Grid Posts

View All
माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

Thumbnail

View All
महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

Tile List

View All
My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा ख्रिश्चन, मुस्लिमांना अनुसूचित जातीचा दर्जा देता येणार नाही मुंबई/प्रतिनिधी : सुप्रिम कोर्टाने आज २४…

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

Tile Posts

View All
My Marathi

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

My Marathi

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती…

My Marathi

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुंबई

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

List Posts

View All
My Marathi

गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील…

My Marathi

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई…

My Marathi

धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

‘धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतिक्षित…

माय मराठी

आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण

सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा पुढाकार आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण  …

Thumbnail

View All
माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

माय मराठी

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक; दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक; दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड  …

माय मराठी

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचामध्ये सहभाग

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचामध्ये सहभाग कोल्हापूर/प्रतिनिधी: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. प्रमोद…

माय मराठी

एनआयटीमध्ये ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न

एनआयटीमध्ये ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये डिग्री इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांमधील…

माय मराठी

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या २४ विद्यार्थ्यांची ‘K12 टेक्नो सर्व्हिसेस’मध्ये निवड

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या २४ विद्यार्थ्यांची ‘K12 टेक्नो सर्व्हिसेस’मध्ये निवड तळसंदे/प्रतिनिधी :  डी. वाय. पाटील कृषी व…

माय मराठी

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई कोल्हापूर/प्रतिनिधी : एकेरी मार्गात वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन प्रवेश करणारे १२४ वाहनचालकांवर तसेच सिग्नल…

माय मराठी

संजय घोडावत विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ १२ नोव्हेंबरला

संजय घोडावत विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ १२ नोव्हेंबरला मा.राष्ट्रपती रामनाथजी कोविंद व पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे यांची प्रमुख उपस्थिती आतिग्रे…

माय मराठी

शिवशस्त्रशौर्यगाथा या भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्रप्रदर्शनाचे उद्या उद्घाटन

शिवशस्त्रशौर्यगाथा या भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्रप्रदर्शनाचे उद्या उद्घाटन   कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त मराठा योद्ध्यांकडून वापरली…

माय मराठी

टीम ‘बाई तुझ्यापायी’च्या टीमने घेतले महालक्ष्मीचे दर्शन

टीम ‘बाई तुझ्यापायी’चा कोल्हापूर दौरा – दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, क्षिती जोग आणि साजिरी जोशींची महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दर्शनासह माध्यमांशी संवाद…

माय मराठी

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. तर्फे, शिरोली (कोल्हापूर), येथे अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखाना चे भव्य उद्घाटन

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. तर्फे, शिरोली (कोल्हापूर), येथे अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखाना चे भव्य उद्घाटन …. कोल्हापूर/प्रतिनिधी : गुजरीच्या…

माय मराठी

पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक; दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश
सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक; दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरच्या बोर्डिंग विभागातील विद्यार्थ्यांनी सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शन २०२५–२६ मध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे. ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम ’ या थीम अंतर्गत पुणे येथील हडपसरच्या अमनोरा स्कूलमध्ये हे विभागीय विज्ञान प्रदर्शन पार पडले.
इयत्ता ८ वीतील संस्कृती लांबटे आणि विश्वजीत शिंदे या बोर्डिंग विभागातील विद्यार्थ्यांनी “थर्ड आय” हा अभिनव प्रोटोटाइप सादर केला.‘शाश्वत शेती’ या विषयाअंतर्गत सादर केलेल्या या मॉडेलला कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. शेतजमिनीवर येणाऱ्या वन्यप्राण्यांचा शोध घेऊन त्यांना मोठ्या आवाजाच्या सिग्नलद्वारे हुसकावून लावणारी ही एआय-आधारित यंत्रणा या विद्यार्थ्यांनी तयार केली होती. ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि मीडिया- कम्युनिकेशन व्यावसायिक डॉ. त्रिवेणी गोस्वामी माथुर यांच्या हस्ते झाले. परीक्षक मंडळातही मान्यवरांचा समावेश होता. महाराष्ट्र, गोवा, दीव आणि दमण येथील एकूण १४५ सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांनी सात विविध विषयांत आपली मॉडेल्स सादर केली.
शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन, गणितीय मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंधारण, उदयोन्मुख तंत्रज्ञान,हरित ऊर्जा या विषयांवर विद्यार्थ्यांनी मॉडेल सादर केले.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विभागाच्या विद्यार्थ्यांच्या या
उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची निवड आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे.
या विद्यार्थ्यांना श्री संतोष हिरेमठ व सौ. साक्षी चौगुले यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे चेअरमन श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले व बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. नवीन महाबळेश्वर, उपप्राचार्या सौ. शोभा नवीन तसेच सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्याधारित उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल कौतुक केले.

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचामध्ये सहभाग

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचामध्ये सहभाग

कोल्हापूर/प्रतिनिधी:
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. प्रमोद एस. पाटील आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रविण पी. पवार यांची ‘इमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह (इस्त्रीच्ल्या२०२५)’ साठी अनुक्रमे वरिष्ठ विज्ञान व तंत्रज्ञान लीडर आणि युवा विज्ञान व तंत्रज्ञान लीडर म्हणून निवड झाली.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, तसेच १२ मंत्रालयांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे ३ ते ५ नोव्हेंबर २०२५ हि परिषद झाली.
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व उदयोन्मुख क्षेत्रे जाणून घेण्यासाठी हि परिषद आयोजित करण्यात आली. संपूर्ण भारतातून निवडलेले संशोधक, शैक्षणिक लीडर, उद्योगपती, निधी पुरवठा संस्था, धोरणकर्ते, स्टार्ट-अप्स आणि विद्यार्थी हे ‘विकसित भारत २०४७ या संकल्पनेशी संबंधित तंत्रज्ञान हस्तांतरण, सहकार्य, संधी, संशोधन सहकार्य इत्यादी विषयांवर चर्चा करण्यासाठी सहभागी झाले होते. यामध्ये डॉ. पाटील यांनी संशोधन विषयक विविध मुद्दे मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नोबेल विजेते भौतिकशास्त्रज्ञ प्रा. आंद्रे गाइम, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजयकुमार सूद, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, नोबेल विजेते, जागतिक तज्ज्ञ, धोरणकर्ते, शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सत्रात ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान-नवोपक्रम दृष्टिकोनावर प्रकाश टाकण्यात आला.
प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांची शैक्षणिक लीडर म्हणून निवड झाली, ही डी. वाय. पाटील विद्यापीठासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बाब ठरली. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी डॉ. पाटील व डॉ. पवार यांचे अभिनंदन केले आहे.

एनआयटीमध्ये ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न

एनआयटीमध्ये ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये डिग्री इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांमधील सुप्त संशोधक वृत्तीला चालना आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांना तांत्रिक व आर्थिक पाठबळ देण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नाॅलाॅजीकल विद्यापीठाकडून ही स्पर्धा भरवली जाते. मानव्यविद्या; भाषा; ललित कला, नैसर्गिक विज्ञान, शेती; पशुपालन, अभियांत्रिकी; तंत्रज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र अशा सहा विभागातील ५७ प्रकल्पांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. पर्जन्यमान, माती परीक्षण, आस्थापना व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, सांगीतिक उपचार अशा विविथ विषयांतील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पातून सादर केली. या अविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना समाजातील समस्यांची नाविन्यपूर्ण संकल्पनांनी उकल करत स्टार्टअप सुरू करण्यास चालना मिळेल असे एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी सांगितले. आरिफ इद्रासी, सना मुल्ला, स्नेहा सुतार, अर्पित कांबळे, हेतवी सुतार यांच्या ग्रुपच्या प्रकल्पांना प्रथम क्रमांक तर राजवर्धन जाखले, मैत्रेयी पाटील, समर्थ केसरकर, कृतिका सिंधी, स्नेहा जाधव यांच्या ग्रुपच्या प्रकल्पांना द्वितीय क्रमांक मिळाला. प्रा. महेश घोसाळकर यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. स्पर्धेसाठी विभागप्रमुख संग्रामसिंह पाटील, प्रा. प्रविण जाधव, डाॅ. विवेक माने आदींनी परिश्रम घेतले.

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या २४ विद्यार्थ्यांची ‘K12 टेक्नो सर्व्हिसेस’मध्ये निवड

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या २४ विद्यार्थ्यांची ‘K12 टेक्नो सर्व्हिसेस’मध्ये निवड

तळसंदे/प्रतिनिधी :  डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठच्या एमबीए व बीबीए विभागातील २४ विद्यार्थ्यांची निवड ‘K12 टेक्नो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रतिष्ठित कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना४ ते ५ लाख रुपये वार्षिक पॅकेज ऑफर करण्यात आले आहे.शैक्षणिक सेवा पुरवणारी कंपनी आहे. शाळांना अकादमिक सपोर्ट, प्रशिक्षण, शिक्षणतंत्रज्ञान व शैक्षणिक सोल्यूशन्स प्रदान करते. कंपनीचे बंगळूर येथे मुख्यालय असून अनेक शहरामध्ये कार्यालये आहेत. या कंपनीच्यावतीने विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हद्वारे ही निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन पात्र विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. त्यातून २४ विद्यार्थ्यांची कंपनी अधिकाऱ्याकडून निवड करण्यात आली.           यामध्ये एमबीए द्वितीय वर्षाच्या सिद्धी गोंडकर, नंदिनी जाधव, श्रद्धा कराडे, महेक सिरकाजी, शोएब पेंधारी, रविराज शिंदे, स्वलेहा पाटील, वरदराज गोऱपाडे, प्रतीक पाटील, सूरज बटगेरी, वैशान्वी मोरे, श्रुतिका हेबळे, तस्नीम देसाई, श्रुती सांकपाळ, यश कांबळे, निराज लाड, ओमकार गांचरी, रोहन पाटील, रोहित जवळदेकर, प्रथमेश जाधव, योगिता चव्हाण तर बीबीए तृतीय वर्षाच्या क्षितिजा पाटील व भक्ती खोत यांची निवड झाली आहे.                                                    निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गुप्ता म्हणाले, आमच्या विद्यापीठाच्या एमबीए, बीबीए विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतानाच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरही भर दिला जातो. विद्यापीठात विविध परीक्षांची तयारी, मुलाखत, विविध प्रशिक्षणही दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंटसाठी फायदा होत आहे.                  निवड झालेल्या विद्यार्थ्याचे कुलपती डॉ.संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, अधिष्ठाता प्रा.डॉ.मुरली भूपती, ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक प्रा. प्रदीप पाटील, प्रा स्वराज पाटील व विभाग समन्वयक शिवानी जंगम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई

कोल्हापूर/प्रतिनिधी : एकेरी मार्गात वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन प्रवेश करणारे १२४ वाहनचालकांवर तसेच सिग्नल जंम्प करणारे ३६ वाहनधारकांवर व इतर कारवाई मिळून एकूण २५६ वाहन धारकांवर कारवाई करुन त्यांचेकडून ४,९८,०००/- रुपये दंड करुन वाहतूक शाखेने कारवाई केली आहे.ही मोहीम आज.राबविण्यात आली.
कोल्हापूर शहरामध्ये सध्या मोटार वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूकीची समस्या निर्माण होत असल्याने वाहतूक सुरळीत व सुरक्षित रहावी, नागरिक व पादचारी यांना रस्ता सुरक्षा प्रस्थापित व्हावी म्हणून वेळोवेळी एकुण ३० ठिकाणचे मार्ग हे सर्व प्रकारच्या मोटार वाहनांसाठी एकेरी वाहतूक करण्यात आलेले आहेत.
तरी परंतु अजुनही काही वाहनधारक हे जाणून बुजुन एकेरी मार्गामध्ये प्रवेश करुन नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांचे या उल्लंघनामुळे नियमाचे पालन करणारे वाहनधारकाना अडथळा होत आहे. अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा वाहनधारकांचे कृतीस आळा बसावा या उददेशाने शहर वाहतुक नियंत्रण शाखा, कोल्हापूरचे वतीने नियमबाहय एकेरी मार्गावर आपली वाहने चालविणारे तसेच सिंग्नल जंम्प करणारे वाहनधारकाविरुध्द दि. १८/११/२०२५ रोजी बिनखांबी गणेश मंदीर, मिरजकर तिकटी, दिलबहार चौक, दुर्गा चौक, राजारामपूरी, वटेश्वर मंदीर या वनवे परिसरात तसेच लिशा हॉटेल चौक, ताराराणी चौक, मुक्त सैनिक चौक, व्हिनस कॉर्नर, दाभोळकर, माळकर व पार्वती सिंग्नल चौकात विशेष व्यापक मोहीम राबवुन कायदेशीर कारवाई आली असून या पुढेही ही मोहीत तीव्र स्वरुपात राबवली जाणार आहे.
आज दि. १८/११/२०२५ रोजी राबवण्यात आलेल्या व्यापक मोहीमेत एकुण २५६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. आहे. सदर कारवाईवेळी इतर तिब्बल सिट वाहन चालविणारे १५, वाहन चालविताना मोबाईलचा वापर १३, अल्पवयीन मुलाने वाहन चालविले बाबत ०२, लायसन्स जवळ न बाळगले बाबत ३५, नो पार्कींग ३१ वाहनधारकांवर मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन केल्याने त्यांचे विरुध्द दंडात्मक कारवाई केलेली आहे.तरी शहर वाहतुक नियंत्रण शाखा कोल्हापूरचे वतीने सर्व नागरिक / वाहनचालक यांना आवाहन करण्यात येते की, वाहनचालकांनी कोल्हापूर शहरातील एकेरी मार्गावरुन वाहतुक करुन नियमांचे उल्लंघन करुन नियमांचे पालन करणारे वाहनधारकांना कोणत्याही प्रकारे अडथळा करु नये तसेच सिंग्नल चौकामध्ये रेड लाईट लागलेनंतर वाहन धारकांनी आपले वाहन पुढे जावू नये त्यामुळे अपघातासारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनधारकांनी वाहतुकीचे नियमांचे तंतोतंत पालन करावे. वाहन चालविताना आपले सोबत ड्रायव्हींग लायसन्स व आपले वाहनांच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जवळ बाळगाव्यात अन्यथा वाहनधारकांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे सूचित करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षकसो, मा. अपर पोलीस अधीक्षकसो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली व शहर वाहतुक शाखेकडील पो. नि. नंदकुमार मोरे, यांचे निरीक्षणाखाली सहा. पोलीस निरीक्षक दिपक जाधव नागेश म्हात्रे व पोलीस अंमलदार यांच्या करवी करण्यात आली आहे.

संजय घोडावत विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ १२ नोव्हेंबरला

संजय घोडावत विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ १२ नोव्हेंबरला

मा.राष्ट्रपती रामनाथजी कोविंद व पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे यांची प्रमुख उपस्थिती

आतिग्रे : प्रतिनिधी: संजय घोडावत विद्यापीठाचा ७ वा दीक्षांत समारंभ बुधवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडणार आहे.या सोहळ्याला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रख्यात नेत्रतज्ज्ञ व राज्यसभेचे माजी खासदार,पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.या दीक्षांत समारंभात विविध शाखांतील एकूण ९३७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये पदवी व पदव्युत्तर ९२१ तर १६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे . यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, डिझाईन, मीडिया, फिजिकल अँड केमिकल सायन्सेस, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आर्ट्स, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शाखांचा समावेश आहे. या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत,अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. एन. के. पाटील यांनी दिली.
संजय घोडावत विद्यापीठाने स्थापनेपासून शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देत शिक्षणाच्या सर्व अंगांचा समतोल साधला आहे. या सातव्या दीक्षांत समारंभाद्वारे विद्यापीठ पुन्हा एकदा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना उज्ज्वल भविष्याच्या दिशेने प्रेरित करणार आहे.विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले आणि कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवशस्त्रशौर्यगाथा या भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्रप्रदर्शनाचे उद्या उद्घाटन

शिवशस्त्रशौर्यगाथा या भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्रप्रदर्शनाचे उद्या उद्घाटन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त मराठा योद्ध्यांकडून वापरली गेलेली शस्त्रे यांना अभिवादन म्हणून शिवशस्त्रशौर्यगाथा या भव्य मराठाकालीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापुर येथे करण्यात आले आहे. या भव्य मराठाकालीन शस्त्रप्रदर्शनाचे उद्घाटन माननीय नामदार ॲङ आशिष शेलार, मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व जिल्ह्यातील मंत्री आणि खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत दिनांक २८ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी. ९.३० वा. संपन्न होत आहे.
या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय लंडन येथुन करार तत्वावर आणण्यात आलेली “वाघनख” असून या प्रदर्शनामध्ये ज्येष्ठ शस्त्रसंग्राहक व अभ्यासक दिवंगत गिरीशराव जाधव यांच्या महाराष्ट्र शासनाने संपादित केलेल्या शस्त्र संग्रहातील निवडक शस्त्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. हे प्रदर्शन जन सामान्यांना पाहण्याकरिता उद्या दिनांक २८.१०.२०२५ पासुन दिनांक ०४.०५.२०२६ पर्यंत खुले राहणार आहे.
तरी या प्रदर्शनाचा सर्व जन सामान्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडून करण्यात येत आहे.

टीम ‘बाई तुझ्यापायी’च्या टीमने घेतले महालक्ष्मीचे दर्शन

टीम ‘बाई तुझ्यापायी’चा कोल्हापूर दौरा – दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, क्षिती जोग आणि साजिरी जोशींची महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दर्शनासह माध्यमांशी संवाद

टीम ‘बाई तुझ्यापायी’च्या टीमने घेतले महालक्ष्मीचे दर्शन

कोल्हापूर/प्रतिनिधी : ZEE5 ची आगामी मराठी ओरिजिनल मालिका ‘बाई तुझ्यापायी’ धैर्य, शिक्षण आणि जुनाट परंपरांना प्रश्न विचारण्याच्या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा रंगवत आहे. सिक्स्टीन बाय सिक्स्टी-फोर प्रॉडक्शन निर्मित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या मालिकेत साजिरी जोशी, क्षिती जोग, सिद्धेश धुरी आणि शिवराज वैचळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
१९९० च्या दशकातल्या काल्पनिक ‘वेसाच्या वाडगाव’ या गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा अहिल्या (साजिरी जोशी) या तरुण मुलीची आहे — जी अंधश्रद्धेला आव्हान देत शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी लढा देते आणि परिवर्तनाची ज्योत संपूर्ण समाजात पेटवते. ‘बाई तुझ्यापायी’ ही मालिका ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी फक्त ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
प्रमोशनल टूरचा भाग म्हणून, दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि प्रमुख कलाकार क्षिती जोग व साजिरी जोशी कोल्हापूरला भेट दिली. दिवसाची सुरुवात पत्रकार परिषदेतून झाली जिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, मालिकेतील भावनिक प्रवास, त्यामागचा संदेश आणि चित्रीकरणातील अनुभव शेअर केले.
यानंतर टीमने श्री महालक्ष्मी मंदिराला भेट देत मालिकेच्या यशासाठी आशीर्वाद घेतला आणि श्रद्धा व धैर्याने विणलेल्या या कथेला साकार करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा क्षण *‘बाई तुझ्यापायी’*च्या आत्म्याशी सुंदररीत्या सुसंगत ठरला – जिथे श्रद्धा आणि शौर्य हातात हात घालून चालतात.
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाले, “‘बाई तुझ्यापायी’ ही एक सर्वमान्य कथा आहे. मुलगी मोठी होत असताना तिच्या शरीरात बदल घडतोच, पण त्याचबरोबर समाजात तिच्यावर अनेक बंधने लादली जातात. या कथेतली नायिका या बंधनांचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करते — ही बंधने खरंच आवश्यक आहेत का, की स्त्रियांना नियंत्रित ठेवण्याचं आणखी एक साधन आहेत? कोल्हापूर माझं घर आहे. माझे वडील इथलेच आहेत आणि माझं बालपणातील बरंचसं सुट्टीचं आयुष्य इथे गेलं आहे. हे शहर माझ्या मनात खास स्थान घेऊन आहे. कोल्हापूरच्या माध्यमांचे आणि लोकांचे मनःपूर्वक आभार, त्यांनी आमचं अतिशय आदराने स्वागत केलं.”
क्षिती जोग म्हणाल्या, “माझं पात्र एका आईचं आहे — जी परंपरा आणि परिवर्तन यांच्या मध्ये अडकलेली आहे. ती मुलीवर मनापासून प्रेम करते, पण तिच्या मनात रुतलेल्या सामाजिक गोष्टींपासून स्वतःला मुक्त करणं तिच्यासाठी कठीण असतं. हीच गोष्ट *‘बाई तुझ्यापायी’*ला सर्वांसाठी लागू बनवते. आमच्या कोल्हापूर भेटीने हे जाणवलं की ही कथा लोकांच्या मनाला खोलवर स्पर्श करते. महालक्ष्मी मंदिरातलं दर्शन भावनिक आणि स्थिर करणारे होतं — करुणा आणि समजूतदारपणातूनच खरी ताकद निर्माण होते, याची जाणीव झाली. या मालिकेचा भाग होण्याचा मला अभिमान आहे.”
साजिरी जोशी, जी मालिकेत अहिल्याची भूमिका साकारते, म्हणाली, “अहिल्या साकारणं माझ्यासाठी आयुष्य बदलणारं ठरलं. ती फक्त एक पात्र नाही — ती प्रत्येक मुलगी आहे जिला सांगितलं गेलं आहे की ‘तू हे करू शकत नाहीस’. मालिकेच्या प्रीमियरपूर्वी महालक्ष्मीदेवीचं दर्शन घेणं खूप प्रतीकात्मक वाटलं, जणू अहिल्याचा प्रवास पूर्णत्वास पोहोचल्यासारखं. कोल्हापूरच्या श्रद्धेने आणि प्रेमाने आम्हाला या कथेमागचा खरा अर्थ पुन्हा जाणवला. प्रेक्षकांना मी विनंती करते की त्यांनी अहिल्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहावं — तिचं धैर्य, तिचा विश्वास आणि शिक्षण हेच खरं स्वातंत्र्य आहे ही तिची धारणा.”
‘बाई तुझ्यापायी’ पाहण्यासाठी सज्ज व्हा — ३१ ऑक्टोबर २०२५ पासून फक्त ZEE5 वर!

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. तर्फे, शिरोली (कोल्हापूर), येथे अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखाना चे भव्य उद्घाटन

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. तर्फे, शिरोली (कोल्हापूर), येथे अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखाना चे भव्य उद्घाटन ….

कोल्हापूर/प्रतिनिधी : गुजरीच्या गल्लीत एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि., या नामांकित दागिन्यांच्या कंपनीने आपल्या अत्याधुनिक दागिन्यांच्या निर्मिती युनिटचे भव्य उद्घाटन शिरोली (कोल्हापूर) येथे करण्यात आले.

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींगची स्थापना सन १९७३ मध्ये श्री. हंजारीमलजी राठोड यांच्या पुढाकाराने झाली होती. व्यवसायाची सुरुवात राठोड परिवाराचे कुटुंबप्रमुख श्री. हंजारीमलजी राठोड यांनी गुजरी येथून एका छोट्या दुकानातून केली, पुढे जाऊन प्रतिभा नगर मध्ये दागिने मॅन्युफॅक्चरिंग करिता एक छोटा कारखाना सुरू केला, त्यापुढे चंद्रकांत राठोड यांनी शिरोली येथे एका छोट्या युनिटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग चे काम वाढवत सुरू ठेवले, आणि त्यापुढे जयपुर मध्ये (राजस्थान) येथे त्यांनी अजून एक अत्याधुनिक जयपूरची राजस्थानी ट्रेडिशनल ज्वेलरी बनवण्याचा कारखाना देखील सुरू केला आहे.गेल्या पाच दशकांपासून उत्कृष्ट गुणवत्ता, विश्वासार्हता आणि नवकल्पनांमुळे राठोड ज्वेलर्स हे नाव दागिन्यांच्या जगतात अग्रस्थानी राहिले आहे.                                                                                              राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग ही नवी अत्याधुनिक उत्पादन सुविधा कंपनीच्या उद्योजकीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनी आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण ज्वेलरी ब्रँड्सना मोठ्या प्रमाणावर दागिन्यांचा पुरवठा करते. उपलब्ध माहितीनुसार, राठोड ज्वेलर्स मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. उच्च प्रतीचे सोन्याचे दागिने (उदा. अँटिक गोल्ड, अनकट डायमंड, पोलकी चे हार, कुंदन व जडाऊ दागिने, कष्टमाइज्ड डिझाइनर ज्वेलरी) असे विविध प्रकारचे दागिने उत्पादन करण्यासाठी ओळखली जाते.

नवीन ज्वेलरी उत्पादन कारखान्याच्या उद्घाटन सोहळ्यास जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रकाश आबिटकर , खासदार श्री. धनंजय म्हाडीक , खासदार श्री. धैर्यशील माने , आमदार श्री. सतेज पाटिल , आमदार श्री. राहुल अवाडे , माजी खासदार श्री. संजय मंडलिक, सुपरिटेंडेंट ऑफ़ पुलिस श्री. योगेशजी गुप्ता, मालाबार गोल्डचे व्हॉइस प्रेसिडेंट श्री. के. पी. अब्दुलसलाम, जॉयलुकासचे श्री. सुरेशभाई जैन, विविध मान्यवर, स्थानिक उद्योगपती तसेच राठोड परिवार आणि त्यांच्या जिवलग मित्रमंडळींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी राठोड ज्वेलर्सच्या यशस्वी प्रवासाचे कौतुक करत, या नव्या अत्याधुनिक युनिटमुळे (कारखाना) कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकास आणि स्थानिक रोजगार निर्मितीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आणि कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे उदगार काढले.

मान्यवरांनी यावेळी राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. चंद्रकांत राठोड आणि त्यांच्या कुटुंबाचे (पत्नी रूपाली , कन्या रीवा , चिरंजीव हीद्रय ) अभिनंदन केले. गुजरीमधील छोट्या दागिन्यांच्या कारखान्यापासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरवठादार कंपनीपर्यंतच्या या यशस्वी वाटचालीवर मान्यवरांनी प्रकाश टाकला आणि कोल्हापूरच्या पारंपरिक सुवर्ण कारागिरीला आधुनिकतेची जोड देऊन जागतिक स्तरावर नेल्याबद्दल कौतुक केले.

यावेळी बोलताना मा. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राठोड यांनी छोट्याशा दुकानातून सुरू केलेला व्यवसाय हा आता नवीन कारखान्याच्या रूपाने पुढे आला आहे, अथक परिश्रमातून राठोड कुटुंबियांनी आपला व्यवसाय वृद्धिगत केला आहे असे सांगून त्यांच्या या दागिने उद्योग क्षेत्राबरोबर आता कोल्हापूरमध्ये राठोड कुटुंब यांनी दागिन्यांची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उभा करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून याद्वारे कोल्हापूरची ओळख सर्व दूर होणार असून दागिने बनविण्याचा कारखाना सुरू करून कोल्हापूरमध्ये एक अभिमानास्पद काम केले आहेत असे सांगितले.

यापुढे बोलताना खासदार मा. धैर्यशील माने यांनी राठोड कुटुंबाची उतुंग भरारी ही कोल्हापूरसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असून पश्चिम महाराष्ट्रात यामुळे कोल्हापूरचे नाव सर्व दूर पोहोचलेले आहे कोल्हापूर मधील हुपरी हे गाव चांदी व्यवसायासाठी परिचित आहे तसेच राठोड कुटुंबाचे नाव या दागिने व्यवसायामध्ये सर्वदूर पोहोचणार आहे. राठोड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्या मुळे कोल्हापूरच्या दागिन्यांची ओळख आता सर्व दूर पोहोचणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर बोलताना खासदार मा. धनंजय महाडिक यांनी चंद्रकांत राठोड यांचे कोल्हापूर मध्ये नवीन अत्याधुनिक मशिनरी सह दागिने बनवण्याचा मॉर्डन कारखानासुरू एक मोठे युनिट आज पासून सुरू होत असून, असा भव्य दिव्य कारखाना कोल्हापूर मध्ये आता राठोड यांच्यामुळे पहावयास मिळणार आहे ही कोल्हापूरच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असे सांगितले.

यावेळी बोलताना आमदार मा. सतेज पाटील यांनी कोल्हापूरचे नाव अनेक क्षेत्रात पुढे आहे तसेच आता दागिन्याच्या बाबतही राठोड यांच्यामुळे आणखी पुढे येणार असून राठोड यांनी कला दाखविण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे.राठोड कुटुंबातील तिसरी पिढी रीवा आणि ह्रदय यांनी आपल्या कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तुंग भरारी घेतली असल्याचे नमूद केले.

यावेळी बोलताना मलाबार गोल्ड चे व्हॉइस प्रेसिडेंट श्री.. के.पी अब्दुल सलाम यांनी बोलताना राठोड कुटुंबाचे अभिनंदन केले.या अत्याधुनिक उत्पादन युनिटमध्ये नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाचे सोन्या-चांदीचे दागिने तयार केले जाणार आहेत. जागतिक दर्जाची गुणवत्ता, कुशल कारागीर आणि नाविन्यपूर्ण डिझाईन्स यांच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणे हे राठोड ज्वेलर्सचे ध्येय आहे.

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. नेहमीप्रमाणे ग्राहकांचा विश्वास, उत्कृष्टता आणि परंपरेचा वारसा पुढे नेत भारतीय दागिन्यांच्या उद्योगात नवे मानदंड प्रस्थापित करण्यास कटिबद्ध आहे.राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग च्या नव्या युनिटमुळे कोल्हापूरच्या सुवर्ण उद्योगाला नवी दिशा मिळेल, तसेच या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.राठोड परिवार तर्फे चंद्रकांत राठोड यानी सर्व उपस्थिताचे आभार मानले.

पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील (दादासाहेब) यांचा ९० वा वाढदिवस बुधवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी दादासाहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ साली कसबा बावडा येथे पहिले अभियांत्रिकी महविद्यालय सुरू केले. त्यानंतर कोल्हापूर, मुंबई व पुणे येथे डी.वाय’ पाटील ग्रुपचा विस्तार करत अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, हॉस्पीटल, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू केल्या. दादासाहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आज ८ विद्यापीठे, १७ अभियांत्रिकी महाविद्यालये, १८२ संस्था, २२ हजाराहून अधिक कर्मचारी, सव्वा चार लाखाहून अधिक माजी विद्यार्थी असा संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे.
शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दादासाहेबांनी बुधवारी ९१व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबीयांनी औक्षण करून दादासाहेबांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले. दादासाहेबाच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, सौ. राजश्री काकडे, डॉ. प्रिया चोलेरा, सौ. वैजयंती संजय पाटील, श्री. मेघराज काकडे, डॉ. प्रदीप पालशेतकर, पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, करण काकडे,सौ. चैत्राली काकडे, यांच्यासह सुना, जावई, नातसुना-जावई, नातवंडे- पणतवंडे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोनद्वारे दादासाहेबाना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. खासदार शाहू महाराज छत्रपती,डी वाय पाटील विद्यापीठ, पुणेचे कुलपति डॉ पी डी पाटील, पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के पी पाटील, मानसिंगराव खोराटे, दिनमानचे संपादक विजय चोरमारे लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे, मकरंद देशपांडे, माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे, डॉ बी पी साबळे, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सतिश पावसकर, चिमणराव डांगे, धैर्यशील पाटील ( इस्लामपूर) जयंत प्रदीप पाटील, डी आर मोरे, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, यांच्यासह यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य,पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून दादासाहेबांना शुभेच्छा दिल्या.