Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) समाजकारण- राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली मुंबई, दि.४:- शिक्षण, सहकार क्षेत्रातील…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

भारतातील सर्वोच्च न्यूरो संस्था SCTIMST, त्रिवेंद्रम कडून न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना सर्वोच्च “अवॉर्ड ऑफ एक्सलन्स” प्रदान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

सिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा पंकज मुंडे यांच्या हस्ते येत्या गुरुवारी होणार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र मुख्य मुंबई

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता कुटुंबीयांची घालमेल, शोधासाठी नागरिकांना पोलिसांचे आवाहन राजापूर/प्रतिनिधी : राजापूर, जि. रत्नागिरी : राजापूर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – हिंदु जनजागृती समिती

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! - हिंदु जनजागृती समिती आधी राज्याच्या मुख्यालयातील…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

श्री एकमुखी दत्त देवस्थान वतीने २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन – जुन्या आध्यात्मिक परंपरेचा पुन प्रारंभ

श्री एकमुखी दत्त देवस्थान वतीने २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन - जुन्या आध्यात्मिक परंपरेचा पुन प्रारंभ   ​कोल्हापूर/प्रतिनिधी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक कोल्हापूर/प्रतिनिधी : रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTI) देशातील रस्ते अपघात आणि…

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास कोल्हापूर/प्रतिनिधी : अल्पवयीन विद्यार्थिंनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करत फूस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती २३०० हून अधिक जागांची वाढ…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक कोल्हापूर/प्रतिनिधी : नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हयातील शेतकरी परिवाराची आर्थिक सह…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

‘द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना कोल्हापूर/प्रतिनिधी : सामाजिक आशय असलेल्या बहुचर्चित…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत…

माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​ याचिकाकर्त्या पुंगावच्या श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेचा…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘एक्सलंट’ श्रेणी

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘एक्सलंट’ श्रेणी कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी संजय घोडावत विद्यापीठाच्या फुटबॉल मैदान परिसरात विद्यार्थी, प्राध्यापक, गार्डन विभागाचे प्रमुख तात्या देसाई आणि त्यांची टीम यांच्या सहकार्याने ३०० हून अधिक देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. भविष्यात हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त परिसर घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी डॉ. विराट गिरी बोलताना म्हणाले, “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. हीच भावी पिढीला दिलेली सर्वात मौल्यवान भेट ठरेल.”या उपक्रमाचे आयोजक प्रा. अजय कोंगे, इन्स्टिट्यूटच्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सागर चव्हाण, प्रा.रईसा मुल्ला, प्रा. वंदना शहा, प्रा. नितीन पाटील, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. स्वप्निल थिकने, प्रा. धीरज पाटील, प्रा. रणजीत शिरोडकर, प्रा. प्रतीक आवटी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
पर्यावरण संरक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि हरित भारताच्या निर्मितीसाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूटने राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. या सामाजिक उपक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

कोल्हापूर/प्रतिनिधी : अल्पवयीन विद्यार्थिंनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करत फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी
विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश
ए.एस.आय.पेरमपल्ली यांनी आरोपी विशाल मारुती कांबळे (वय २४.रा.मळगे ब्रु.ता.कागल) याला ७ वर्षे सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
दि.२९ मार्च २०२२ रोजी कागल तालुक्यातील मळगे ब्रु.येथील विद्यालयात जात असताना आरोपीने विद्यार्थिंनीचा पाठलाग केला.तिच्या वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी अश्लिल वर्तन केले आणि पळवून नेल्याचा आरोप न्यायालयात सिध्द झाला.
तपासादरम्यान पीडित मुलगी व आरोपी सातारा जिल्ह्यातील भुईंज येथे आढ़ळले.मुरगूड पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.सरकार पक्षातर्फे ॲड.एस.एस.इंगळे यांनी प्रभावी युक्तीवाद केला.
त्यांना या कामी मुरगूड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर.ए.वाघमारे व पैरवी युवराज पाटील यांनी मदत केली.

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

२३०० हून अधिक जागांची वाढ
आठ जी. एन. एम. पदविका कॉलेजचे श्रेणीवर्धन बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालयात

पाच बी. एस्सी नर्सिंग महाविद्यालयांची क्षमता प्रत्येकी ५० वरून १००

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील आरोग्यसेवेला बळकट करण्यासाठी आणि तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्यातील नर्सिंग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार असून, तब्बल २,३०० हून अधिक नवीन नर्सिंग जागांची वाढ होणार आहे. राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधांना अधिक बळकट करण्यासाठी आणि आरोग्य सेवेतील प्रशिक्षित परिचारिकांची कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ७ जुलै २०२६ रोजी एक क्रांतिकारी शासन निर्णय जारी केला आहे. या अंतर्गत राज्यात १० नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. आठ जी. एन. एम. पदविका कॉलेजेसचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे आणि पाच कार्यरत महाविद्यालयांची प्रवेश क्षमता दुप्पट केली जाणार आहे.
​वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.
या संपूर्ण प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल ५५८.७१ कोटी रुपयांच्या अनावर्ती खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.शासन निर्णयातील तीन सर्वात मोठे बदल असे आहेत.यात दहा जिल्ह्यांत होणार नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग कॉलेजेस- राज्यातील दुर्गम आणि महत्त्वाच्या अशा चंद्रपूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अलिबाग (रायगड), रत्नागिरी, अमरावती, धाराशीव, गडचिरोली, पालघर आणि अहिल्यानगर या दहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेची नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जातील. या नवीन १० कॉलेजेसमुळे राज्यात थेट १,००० नवीन जागा उपलब्ध होतील.आठ ‘जी.एन.एम. पदविका’ कॉलेजचे ‘बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालया’ मध्ये रुपांतर- राज्यात सध्या सुरू असलेल्या आठ शासकीय जी. एन. एम. नर्सिंग शाळांचे श्रेणीवर्धन करून त्या ठिकाणी प्रत्येकी १०० जागांची भव्य बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू केली जातील. यामध्ये जी. टी. रुग्णालय – मुंबई, सेंट जॉर्जेस रुग्णालय- मुंबई, धुळे, सोलापूर, अंबाजोगाई, अकोला, नागपूर आणि सांगली या शहरांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत यासाठी प्रति महाविद्यालय सात कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
पाच मोठ्या शहरांतील कॉलेजेसची क्षमता दुप्पट- मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नांदेड येथील सध्याच्या शासकीय बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांची विद्यार्थी प्रवेश क्षमता ५० वरून थेट १०० करण्यात आली आहे. म्हणजेच; येथे अतिरिक्त २५० जागा वाढणार आहेत. भव्य पायाभूत सुविधा आणि ५५८ कोटींचा निधी- या सर्व महाविद्यालयांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. ‘इंडियन नर्सिंग कौन्सिल’च्या (INC) निकषांनुसार आधुनिक प्रयोगशाळा (Computer, Nutrition, Pre-Clinical Labs), सुसज्ज ग्रंथालय, मल्टिपर्पज हॉल आणि विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वसतिगृहांचे बांधकाम केले जाईल. यासाठी शासनाने एकूण ५५८.७१ कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने खर्च करण्यास मान्यता दिली आहे.
रोजगाराची सुवर्णसंधी- नर्सिंग कॉलेजेस वाढल्यामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच फायदा होणार नाही, तर मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होणार आहे. प्रत्येक नवीन महाविद्यालयासाठी प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, ट्युटर, ग्रंथपाल यांच्यापासून ते कार्यालयीन कर्मचारी, स्वयंपाकी आणि सुरक्षा रक्षक अशा वर्ग १ ते वर्ग ४ मधील प्रत्येकी ८६ पदांच्या निर्मितीला अशा एकूण ८६० हून अधिक पदांना मंजुरी देण्यात आली आहे. ही पदे उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने कंत्राटी आणि बाह्यस्त्रोतांद्वारे भरली जातील.

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

कोल्हापूर/प्रतिनिधी : नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला अधिक बळ देत कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैद्य टोळीविरोधात मोठी कारवाई केली आहे.जिल्ह्यातील १५ पोलिस ठाण्यामध्ये नोंद असलेल्या ८९ गुन्हयांमधून जप्त करण्यात आलेले तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा,
एमडी आणि चरस न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आले.या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांच्या बेकायदेशीर जाळ्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
ही नाश प्रक्रिया कसबा बावडा येथील जैववैद्यकीय कचरा निर्मलून प्रकल्पात पार पाडली.पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीच्या उपस्थित न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर पध्दतीने पूर्ण करण्यात आली.यावेळी वजन-माप विभाग,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच पंच उपस्थित होते.
लक्ष्मीपुरी,राजारामपुरी,करवीर ,शाहुपुरी ,गोकुळ शिरगाव ,हुपरी,
शाहुवाडी,आजरा ,शहापूर,भुदरगड ,गांधीनगर गावभाग,शिवाजीनगर,एमआयडीसी आणि इचलकरंजी परिसरातील विविध पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्हयांमधील जप्त अंमली पदार्थांचा यात समावेश आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचारी ही नाश प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.१५ पोलिस ठाण्यातील ८९ गुन्हयांमधील अंमली पदार्थांचा नाश.५१५ किलो ४७२ gm गांजा,एमडी आणि चरस नष्ट.न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया.नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला कोल्हापूर पोलिसांची मोठी साथ मिळाली आणि यामुळे ड्रग्ज माफियांना मोठा धक्का बसला आहे.

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हयातील शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगती साठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेली बदनामी त्वरित थांबवावी यासाठी आत्मक्लेश आंदोलन सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ शिरगाव येथील गोकुळ चौकात भर पावसात झाले . यामध्ये पंचवीस वर्षेतील शेतकरी कष्टकरी आणि महिलांचा उस्फूर्त सहभाग हा सर्वांसाठी लक्षवेधी ठरला .
या आंदोलन विषयी आपली भूमिका विशद करताना डॉक्टर युवराज येडुरे म्हणाले की ‘ लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली.माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली.
म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे.परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे भविष्यातील होऊ नये यासाठी सत्ताधारी विरोधकांनी खबरदारी घ्यावी यासाठीच आपण हे आंदोलन करत असो यास मिळालेला हा प्रतिसाद सर्वांनाच एक चपराक आहे असे परखड मत त्यांनी नोंदवले . या आंदोलनात भुदरगड कागल राधानगरी परिसरातील धारवाड मसवी सावर्डे पांढरे पाणी अमित वाडा मोरेवाडी वाघापूर गोडशी ईस्पुली चक्रेश्वरवाडी नांदवली सांगाव भुदरगड शेगाव सह पंचक्रोशीतील शेतकरी महिला तसेच विविध सहकारी दूध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते . सायंकाळी या आंदोलनाची दूध पिऊन सांगता करण्यात आली यानंतर गोकुळ मुख्यालयात अनुरा पाटील आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व्यापक शिष्टमंडळाद्वारे आपले मागणीचे निवेदन प्रदीप बालगाव योगेश गोडगे सागर मलकवडे यांना संयुक्तपणे सादर केले . आगामी पंधरा दिवसात आपल्या मागण्यावर सकारात्मक कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करून असेही युवराज येडूरे
यांनी सांगितले. आपल्या मागणी निवेदनात त्यांनी गोकुळचे प्रचार दरम्यान विनाकारण बदनामी करणाऱ्या विरोधकांनी सत्ताधारी यांच्यावर परत कायदेशीर कारवाई करावी ठराव आणि त्यासाठी दबाव तंत्र आणि कोट्यावधीचा होत असलेला व्यवहार याविषयी कारवाई करावी गोकुळची स्वायत्तता पारदर्शकता आणि शेतकरी केंद्रित कार्यपद्धती आबादराजेत राहण्यासाठी शासनाने स्वतंत्र संरक्षणात्मक धोरण करावे आणि आगामी निवडणुकीत सर्व सभासदांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा यासह विविध मागणीचे निवेदन त्यांनी यावेळी सादर केले.भर पावसात झालेले आंदोलन आगामी गोकुळच्या प्रचाराच्या आणि आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्याच केंद्रस्थानी राहणार आहे .

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

‘द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

कोल्हापूर/प्रतिनिधी : सामाजिक आशय असलेल्या बहुचर्चित ‘द इंडिया स्टोरी’ या कोर्टरूम ड्रामाचा आणखी एक प्रभावी पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहयोगाने साकारलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांची आहे.
येत्या २४ जुलै २०२६ रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांत हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कीटकनाशक शेती आणि त्याचे जनतेच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम या संवेदनशील विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटात एका प्रभावी कोर्टरूम ड्रामामधून समाजाला विचार करायला भाग पाडणारा विषय मांडण्यात आला आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे अत्यंत तणावपूर्ण आणि भावनिक प्रसंगात दिसत आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखा एका धक्कादायक सत्याचा शोध घेत असताना त्यांना कोणत्या संघर्षाला सामोरे जावे लागते, याची प्रभावी झलक या पोस्टरमधून पाहायला मिळते.गजबजलेल्या भाजी मार्केटच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर साकारण्यात आले आहे. संतप्त विक्रेत्यांचा जमाव काजल आणि श्रेयस यांच्याभोवती जमलेला असून, त्यांच्यावर बोटे दाखवत भाज्या फेकताना दिसतो. दोन्ही प्रमुख कलाकारांच्या चेहऱ्यावरील भीती, हवेत उडणाऱ्या भाज्या आणि संतप्त गर्दी यामुळे सत्य उघड करण्याचे धाडस करणाऱ्यांना समाजाकडून कसा विरोध सहन करावा लागतो, याचे प्रभावी चित्रण पोस्टरमध्ये करण्यात आले आहे. “स्लो पॉइझन इन प्रोग्रेस…” ही टॅगलाईन चित्रपटाच्या मूळ आशयाला अधिक ठळक करते आणि लाखो लोकांच्या आयुष्यावर शांतपणे परिणाम करणाऱ्या अदृश्य धोक्याकडे लक्ष वेधते.
याविषयी दिग्दर्शक चेतन डीके म्हणाले, “हे पोस्टर सत्य बोलण्याची किंमत दाखवते. फसवणुकीवर उभ्या असलेल्या व्यवस्थेला जेव्हा आव्हान दिले जाते, तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया भीती आणि संतापाचीच असते. ‘द इंडिया स्टोरी’मधील प्रत्येक दृश्य हा संघर्ष प्रामाणिकपणे मांडण्यासाठी तयार करण्यात आला आहे, जेणेकरून प्रेक्षकांनी ते काय खातात आणि कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, याचा पुन्हा विचार करावा.”
या चित्रपटाचे सहनिर्माते स्वाती विनायक साईंदाणे, अनिता जाधव, विनायक साईंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी आहेत. चित्रपटाचे छायांकन निशांत भागवत, संगीत मंगेश ढाकडे, संकलन आशीष म्हात्रे, गीतलेखन शकील आझमी, तर ध्वनी संयोजन अनमोल भावे यांनी केले आहे.

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा तिरुचिरापल्ली येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) येथे पाच दिवसीय डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण व आधुनिक व्यवस्थापन पैलूंचे ज्ञान मिळवण्याची संधी मिळाली.
या विशेष शैक्षणिक उपक्रमामध्ये आयआयएम तिरुचिरापल्लीच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिक्स, प्रेस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिक्स, प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग, आयपीओ अँड व्हॅल्युएशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), जनरेटिव्ह एआय, आंत्रप्रेन्युअरियल फायनान्स तसेच लीडरशिप एसेंशियल्स यांसारख्या समकालीन व्यवस्थापन विषयांवर मार्गदर्शन केले. याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) लॅबला भेट, उद्योगभेट, तज्ज्ञांशी संवाद, पीअर लर्निंग, नेटवर्किंग आणि कॅम्पस एक्स्पोजर यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योग आणि व्यवस्थापन क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली.
या उपक्रमाचे आयोजन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. डॉ. पुरुषोत्तम पेटारे, डॉ. अर्पिता बिदनूरकर आणि श्री. व्यंकटेश बडवे यानी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.आयआयएम तिरुचिरापल्ली प्रा. ज्योतिमॉय दलाल आणि प्रा. गोपीनाथ के. यांनी कार्यक्रम संचालक म्हणून तसेच कॉर्पोरेट रिलेशन्स अँड फॅकल्टी अफेअर्सचे अधिष्ठाता प्रा. पी. सारवनन, एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन अँड कन्सल्टन्सीचे अध्यक्ष प्रा. गजानंद एम. एस., कॉर्पोरेट रिलेशन्स ऑफिसर (सीआरओ) श्री. सेंथिल सरवणन तसेच ईईसी विभागाच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमात प्रा. अरुलानंद प्रभू, प्रा. गोपीनाथ के., प्रा. ज्योतिमॉय दलाल, प्रा. वेंकटराघवन कृष्णस्वामी, प्रा. सतीश एस. महेश्वरप्पा, प्रा. मुकुंदन के. व्ही., प्रा. बिपिन दीक्षित, प्रा. गजानंद एम. एस. आणि प्रा. पापरी नाथ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक प्रा. डॉ. अजित पाटील, डी. वाय. पाटील स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक प्रा. डॉ. ए. एम. गुरव, डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार

याचिकाकर्त्या पुंगावच्या श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेचा इशारा

अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणावर ठेवला ठपका

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाची निवडणूक “आजपासून ९० दिवसांच्या आत घ्या” असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने सहा मे, २०२६ रोजी दिले होते. तीन ऑगस्ट, २०२६ रोजी ९० दिवसांची ही मुदत पूर्ण होते. त्यामुळे; तीन ऑगस्ट २०२६ पर्यंत गोकुळ दूध संघासाठी मतदान न झाल्यास ९१ व्या दिवशी म्हणजेच चार ऑगस्ट, २०२६ रोजी प्रशासनाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहोत, असा ईशारा याचिकाकर्त्या असलेल्या पुंगाव ता. राधानगरी येथील श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध व्यवसायिक संस्थेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. संस्थेने अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणावर ठपका ठेवला आहे.
संस्थेच्यावतीने प्रसिद्धीला दिलेल्या या निवेदनात पुढे म्हंटले आहे, गोकुळ निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दि. सहा मे २०२६ रोजी ही निवडणूक “आजपासून ९० दिवसांच्या आत” घेण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. श्री. सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवसापासून ९० दिवसांच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. न्यायालयीन आदेश प्राप्त होताच, एका आठवड्याने निवडणूक प्राधिकरणाने विधी व न्याय विभागाचा सल्ला मागितला. सल्ला मागताना त्यांनी भलताच जावईशोध लावला. “उच्च न्यायालयाने अवसायानात असलेल्या संस्थांचा निकाल ८० दिवसांत दिल्यानंतर ९० दिवसांत इलेक्शन घ्यावी. अशा प्रकारची आमच्या मनातली धारणा पक्की करावी,” अशा आशयाची मागणी व कायदेशीर मत मागण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेऊन त्यांनी मुंबईला विधी व न्याय विभागाच्या मंत्रालयाकडे पाठवला.
​ त्यानंतर विधी व न्याय विभागाने एक आठवड्याने, “सर्वोच्च न्यायालयात सीनियर सरकारी ॲडव्होकेट श्री. सिध्दार्थ धर्माधिकारी यांनी काय निवेदन केले होते? याबाबत त्यांच्याकडूनच सल्ला घ्यावा,” असे उत्तर निवडणूक प्राधिकरणाला दिले. त्यानंतर निवडणूक प्राधिकरणाने ॲड. श्री. धर्माधिकारी यांना याबद्दलची विचारणा केली. त्यावर ॲडव्होकेट श्री. धर्माधिकारी यांनी, “मी ९० दिवसांत निवडणूक घेण्याचे सांगितले होते. तात्काळ गोकुळची निवडणूक सुरू करा आणि अवसायानातील संस्थांचा निकाल हा लवकरात लवकर द्या,” असे मत त्यांनी कळविले होते. हे प्राप्त होताच, निवडणूक प्राधिकरणाने खाली आदेश काढले. परंतु; यासाठी जवळजवळ तीन आठवड्यांचा कालावधी लोटला गेला होता. यामध्ये मुद्दामहून जाणूनबुजून तीन आठवड्यांचा कालावधी घालविण्यात आला. कारण; हाच कायदेशीर सल्ला जर ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. धर्माधिकारी यांना ईमेल द्वारे विचारला असता तर ते उत्तर अगदी दोन दिवसातच मिळाले असते. आजही या निवडणुका लवकर घेण्याबाबत अधिकारी तत्परता दाखवत नाहीत. कारण, ठराव आल्यानंतर कच्ची यादी प्रसिद्ध करणे, पक्क्या यादीचा कार्यक्रम जाहीर करणे आणि निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे हे अपेक्षित होतं. मुद्दाम वेळ काढण्याचं काम हे सगळे अधिकारी करत आहेत. यासाठी या सर्व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही ९१ व्या दिवशी म्हणजेच मंगळवार दि. चार ऑगस्ट, २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात “सर्वोच्च न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल खटला” दाखल करून या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणार आहोत.

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘एक्सलंट’ श्रेणी

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘एक्सलंट’ श्रेणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून (एम. एस. बी. टी. ई.) एक्सलंट श्रेणी प्राप्त झाली आहे.
मेकॅनिकल आणि सिव्हिल या शाखांना ‘व्हेरी गुड’ ही श्रेणी प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये झालेल्या अकॅडमीक मॉनिटरिंगनुसार ही श्रेणी मिळाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी दिली.
गेल्या वर्षभरातील शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांचे परीक्षांमधील निकाल, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम, उद्योग क्षेत्राबरोबर केलेले सामंजस्य करार आणि शिक्षकांसाठी राबविलेले प्रोत्साहनपर व संशोधनात्मक कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मिळालेले पेटंट आदी बाबींची तपासणी एम.एस. बी. टी. ई. तज्ज्ञांच्या समितीकडून केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार पॉलिटेक्निकला ही श्रेणी मिळाली आहे. ‘हिरकणी मंच’ च्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी राबविलेले वैविध्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही दखल घेण्यात आली.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए . के.गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी सर्व स्टाफचे अभिनंदन केले.यासाठी प्राचार्य डॉ.महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके , विभाग प्रमुख डॉ.पी.के.शिंदे,प्रा.एस.बी.शिंदे, प्रा.अक्षय करपे, प्रा.शीतल साळोखे तसेच सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले .
यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी –

लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली.
माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली.
ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे.
गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे.
परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना.
गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले.हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी.
या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.