घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज

घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज

अतिग्रे/प्रतिनिधी :  संजय घोडावत विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस’ मधील विद्यार्थी पराग भोपाळे याला लक्झेंबर्गमधील नामांकित ‘फार्मासी हॅमिलुअस’ येथे नोकरीची संधी मिळाली आहे. त्याला वार्षिक ३८.४३ लाख रुपयाचे पॅकेज प्राप्त झाले आहे.फार्मसी विभागातील आतापर्यंतचे हे सर्वोच्च पॅकेज आहे.                                                                 या यशावर भाष्य करताना विद्यापीठ प्रशासनाने नमूद केले की, हा टप्पा म्हणजे विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उद्योगधंद्यांना आवश्यक असणारे व्यवहारिक शिक्षण, त्यानुसार रोजगाराभिमुख कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्यावर भर,प्लेसमेंट विभागाचे विविध उपक्रम, त्याद्वारे जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे.विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, टीपीओ संचालक डॉ. नितीन पुजारी आणि प्राध्यापक वर्गाने परागचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *