Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘एक्सलंट’ श्रेणी

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'एक्सलंट' श्रेणी कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या शाखांना महाराष्ट्र…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी – लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे. परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख -- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यात "एकात्मिक आरोग्यवर्धिनी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय पशु चिकीत्सा परिषद (VCI)) आणि केंद्र सरकारच्या मंत्स्यपालन,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान पुणे/प्रतिनिधी : संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती…

Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

माय मराठी

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश

कसबा बावडा/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र स्टेट स्किल्स कॉम्पिटिशन २०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत डी. वाय. पाटील…

माय मराठी

कुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र व ग्रंथालय  प्राचीन संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधी

आठ लिपीमधील ग्रंथ संपदेसाठी राज्य सरकारतर्फे मदत करणार कुंभोजगिरी – कुंभोज येथे उभारण्यात आलेले सरस्वती साधना केंद्र व याठीकाणी उभारलेले…

माय मराठी

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजन

कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजय घोडावत एआय संशोधन केंद्र (SGAiRC)…

माय मराठी

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे आज होणार पालकमंत्री ना.प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

१३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे प्रदर्शन आयोजित चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित कंपन्यांचा सहभाग,…

माय मराठी

इंडियन सुपर फायटर्स असोसिएशन आयोजित एमएमए स्पर्धेत कोल्हापूरचे खेळाडू चमकले

कोल्हापूर/प्रतिनिधी : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या इंडियन सुपर फायटर्स असोसिएशन आयोजित एमएमए या राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत कोल्हापूरचे खेळाडू चमकले.संपूर्ण…

माय मराठी

वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार, रोटरीच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांची माहिती

  कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ही समाजातील विविध गरजू घटकांसाठी भरीव उपक्रम राबवणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. या संघटनेच्या अनेक शाखा…

माय मराठी

5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी – प्रचार संपुष्टात येणार

5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी – प्रचार संपुष्टात येणार कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक…

माय मराठी

वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार

वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार रोटरीच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांची…

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शन २०२६ १३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे आयोजित

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शन २०२६ १३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश

कसबा बावडा/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र स्टेट स्किल्स कॉम्पिटिशन २०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागातील श्रेयस माने आणि निकिता कोळेकर यांनी ‘लँडस्केप गार्डनिंग’ या कौशल्य प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्यांना २५,००० रुपये रोख पारितोषिक, सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
युवकांमधील तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यांना चालना देऊन त्यांना जागतिक स्तरावर सक्षम करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. संगणक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘लँडस्केप गार्डनिंग’सारख्या वेगळ्या व आव्हानात्मक कौशल्य प्रकारात सुवर्णपदक मिळवणे ही विशेष उल्लेखनीय बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशामुळे प्रादेशिक फेरी तसेच विशेष बूटकॅम्प प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली आहे.
या यशाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले आणि डॉ. अजित पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील, विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. ओतारी, प्रा. सतीश रणभिसे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र व ग्रंथालय  प्राचीन संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधी

आठ लिपीमधील ग्रंथ संपदेसाठी राज्य सरकारतर्फे मदत करणार
कुंभोजगिरी – कुंभोज येथे उभारण्यात आलेले सरस्वती साधना केंद्र व याठीकाणी उभारलेले दुर्मिळ ग्रंथ संपदेचे ग्रंथालय हे प्राचीन भारतीय संस्कृती जपण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम असल्याचे प्रतिपादन जैन विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
सरस्वती साधना केंद्राचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक या नात्याने बोलताना ललित गांधी यांनी सदर साधना केंद्रामध्ये भारतातील अति प्राचीन अशा ब्राम्ही, शारदा, कुटील, देवनागरी, मल्याळी, कन्नड अशा लिपीमध्ये दुर्मिळ ग्रंथांच्या पुनर्लेखनासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सहकार्य केले जाईल असे सांगितले.
आचार्य रैवतसुरीजी, साध्वी शीलवतीश्रीजी, साध्वीजी प्रज्ञाभारती सरस्वतीश्रीजी, साध्वीजी उदयप्रभाश्रीजी आदि अनेक साधु-साध्वींच्या प्रमुख उपस्थितीत आनंद स्मृति ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र बोहरा (पूणे), अरूण ललवाणी, नरेंद्र जैन, मोहनलाल ओसवाल, अभय गांधी, सुभाष शहा, चंपकभाई शहा, अमृतभाई शहा, माणकचंद लालवाणी आदि विविध समाज अग्रणींसह उपजिल्हाधिकारी जीनल पालरेचा यांच्यासह देशभरातुन आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साध्वीजी प्रज्ञाभारती सरस्वतीश्रीजी यांच्या विशेष प्रेरणा व मार्गदर्शनाने स्थापित या साधना केंद्रामध्ये साध्वीजी सरस्वतीश्रीजी यांनी स्वतः आठ लिपीमध्ये लिहीलेली दुर्मिळ ग्रंथ संपदा यानिमित्ताने प्रदर्शित करण्यात आली आहे.
साधना केंद्रामध्ये नवनिर्मित सरस्वती मंदीरामध्ये सरस्वतीच्या प्राचीन ग्रंथात वर्णवलेल्या नऊ वेगवेगळ्या मुद्रांमधील सरस्वती मुर्तींची प्रतिष्ठापना शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे.
पाच दिवस चालणार्‍या या महोत्सवासाठी देशाच्या विविध भागातुन साधु-साध्वी-संत, जैन समाज अग्रणी मोठ्या संख्येने कुंभोजगिरी तिर्थावर दाखल झाले आहेत.
उद्घाटनानिमित्त ट्रस्ट मंडळातर्फे जैन महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) नाम. ललित गांधी यांचा नऊ लिपित लिहिलेल्या नवकार महामंत्राची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करणेत आला.
महाराष्ट्रात अशा प्रकारचे हे पहिलेच सरस्वती साधना केंद्र बनले असुन भाविकांनी, ज्ञान साधकांनी व प्राचीन संस्कृती अभ्यासकांनी याठीकाणी अवश्य भेट द्यावी असे आवाहनही ललित गांधी यांनी याप्रसंगी केले.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजन

कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजय घोडावत एआय संशोधन केंद्र (SGAiRC) चे उद्घाटन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सी-ब्लॉक येथील सेमिनार सभागृहात संपन्न झाले. या उद्घाटन समारंभास संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

याच दिवशी “इंडिया एआय अभियान” सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित पूर्व संमेलन कार्यक्रम ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ चे ही उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नामवंत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना कृत्रिम बुद्धिमत्ता, नवसंकल्पना, संशोधनाच्या संधी तसेच भारतातील एआयचे भवितव्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रुती पाटील संचालिका, सिम्बायोसिस कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था, पुणे, श्री. हर्षवर्धन सालुंखे उपाध्यक्ष, व्हीसी टेक्नॉलॉजीज, कोल्हापूर, अनुप कारेकर संशोधन प्रमुख अवकाश व प्रगत संशोधन, व्यापारीकरण व तंत्रज्ञान प्रा. लि.; आंतरराष्ट्रीय खगोल व अंतराळ संघटनेचे राजदूत, तसेच आशुतोष पवार वरिष्ठ संगणक प्रणाली अभियंता, रिव्होल्युशन आयटी सोल्युशन्स यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विराट व्ही. गिरी, कॉम्पुटर विज्ञान व अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सागर चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विराट गिरी यांनी केले. “एआय संशोधन केंद्राचे महत्वाचे कार्य कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व, भविष्यातील संशोधन संधी आणि आवश्यक कौशल्यांवर सविस्तर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये भविष्यातील शास्त्रज्ञ आणि संशोधक घडविण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षण व संशोधन अत्यंत आवश्यक असून हे कार्य संस्था प्रभावीपणे करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाच्या नव्या युगाची सुरुवात करणारे SGAiRC संशोधन केंद्र आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ हे दोन्ही उपक्रम विद्यार्थी, संशोधक व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणारे असून उपस्थितांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांतीचा भाग होण्याचे आह्वान त्यांनी केले.

हा संपूर्ण कार्यक्रम इन्स्टिट्यूटच्या कॉम्पुटर विज्ञान व अभियांत्रिकी विभागांतर्गत आयोजित करण्यात आला होता. विभागप्रमुख प्रा. सागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सिद्धी जोशी हिने केले, तर प्रा. सागर चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे आज होणार पालकमंत्री ना.प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

१३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे प्रदर्शन आयोजित

चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित कंपन्यांचा सहभाग, शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल,
१२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय असणार खास आकर्षण

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी १८ वे भव्य कृषी व पशूप्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री ना.श्री. प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते आज शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.यावेळी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सांगली ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण असणार आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई येणार आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफसो, माजी आमदार महादेवरावजी महाडिक यांच्या हस्ते विविध पुरस्कार वितरण होणार आहेत.उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महापौर सौ. रूपाराणी निकम,उपमहापौर श्री अक्षय जरग यांची उपस्थिती असणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष ना.श्री.राजेश क्षीरसागर,मा. खासदार श्री. धैयशील माने,
मा. आ. श्री. विनय कोरे, आ.राहुल आवाडे,मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर श्री. अमोल येडगे,पोलिस अधीक्षक श्री .योगेशकुमार गुप्ता,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री, एस.कार्तिकेयन,मा. आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी,भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. विजय जाधव,भाजपा प्रदेश सचिव श्री.महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. नाथाजी पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष पूर्व मा. श्री. राजवर्धन निंबाळकर पूर्व, आणि मा. श्री. विजय पाटील अध्यक्ष, कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन श्री.विजय पाटील,भगिरथी महिला संस्था अध्यक्षा मा. सौ. अरुंधती महाडिक आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड अश्या भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने पाहावयास व खरेदी करता येणार आहेत.
प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, संद्रिय गुळ, हळद विक्रीसाठी असणार आहे.शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके, ए आय तंत्रज्ञान याची
माहिती मिळणार आहे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती याठिकाणी दिली जाणार आहे. विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळणार आहेत असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मा. सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते, यामध्ये दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावतात. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली जाते. शिवाय चार दिवस भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुणका-भाकरी दिली जाते.
याचबरोबर कृषीविषयक आधारित २०० हून अधिक स्टॉल याठिकाणी आहेत.

प्रदर्शनामध्ये कृषी तज्ञांची व्याख्याने चार दिवस दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. यात १४ फेब्रुवारी रोजी क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर डॉ. संग्राम धर्माजी काळे सह प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. त्याचदिवशी आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे मार्गदर्शन करणार आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार हे सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडणार आहेत. डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) हे दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री. युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे श्री. शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भिमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतीभूषण ५ पुरस्कार तर शेतीनिष्ठ शेतकरी १०, जिजामाता ५ पुरस्कार, तर युवा शेतकरी ५, आदर्श शेतकरी ५ आणि शेती तंत्रज्ञ पुरस्कार ५ दिले जाणार आहेत आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धा, जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षीसे दिली जाणार आहेत.
दररोज सायंकाळी ६ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत. यात १३ फेब्रुवारी रोजी कराओके गीत गायन स्पर्धा,
१४ फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १५ रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

विशेष सहकार्य असणाऱ्या वृंदावन फाउंडेशनविषयी

वृंदावन फाउंडेशनमार्फत महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न, ग्रामीण भागातील गरीब होतकरू शेतकन्यांकरीता अवजारे खरेदी करणेसाठी प्रयत्न व मदत, गरीब व होतकरू नवीन तरुण उद्योजकांसाठी व्यवसायासाठी प्रयत्न व मदत, भटक्या जनावरांसाठी अन्नदान व उपचार करीता प्रयत्न व मदत, अनाथ मुलांसाठी शिक्षणाकरिता मदत, ग्रामीण विकासासाठी प्रयत्न, सांस्कृतीक व आर्थिक विकास, स्वयंसेवी संस्थाना मदत, पर्यावरण प्रयत्न, समाजातील वंचित घटकांना उच्चाटनासाठी विविध कार्यक्रम राबवणे, आरोग्यविषयक सुवीधा पुरवणे तसेच शिबिरे आयोजीत करणे असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. वृंदावन फाउंडेशनची याच वर्षी नोंदणी झाली आहे. अशी माहिती वृंदावन फाउंडेशनच्या संचालिका सौ. गौरी सुजित चव्हाण व संचालिका जाई संजय भोसले यांच्या वतीने सुजित चव्हाण यांनी दिली.
यावर्षीच्या भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कृषी व पशू प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे

इंडियन सुपर फायटर्स असोसिएशन आयोजित एमएमए स्पर्धेत कोल्हापूरचे खेळाडू चमकले

कोल्हापूर/प्रतिनिधी : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या इंडियन सुपर फायटर्स असोसिएशन आयोजित एमएमए या राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत कोल्हापूरचे खेळाडू चमकले.संपूर्ण भारतातून या स्पर्धेत विविध राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत वायएमसीए या क्लब कडून चार स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये ८० किलो गटात कोल्हापूरच्या राज कोरगावकर यांनी मुंबईच्या अली बशीर याला अवघ्या १४ सेकंदात पराजित करत सर्वात जलद नॉक आउट ची नोंद केली.तसेच ६५ किलो गटात प्रथमेश पाटील याने १ मी २२ सेकंद मध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात केली. तसेच ७० किलो गटात अथर्व तिवडे यांनी देखील स्पर्धेत सहभाग घेतला. या सर्व खेळाडूना प्रशिक्षक स्टवन सोरटे यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाची पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरातुन अनेक जागतिक स्तरावरील खेळाडू घडले असून या वेगळ्या आणि साहसी प्रकाराकडे देखील खेळाडू आता आकर्षित होऊन कोल्हापूरचे नाव उज्वल करत आहेत. या यशामागे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि क्रीडाप्रेमींचा पाठिंबा कारणीभूत ठरला आहे. कोल्हापूरने बॉक्सिंग क्षेत्रात आपली परंपरा कायम राखत पुन्हा एकदा राज्यभर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजयी खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कोल्हापूरच्या या कामगिरीमुळे आगामी स्पर्धांसाठी नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे.

वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार, रोटरीच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ही समाजातील विविध गरजू घटकांसाठी भरीव उपक्रम राबवणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. या संघटनेच्या अनेक शाखा असून, त्यापैकी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं गेल्या काही वर्षात कोल्हापूरसह परिसरातील विविध जिल्हयांमध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत. विशेषत: २०२४ ते २०२५ या कालावधीत रोटरी क्लब मिडटाऊनने अनेक लक्षवेधी आणि समाजहिताचे प्रकल्प राबवले. त्याची दखल घेवून यावर्षी रोटरी मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी ११ जुलै २०२४ रोजी सौ. अरूंधती धनंजय महाडिक यांची निवड झाली. निवडीनंतर त्यांनी राबवलेल्या विविध नियोजनबध्द कार्यक्रमाचा समाजातील अनेक घटकांना मोठा फायदा झाला. त्यामध्ये विकासवाडी आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजुला केलेले वृक्षारोपण, रोटरीच्या वतीने प्रथमच राबवलेला आषाढी वारीचा आणि प्रसाद वाटपाचा उपक्रम, कारगील विजय दिवस साजरा करून शहीदांच्या कुटूंबियांचा केलेला सन्मान, बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन, कळंबा जेल मधील कैद्यांसाठी राबवलेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच वृध्दाश्रमातील निराधारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, सांस्कृतिक स्पर्धा, गाण्यांचा कार्यक्रम, जिल्हयातील नवोदित फोटोग्राफर्सना मार्गदर्शन करण्यासाठी ३ दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा, वयात येणार्‍या मुलींना आरोग्यासह परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी कळी उमलताना या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे जिल्हयातील सुमारे १५ हून अधिक शाळांमध्ये आयोजन, तसेच विद्यार्थीनींसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशिनचे वितरण, शालेय वयात स्पर्धा परीक्षेबाबत आवड निमर्ाण व्हावी, यासाठी केटीएस स्पर्धेचे जिल्हयातील सर्वच शाळांमध्ये आयोजन, त्यामध्ये १६०० मुलांचा सहभाग, त्यातून प्रथम आलेल्या २०० मुलांना स्कॉलरशिपसह बक्षिसं, ६० गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण, त्याचप्रमाणे पुण्याच्या सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ऍक्युपेंचर तज्ञ डॉ. सुनिता सातारकर, अच्युत गोडबोले, तसेच आदिवासी आणि जंगली भागात राहणार्‍या महिलांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणार्‍या अनघा पुरंदरे आणि पर्यावरणप्रेमी, पक्षी मित्र किरण पुरंदरे तसेच सीमेवरील युध्दात जखमी होवूनही जोरदार पुनरागमन करत, जलतरण स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ४७६ मेडल्स मिळवलेल्या चंदू चॅम्पियन फेम अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीधर पेटकर यांच्यासह विविध नामवंत आणि तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आणि शिबीराचे आयोजन, शिक्षक दिनानिमित्त जिल्हयातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार, रोटरी क्लबच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून, प्रथमच महिला संघाचा सहभाग, आंतर शालेय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसं, महिलांमधील वाढत्या कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी शिबीराचे आयोजन, त्यामध्ये सुमारे ६० महिलांची तपासणी, तसेच गरजू महिलांना सवलतीच्या दरात कॅन्सर तपासणी करता यावी, यासाठी रोटरीच्या ग्लोबल ग्रँट अंतर्गत कोल्हापूर कॅन्सर सेंटरला मॅमोग्राफी मशिन प्रदान, निगवे खालसा गावात स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी वॉटर एटीएम, रक्तदान शिबीराचे आयोजन, महिलांवरील अत्याचाराबाबत प्रतिबंधात्मक कायद्याचे मार्गदर्शन, त्यामध्ये पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर, निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यादव यांचे मार्गदर्शन, रोटरी मिडटाऊनला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल क्लबच्या माजी प्रेसिडेन्स यांचा सत्कार, दिव्यांगांना व्हिलचेअर आणि सायकलीसह विविध दिव्यांग सहाय्यक साधनांचे वाटप, हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृती मोहिम, वर्षभराच्या कालावधीत सुमारे १५० पेक्षा अधिक आरोग्य आणि वैद्यकीय शिबीरांचे आयोजन, रोटरी इंटरनॅशनलकडून विविध प्रकल्प राबवण्यासाठी भरीव निधी खेचून आणण्यात यश, रोटरीसाठी डॉ. रेश्मा आणि डॉ. सुरज पवार, खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक तसेच पृथ्वीराज महाडिक आणि भारती आणि करूणाकर नायक यांच्याकडून मोठा निधी प्रदान, दिव्यांगासाठी कदमवाडी मध्ये जयपूर फुटचे वितरण, जिल्हयातील गाेरगरीब आणि गरजू १०० महिलांना मोफत शिलाई मशिन वाटप, असंडोली गावामध्ये मुलींसाठी शौचालये बांधून देण्याच्या कामासाठी मदत, प्रयास या उपक्रमांतर्गत समाजात तंटा, वाद, मतभेद संपुष्टात येवून एकोपा निर्माण व्हावा, यासाठी तंटामुक्ती केंद्राची स्थापना असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. विशेषत: १ कोटी १३ लाख रूपयांच्या ग्लोबल गॅ्रंट करण्यात क्लबला यश आले. सौ. अरूंधती महाडिक यांच्या अध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कालावधीत असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांची दखल घेवून रोटरी मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये बेस्ट प्रेसिडेंट म्हणून रोटेरियन अरूंधती महाडिक, हायेस्ट कॉंट्रीब्युशन इन टोटल गिव्हींग, बेस्ट इन अर्बन रूरल रिलेशन, बेस्ट इन मेंबरशिप रिटेंशन, आऊट स्टँडींग कम्युनिटी सर्व्हीस प्रोजेक्ट, बेस्ट इन युथ सर्व्हीस, मेजर डोनरचे ४ पुरस्कार, २ ग्लोबल ग्रँड प्रोजेक्टचे पुरस्कार, द मॅजिक ऑफ रोटरी फौंडेशन लिगसी ऍवॉर्ड, बेस्ट क्लब बुलेटिन मंथली आणि बेस्ट ऍवॉर्ड फॉर आऊटस्टँडींग कम्युनिटी सर्व्हीस प्रोजेक्ट अशा १५ पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारामुळे वर्षभर अतिशय नियोजनबध्द रितीने आणि पूर्ण समर्पित वृत्तीने केलेल्या कामाचे चिज झाले आहे, अशी प्रतिक्रिया माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी व्यक्त केली. रोटरीच्या पदाधिकार्‍यांसह तत्कालीन सहकार्‍यांची साथ आणि सहकार्य मिळाल्यानेच एवढ्या मोठ्या संख्येने उपक्रम राबवणे शक्य झाल्याचेही सौ. महाडिक यांनी नमुद केले. पत्रकार परिषदेला रोटरीच

5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी – प्रचार संपुष्टात येणार

5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी – प्रचार संपुष्टात येणार

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी विनिर्दिष्ट ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या मतदारसंघासाठी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही किंवा सभा घेता येणार नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघ कार्यक्षेत्रात 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते मतदानादिवशी 7 फेब्रुवारी रोजी मतदान संपेपर्यंत बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा, बैठका घेणे तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे अशी कृत्ये करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघ क्षेत्रात मतदान संपेपर्यंत खालील कृती करण्यास मनाई केली आहे.

बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे अगर निवडणूक प्रचार करणे. तसेच पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येणे. (पूर्व नियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम वगळून व राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून.) या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार

वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार रोटरीच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ही समाजातील विविध गरजू घटकांसाठी भरीव उपक्रम राबवणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. या संघटनेच्या अनेक शाखा असून, त्यापैकी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं गेल्या काही वर्षात कोल्हापूरसह परिसरातील विविध जिल्हयांमध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत. विशेषत: २०२४ ते २०२५ या कालावधीत रोटरी क्लब मिडटाऊनने अनेक लक्षवेधी आणि समाजहिताचे प्रकल्प राबवले. त्याची दखल घेवून यावर्षी रोटरी मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी ११ जुलै २०२४ रोजी सौ. अरूंधती धनंजय महाडिक यांची निवड झाली. निवडीनंतर त्यांनी राबवलेल्या विविध नियोजनबध्द कार्यक्रमाचा समाजातील अनेक घटकांना मोठा फायदा झाला. त्यामध्ये विकासवाडी आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजुला केलेले वृक्षारोपण, रोटरीच्या वतीने प्रथमच राबवलेला आषाढी वारीचा आणि प्रसाद वाटपाचा उपक्रम, कारगील विजय दिवस साजरा करून शहीदांच्या कुटूंबियांचा केलेला सन्मान, बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन, कळंबा जेल मधील कैद्यांसाठी राबवलेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच वृध्दाश्रमातील निराधारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, सांस्कृतिक स्पर्धा, गाण्यांचा कार्यक्रम, जिल्हयातील नवोदित फोटोग्राफर्सना मार्गदर्शन करण्यासाठी ३ दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा, वयात येणार्‍या मुलींना आरोग्यासह परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी कळी उमलताना या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे जिल्हयातील सुमारे १५ हून अधिक शाळांमध्ये आयोजन, तसेच विद्यार्थीनींसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशिनचे वितरण, शालेय वयात स्पर्धा परीक्षेबाबत आवड निमर्ाण व्हावी, यासाठी केटीएस स्पर्धेचे जिल्हयातील सर्वच शाळांमध्ये आयोजन, त्यामध्ये १६०० मुलांचा सहभाग, त्यातून प्रथम आलेल्या २०० मुलांना स्कॉलरशिपसह बक्षिसं, ६० गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण, त्याचप्रमाणे पुण्याच्या सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ऍक्युपेंचर तज्ञ डॉ. सुनिता सातारकर, अच्युत गोडबोले, तसेच आदिवासी आणि जंगली भागात राहणार्‍या महिलांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणार्‍या अनघा पुरंदरे आणि पर्यावरणप्रेमी, पक्षी मित्र किरण पुरंदरे तसेच सीमेवरील युध्दात जखमी होवूनही जोरदार पुनरागमन करत, जलतरण स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ४७६ मेडल्स मिळवलेल्या चंदू चॅम्पियन फेम अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीधर पेटकर यांच्यासह विविध नामवंत आणि तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आणि शिबीराचे आयोजन, शिक्षक दिनानिमित्त जिल्हयातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार, रोटरी क्लबच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून, प्रथमच महिला संघाचा सहभाग, आंतर शालेय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसं, महिलांमधील वाढत्या कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी शिबीराचे आयोजन, त्यामध्ये सुमारे ६० महिलांची तपासणी, तसेच गरजू महिलांना सवलतीच्या दरात कॅन्सर तपासणी करता यावी, यासाठी रोटरीच्या ग्लोबल ग्रँट अंतर्गत कोल्हापूर कॅन्सर सेंटरला मॅमोग्राफी मशिन प्रदान, निगवे खालसा गावात स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी वॉटर एटीएम, रक्तदान शिबीराचे आयोजन, महिलांवरील अत्याचाराबाबत प्रतिबंधात्मक कायद्याचे मार्गदर्शन, त्यामध्ये पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर, निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यादव यांचे मार्गदर्शन, रोटरी मिडटाऊनला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल क्लबच्या माजी प्रेसिडेन्स यांचा सत्कार, दिव्यांगांना व्हिलचेअर आणि सायकलीसह विविध दिव्यांग सहाय्यक साधनांचे वाटप, हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृती मोहिम, वर्षभराच्या कालावधीत सुमारे १५० पेक्षा अधिक आरोग्य आणि वैद्यकीय शिबीरांचे आयोजन, रोटरी इंटरनॅशनलकडून विविध प्रकल्प राबवण्यासाठी भरीव निधी खेचून आणण्यात यश, रोटरीसाठी डॉ. रेश्मा आणि डॉ. सुरज पवार, खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक तसेच पृथ्वीराज महाडिक आणि भारती आणि करूणाकर नायक यांच्याकडून मोठा निधी प्रदान, दिव्यांगासाठी कदमवाडी मध्ये जयपूर फुटचे वितरण, जिल्हयातील गाेरगरीब आणि गरजू १०० महिलांना मोफत शिलाई मशिन वाटप, असंडोली गावामध्ये मुलींसाठी शौचालये बांधून देण्याच्या कामासाठी मदत, प्रयास या उपक्रमांतर्गत समाजात तंटा, वाद, मतभेद संपुष्टात येवून एकोपा निर्माण व्हावा, यासाठी तंटामुक्ती केंद्राची स्थापना असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. विशेषत: १ कोटी १३ लाख रूपयांच्या ग्लोबल गॅ्रंट करण्यात क्लबला यश आले. सौ. अरूंधती महाडिक यांच्या अध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कालावधीत असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांची दखल घेवून रोटरी मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये बेस्ट प्रेसिडेंट म्हणून रोटेरियन अरूंधती महाडिक, हायेस्ट कॉंट्रीब्युशन इन टोटल गिव्हींग, बेस्ट इन अर्बन रूरल रिलेशन, बेस्ट इन मेंबरशिप रिटेंशन, आऊट स्टँडींग कम्युनिटी सर्व्हीस प्रोजेक्ट, बेस्ट इन युथ सर्व्हीस, मेजर डोनरचे ४ पुरस्कार, २ ग्लोबल ग्रँड प्रोजेक्टचे पुरस्कार, द मॅजिक ऑफ रोटरी फौंडेशन लिगसी ऍवॉर्ड, बेस्ट क्लब बुलेटिन मंथली आणि बेस्ट ऍवॉर्ड फॉर आऊटस्टँडींग कम्युनिटी सर्व्हीस प्रोजेक्ट अशा १५ पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारामुळे वर्षभर अतिशय नियोजनबध्द रितीने आणि पूर्ण समर्पित वृत्तीने केलेल्या कामाचे चिज झाले आहे, अशी प्रतिक्रिया माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी व्यक्त केली. रोटरीच्या पदाधिकार्‍यांसह तत्कालीन सहकार्‍यांची साथ आणि सहकार्य मिळाल्यानेच एवढ्या मोठ्या संख्येने उपक्रम राबवणे शक्य झाल्याचेही सौ. महाडिक यांनी नमुद केले. पत्रकार परिषदेला रोटरीचे सचिव विकास राऊत, बी एस शिंपुकडे, अनिरूध्द तगारे, ऍड. अनिल देशपांडे, भारती नायक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शन २०२६ १३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे आयोजित : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित कंपन्यांचा सहभाग, शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल,
१२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय खास आकर्षण

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन येत्या १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी याही वर्षी हे भव्य कृषी प्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरविण्यात येत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. २०२६ मध्ये भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण असणार आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई येणार आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत. याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती देताना खासदार धनंजय महाडिक यांनी देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड अश्या भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने पाहावयास व खरेदी करता येणार आहेत. याचबरोबर या प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, संद्रिय गुळ, हळद विक्रीसाठी असणार आहे.
शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके, ए आय तंत्रज्ञान याची माहिती मिळणार आहे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती याठिकाणी दिली जाणार आहे. विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळणार आहेत असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मा. सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते, यामध्ये दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावतात. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली जाते. शिवाय चार दिवस भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुणका-भाकरी दिली जाते.                                  प्रदर्शनामध्ये कृषी तज्ञांची व्याख्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. यात १४ फेब्रुवारी रोजी क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर डॉ. संग्राम धर्माजी काळे सह प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. त्याचदिवशी आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे मार्गदर्शन करणार आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार हे सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडणार आहेत. डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) हे दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री. युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे श्री. शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भिमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतीभूषण ५ पुरस्कार तर शेतीनिष्ठ शेतकरी १०, जिजामाता ५ पुरस्कार, तर युवा शेतकरी ५, आदर्श शेतकरी ५ आणि शेती तंत्रज्ञ पुरस्कार ५ दिले जाणार आहेत आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धा, जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षीसे दिली जाणार आहेत.दररोज सायंकाळी ६ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत. यात १३ फेब्रुवारी रोजी कराओके गीत गायन स्पर्धा,१४ फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १५ रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहे. आणि १६ फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

विशेष सहकार्य असणाऱ्या वृंदावन फाउंडेशनविषयी

वृंदावन फाउंडेशनमार्फत महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न, ग्रामीण भागातील गरीब होतकरू शेतकन्यांकरीता अवजारे खरेदी करणेसाठी प्रयत्न व मदत, गरीब व होतकरू नवीन तरुण उद्योजकांसाठी व्यवसायासाठी प्रयत्न व मदत, भटक्या जनावरांसाठी अन्नदान व उपचार करीता प्रयत्न व मदत, अनाथ मुलांसाठी शिक्षणाकरिता मदत, ग्रामीण विकासासाठी प्रयत्न, सांस्कृतीक व आर्थिक विकास, स्वयंसेवी संस्थाना मदत, पर्यावरण प्रयत्न, समाजातील वंचित घटकांना उच्चाटनासाठी विविध कार्यक्रम राबवणे, आरोग्यविषयक सुवीधा पुरवणे तसेच शिबिरे आयोजीत करणे असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. वृंदावन फाउंडेशनची याच वर्षी नोंदणी झाली आहे. अशी माहिती वृंदावन फाउंडेशनच्या संचालिका सौ. गौरी सुजित चव्हाण व संचालिका जाई संजय भोसले यांच्या वतीने सुजित चव्हाण यांनी दिली.
यावर्षीच्या भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.तरी या प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. अजित शिंदे, डॉ. सुनिल काटकर, सर्जेराव धनवडे दादा, पृथ्वीराज महाडिक,अशोक सिधनेर्ले, इंद्रजीत जाधव,जिल्हा कृषी अधीक्षक महेश मस्तोळी,जिल्हा कृषी अधीक्षक नामदेव परिट, कृषी अधिकारी युवराज पाटील,किरण रणदिवे आदी उपस्थित होते.