शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद
एकुण २,७०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी
कोल्हापूर/प्रतिनिधी : दिनांक ०७/१२/२०२५ रोजी दुपारी १२.१५ वा. चे सुमारास खळखळीचा माळ नावाचे शेतात आदमापूर, ता. भुदरगड येथे फिर्यादी लक्ष्मीबाई सर्जेराव भोसले व.व.६७, रा. आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर ह्या व त्यांचे सोबत लक्ष्मी दिनकर पाटील रा. आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर अश्या दोघीजण शेतात काम करीत असताना दोन अज्ञात इसम तेथे येवुन लक्ष्मीबाई यांचेकडून पिण्यासाठी पाणी मागून घेवुन पाणी पिवुन परत जाण्याचा बहाणा करून फिर्यादी व लक्ष्मी यांचे पाठीमागून येवून त्यापैकी एका इसमाने लक्ष्मीबाई भोसले यांचे गळ्यातील सोन्याचे पट्टीमध्ये असलेले मंगळसूत्र व दुसऱ्या इसमाने लक्ष्मी पाटील यांचे गळ्धातील सोन्याची एकसर माळ जबरदस्तीने हिसडा मारून हिसकावून घेवून तेथून पळुन गेलेबाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून भुदरगड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३१६/२०२६ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४, ३(५) प्रमाणे दिनांक ०७/१२/२०२५ रोजी २२.३६ वा. गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार साो यांनी गुन्हा उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. मा. पोलीस अधीक्षक सो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिने मार्गदर्शन करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत अज्ञात आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत माहीती काढून शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार राजु कोरे, योगेश गोसावी व अमित सर्जे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, भुदरगड पोलीस ठाणे गु.र.नं. ३१६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४, ३(५) प्रमाणे दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राम केंद्रे रा पुणे याने त्याचे साथीदारासह मिळून केला असून तो व त्याचा साथीदार असे किणी, ता. हातकणंगले गावचे हद्दीतील पुणे ते बेंगलोर जाणारे रोडवरील माऊली पान शॉप जवळ येणार आहेत. मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने किणी, ता. हातकणंगले गावचे हद्दीतील पुणे ते बेंगलोर जाणारे रोडवरील माऊली पान शॉप जवळ सापळा लावून आरोपी नामे राम ज्ञानोबा केंद्रे व.व. २७, रा. मौजे खोकलेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी, सध्या रा. शिवाजी चौक, साखरेवस्ती, हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे, मनोज शिवाजी लंगडे व.व. ३४, रा. तगरखेडा, पोष्ट औराद शहाजनी, ता.निलंगा, जि. लातूर, सध्या रा. नेऊर फाटा, सोलापूर रोड, पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जातून गुन्ह्यातील जबरदस्तीने चोरलेले १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्टीमध्ये तुटलेले मणीमंगळसुत्र व अंदाजे ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याची एकसर माळ असा एकुण २,७०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून जप्त मुद्देमालासह आरोपीना पुढील कायदेशीर कारवाईकामी भुदरगड पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे.
आरोपी राम ज्ञानोबा केंद्रे यांच्यावर यापुर्वी देखील पुणे, रायगड, लातुर जिल्ह्यातील पोलीस ठाणेमध्ये चोरीचे एकुण १२ गुन्हे व आरोपी,मनोज शिवाजी लंगडे याचेवर कोंडवा पोलीस ठाणे, पुणे येथे चोरीचा ०१ गुन्हा नोंद आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. डॉ. बी. धीरजकुमार बच्चु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश म्हेत्रे, अनिल जाधव पोलीस अंमलदार संजय देसाई, राजु कोरे, योगेश गोसावी, समीर कांबळे, रोहीत मर्दाने, अमित सर्जे, अमित मर्दाने, सतिश सुर्यवंशी, राजेंद्र ताटे, अमर वासुदेव यांनी केली आहे.

