Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार कोल्हापूरमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार मुंबई/प्रतिनिधी :…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमधील रस्त्यांच्या स्थितीबाबत कोणतेही समाधानकारक काम न करता आज प्रतिवादी महानगर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रासंगिक लेख मातीत जन्मलो…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन कोल्हापूर, दि. ९: राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरीबाग येथील समाधीस्थळी मुख्यमंत्री…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संगीतसूर्य…

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

माय मराठी

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार… शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन कोल्हापूर /प्रतिनिधी : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे.…

माय मराठी

सेंद्रिय गुळापासून जिलेबीप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रीय गुळाच्या जिलेबीच्या स्टॉलचा शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : चव, रंग आणि गोडी यामुळे जगप्रसिध्दी मिळालेल्या कोल्हापुरी गुळापासून आता जिलेबी तयार करण्याची युक्ती शेतकऱ्यांनी लढवली आहे. निमित्त…

माय मराठी

कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी

राष्ट्रीय पर्यटन दिनी ई – मेल द्वारे केले मागणीचे निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि…

माय मराठी

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका !

रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर! कोल्हापूर/प्रतिनिधी: “शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” असं म्हणत सुरू झालेल्या ‘बिग…

माय मराठी

बँकांचे खाजगीकरण हे कर्मचाऱ्यांसमोरील मोठे आव्हान : राष्ट्रीय सरचिटणीस सी.एच.वेंकटाचलम

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनास कोल्हापुरात प्रारंभ कोल्हापूर/प्रतिनिधी : खाजगीकरण हे बँक कर्मचाऱ्यांसमोर सध्या मोठे आव्हान आहे. सर्वात…

माय मराठी

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे “त्रैवार्षिक अधिवेशन” येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी कोल्हापुरात

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे (महाराष्ट्र स्टेट बैंक एम्प्लॉइज फेडरेशन) त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन” येत्या शनिवारी आणि रविवारी दि. २४…

माय मराठी

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम

कोल्हापूर, अतिग्रे : रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व तरुण पिढीत रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट,…

माय मराठी

शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद

शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद एकुण २,७०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण…

माय मराठी

कोल्हापरमध्ये विकासाचे व्हिजन घेऊन मख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कटटयावर’साधला कोल्हापूरकरांशी संवाद

कोल्हापरमध्ये विकासाचे व्हिजन घेऊन मख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कटटयावर’साधला कोल्हापूरकरांशी संवाद कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने मिसळ कट्रा च्या…

माय मराठी

चार वर्षापासून फरार असलेला मोकातील आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई

कोल्हापूर/प्रतिनिधी:मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पाहीजे, फरार आरोपींचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.पोलीस…

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार… शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर /प्रतिनिधी : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यांचे विचार घेवूनच शिवसेनेचे शिलेदार काम करत असून, या कामाच्या रूपानेच जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविला. नॅचरल जस्टीस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नसल्याचे सांगत कोल्हापूरवासियांनी वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आभार व्यक्त करीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
आज शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे शिवसेनाप्रमुख अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रात एकमेव कोल्हापुरातच महायुती म्हणून आम्ही निवडणुकीस सामोरे गेलो आहे. निवडणुकीच्या सुरवातीपासूनच वरिष्ठ नेत्यांसोबत महायुती होण्याकडे आम्ही वाटचाल केली. महायुतीमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी शिवसेनेने जागा वाटपात एक पाऊल मागे घेतले. या त्यागाचा मोबदला म्हणून महापौर पद शिवसेनेला मिळणे हा आमचा ‘नैसर्गिक हक्क’ आहे. महायुतीचे संख्याबळ ४६ हे सत्तास्थापने साठी पूरक आहे. त्यामुळे महायुतीत कोणताही वाद होईल अशी कोणाचीच भूमिका राहणार नाही. गेल्या काही वर्षातील महानगरपालिकेतील पदांच्या वाटपाचा लेखाजोखा करून सर्वच पक्षांना न्याय मिळेल अशा पद्धतीने पदांचे वाटप केले जाणार आहे. स्वीकृत नगरसेवकांची पदे कायद्याची अंमलबजावणी करून निवड केली जातील. देशात, राज्यात आणि महापालिकेत महायुतीचे सरकार असल्याने विकासकामांना कोणताही निधी कमी पडणार नाही. शहरातील प्रमुख प्रलंबित प्रश्नही लवकरच मार्गी लावू. नागरिकांना सेवा पुरविण्यात शिवसेना आणि महायुतीचे नगरसेवक कमी पडणार नाहीत. शहरातील प्रश्न सोडवून सुसज्ज आणि आधुनिक कोल्हापूरची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेविका शिला सोनुले, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका संगीता सावंत, नगरसेविका कौसर बागवान, शहरप्रमुख रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, उदय भोसले, राहुल चव्हाण, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अरविंद मेढे, विजय जाधव, दादा माने, महिला आघाडीच्या पूजा भोर, अमरजा पाटील, पूजा कामते, सुनिता भोपळे, पूजा आरदांडे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेंद्रिय गुळापासून जिलेबीप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रीय गुळाच्या जिलेबीच्या स्टॉलचा शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : चव, रंग आणि गोडी यामुळे जगप्रसिध्दी मिळालेल्या कोल्हापुरी गुळापासून आता जिलेबी तयार करण्याची युक्ती शेतकऱ्यांनी लढवली आहे. निमित्त आहे. प्रजासत्ताक दिनाचे. प्रा. अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून गूळ उत्पादक शेतकरी राजेंद्र करंबे यांनी त्यांच्या शेतात उत्पादित झालेल्या उसाच्या रसापासून हा गूळ तयार करण्यात आला आहे. त्याच गुळाच्या पाकातून जिलेबी तयार केली आहे. मिरजकर तिकटी येथे सुरु करण्यात आलेल्या जिलेबी स्टॉलचा शुभारंभ जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, नगरसेवक विशाल शिराळे, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, कृषीअभ्यास डी.बी.चव्हाण, माजी नगरसेवक किरण शिराळे, बाबा पार्टे, सीपीआरचे डॉ. शिरीष मुरगुंडे, शिक्षक नेते पी.के.पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, जयाकुमार शिंदे, एसएससी बोर्डाचे अधिकारी रणजित देसाई आदी उपस्थित होते.
कोल्हापूरकर नेहमीच वेगळे कांही शोधत असतात, त्यातून साखरेच्या पाकापासून तयार केलेल्या जिलेबीबरोबर कोल्हापुरीतील गुळापासुन तयार केलेल्या जिलेबीचा स्टॉल सर्वानाच आवडेल, असा विश्वास जिल्हा पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक प्रा. अशोक पाटील यांनी केले. पुढारीचे संपादक डॉ. प्रतापसिहं जाधव यांच्या प्ररेणेने गुळाच्या जिलेबीचा स्टॉल सुरु केला आहे. या जिलेबीसाठी संपूर्णपणे सेंद्रीय गुळाचा वापर केला आहे. त्यामुळे कोल्हापूरशहर वासियांच्याबरोबर भाविक, पर्यंटक यांना ही जिलेबी आवडेल, असेही प्रा. पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी

राष्ट्रीय पर्यटन दिनी ई – मेल द्वारे केले मागणीचे निवेदन सादर

कोल्हापूर/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक समुदायामध्ये भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिन आज २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक पर्यटनासह उद्योजक आणि व्यापार पर्यटनाची मोठी क्षमता असणारा जिल्हा आहे. गेल्या अनेक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात देशविदेशातील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी आज ई- मेल द्वारे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
या निवेदना पुढे म्हंटले आहे कि, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा धार्मिक सणांसह साप्ताहिक, वार्षिक सुट्ट्यांच्या दिवशीही कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळते. एकंदरीत कोल्हापूर जिल्हा एकप्रकारे “पर्यटन हब” च्या दृष्टीने वाटचाल करत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा मिळाल्यास कोल्हापूर हे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र म्हणून उदयाला येऊ शकते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा देणेबाबतची मागणी समस्त कोल्हापूरवासियांकडून केली जात आहे.
कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाची मोठी क्षमता असून, यासाठी खालील मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतात.

धार्मिक वारसा :

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर: हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक येतात. यासह खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, श्री जोतीबा मंदिर, श्री नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर, आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिर, पट्टणकोडोली येथील श्री बिरदेव मंदिर, श्री बाहुबली ब्रम्हचर्य आश्रम, श्री कणेरी मठ असा धार्मिक श्रद्धास्थाने कोल्हापूरमध्ये वसली आहेत.

ऐतिहासिक वारसा :

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत, ज्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे किल्ले केवळ लष्करी तळ नव्हते, तर त्या काळातील स्थापत्यकलेचे उत्तम नमुने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावनझालेला किल्ले पन्हाळा गड, किल्ले विशाळगड, वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची साक्ष देणारी पवित्र पावनखिंड, गगनगिरी गड, भुदरगड, रांगणा किल्ला, सामानगड येथील सात दरवाजांची विहीर, यासह न्यू पॅलेस, शालिनी पॅलेस, भवानी मंडप हे कोल्हापूरच्या राजघराण्याचा इतिहास आणि वास्तुकलेचा हा एक उत्तम नमुना आहे.

नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीव :

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य: गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य निसर्गप्रेमींना आकर्षित करते. दाजीपूर जंगल: ट्रेकिंग आणि जंगल सफारीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. त्याचबरोबर आंबा घाट हा सह्याद्री वाघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. ‘विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्रात’ पर्यकांसाठी जंगल सफारी उपलब्ध आहे. कोकण किनारपट्टीशी जवळीक: कोल्हापूर हे गोवा, कोकण तसेच कर्नाटक राज्यात जाणाऱ्या पर्यटकांचे महत्त्वाचे ठिकाण आहे. यासह कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव सद्या पर्यटकांचा आकर्षकबिंदू ठरत आहे. यासह जिल्ह्यात उपलब्ध असणारे राधानगरी सह इतर धरणे, नैसर्गिक धबधबे, सनसेट पाँइंट, सह्याद्री पर्वतरांगा, घाट कोल्हापूरच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालत आहेत.

सांस्कृतिक व औद्योगिक ओळख :

कोल्हापूरी खाद्यसंस्कृती: तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ-पाव, गुळ, साखर जगभरात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरी चप्पल, साज दागिने, चांदीचे दागिने, वस्त्रोद्योग, कास्टिंग, मशिनिंग आणि फाऊंड्री उद्योगांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, पारंपारिक हस्तकला उद्योग हे कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यातील एक प्रगत औद्योगिक जिल्हा बनवत आहेत. यासह नुकत्याच मंजूर झालेल्या सर्किट बेंच, आय.टी. पार्क मुळे कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत जाणार आहे.

कला, क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय नगरी :

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, विशेषतः गरीब आणि मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा पाया रचला, ज्यामुळे कोल्हापूरमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.  येथे विविध अभ्यासक्रमांसाठी अनेक महाविद्यालये आहेत. शिवाजी विद्यापीठ या विद्यापीठाच्या अखत्यारीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे तीन जिल्हे येतात. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याने शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या काळात संगीत, नाटक, चित्रकला आणि हस्तकला यांसारख्या कलांना राजाश्रय मिळाला, ज्यामुळे अनेक कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात आणि सुवर्णकाळात कोल्हापूरचे मोठे योगदान आहे. या सर्व कलात्मक आणि सांस्कृतिक वारशामुळे कोल्हापूरला खऱ्या अर्थाने ‘कलानगरी’ म्हटले जाते.
राजर्षी शाहू महाराजांनी या नगरीत खेळांचा पाया रचला, जो आजही तितक्याच उत्साहाने जपला जात आहे. कोल्हापूरला “क्रीडानगरी” किंवा “क्रीडापंढरी” म्हणून ओळखले जाते, कारण येथील रक्तातच कुस्ती आणि फुटबॉलसारख्या खेळांची आवड भिनलेली आहे. कोल्हापूर ही कुस्तीगिरांची खाण आहे. येथील खासबाग मैदान हे भारतातील एकमेव गोलाकार कुस्ती मैदान असून, शहरात आणि जिल्ह्यात अनेक “तालीम” (आखाडे) आहेत, जिथे देशविदेशातील मल्ल आजही मातीच्या कुस्तीचे धडे गिरवतात. त्यामुळे कोल्हापूर हे खऱ्या अर्थान कुस्तीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूरला ‘महाराष्ट्राचे फुटबॉल हब’ म्हटले जाते. येथे स्थानिक क्लबच्या सामन्यांनाही ६०,००० हून अधिक प्रेक्षक गर्दी करतात. कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक नामवंत फुटबॉल खेळाडूंनी राज्याच्या आणि देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव याच मातीतील होते. तसेच नेमबाजीमध्ये राही सरनोबत, तेजस्विनी सावंत आणि पोहण्यामध्ये वीरधवल खाडे यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा डंका वाजवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याने आरोग्यसेवेत मोठी प्रगती केली असून, अत्याधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांमुळे गोवा, कोकण आणि कर्नाटकच्या सीमेवरील रुग्णांसाठी कोल्हापूर हे सोयीस्कर ठिकाण आहे, ज्यामुळे येथे वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळाली आहे.

पायाभूत सुविधा, दळणवळण :

कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि कोकण- गोवा राज्यांना जोडणारा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. नुकतेच कोल्हापूर विमानतळाचा झालेला विस्तार, प्रस्तावित कोल्हापूर - कोकण रेल्वेमार्ग, शक्तीपीठ महामार्ग, सोलापूर - रत्नागिरी महामार्ग यामुळे वाहतुकीची कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. यासह आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, पूरनियंत्रण प्रकल्प, यामुळे पायाभूत सुविधांचाही विकास होणार आहे. 

वरील सर्व बाबींचा विचार होवून कोल्हापूरला अधिकृत ‘पर्यटन हब’ चा दर्जा देणेबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवेदनातून केली आहे.

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका !

रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर!

कोल्हापूर/प्रतिनिधी: “शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” असं म्हणत सुरू झालेल्या ‘बिग बॉस मराठी ६’ च्या अभूतपूर्व यशाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या सिझनच्या पहिल्याच आठवड्यात रितेश भाऊंने सर्वांचं मन जिंकलं आहे. रितेश भाऊंचा तोच कडक अंदाज, त्यांचा जबरदस्त स्वॅग आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची त्यांची खास शैली यामुळे हा सिझन घराघरांत पोहोचला आहे. रितेश भाऊंच्या जादूने यंदा केवळ टीव्हीच नाही, तर डिजिटल जगतावरही अधिराज्य गाजवलं असून, खऱ्या अर्थाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली मोहोर उमटवली आहे. कलर्स मराठी आणि JioHotstar वर एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या या सिझनने लोकप्रियतेचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
कलर्स मराठीवर, ग्रँड प्रीमियर आणि दैनंदिन भागांना जोरदार सुरुवात मिळाली असून, लाँचिंगच्या पहिल्याच आठवड्यात ३३ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या आगमनामुळे मराठी जनरल एंटरटेनमेंट चॅनेलच्या (GEC) प्रेक्षकसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे; ३४ GRPs वरून ७७ GRPs पर्यंत झालेली ही २.३ पट वाढ या शोची जनमानसातील पकड अधोरेखित करते. जिओ स्टार पहिल्या भागाच्या ‘रीच’मध्ये ५ व्या सीझनच्या प्रीमियरच्या तुलनेत २.२ पट आणि ‘वॉच-टाइम’मध्ये ६.५ पट वाढ नोंदवण्यात आली. पहिल्या आठवड्यात जिओ स्टारवर देखील हा वेग कायम राहिला; गेल्या सीझनच्या तुलनेत व्हिडिओ व्ह्यूजमध्ये १.८ पट आणि वॉच-टाइममध्ये १.३ पट वाढ झाली असून, हे प्रेक्षकांचा वाढता कल आणि वारंवार पाहिल्या जाणाऱ्या संख्येचे निदर्शक आहे..
या अभूतपूर्व यशाचे मोठे श्रेय जाते ते म्हणजे महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार आणि शोचा होस्ट रितेश देशमुख यांना. प्रोमो रिलीज झाल्यापासूनच रितेश भाऊंच्या कडक डायलॉग्स नी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तय्यार!” या त्यांच्या वाक्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. ग्रँड प्रीमियर च्या दिवशी रितेश भाऊंचा तो अस्सल महाराष्ट्रीयन स्वॅग, ‘लार्जर-दॅन-लाईफ’ परफॉर्मन्स आणि त्यांच्या एन्ट्री ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यांचं प्रभावी सूत्रसंचालन, आणि त्यांच्या शब्दांमधली धार यामुळे ग्रँड प्रीमियर ची रंगत अजूनच वाढली. या सगळ्यामुळेच सिझन ६ चा ग्रँड प्रीमियर हा विक्रमी टीआरपी मिळवणारा कार्यक्रम ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात १७ सदस्यांनी मोठ्या दिमाखात एंट्री घेतली, आणि संपूर्ण आठवडा प्रेक्षकांना राडा, भांडणं, मैत्री, याने खिळवून ठेवले.

बँकांचे खाजगीकरण हे कर्मचाऱ्यांसमोरील मोठे आव्हान : राष्ट्रीय सरचिटणीस सी.एच.वेंकटाचलम

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनास कोल्हापुरात प्रारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : खाजगीकरण हे बँक कर्मचाऱ्यांसमोर सध्या मोठे आव्हान आहे. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात बँकांच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी सध्या राष्ट्रीय संघर्षाला सुरुवात झालेली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात होणारे हे कर्मचाऱ्यांचे अधिवेशन महत्त्वाचे आहे. संघटनेमुळे कर्मचाऱ्यांना धैर्य मिळते. आपल्या हक्कासाठी लढण्याचे बळ मिळते. आज बँकांमध्ये जनतेचे २.२५ लाख कोटी आहेत. त्याचे संपूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी ही बँक कर्मचाऱ्यांवर आहे.नवीन आर्थिक धोरण, उदारीकरण या नावाखाली सरकारने खाजगीकरणाचा घाट घातला आहे. बँकेतील ठेवीमुळे देशाला भांडवल मिळते. पण जर खाजगी बँका अस्तित्वात आल्या तर त्याच्यावर सरकारचे नियंत्रण राहणार नाही.आणि कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येईल. याला जबाबदार कोण असेल? असा सवाल ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे सरचिटणीस कॉम. सी. एच वेंकटाचलम यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना केला.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशन कोल्हापुरातील सायबर कॉलेज येथील आनंद भवन येथे होत आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मोठ्या बँकांच्या तुलनेत लहान बँकांची गुणवत्ता ही जास्त चांगली आहे. तरीही सरकारकडून छोट्या बँकांचे विलीनीकरण सुरू आहे.गेल्या दहा वर्षांपूर्वी बँक कर्मचारी संख्या कमी झाली असून अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने ग्राहकाला सेवा कशी देणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.सध्या दोन लाख जागा रिक्त असून कर्मचाऱ्यांना कंत्राट बेसिसवर घेण्याच धोरण आखले जात आहे.बँकेचे कर्ज हे गरजू आणि विकसनशील क्षेत्राला मिळणे आवश्यक आहे.बँका नफेखोरीसाठी कार्यरत आहेत.बँक कर्जाचे बुडीत प्रमाण वाढलं आणि अनेक कर्जे माफ केली गेली. हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत. याविरुद्ध लढा देण्यासाठी संघटना आणि एकात्मतेच्या जोरावरच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे भवितव्य ठरणार आहे.असे देखील सी.एच वेंकटाचलम म्हणाले.

        सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे काम केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळत नाही. बँक कर्मचारी हे सर्वसामान्यांसाठी काम करतात. त्यांच्या पैशांचे संरक्षण करतात. आज जवळजवळ सगळेच लोक हे बँकांवर अवलंबून आहेत. आज जर बँक कर्मचारी अडचणीत  असतील तर त्यांनी एकत्रितपणे आपल्या हक्कासाठी लढल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिली.

        बँकांचे विलीनीकरण करून अगदी मोजक्याच बँका देशांमध्ये चालवायच्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करायचे. याला महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज संघटनेचा तीव्र विरोध आहे. तसेच खाजगी बँकांमध्ये विदेशी भांडवल आणून या देशाचे आर्थिक स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व धोक्यात येईल. ग्रामीण बँकांचेही खाजगीकरण झाले तर सहकार तत्त्वावर चाललेल्या बँका तसेच ग्रामीण पतपेढ्या यांचे अस्तित्व संपेल. ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रामधील मुंबई हे एक मोठे भांडवल देणारे आणि सर्व बँकांची मुख्यालय असणारे शहर आहे. त्यामुळे तेथील बँक कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक भूमिका घ्यावे लागेल. आणि संघर्षाची प्रतिमा आपल्याला पुढे न्यायची आहे. अशी भूमिका संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम. देविदास तुळजापूरकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मांडली.

            बँकांचे खाजगीकरण हा मुद्दा फक्त आर्थिक धोरणानुसार नसून हा आंतरराष्ट्रीय विषय आहे. विदेशी लोक भारतात येऊन गुंतवणूक करणार आणि सरकारच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात बँक कर्मचारी संघर्ष करत आहेत. हा विरोधाभास आहे. पण अमेरिकेने भारतावर जो आर्थिक बोजा टाकलेला आहे त्याला सरकार कोणतेही प्रत्युत्तर देत नाही. कारण भारताचे राजकारण हे, जसे अमेरिकेला हवे आहे तसेच सुरू आहे . आंतरराष्ट्रीय व्यापक राजकारणाचा एक भाग म्हणजे बँकांचे खाजगीकरण करणे असा आहे.असे मत माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केले. नोटाबंदीची कल्पना खुद्द अर्थमंत्र्यांना आणि अर्थ सल्लागारांना देखील नव्हती. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना बँक राष्ट्रीयकरणामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा झाली. आणि एक नवीन मध्यमवर्ग निर्माण झाला. आर्थिक चलनवलन वाढले. पण आता खाजगीकरणामुळे बँक कर्मचाऱ्यांवर मोठे संकट येणार आहे. यासाठी एकत्रितपणे याला विरोध केला पाहिजे. अशी अपेक्षा पत्रकार कुमार केतकर यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमास कॉम.देविदास तुळजापूरकर,कॉम.ललिता जोशी, कॉम.एन.शंकर,कॉम.जयराम,कॉम महेन्द्र प्रभुलकर, कॉम.अक्षय स्वामी, महिंद्र ताटे,मकरंद करंदीकर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे “त्रैवार्षिक अधिवेशन” येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी कोल्हापुरात

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे (महाराष्ट्र स्टेट बैंक एम्प्लॉइज फेडरेशन) त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन” येत्या शनिवारी आणि रविवारी दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी कोल्हापूर येथे होत आहे. या अधिवेशनास विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील सुमारे ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत असून, ते बँक कर्मचारी चळवळीचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हे दोन दिवसीय अधिवेशन सायबर कॉलेज येथील आनंद भवन येथे होणार आहे,अशी माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम.देविदास तुळजापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या अधिवेशनात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका तसेच विदेशी बँकांमधील कर्मचारी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या अधिवेशनाचे उद्घाटन ऑल इंडिया बैंक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे अखिल भारतीय जनरल सेक्रेटरी कॉ. सी. एच. वेंकटाचलम यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर तसेच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

हा उद्घाटन सोहळा शनिवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता होणार आहे.
या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागत समितीचे अध्यक्ष सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील बैंक कर्मचारी संघटनांचे कार्यकर्ते जोमाने तयारी करत आहेत.
याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता, त्याच ठिकाणी तरुण सिने दिग्दर्शक, लोकसत्ता दैनिकाचा ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारप्राप्त वरुण सुखराज यांच्या निर्मितीतील “दि
ग्रेट बैंकिंग इल्यूजन” या माहितीपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास वरुण सुखराज स्वतः उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता, त्याच ठिकाणी नवीन कामगार कायदे या अत्यंत महत्वाच्या विषयावर
निवृत्त प्रादेशिक कामगार आयुक्त
धनराज एस. जाधव यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सध्या केंद्र सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबाबत पुन्हा एकदा एकत्रीकरण व खाजगीकरणाची धोरणे राबवण्याची भाषा केली जात आहे. संघटनेचा या धोरणांना ठाम विरोध असून, यामुळे सामान्य नागरिकांच्या ठेवी असुरक्षित होण्याचा धोका निर्माण होतो. शेतकरी, छोटे व्यापारी व लघुउद्योग पुन्हा एकदा बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे, कारण खाजगी बँका प्रामुख्याने नफ्यावर आधारित कार्य करतात.
संघटनेची अशी ठाम भूमिका आहे की, बँकिंग सेवा ही मूलभूत हक्क म्हणून घोषित झाली पाहिजे. तसेच सामान्य बचत खातेदारांकडून कोणतेही सेवा शुल्क आकारले जाऊ नये. याशिवाय कॉर्पोरेट थकबाकीदारांकडून कोणतीही सवलत न देता संपूर्ण थकबाकी वसूल केली जावी. अशी संघटनेची ठाम मागणी आहे.
या अधिवेशनात बँकिंग उद्योगाशी संबंधित असंघटित कर्मचारी बैंक मित्र, आऊटसोर्ड व कंत्राटी कर्मचारी – यांना संघटित करण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात येणार आहे. तसेच पुरेशी नोकरभरती, पाच दिवसांचा आठवडा लागू करणे आदी महत्त्वाच्या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने बैंकिंग उद्योग आणि बँक कर्मचारी चळवळीसमोरील सर्व महत्वाच्या प्रश्नांवर सखोल आणि व्यापक चर्चा घडून येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेस कॉम.जयराम,कॉम महेन्द्र प्रभुलकर, कॉम.अक्षय स्वामी, कॉम एन शंकर, महिंद्र ताटे,मकरंद करंदीकर, उपस्थित होते.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम

कोल्हापूर, अतिग्रे : रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व तरुण पिढीत रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जाणीव जागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इचलकरंजी परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विजय इंगवले, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अंकिता वांडेकर, सहाय्यक निरीक्षक श्री. अजिंक्य डुबल, सहाय्यक निरीक्षक अनुसया माळी, निरीक्षक. कुलकर्णी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, विद्यार्थी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी इंगवले यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व अत्यंत उदाहरणासह अधोरेखित केले. ते म्हणाले, “रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केल्याने केवळ शासकीय दंड टळत नाही, तर स्वतःच्या व इतरांच्या अमूल्य प्राणांचेही संरक्षण होते.” विद्यार्थ्यांकडे देशाच्या भवितव्याची धुरा असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, “आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यांनी वाहतूक नियम काटेकोरपणे पाळले, तर अपघातांचे प्रमाण निश्चितच घटेल. सुरक्षित वाहतूक संस्कृतीमुळे देश, राज्य आणि गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल.” रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून, ती सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलतेची जाणीव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नवीन रुजू झालेले सहाय्यक निरीक्षक अजिंक्य डुबल यांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावरील नियमावली, वाहन चालवताना पाळावयाची शिस्त, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व, वेगमर्यादा, सिग्नलचे पालन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे नियम समजावून सांगत सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून दिले.

या मार्गदर्शन कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन श्री. संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद

शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद

एकुण २,७०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी

कोल्हापूर/प्रतिनिधी : दिनांक ०७/१२/२०२५ रोजी दुपारी १२.१५ वा. चे सुमारास खळखळीचा माळ नावाचे शेतात आदमापूर, ता. भुदरगड येथे फिर्यादी लक्ष्मीबाई सर्जेराव भोसले व.व.६७, रा. आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर ह्या व त्यांचे सोबत लक्ष्मी दिनकर पाटील रा. आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर अश्या दोघीजण शेतात काम करीत असताना दोन अज्ञात इसम तेथे येवुन लक्ष्मीबाई यांचेकडून पिण्यासाठी पाणी मागून घेवुन पाणी पिवुन परत जाण्याचा बहाणा करून फिर्यादी व लक्ष्मी यांचे पाठीमागून येवून त्यापैकी एका इसमाने लक्ष्मीबाई भोसले यांचे गळ्यातील सोन्याचे प‌ट्टीमध्ये असलेले मंगळसूत्र व दुसऱ्या इसमाने लक्ष्मी पाटील यांचे गळ्धातील सोन्याची एकसर माळ जबरदस्तीने हिसडा मारून हिसकावून घेवून तेथून पळुन गेलेबाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून भुदरगड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३१६/२०२६ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४, ३(५) प्रमाणे दिनांक ०७/१२/२०२५ रोजी २२.३६ वा. गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार साो यांनी गुन्हा उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. मा. पोलीस अधीक्षक सो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिने मार्गदर्शन करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत अज्ञात आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत माहीती काढून शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार राजु कोरे, योगेश गोसावी व अमित सर्जे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, भुदरगड पोलीस ठाणे गु.र.नं. ३१६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४, ३(५) प्रमाणे दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राम केंद्रे रा पुणे याने त्याचे साथीदारासह मिळून केला असून तो व त्याचा साथीदार असे किणी, ता. हातकणंगले गावचे हद्दीतील पुणे ते बेंगलोर जाणारे रोडवरील माऊली पान शॉप जवळ येणार आहेत. मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने किणी, ता. हातकणंगले गावचे हद्दीतील पुणे ते बेंगलोर जाणारे रोडवरील माऊली पान शॉप जवळ सापळा लावून आरोपी नामे राम ज्ञानोबा केंद्रे व.व. २७, रा. मौजे खोकलेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी, सध्या रा. शिवाजी चौक, साखरेवस्ती, हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे, मनोज शिवाजी लंगडे व.व. ३४, रा. तगरखेडा, पोष्ट औराद शहाजनी, ता.निलंगा, जि. लातूर, सध्या रा. नेऊर फाटा, सोलापूर रोड, पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जातून गुन्ह्यातील जबरदस्तीने चोरलेले १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्टीमध्ये तुटलेले मणीमंगळसुत्र व अंदाजे ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याची एकसर माळ असा एकुण २,७०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून जप्त मुद्देमालासह आरोपीना पुढील कायदेशीर कारवाईकामी भुदरगड पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे.
आरोपी राम ज्ञानोबा केंद्रे यांच्यावर यापुर्वी देखील पुणे, रायगड, लातुर जिल्ह्यातील पोलीस ठाणेमध्ये चोरीचे एकुण १२ गुन्हे व आरोपी,मनोज शिवाजी लंगडे याचेवर कोंडवा पोलीस ठाणे, पुणे येथे चोरीचा ०१ गुन्हा नोंद आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. डॉ. बी. धीरजकुमार बच्चु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश म्हेत्रे, अनिल जाधव पोलीस अंमलदार संजय देसाई, राजु कोरे, योगेश गोसावी, समीर कांबळे, रोहीत मर्दाने, अमित सर्जे, अमित मर्दाने, सतिश सुर्यवंशी, राजेंद्र ताटे, अमर वासुदेव यांनी केली आहे.

कोल्हापरमध्ये विकासाचे व्हिजन घेऊन मख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कटटयावर’साधला कोल्हापूरकरांशी संवाद

कोल्हापरमध्ये विकासाचे व्हिजन घेऊन मख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कटटयावर’साधला कोल्हापूरकरांशी संवाद

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने मिसळ कट्रा च्या अनोख्या व्यासपीठावरून मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायतीच्या प्रचारा बरोबरच कोल्हापूर शहर आणि जिल्हयाचे प्रश्न आणि विकास याबाबत ठोस भमिका मांडली.त्यांनी या मिसळ कट्टा च्या माध्यमातून साधला संवाद रस्ते, हद्दवाढ पंचगंगा प्रद्षण, महापूर, उद्योग, विमानतळ, खेळ आणि कला, सांस्कतीक परंपरा याबाबत निर्णय आणि नियोजन याबाबतची दिशा स्पष्ट केली कोल्हापूरातील महायुतीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या मिसळ कट्रयावर विविध क्षेत्रातील शहर आणि जिल्हयातील शेकडो निमंत्रित मान्यवरांच्या साक्षीने म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बी न्यूज वृत्त वाहीनीचे संपादक चारूदत्त जोशी, खासदार पुत्र युथ आयकान कृष्णराज महाडिक, सिने अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी प्रकट मुलाखत घेतली
कोल्हापर शहरातील रस्त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की शहरातील रस्ते चांगले झाले पण त्याबरोबरच सर्व नागरीकांच्यावर टोलचा बोजा पडणार होता. त्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र निधी देऊन कोल्हापूर शहराला टोल मक्त केले. याबरोबरच हद्दवाढीबाबत बोलताना ते म्हणाले की कोणत्या शहराची हद्दवाढ झाल्यानंतर त्या शहराचा विकास झाला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहराचा विकास होण्यासाठी हद्वाढ झालीच पाहिजे अशी माझी व्यक्तिगत तसेच सरकारची भमिका आहे पण हद्दवाढीला ‘ येथील अनेक राजकीय नेत्यांनी संबधीत गावानी प्रखर विरोध केला त्यामळे हद्दवाद करता आली नाही. तसेच प्रस्तावित गावांना करवाढी बाबतची भीती निर्माण झाली आहे
आता सरकारने निर्णय घेतला आहे की हह् वाढ झाल्यानंतर प्रस्तावित गावांना पाच वर्षे कोणतीही कर वाढ केली जाणार नाही त्यामळे आता ही भीती बाळगण्याचे कारण नाही.. तसेच ज्यांचा विरोध आहे त्यांच्याशी सविस्तर चचा करून हद्द वाढोबाबत सकारात्मक प्रातिसाद दिला तरच मी ताबडतोब हद्दवाढ करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
पंचगंगा नदीचे प्रद्षण रोखण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की कोल्हापुर, इचलकरंजीसह काही प्रमख शहर आणि गावांचे सांडपाणी नाल्याद्वारे नदीत मिसळते त्याबरोबरच काही औद्योगिक क्षेत्राचेही पाणी नदीत येते त्यामळे नदीचे प्रदरषण मोठ्या प्रमाणात होते. हे रोखण्यासाठी या साडपाण्यावर प्राक्रेया करण्याचे प्रकल्प उभा केले पाहिजेत ‘ काही प्रमाणात’ ते केले असन आणखी याप्ढेही सर्व शंभर टक्के हे सांडपाणी रोखण्या साठी प्रयत्न केले जातील त्यासाठी आवश्यक तो सर्व निर्धी दिला जार्डल असेही त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच ने =्पूर शहर आणि परिसराला होणारा महापूराचा विळखा रोखण्यासाठी आता नदीजोड प्रकल्पावर भर देण्यात आला असन त्यात्न कोल्हापर जिल्ह्यातून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी मराठवाडा भागात वळवण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत ते लवकरच पूर्ण होतील त्यानंतर कोल्हापूर शहराला मोठ्या महापूराचा धोका कधीही उद्भवणार नाही असेही त्यांनी सांगितले उद्योग क्षेत्रातील समस्या बाबत बोलताना ते म्हणाले की कोल्हापूर शहरात फौंड्री हब तसेच अनेक चांगले उद्योग आहेत पण त्याचा विस्तार करण्यासाठी आता जागांचा प्रश्न निर्माण झाले आहे नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण होत असन या ठिकाणी आयटी सह इतर उद्योग विस्तारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामळे हा प्रश्न मार्गी लागेल. तसेच पणे बेंगलोर कॅरिडॉर मळे ही येथील अनेक संधी उपलब्ध होणार असन त्याचा उपयोग कोल्हापर जिल्ह्यातील विकासासाठी होणार आहे. कष्णाराज महाडिक यां्न कोल्हापूर जिल्ह्याला खेळाची मोठी परंपरा आहे अनेक राष्ट्रीय, ऑलिम्पिक, आंतरराष्ट्ीय दर्जाचे खेळाड्र निर्माण झाले आहेत यापुढेही असेच खेळाचा विकास व्हावा यासाठी काय करणार असे विचारले असता त्यांनी केंद् शासनाच्या खेलो डंडियासह अनेक राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात खेळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असे सांगितले. अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी कोल्हापर जिल्ह्यात कला आणि संस्कती परंपरा जपण्यासाठी फिल्म इन्स्टिट्यूट आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांच्या शाखा सुरू कराव्यात अशी मागणी केली यावर ते म्हणाले की चित्रपट क्षेत्रासह इतर सर्व कला आणि सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी काही शैक्षणिक आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल
यावेळी पालक मंत्री प्रकाश आबिटकर,मंत्री हसन मश्रीफ, चंद्रकांत दादा पाटील, खा. धनंजय महाडिक आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके आदींसह महायतीचे नेते, उमेदवार, सहकार, उद्योग सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

चार वर्षापासून फरार असलेला मोकातील आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई

कोल्हापूर/प्रतिनिधी:
मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पाहीजे, फरार आरोपींचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.पोलीस अधीक्षक यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांनी त्यांचे शाखेकडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांची पथके तयार करून पाहीजे, फरार आरोपींची माहिती काढून कायदेशीर कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या.
जुना राजवाडा पोलीस ठाणे गु.र.नं. 552/2021 भा.द.वि.स. कलम 364(1), 384, 386,388,397,327, 452,120 (ब) सह मोका कलम कलम 3(1), (2), 3(2), 3(4) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे विजय रामचंद्र गौड रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर हा गुन्हा घडलेपासून गेले चार वर्षापासून मिळून येत नव्हता. सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक आरोपी नामे विजय रामचंद्र गौड रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर याचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना त्यांचे गोपनिय बातमी मिळाली की, आरोपी नामे विजय रामचंद्र गौड हा तलवार चौक, सानेगुरूजी वसाहत, कोल्हापूर येथे उभा आहे. सदर बातमीचे अनुषंगाने पथकाने पुष्कराज वाईन शॉपी समोर तलवार चौक, सानेगुरूजी वसाहत, कोल्हापूर येथे जावून सापळा लावून आरोपी नामे विजय रामचंद्र गौड व.व. 42, रा. राम गल्ली, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांस दिनांक 06/01/2026 रोजी 21.00 वा. चे सुमारास ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईकामी जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक साो, श्री. योगेश कुमार व मा. अपर पोलीस अधीक्षक , श्री. डॉ. बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, राम कोळी, रूपेश माने, विनोद कांबळे, सचिन पाटील, अमित मर्दाने यानी केली आहे.