भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्यावतीने,  कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये मोफत प्रशिक्षण शिबीर झाले. सध्याच्या महागाईच्या दिवसात पुरूषांच्याबरोबरीने महिलांनी उद्योग- व्यवसाय सुरू करत कुटूंबाला हातभार लावावा, यासाठी भागीरथी महिला संस्था प्रयत्नशिल आहे. महिलांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून, आर्थिकदृष्टया सक्षम बनावे, असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केले.
भारतीय जनता पार्टी आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, कोल्हापुरातील देवकर पाणंद परिसरातील महिलांसाठी, मोफत प्रशिक्षण शिबीर झाले. भागीरथीच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, नगरसेविका पुर्वा राणे, अर्चना कोराणे यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरवात झाली. भागीरथी संस्थेने आजवर २५ ते ३० हजार महिलांना उद्योगशील बनवले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासह, भागीरथी पतसंस्थेच्यावतीने उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. तसेच महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भागीरथी संस्था प्रयत्न करते. आजवर शेकडो महिला स्वयंपूर्ण बनल्या आहेत. यापुढेही महिला सक्षमीकरणाची चळवळ कायम सुरू असेल, असे अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. त्यानंतर अश्‍विनी वास्कर यांनी महिलांना नीळ, फिनेल, वॉशिंग पावडर, सेंट, साबण, अगरबत्ती, केक, चौपाटी पदार्थ अशा विविध पदार्थांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. तर नगरसेविका पुर्वा राणे यांनीही उपस्थित महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी नम्रता देसाई, प्रज्ञा इंगवले यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *