वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई
कोल्हापूर/प्रतिनिधी : एकेरी मार्गात वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन प्रवेश करणारे १२४ वाहनचालकांवर तसेच सिग्नल जंम्प करणारे ३६ वाहनधारकांवर व इतर कारवाई मिळून एकूण २५६ वाहन धारकांवर कारवाई करुन त्यांचेकडून ४,९८,०००/- रुपये दंड करुन वाहतूक शाखेने कारवाई केली आहे.ही मोहीम आज.राबविण्यात आली.
कोल्हापूर शहरामध्ये सध्या मोटार वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूकीची समस्या निर्माण होत असल्याने वाहतूक सुरळीत व सुरक्षित रहावी, नागरिक व पादचारी यांना रस्ता सुरक्षा प्रस्थापित व्हावी म्हणून वेळोवेळी एकुण ३० ठिकाणचे मार्ग हे सर्व प्रकारच्या मोटार वाहनांसाठी एकेरी वाहतूक करण्यात आलेले आहेत.
तरी परंतु अजुनही काही वाहनधारक हे जाणून बुजुन एकेरी मार्गामध्ये प्रवेश करुन नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांचे या उल्लंघनामुळे नियमाचे पालन करणारे वाहनधारकाना अडथळा होत आहे. अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा वाहनधारकांचे कृतीस आळा बसावा या उददेशाने शहर वाहतुक नियंत्रण शाखा, कोल्हापूरचे वतीने नियमबाहय एकेरी मार्गावर आपली वाहने चालविणारे तसेच सिंग्नल जंम्प करणारे वाहनधारकाविरुध्द दि. १८/११/२०२५ रोजी बिनखांबी गणेश मंदीर, मिरजकर तिकटी, दिलबहार चौक, दुर्गा चौक, राजारामपूरी, वटेश्वर मंदीर या वनवे परिसरात तसेच लिशा हॉटेल चौक, ताराराणी चौक, मुक्त सैनिक चौक, व्हिनस कॉर्नर, दाभोळकर, माळकर व पार्वती सिंग्नल चौकात विशेष व्यापक मोहीम राबवुन कायदेशीर कारवाई आली असून या पुढेही ही मोहीत तीव्र स्वरुपात राबवली जाणार आहे.
आज दि. १८/११/२०२५ रोजी राबवण्यात आलेल्या व्यापक मोहीमेत एकुण २५६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. आहे. सदर कारवाईवेळी इतर तिब्बल सिट वाहन चालविणारे १५, वाहन चालविताना मोबाईलचा वापर १३, अल्पवयीन मुलाने वाहन चालविले बाबत ०२, लायसन्स जवळ न बाळगले बाबत ३५, नो पार्कींग ३१ वाहनधारकांवर मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन केल्याने त्यांचे विरुध्द दंडात्मक कारवाई केलेली आहे.तरी शहर वाहतुक नियंत्रण शाखा कोल्हापूरचे वतीने सर्व नागरिक / वाहनचालक यांना आवाहन करण्यात येते की, वाहनचालकांनी कोल्हापूर शहरातील एकेरी मार्गावरुन वाहतुक करुन नियमांचे उल्लंघन करुन नियमांचे पालन करणारे वाहनधारकांना कोणत्याही प्रकारे अडथळा करु नये तसेच सिंग्नल चौकामध्ये रेड लाईट लागलेनंतर वाहन धारकांनी आपले वाहन पुढे जावू नये त्यामुळे अपघातासारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनधारकांनी वाहतुकीचे नियमांचे तंतोतंत पालन करावे. वाहन चालविताना आपले सोबत ड्रायव्हींग लायसन्स व आपले वाहनांच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जवळ बाळगाव्यात अन्यथा वाहनधारकांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे सूचित करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षकसो, मा. अपर पोलीस अधीक्षकसो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली व शहर वाहतुक शाखेकडील पो. नि. नंदकुमार मोरे, यांचे निरीक्षणाखाली सहा. पोलीस निरीक्षक दिपक जाधव नागेश म्हात्रे व पोलीस अंमलदार यांच्या करवी करण्यात आली आहे.






