Grid Posts

View All
माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

Thumbnail

View All
महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

Tile List

View All
My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा ख्रिश्चन, मुस्लिमांना अनुसूचित जातीचा दर्जा देता येणार नाही मुंबई/प्रतिनिधी : सुप्रिम कोर्टाने आज २४…

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

Tile Posts

View All
My Marathi

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

My Marathi

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती…

My Marathi

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुंबई

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

List Posts

View All
My Marathi

गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील…

My Marathi

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई…

My Marathi

धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

‘धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतिक्षित…

माय मराठी

आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण

सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा पुढाकार आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण  …

Thumbnail

View All
माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

माय मराठी

घोडावत विद्यापीठात भूगोल दिन साजरा’माय व्हिलेज माय मॅप’ पोस्टर स्पर्धा यशस्वी

अतिग्रे/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना स्थानिक भूगोलाची शास्त्रीय समज, नकाशावाचन कौशल्य आणि ग्रामीण विकासाबाबतची जाणीव वाढीस लागावी या हेतूने १४ जानेवारी भूगोल…

माय मराठी

कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघ घोटवडे प्रचारसभा

अमृता डोंगळे, संग्राम कलीकते, पुनम पाटील यांच्या विजयाने कै. दादासाहेब पाटील-कौलवकर, माजी आमदार गोविंदराव कलिकते, गणपतराव डोंगळे यांच्या कार्याचा गौरव…

माय मराठी

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून नॉर्थ ईस्ट कनेक्ट उपक्रमाचे यशस्वी आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मा. पोलीस महासंचालक साो, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार “नॉर्थईस्ट…

माय मराठी

कोल्हापूर महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी मुरलीधर जाधव, तर शिवसेनेच्या गटनेतेपदी शारंगधर देशमुख

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेत भाजपकडून गटनेतेपदी अनुभवी नगसेवक मुरलीधर जाधव यांची, तर शिवसेनेकडून माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांची…

माय मराठी

८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारणाचे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात योगदान द्या : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार; गट स्थापनेच्या प्रक्रियेला सुरवात कोल्हापूर दि.२३ : पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवीत इतिहास…

माय मराठी

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार… शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन कोल्हापूर /प्रतिनिधी : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे.…

माय मराठी

सेंद्रिय गुळापासून जिलेबीप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रीय गुळाच्या जिलेबीच्या स्टॉलचा शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : चव, रंग आणि गोडी यामुळे जगप्रसिध्दी मिळालेल्या कोल्हापुरी गुळापासून आता जिलेबी तयार करण्याची युक्ती शेतकऱ्यांनी लढवली आहे. निमित्त…

माय मराठी

कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी

राष्ट्रीय पर्यटन दिनी ई – मेल द्वारे केले मागणीचे निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि…

माय मराठी

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका !

रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर! कोल्हापूर/प्रतिनिधी: “शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” असं म्हणत सुरू झालेल्या ‘बिग…

घोडावत विद्यापीठात भूगोल दिन साजरा’माय व्हिलेज माय मॅप’ पोस्टर स्पर्धा यशस्वी

अतिग्रे/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना स्थानिक भूगोलाची शास्त्रीय समज, नकाशावाचन कौशल्य आणि ग्रामीण विकासाबाबतची जाणीव वाढीस लागावी या हेतूने १४ जानेवारी भूगोल दिनाचे औचित्य साधून संजय घोडावत विद्यापीठात नुकताच भूगोल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भूगोल विभागाच्या वतीने ‘माय व्हिलेज माय मॅप’ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. उद्धव भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. एन. के. पाटील, मानवविदया व सामाजिक शास्त्र संकुलाचे अधिष्ठाता डॉ. उत्तम जाधव, भूगोल विभाग प्रमुख डॉ. कपिल पाटील, तसेच प्रा. विशाल जाधव, प्रा. गोपाळ पाटील उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. आज्ञा मांजरेकर व प्रा. अंबपकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचा भौगोलिक नकाशा, नैसर्गिक संसाधने, लोकवस्ती, वाहतूक, जलस्रोत तसेच विकासाच्या संधी व समस्या यांचे पोस्टरद्वारे प्रभावी सादरीकरण केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, नकाशा मांडणी, विषयाची स्पष्टता व सादरीकरण कौशल्य यांचे विशेष कौतुक केले.यासाठी विश्वस्त विनायक भोसले यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भूगोल विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. याबद्दल संस्थेचे चेअरमन संजयजी घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघ घोटवडे प्रचारसभा

अमृता डोंगळे, संग्राम कलीकते, पुनम पाटील यांच्या विजयाने कै. दादासाहेब पाटील-कौलवकर, माजी आमदार गोविंदराव कलिकते, गणपतराव डोंगळे यांच्या कार्याचा गौरव करूया : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघाची घोटवडे येथे जाहीर प्रचारसभा

घोटवडे/प्रतिनिधी : भोगावती खोऱ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये कै. दादासाहेब पाटील- कौलवकर, माजी आमदार गोविंदराव कलीकते आणि कै. गणपतराव डोंगळे या तिघांचेही योगदान मोठे आहे. या निवडणुकीत ही तिन्ही घरांणी एकत्र आली आहेत. कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार कु. अमृता डोंगळे, कसबा तारळे पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संग्राम अरूण कलीकते, कौलव पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. पुनम युवराज पाटील यांच्या विजयाने कै. दादासाहेब पाटील-कौलवकर, माजी आमदार कै. गोविंदराव कलिकते, कै. गणपतराव डोंगळे यांच्या कार्याचा गौरव करूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ घोटवडे ता. राधानगरी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी या नात्याने प्रदीर्घकाळ जनसेवा करायची असेल तर गरीब, सामान्य, दिनदलित, पददलित, युवक, बेरोजगार यांच्या सुखदुःखात मिसळून काम करण्याची गरज आहे. आमचे सर्वच उमेदवार गोरगरिबांच्या कल्याणाच्या कार्यात अग्रभागी राहतील.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, या निवडणुकीत कै. दादासाहेब पाटील- कौलवकर, माजी आमदार गोविंदराव कलीकते आणि कै. गणपतराव डोंगळे ही तिन्ही घरांणी एकत्र आली आहेत.त्यामुळे या जिल्हा परिषद मतदार संघात प्रचंड मताधिक्याने सर्वच उमेदवारांचा विजय होईल, याची खात्री आहे. अरुणराव डोंगळे यांच्या सहकार्याने या विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा पुढे नेऊ. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या नात्याने राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या विजयासाठी त्यांचे योगदान लाभणार आहे. आम्ही सर्वजण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली काम करू.

राष्ट्रवादी नंबर एक असेल….!
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निकालामध्ये नंबर एक असेल. त्यामध्ये राधानगरी तालुक्याचा वाटा सिंहाचा असेल.

चौकट….
धर्माच्या बाजूने उभे राहा……!
श्री. मुश्रीफ म्हणाले, अरुणराव डोंगळे गेली अनेक वर्षे गोकुळ दूध संघाच्या संचालक पदाच्या माध्यमातून सहकारात सेवार्थ आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दुर्दैवाने त्यांच्या घरातच धर्मयुद्ध सुरू झाले आहे. शेवटी जे महाभारतात झाले तेच होणार आहे. धर्म विरुद्ध अधर्मची ही लढाई आहे. तुम्ही सर्वजण धर्माच्या बाजूने उभे रहा.

यावेळी व्यासपीठावर गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुणराव डोंगळे, राष्ट्रवादीचे राधानगरी तालुका अध्यक्ष किसनराव चौगुले, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील- कौलवकर, केडीसीसी बँकेचे संचालक रणजिसिंह पाटील, आनंदराव आतवडे आदी प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून नॉर्थ ईस्ट कनेक्ट उपक्रमाचे यशस्वी आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मा. पोलीस महासंचालक साो, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार “नॉर्थईस्ट कनेक्ट” हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.या उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्हयामध्ये वास्तव्यास असलेल्या व शिक्षणासाठी आलेल्या ईशान्य राज्यांतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभ, संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी वरिष्ठ पोलीस व नागरी अधिका-यांशी संवाद साधला.
त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री योगेशकुमार गुप्ता साो, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री डॉ बी धीरजकुमार सोो, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील शहर विभाग, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री आप्पासाहेब पवार शाहुवाडी विभाग, व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुजितकुमार क्षीरसागर करवीर विभाग, पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण स्थानिक गुन्हे शाखा यांचे उपस्थितीत ईशान्य राज्यांतील विद्यार्थी कोण कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत, ते वास्तव्यास कोठे आहेत त्यांना काय अडचणी आहेत याबाबत माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना आलेले अनुभव देखील कथन केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे वतीने संपूर्ण सहकार्य व संरक्षणाची हमी दिली. यावेळी विद्यार्थ्यांना डायल ११२ आपत्कालीन सेवा, सीसीटीव्ही देखरेख तसेच पोलीस नियंत्रण कक्षाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमास विद्यार्थ्यांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
एकंदरीत, “नॉर्थईस्ट कनेक्ट” हा उपक्रम कोल्हापूर जिल्हयात यशस्वीपणे राबविण्यात आला असून ईशान्य राज्यांतील विद्यार्थ्यांमध्ये विश्वास, सुरक्षितता आणि समाजातील आपलेपणाची भावना दृढ करण्यास तो उपयुक्त ठरला आहे.

कोल्हापूर महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी मुरलीधर जाधव, तर शिवसेनेच्या गटनेतेपदी शारंगधर देशमुख

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेत भाजपकडून गटनेतेपदी अनुभवी नगसेवक मुरलीधर जाधव यांची, तर शिवसेनेकडून माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रसकडून माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास आणि काँग्रेसकडून इंद्रजीत बोंद्रे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारीला विशेष सभा आयोजित केली आहे. याचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी अमोल येडगे भूषवणार आहेत. महायुतीचे ४५ उमेदवार निवडून आल्याने त्यांचाच महापौर होणार हे निश्‍चित आहे. हे पद नागीरकांचा मागास प्रर्वगासाठी आरक्षित झाले आहे. महापौरपदासाठी विजयसिंह देसाई आणि विजयसिंह खाडे या दोघा नावांची अधिक चर्चा चालू आहे.

मानवतावादी साहित्य संमेलन माणसाला माणूस बनवण्याची प्रक्रिया पार पाडेल : संमेलनाध्यक्ष अ‍ॅड. डॉ. रमेश विवेकीडॉ. सुनीलकुमार लवटे, अ‍ॅड. जयंत जायभावे ‘मानवतावादी’ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित

कोल्हापूर/प्रतिनिधी : सद्य परिस्थितीमध्ये भारत जात, धर्म, वर्ग, वर्ण यामध्ये विभागला गेला आहे माणूस देखील कप्पे बंद झाला आहे. संस्कृतीच्या नावाखाली माणसं दुरावली जातील यासाठी धार्मिक राजकारण उभे केले जात आहे अशा काळात साहित्यिकांनी भूमिका घेत मानवतावादी विचारांची प्रेरणी करणे गरजेचे आहे. माणूस जगला तर देश जगेल. देश महासत्ता बनायचा असेल तर माणूस समृद्ध झाला पाहिजे. माणसाच्या विकासाची नवी परिभाषा निर्माण केली पाहिजे. धर्मांध राजकारण झुगारून मानवतावादी संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. मानवतावादी साहित्य संमेलन माणसाला माणूस बनवण्याची प्रक्रिया पार पाडेल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, दिग्दर्शक आणि निर्माते आणि संमेलनाध्यक्ष अ‍ॅड. डॉ. रमेश विवेकी यांनी प्रतिपादन केले.
ते लोकराजे राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत मानवतावाद जोपासण्याच्या दृष्टिकोनातून मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनात बोलत होते.
यावेळी कोल्हापूरचे ज्येष्ठ मानवतावादी साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे आणि नाशिकचे भारतीय संविधानाचे अभ्यासक, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रा अँड गोव्याचे मा. चेअरमन अ‍ॅड. जयंत जायभावे यांना अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्या हस्ते ‘मानवतावादी’ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अ‍ॅड. जयंत जायभावे म्हणाले, संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला असून लोकशाहीमध्ये अल्प असणारा विरोधी पक्षाला सन्मान देण्याची भूमिका अधोरेखित केली असताना सध्याच्या बहुमत असणारे लोक हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहेत. लोकशाही मोडीत काढून हुकूमशाहीकडे वाटचाल देशासाठी व संविधानासाठी घातक आहे. त्यामुळे मानवतावादी लोकांनी एकत्र येऊन याचा प्रतिरोध करणे गरजेचे आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, माणसांनी माणसांशी माणसाप्रमाणे वागावे. यासाठी मानवतावादी विचारांचा जागर होणे गरजेचे आहे. सत्यासोबत उभे राहणे माणसाला मानवीमूल्य प्राप्त करून देणे, त्याच्या अभिव्यक्तीला अबाधित ठेवण्यासाठीची भूमिका साहित्यिक विचारवंतांनी घेतली पाहिजे. मानवतावाद मानवी विकासाला मदत करणारा आशावाद आहे.
स्वागताध्यक्ष डॉ. राजेखान शानेदिवाण, संस्थापक अध्यक्ष अनिल म्हमाने, डॉ. मिलिंद आवाड, अ‍ॅड. विवेक घाटगे, डॉ. शोभा चाळके, निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, भरत लाटकर यांनी मनोगते व्यक्त केली. तत्पूर्वी मानवतावादी गाणं म्हणून शाहीर शीतल साठे व शाहीर सचिन माळी संमेलनाच उद्घाटन केले.
आदित्य म्हमाने आणि दूर्वा राजहंस लिखित आम्हाला जगायचे आहे! या बाल लेखकाच्या पुस्तकावर विशेष चर्चा करण्यात आली. भविष्यातील मुलं जगायची आहेत म्हणतात हा आशावाद येणाऱ्या पिढीसाठी खूपच खूपच सुखद आहे अशी प्रतिक्रिया संमेलनातील विविध मान्यवरांनी अधोरेखित केली. संमेलनात आम्हाला जगायचे आहे! या पुस्तकाच्या पंचवीस हजार प्रतींची वाचकांनी विक्रमी खरेदी केली.
दुपारच्या सत्रात मानवतावाद या विषयावर डॉ. कपिल राजहंस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात अ‍ॅड. कृष्णा पाटील, अ‍ॅड. करुणा विमल, प्राचार्य सुरेश कांबळे यांनी मानवतावादावर भाष्य केले. कवी व पत्रकार ताज मुल्लाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनास डॉ. किरण भिंगारदिवे, डॉ. वसंत भागवत, तानाजीराव जाधव, डॉ. सागर भजनावळे यांच्यासह शंभरहून अधिक कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
व्यंकाप्पा भोसले, भरत लाटकर, लालासाहेब नाईक, सुरेश केसरकर, कृष्णात पाटील, मधुकर शिर्के, प्रमोद कांबळे, सुनील जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या संख्येने साहित्यिक आणि विचारवंत उपस्थित होते.
मानवतावादी संमेलनात एकाच वेळी मानवतावादी ऐशी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर, गंगाधर म्हमाने, सिद्धार्थ तामगावे, निवेदक अभिजीत मासुर्लीकर, बालनिमंत्रक आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर, दुर्वा राजहंस यांनी संमेलनाचे आयोजन होते.

८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारणाचे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात योगदान द्या : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार; गट स्थापनेच्या प्रक्रियेला सुरवात

कोल्हापूर दि.२३ : पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवीत इतिहास रचला आहे. १९८६ सालच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून अपेक्षित यश मिळाले न्हवते परंतु या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे १५ शिलेदार निवडून आले आहेत. आज शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जन्मशताब्दी जयंती असून, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा सर्वांनी संकल्प करावा. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात मोलाचे योगदान द्या, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त नगरसेवकांना दिल्या.नूतन नगरसेवकांच्या विजयानंतर आता महापालिकेत अधिकृत गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने शिवालय शिवसेना जिल्हा कार्यालय शनिवार पेठ कोल्हापूर येथे शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच गट स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ जमा करण्याच्या सूचनाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, निवडून आल्यानंतर केवळ पदाचा उपभोग न घेता, प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीला धावून जा. ‘नगरसेवक’ ही केवळ एक पदवी आहे, पण लोकांच्या मनात ‘जनसेवक’ म्हणून जागा मिळवणे हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचे यश आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हा मूळ मंत्र अमलात आणून प्रभागाचा कायापालट करण्यासाठी झटून काम करा. राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून उर्वरित काळ समाजाच्या हितासाठी, प्रभागाच्या विकासासाठीच ठेवा. मतदारांशी सतत संवाद ठेवा. निवडणुकीत ज्या विश्वासाने त्यांनी मतदान केले, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कायम उपलब्ध रहा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेविका शिला सोनुले, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका संगीता सावंत, नगरसेविका कौसर बागवान उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार… शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर /प्रतिनिधी : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यांचे विचार घेवूनच शिवसेनेचे शिलेदार काम करत असून, या कामाच्या रूपानेच जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविला. नॅचरल जस्टीस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नसल्याचे सांगत कोल्हापूरवासियांनी वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आभार व्यक्त करीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
आज शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे शिवसेनाप्रमुख अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रात एकमेव कोल्हापुरातच महायुती म्हणून आम्ही निवडणुकीस सामोरे गेलो आहे. निवडणुकीच्या सुरवातीपासूनच वरिष्ठ नेत्यांसोबत महायुती होण्याकडे आम्ही वाटचाल केली. महायुतीमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी शिवसेनेने जागा वाटपात एक पाऊल मागे घेतले. या त्यागाचा मोबदला म्हणून महापौर पद शिवसेनेला मिळणे हा आमचा ‘नैसर्गिक हक्क’ आहे. महायुतीचे संख्याबळ ४६ हे सत्तास्थापने साठी पूरक आहे. त्यामुळे महायुतीत कोणताही वाद होईल अशी कोणाचीच भूमिका राहणार नाही. गेल्या काही वर्षातील महानगरपालिकेतील पदांच्या वाटपाचा लेखाजोखा करून सर्वच पक्षांना न्याय मिळेल अशा पद्धतीने पदांचे वाटप केले जाणार आहे. स्वीकृत नगरसेवकांची पदे कायद्याची अंमलबजावणी करून निवड केली जातील. देशात, राज्यात आणि महापालिकेत महायुतीचे सरकार असल्याने विकासकामांना कोणताही निधी कमी पडणार नाही. शहरातील प्रमुख प्रलंबित प्रश्नही लवकरच मार्गी लावू. नागरिकांना सेवा पुरविण्यात शिवसेना आणि महायुतीचे नगरसेवक कमी पडणार नाहीत. शहरातील प्रश्न सोडवून सुसज्ज आणि आधुनिक कोल्हापूरची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेविका शिला सोनुले, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका संगीता सावंत, नगरसेविका कौसर बागवान, शहरप्रमुख रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, उदय भोसले, राहुल चव्हाण, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अरविंद मेढे, विजय जाधव, दादा माने, महिला आघाडीच्या पूजा भोर, अमरजा पाटील, पूजा कामते, सुनिता भोपळे, पूजा आरदांडे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेंद्रिय गुळापासून जिलेबीप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रीय गुळाच्या जिलेबीच्या स्टॉलचा शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : चव, रंग आणि गोडी यामुळे जगप्रसिध्दी मिळालेल्या कोल्हापुरी गुळापासून आता जिलेबी तयार करण्याची युक्ती शेतकऱ्यांनी लढवली आहे. निमित्त आहे. प्रजासत्ताक दिनाचे. प्रा. अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून गूळ उत्पादक शेतकरी राजेंद्र करंबे यांनी त्यांच्या शेतात उत्पादित झालेल्या उसाच्या रसापासून हा गूळ तयार करण्यात आला आहे. त्याच गुळाच्या पाकातून जिलेबी तयार केली आहे. मिरजकर तिकटी येथे सुरु करण्यात आलेल्या जिलेबी स्टॉलचा शुभारंभ जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, नगरसेवक विशाल शिराळे, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, कृषीअभ्यास डी.बी.चव्हाण, माजी नगरसेवक किरण शिराळे, बाबा पार्टे, सीपीआरचे डॉ. शिरीष मुरगुंडे, शिक्षक नेते पी.के.पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, जयाकुमार शिंदे, एसएससी बोर्डाचे अधिकारी रणजित देसाई आदी उपस्थित होते.
कोल्हापूरकर नेहमीच वेगळे कांही शोधत असतात, त्यातून साखरेच्या पाकापासून तयार केलेल्या जिलेबीबरोबर कोल्हापुरीतील गुळापासुन तयार केलेल्या जिलेबीचा स्टॉल सर्वानाच आवडेल, असा विश्वास जिल्हा पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक प्रा. अशोक पाटील यांनी केले. पुढारीचे संपादक डॉ. प्रतापसिहं जाधव यांच्या प्ररेणेने गुळाच्या जिलेबीचा स्टॉल सुरु केला आहे. या जिलेबीसाठी संपूर्णपणे सेंद्रीय गुळाचा वापर केला आहे. त्यामुळे कोल्हापूरशहर वासियांच्याबरोबर भाविक, पर्यंटक यांना ही जिलेबी आवडेल, असेही प्रा. पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी

राष्ट्रीय पर्यटन दिनी ई – मेल द्वारे केले मागणीचे निवेदन सादर

कोल्हापूर/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक समुदायामध्ये भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिन आज २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक पर्यटनासह उद्योजक आणि व्यापार पर्यटनाची मोठी क्षमता असणारा जिल्हा आहे. गेल्या अनेक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात देशविदेशातील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी आज ई- मेल द्वारे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
या निवेदना पुढे म्हंटले आहे कि, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा धार्मिक सणांसह साप्ताहिक, वार्षिक सुट्ट्यांच्या दिवशीही कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळते. एकंदरीत कोल्हापूर जिल्हा एकप्रकारे “पर्यटन हब” च्या दृष्टीने वाटचाल करत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा मिळाल्यास कोल्हापूर हे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र म्हणून उदयाला येऊ शकते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा देणेबाबतची मागणी समस्त कोल्हापूरवासियांकडून केली जात आहे.
कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाची मोठी क्षमता असून, यासाठी खालील मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतात.

धार्मिक वारसा :

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर: हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक येतात. यासह खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, श्री जोतीबा मंदिर, श्री नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर, आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिर, पट्टणकोडोली येथील श्री बिरदेव मंदिर, श्री बाहुबली ब्रम्हचर्य आश्रम, श्री कणेरी मठ असा धार्मिक श्रद्धास्थाने कोल्हापूरमध्ये वसली आहेत.

ऐतिहासिक वारसा :

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत, ज्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे किल्ले केवळ लष्करी तळ नव्हते, तर त्या काळातील स्थापत्यकलेचे उत्तम नमुने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावनझालेला किल्ले पन्हाळा गड, किल्ले विशाळगड, वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची साक्ष देणारी पवित्र पावनखिंड, गगनगिरी गड, भुदरगड, रांगणा किल्ला, सामानगड येथील सात दरवाजांची विहीर, यासह न्यू पॅलेस, शालिनी पॅलेस, भवानी मंडप हे कोल्हापूरच्या राजघराण्याचा इतिहास आणि वास्तुकलेचा हा एक उत्तम नमुना आहे.

नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीव :

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य: गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य निसर्गप्रेमींना आकर्षित करते. दाजीपूर जंगल: ट्रेकिंग आणि जंगल सफारीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. त्याचबरोबर आंबा घाट हा सह्याद्री वाघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. ‘विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्रात’ पर्यकांसाठी जंगल सफारी उपलब्ध आहे. कोकण किनारपट्टीशी जवळीक: कोल्हापूर हे गोवा, कोकण तसेच कर्नाटक राज्यात जाणाऱ्या पर्यटकांचे महत्त्वाचे ठिकाण आहे. यासह कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव सद्या पर्यटकांचा आकर्षकबिंदू ठरत आहे. यासह जिल्ह्यात उपलब्ध असणारे राधानगरी सह इतर धरणे, नैसर्गिक धबधबे, सनसेट पाँइंट, सह्याद्री पर्वतरांगा, घाट कोल्हापूरच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालत आहेत.

सांस्कृतिक व औद्योगिक ओळख :

कोल्हापूरी खाद्यसंस्कृती: तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ-पाव, गुळ, साखर जगभरात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरी चप्पल, साज दागिने, चांदीचे दागिने, वस्त्रोद्योग, कास्टिंग, मशिनिंग आणि फाऊंड्री उद्योगांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, पारंपारिक हस्तकला उद्योग हे कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यातील एक प्रगत औद्योगिक जिल्हा बनवत आहेत. यासह नुकत्याच मंजूर झालेल्या सर्किट बेंच, आय.टी. पार्क मुळे कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत जाणार आहे.

कला, क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय नगरी :

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, विशेषतः गरीब आणि मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा पाया रचला, ज्यामुळे कोल्हापूरमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.  येथे विविध अभ्यासक्रमांसाठी अनेक महाविद्यालये आहेत. शिवाजी विद्यापीठ या विद्यापीठाच्या अखत्यारीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे तीन जिल्हे येतात. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याने शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या काळात संगीत, नाटक, चित्रकला आणि हस्तकला यांसारख्या कलांना राजाश्रय मिळाला, ज्यामुळे अनेक कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात आणि सुवर्णकाळात कोल्हापूरचे मोठे योगदान आहे. या सर्व कलात्मक आणि सांस्कृतिक वारशामुळे कोल्हापूरला खऱ्या अर्थाने ‘कलानगरी’ म्हटले जाते.
राजर्षी शाहू महाराजांनी या नगरीत खेळांचा पाया रचला, जो आजही तितक्याच उत्साहाने जपला जात आहे. कोल्हापूरला “क्रीडानगरी” किंवा “क्रीडापंढरी” म्हणून ओळखले जाते, कारण येथील रक्तातच कुस्ती आणि फुटबॉलसारख्या खेळांची आवड भिनलेली आहे. कोल्हापूर ही कुस्तीगिरांची खाण आहे. येथील खासबाग मैदान हे भारतातील एकमेव गोलाकार कुस्ती मैदान असून, शहरात आणि जिल्ह्यात अनेक “तालीम” (आखाडे) आहेत, जिथे देशविदेशातील मल्ल आजही मातीच्या कुस्तीचे धडे गिरवतात. त्यामुळे कोल्हापूर हे खऱ्या अर्थान कुस्तीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूरला ‘महाराष्ट्राचे फुटबॉल हब’ म्हटले जाते. येथे स्थानिक क्लबच्या सामन्यांनाही ६०,००० हून अधिक प्रेक्षक गर्दी करतात. कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक नामवंत फुटबॉल खेळाडूंनी राज्याच्या आणि देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव याच मातीतील होते. तसेच नेमबाजीमध्ये राही सरनोबत, तेजस्विनी सावंत आणि पोहण्यामध्ये वीरधवल खाडे यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा डंका वाजवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याने आरोग्यसेवेत मोठी प्रगती केली असून, अत्याधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांमुळे गोवा, कोकण आणि कर्नाटकच्या सीमेवरील रुग्णांसाठी कोल्हापूर हे सोयीस्कर ठिकाण आहे, ज्यामुळे येथे वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळाली आहे.

पायाभूत सुविधा, दळणवळण :

कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि कोकण- गोवा राज्यांना जोडणारा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. नुकतेच कोल्हापूर विमानतळाचा झालेला विस्तार, प्रस्तावित कोल्हापूर - कोकण रेल्वेमार्ग, शक्तीपीठ महामार्ग, सोलापूर - रत्नागिरी महामार्ग यामुळे वाहतुकीची कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. यासह आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, पूरनियंत्रण प्रकल्प, यामुळे पायाभूत सुविधांचाही विकास होणार आहे. 

वरील सर्व बाबींचा विचार होवून कोल्हापूरला अधिकृत ‘पर्यटन हब’ चा दर्जा देणेबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवेदनातून केली आहे.

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका !

रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर!

कोल्हापूर/प्रतिनिधी: “शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” असं म्हणत सुरू झालेल्या ‘बिग बॉस मराठी ६’ च्या अभूतपूर्व यशाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या सिझनच्या पहिल्याच आठवड्यात रितेश भाऊंने सर्वांचं मन जिंकलं आहे. रितेश भाऊंचा तोच कडक अंदाज, त्यांचा जबरदस्त स्वॅग आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची त्यांची खास शैली यामुळे हा सिझन घराघरांत पोहोचला आहे. रितेश भाऊंच्या जादूने यंदा केवळ टीव्हीच नाही, तर डिजिटल जगतावरही अधिराज्य गाजवलं असून, खऱ्या अर्थाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली मोहोर उमटवली आहे. कलर्स मराठी आणि JioHotstar वर एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या या सिझनने लोकप्रियतेचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
कलर्स मराठीवर, ग्रँड प्रीमियर आणि दैनंदिन भागांना जोरदार सुरुवात मिळाली असून, लाँचिंगच्या पहिल्याच आठवड्यात ३३ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या आगमनामुळे मराठी जनरल एंटरटेनमेंट चॅनेलच्या (GEC) प्रेक्षकसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे; ३४ GRPs वरून ७७ GRPs पर्यंत झालेली ही २.३ पट वाढ या शोची जनमानसातील पकड अधोरेखित करते. जिओ स्टार पहिल्या भागाच्या ‘रीच’मध्ये ५ व्या सीझनच्या प्रीमियरच्या तुलनेत २.२ पट आणि ‘वॉच-टाइम’मध्ये ६.५ पट वाढ नोंदवण्यात आली. पहिल्या आठवड्यात जिओ स्टारवर देखील हा वेग कायम राहिला; गेल्या सीझनच्या तुलनेत व्हिडिओ व्ह्यूजमध्ये १.८ पट आणि वॉच-टाइममध्ये १.३ पट वाढ झाली असून, हे प्रेक्षकांचा वाढता कल आणि वारंवार पाहिल्या जाणाऱ्या संख्येचे निदर्शक आहे..
या अभूतपूर्व यशाचे मोठे श्रेय जाते ते म्हणजे महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार आणि शोचा होस्ट रितेश देशमुख यांना. प्रोमो रिलीज झाल्यापासूनच रितेश भाऊंच्या कडक डायलॉग्स नी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तय्यार!” या त्यांच्या वाक्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. ग्रँड प्रीमियर च्या दिवशी रितेश भाऊंचा तो अस्सल महाराष्ट्रीयन स्वॅग, ‘लार्जर-दॅन-लाईफ’ परफॉर्मन्स आणि त्यांच्या एन्ट्री ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यांचं प्रभावी सूत्रसंचालन, आणि त्यांच्या शब्दांमधली धार यामुळे ग्रँड प्रीमियर ची रंगत अजूनच वाढली. या सगळ्यामुळेच सिझन ६ चा ग्रँड प्रीमियर हा विक्रमी टीआरपी मिळवणारा कार्यक्रम ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात १७ सदस्यांनी मोठ्या दिमाखात एंट्री घेतली, आणि संपूर्ण आठवडा प्रेक्षकांना राडा, भांडणं, मैत्री, याने खिळवून ठेवले.