबतचा” मुख्य हेतु साध्य झाल्याचे व गुणवत्तापूर्ण तपासामुळे दोषसिध्दी प्रमाणामध्ये वाढ होण्यासाठी अशा कार्यशाळांची मदतच होईल असे प्रशिक्षणार्थीनी मत व्यक्त केले आहे.

