Grid Posts

View All
ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

Thumbnail

View All
माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

Tile List

View All
ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

संकल्प "पी. एम. सूर्यघर योजना" आणि "मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद/ रस्ते योजना" राबविण्याचे कोल्हापूर, दि. २३:वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस गुरुवारी दि. २६…

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

Tile Posts

View All
My Marathi

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात…

My Marathi

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

My Marathi

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती…

My Marathi

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुंबई

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर   कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या काही वर्षात…

My Marathi

गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील…

My Marathi

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई…

My Marathi

धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

‘धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतिक्षित…

Thumbnail

View All
My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

माय मराठी

क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित दालन प्रदर्शनास प्रारंभ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

  कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ फेब्रुवारीस अपघाती निधन झाले आहे. मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण…

माय मराठी

स्वप्न मोठी ठेवा : विनायक भोसले घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत…

स्वप्न मोठी ठेवा : विनायक भोसले घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत स्वप्न मोठी ठेवा : विनायक भोसले घोडावत विद्यापीठात…

माय मराठी

औषध निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रायोगिक प्राण्यांचीयोग्य हाताळणी गरजेची – डॉ. एम. व्यंकट रमणा‘एक्स्पेरिमेंटल ॲनिमल हँडलिंग अँड एन्व्हायरन्मेंटल एनरिचमेंट’ कार्यशाळाडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : औषध निर्मिती आणि संशोधनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रायोगिक प्राण्यांची योग्य हाताळणी, त्यांचे ताणतणाव कमी करणे अत्यंत गरजेचे आहे.…

माय मराठी

अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी

सतेज पाटील : बारामतीत पवार कुटुंबांचे केले सांत्वन कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर जणू काळोख पसरला आहे.…

माय मराठी

क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित दालन प्रदर्शनास प्रारंभ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ फेब्रुवारीस अपघाती निधन झाले आहे. मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून…

माय मराठी

महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रे

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी नूतन नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांची मंगळवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात…

माय मराठी

भोगावती साखर कारखान्याची विस्तारवाढ, को- जनरेशन आणि डिस्टिलरी करूनच पी. एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना भेट देणार….!मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

निगवे जिल्हा परिषद मतदारसंघाची कुरुकली येथे जाहीर सभा कुरुकली/प्रतिनिधी : स्वर्गीय आमदार पाटील साहेब यांना शेतकऱ्यांच्या श्रमाचे मंदिर म्हणून भोगावती…

माय मराठी

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी ठीक ८ वाजता…

माय मराठी

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे ७७ वा प्रजासत्ताक…

माय मराठी

डीवायपी साळोखेनगर इंक्युबेशन सेंटर येथे ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ प्रशिक्षण संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. डी. वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पस येथे महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म, लघु व…

क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित दालन प्रदर्शनास प्रारंभ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ फेब्रुवारीस अपघाती निधन झाले आहे. मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून आज अत्यंत साधेपणाने क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित ‘दालन २०२६’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा नव्या तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक वास्तुकलेचा मेळावा हे प्रदर्शन ठरणार आहे.
२ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन बांधकाम व्यावसायिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.आज पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी याठिकाणी आले होते.

या प्रदर्शनात, एकाच छताखाली शेकडो रेसिडेन्शिअल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. तुमच्या स्वप्नातील घर आणि भविष्यातील गुंतवणूक यांचा अचूक संगम म्हणजे क्रीडाई कोल्हापूरचे ‘दालन २०२६’ प्रदर्शन आज ३० जानेवारीपासून महासैनिक दरबार येथे सुरू झाले आहे.
क्रीडाई कोल्हापूरतर्फे आयोजित ‘दालन २०२६’ हे भव्य बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन महासैनिक दरबार मैदानावर भरणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आज साध्या पद्धतीने करण्यात आले. क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, दालन प्रदर्शनाचे अध्यक्ष महेश यादव,उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजिनदार अजय डोईजड, दालनचे व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शहा, सचिव संग्राम दळवी आणि खजिनदार अमोल देशपांडे, राजीव पारीख, संदीप मिरजकर, यांच्यासह क्रीडाईचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते.
या प्रदर्शनात एकूण १७० स्टॉल्स आहेत. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन झाल्याने जिल्ह्याबाहेरील लोकांचा ओघ वाढत आहे. अशा परिस्थितीत नवीन प्रकल्प,अत्याधुनिक तंत्रज्ञान, बांधकाम साहित्य आणि गृहकर्ज देणाऱ्या बँका यांची माहिती एकाच छताखाली या प्रदर्शनात मिळणार आहे. या प्रदर्शनादरम्यान तांत्रिक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. आज ३१ जानेवारीला प्रा. एम. जी. गाडगीळ आधुनिक स्थापत्यामधील नावीन्यपूर्ण सोल्युशन्स या विषयावर तर १ फेब्रुवारीला प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले ‘एआय आणि बदलणारे जग’ या विषयावर संवाद साधणार आहेत.या प्रदर्शनाची ब्रँड अँम्बेसीडर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे या आहेत.

स्वप्न मोठी ठेवा : विनायक भोसले घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत…

स्वप्न मोठी ठेवा : विनायक भोसले घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत

स्वप्न मोठी ठेवा : विनायक भोसले घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत

अतिग्रे/प्रतिनिधी : स्वप्न मोठी ठेवा, मेहनत करत रहा, ध्येय निश्चित ठेवा आणि सातत्याने व प्रामाणिक प्रयत्न करत राहा, हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असा सल्ला विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत विद्यापीठात आयोजित प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात दिला.घोडावत विद्यापीठात यावर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत इंडक्शन प्रोग्रॅमच्या माध्यमातून करण्यात आले.
या मध्ये इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, कॉमर्स, सायन्स, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, फार्मसी आणि कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स या विभागांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.या प्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या शैक्षणिक वातावरणाची ओळख करून दिली. उच्च दर्जाच्या शिक्षणपद्धती, जागतिक स्तरावरील संशोधन संधी आणि विद्यार्थी विकास कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.
कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी विद्यापीठातील शिस्तपालनाचे नियम, प्रशासन प्रक्रियेची पारदर्शकता व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधेबद्दल माहिती दिली.यावेळी विद्यापीठातील सर्व डीन, विभागप्रमुख आणि प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिग्रे/प्रतिनिधी : स्वप्न मोठी ठेवा, मेहनत करत रहा, ध्येय निश्चित ठेवा आणि सातत्याने व प्रामाणिक प्रयत्न करत राहा, हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असा सल्ला विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत विद्यापीठात आयोजित प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात दिला.घोडावत विद्यापीठात यावर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत इंडक्शन प्रोग्रॅमच्या माध्यमातून करण्यात आले.
या मध्ये इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, कॉमर्स, सायन्स, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, फार्मसी आणि कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स या विभागांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.या प्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या शैक्षणिक वातावरणाची ओळख करून दिली. उच्च दर्जाच्या शिक्षणपद्धती, जागतिक स्तरावरील संशोधन संधी आणि विद्यार्थी विकास कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.
कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी विद्यापीठातील शिस्तपालनाचे नियम, प्रशासन प्रक्रियेची पारदर्शकता व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधेबद्दल माहिती दिली.यावेळी विद्यापीठातील सर्व डीन, विभागप्रमुख आणि प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औषध निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रायोगिक प्राण्यांचीयोग्य हाताळणी गरजेची – डॉ. एम. व्यंकट रमणा‘एक्स्पेरिमेंटल ॲनिमल हँडलिंग अँड एन्व्हायरन्मेंटल एनरिचमेंट’ कार्यशाळाडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : औषध निर्मिती आणि संशोधनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रायोगिक प्राण्यांची योग्य हाताळणी, त्यांचे ताणतणाव कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रयोगांचे अचूक व पुनरुत्पादक निष्कर्ष मिळवण्यासाठी नैतिक मुल्ये आणि कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी. औषध निर्मिती आणि त्यांचा सुरक्षित वापर याबद्दल जनजागृती करण्यासाठी फार्मसी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडियाचे (दक्षिण विभाग) उपाध्यक्ष डॉ. एम. व्यंकट रमणा यांनी केले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्यावतीने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित ‘एक्स्पेरिमेंटल ॲनिमल हँडलिंग अँड एन्व्हायरन्मेंटल एनरिचमेंट’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय प्रायोगिक कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, डॉ. रविकांत पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.डॉ. एम वेंकट रमणा म्हणाले, डी. वाय. पाटील विद्यापीठाने या कार्यशाळेच्या माध्यमातून आव्हानात्मक आणि महत्वाच्या विषय हाती घेतला आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात भर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वतःला अपडेट करा, प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर रहा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी केले. देशभरात ५ हजार पेक्षा जास्त फार्मसी कॉलेज असून येथून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची औषध निर्माण क्षेत्रात महत्वाची भूमिका राहणार आहे. अत्याधुनिक पद्धतीचा वापर, प्रायोगिक ज्ञान, शिक्षण, संवाद, चर्चा या कार्यशाळेत होणार असून विद्यार्थी व संशोधक याना नवे ज्ञान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे म्हणाले, फार्मसी क्षेत्र हे मेडिकल क्षेत्राशी सर्वात जवळ आहे. प्राण्यांवर करण्यात येणाऱ्या प्रयोगामधूनच यशस्वी औषध निर्मिती होते. त्यानंतरच मनुष्यावर वापर केला जातो. त्यामुळे या प्रक्रियेत महत्वाच्या असलेल्या प्रायोगिक प्राण्यंची हाताळणी हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आपल्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी अधिक संपन्न बनविण्यासाठी हि कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरेल.डॉ. आर. वाय पाटील म्हणाले, निसर्गातील प्राण्यांच्या प्रत्येक जाती एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत, त्यांच्या जीवनपद्धतीचे बारकावे समजून घेणं आणि सूक्ष्म अभ्यास करणं गरजेचे आहे. कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांनी, मानवी आरोग्यासाठी प्रयोग गरजेचे आहेत, पण नियमावली काटेकोर पालन करणेही आवश्यक आहे. प्रयोगासाठी प्राण्याचा वापर करण्यापूर्वी याऐवजी दुसरा पर्याय आहे का? त्याच प्राण्याचा पुनर्रवापर करता येइल का? आणि प्रयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्याला कमीत कमी वेदना व्हाव्यात यासाठी काय करू शकतो हे तीन प्रश्न विचारा.

दोन दिवशीय या कार्यशाळेत डॉ. प्रल्हाद वांगीकर, डॉ. एन. एस. व्यवहारे, डॉ. आर. वाय. पाटील, डॉ. मिता बुरांडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. देवेंद्र शिरोडे, डॉ. स्मिता सदर, डॉ. विश्वेश डांगे यांनी प्रात्यक्षिक सादर केली. शनिवारी दुसऱ्या दिवशीच्या सत्रात डॉ. बलवंत चौरे, डॉ. ए. जी. ढवळशंख, डॉ. रविंद्र जरग, डॉ. संदीप पाटील, डॉ. चंद्रगौंडा पाटील हे मार्गदर्शन करणार असून डॉ. एन. एस. व्यवहारे, डॉ. संतोष वाळवेकर, डॉ. संदीप पाटील, डॉ. देवेंद्र शिरोडे, डॉ. स्मिता सदर हे प्रात्यक्षिक घेणार आहे.

डॉ. सोनाली दिवटे आणि स्नेहल भोंगाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार डॉ. अभिनंदन पाटील यांनी मानेल. यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सी.डी लोखंडे, डॉ. अमृतकुवर रायजादे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. उमराणी जे. , रुधीर बार्देसकर, संजय जाधव, अजित पाटील, जयदीप पाटील यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, देशभरातून उपस्थित विद्यार्थी, संशोधक उपस्थित होते.

अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी

सतेज पाटील : बारामतीत पवार कुटुंबांचे केले सांत्वन

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर जणू काळोख पसरला आहे. हा धक्का इतका मोठा आहे की, राज्याच्या राजकारण आणि समाज जीवनातील पोकळी कधीही भरून निघणार नाही, या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली. आमदार पाटील यांनी शुक्रवारी बारामतीत जाऊन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, पार्थ व जय पवार, रोहीत पवार यांची भेट घेत पवार कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार पाटील म्हणाले, आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी अजित पवार यांनी वैयक्तिक संबंध सातत्याने जाेपासले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने मला वैयक्तिकरित्या बसलेला हा धक्का शब्दांच्या पलीकडचा असून, अंतःकरण सुन्न करून टाकणारा आहे. यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते

क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित दालन प्रदर्शनास प्रारंभ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ फेब्रुवारीस अपघाती निधन झाले आहे. मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून आज अत्यंत साधेपणाने क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित ‘दालन २०२६’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा नव्या तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक वास्तुकलेचा मेळावा हे प्रदर्शन ठरणार आहे.
२ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन बांधकाम व्यावसायिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.आज पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी याठिकाणी आले होते.
या प्रदर्शनात, एकाच छताखाली शेकडो रेसिडेन्शिअल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. तुमच्या स्वप्नातील घर आणि भविष्यातील गुंतवणूक यांचा अचूक संगम म्हणजे क्रीडाई कोल्हापूरचे ‘दालन २०२६’ प्रदर्शन आज ३० जानेवारीपासून महासैनिक दरबार येथे सुरू झाले आहे.
क्रीडाई कोल्हापूरतर्फे आयोजित ‘दालन २०२६’ हे भव्य बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन महासैनिक दरबार मैदानावर भरणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आज साध्या पद्धतीने करण्यात आले. क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, दालन प्रदर्शनाचे अध्यक्ष महेश यादव,उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजिनदार अजय डोईजड, दालनचे व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शहा, सचिव संग्राम दळवी आणि खजिनदार अमोल देशपांडे, राजीव पारीख, संदीप मिरजकर, यांच्यासह क्रीडाईचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते.
या प्रदर्शनात एकूण १७० स्टॉल्स आहेत. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन झाल्याने जिल्ह्याबाहेरील लोकांचा ओघ वाढत आहे. अशा परिस्थितीत नवीन प्रकल्प,अत्याधुनिक तंत्रज्ञान, बांधकाम साहित्य आणि गृहकर्ज देणाऱ्या बँका यांची माहिती एकाच छताखाली या प्रदर्शनात मिळणार आहे. या प्रदर्शनादरम्यान तांत्रिक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. आज ३१ जानेवारीला प्रा. एम. जी. गाडगीळ आधुनिक स्थापत्यामधील नावीन्यपूर्ण सोल्युशन्स या विषयावर तर १ फेब्रुवारीला प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले ‘एआय आणि बदलणारे जग’ या विषयावर संवाद साधणार आहेत.या प्रदर्शनाची ब्रँड अँम्बेसीडर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे या आहेत.

महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रे

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी नूतन नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांची मंगळवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अर्हता नियम १९८७ मधील नियम तीन नुसार काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली. यात काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रे यांची एकमताने निवड केली. विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, सहआयुक्त चंद्रकांत खोसे व उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत गटाची नोंदणी करण्यात आली. बोंद्रे हे प्रभाग ८ मधून विजयी झाले असून महापालिकेच्या राजकारणाचा त्यांना पुर्वानुभव आहे. आक्रमक अन अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. आई शोभा बोंद्रे यांनी याआधी महापौरपद भूषवले असून बोंद्रे परिवार गेल्या कित्येक दशकापासून महापालिकेच्या राजकारणावर मांड ठेवून आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन काँग्रेसने त्यांचही गटनेतेपदी निवड केली आहे. खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक ३४ नगरसेवक निवडूण आले आहेत. सत्तेपर्यंत जाण्यासाठी त्यांना काही जागा कमी पडल्या असल्या तरी महापालिकेत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला मान मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावण्याठी काँग्रेसने आक्रमक व तरुण चेहऱ्याला बोंद्रे यांच्या रुपाने संधी दिल्याचे मानले जाते.

यावेळी राजेश लाटकर संजय मोहिते अर्जून माने दुर्वास कदम प्रतापसिंह जाधव सरकार अमर समर्थ सुभाष बुचडे विनायक कारंडे विशाल चव्हाण जयश्री जाधव स्वाती यवलुजे रुग्वेदा माने रुपाली पोवार दिपाली घाटगे पुष्पा नरुटे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

कोट : खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आ जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपति, ऋतुराज पाटील, यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझी महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी केलेली निवड मी माझ्या कामातून सार्थकी लावेल. कोल्हापूरच्या विकासासाठी आम्ही प्रशासन व सत्ताधाऱ्यांना नक्की सहकार्य करु. पण जिथे चुकीचे प्रकार घडतील तेथे मात्र, कडाडून विरोध राहील. सर्वसामान्य कोल्हापुरकरांना मुलभूत सुविधा देण्यासाठी आमचा आवाज सदैव बुलंद राहील. त्यासाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका पार पाडू.

इंद्रजित बोंद्रे, गटनेता, काँग्रेस, कोल्हापूर महापालिका.

भोगावती साखर कारखान्याची विस्तारवाढ, को- जनरेशन आणि डिस्टिलरी करूनच पी. एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना भेट देणार….!मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

निगवे जिल्हा परिषद मतदारसंघाची कुरुकली येथे जाहीर सभा

कुरुकली/प्रतिनिधी : स्वर्गीय आमदार पाटील साहेब यांना शेतकऱ्यांच्या श्रमाचे मंदिर म्हणून भोगावती साखर कारखान्या बद्दल प्रचंड आत्मीयता होती या भोगावती साखर कारखान्याची पाच हजार गाळपक्षमतेसह विस्तारवाढ, को- जनरेशन प्रकल्प आणि डिस्टिलरी प्रकल्प करूनच कै. पी. एन. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना भेट देणार आहोत, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कुरुकली ता. करवीर येथे निगवे खालसा जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार संदीप पाटील, निगवे खालसा पंचायत समितीचे मतदार संघाचे उमेदवार पांडुरंग पाटील, परिते पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार साताप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय आमदार कै. पी. एन. पाटीलसाहेब यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल पाटील यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. ही सल आजही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये टोचत आहे या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून राहुल पाटील यांचा झालेला पराभव भरून काढूया.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर म्हणाले, स्वर्गीय आमदार कै. पी एन पाटीलसाहेब यांच्या निधनानंतर आमच्या गटांने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या पहिल्याच निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत. पी. एन. साहेबांच्या जाण्यानंतर जनता आम्हा कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तसेच; मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांनीही विश्वासाचा हात आम्हा सर्वांच्या पाठीवर ठेवला.

चौकट

वडीलकीच्या नात्याने पाठीशी
श्री. मुश्रीफ म्हणाले, माझी आणि स्वर्गीय आमदार कै. पी. एन. पाटीलसाहेब यांची चांगली मैत्री होती. काही मुद्द्यांवर आमच्यात मतभेदही असायचे त्यांच्या अचानक जाण्याने हा गट पोरका झाला आहे. परंतु; तुम्हा सर्वांना वडीलकीच्या नात्याने कधीही पोरकेपणाची जाणीव होऊ देणार नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल पाटील यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

चौकट

पी. एन. पाटील यांना श्रध्दांजली

राहुल पाटील म्हणाले, २०१५ साली स्वर्गीय आमदार कै. पी. एन. पाटीलसाहेब यांनी या मतदारसंघाच्या जिल्हा परिषद उमेदवारीसाठी पक्षाचा ए. बी. फॉर्म संदीप पाटील यांना दिला होता. परंतु; त्यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांनी नम्रतेने तो फॉर्म त्यांच्याकडे परत केला आणि माझ्या उमेदवारीसाठी आग्रह धरला. आज संदीप पाटील यांच्यासह सर्वच उमेदवारांच्या विजयाने पी. ए. साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करूया
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, सरपंच रोहित पाटील, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग पाटील, केरबा भाऊ पाटील, दत्तात्रय मुळीक, डॉ. दिग्विजय पाटील, शिवाजी कारंडे, दत्तात्रय मुळीक, संतोष पोर्लेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी ठीक ८ वाजता आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू कस्तुरी सागर कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत म्हणून ध्वजवंदन करण्यात आले.याप्रसंगी भाजप नगरसेवक प्रमोद देसाई, वंदना मोहिते, राजनंदा महाडिक,पल्लवी देसाई, विशाल शिराळे, दिपा ठाणेकर, दिपा काटकर, विजयसिंह देसाई, माधवी पाटील, निलंबरी साळोखे, माधुरी नकाते, निलिमा पाटील, मुरलीधर जाधव, रूपाराणी निकम, बबन मोकाशी, विजयसिंह खाडे- पाटील, सुरेखा ओटवकर, वैभव कुंभार, नेहा तेंडुलकर
यांच्यासह भाजपा पदाधिकारी अमर साठे, डॉ राजवर्धन, भरत काळे, विजय अग्रवाल, शैलेश पाटील, गिरीश साळोखे, दिग्विजय कालेकर, हेमंत कांदेकर, संगीता खाडे, राजसिंह शेळके, संदीप देसाई, विश्वजित पवार, महेश यादव, अनिल कामत, धीरज पाटील, सचिन कुलकर्णी, कोमल देसाई, सुनील पाटील, प्रीतम यादव, डॉ शिवानंद पाटील,सुधीर देसाई, गायत्री राउत, अजित ठाणेकर, अशोक जाधव, विजय सूर्यवंशी, संजय जासूद, दिलीप बोंद्रे, आश्विनी गोपुगाडे, तेजस्विनी पार्टी, शिवप्रसाद घोडके, रावसाहेब शिंदे, मानसिंग पाटील, किरण तासगावे, रघुनाथ पाटील, राजाराम परिट, राजेंद्र माळगे, अश्विनी वास्कर, विशाला पटनशेट्टी, सागर रांगोळे, प्रवीण शिंदे, सचिन पोवार, संग्राम जरग,अलका जावीर, सुनीता घोडके, विद्या बागडी, रिमा पालनकार, अनिकेत अतिग्रे, दत्ता लोखंडे, रोहित कारंडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, आर्यमन ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यानंतर छोट्या मुलांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून प्रसजसत्ताक दिनाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी एनसीसी विद्यार्थांनी परेड सादर केली तर विद्यार्थ्यांकडून विविध देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.
यावेळी सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. सी.डी.लोखंडे, डॉ. अद्वैत राठोड, डॉ. अजित पाटील, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. अमृतकुवर रायजादे, रुधिर बार्देसकर, डॉ. उमारणी जे., शंकर गोनुगडे, संजय जाधव, अजित पाटील यांच्यासह विवीध विभागाचे विभाप्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कसबा बावड्यातील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी कार्यकारी संचालक डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, सी. एच. आर.ओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, आर्यमन पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, डॉ. आर. ए पाटील, यांच्यासह अधिष्ठाता विभाग प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतमाता, महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील व उपस्थित सर्व शालेय विद्यार्थ्यांची भेट घेऊन विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

डीवायपी साळोखेनगर इंक्युबेशन सेंटर येथे ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ प्रशिक्षण संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. डी. वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पस येथे महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची कार्यक्षमता वाढ अर्थात ‘रॅम्प’ योजनेतर्गत ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापूर, पुणे, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण ४५ प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील समूहाच्या कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर मध्ये झालेल्या सामंजस्य कराराअतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साळोखेनगर येथील कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ या प्राशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
दागिने क्षेत्रातील ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले मुंबई येथील भारतीय रत्न व दागिने संस्थेचे उत्पादन विभागप्रमुख विनोद काटकर यांनी आठ तासांच्या सखोल प्रशिक्षण सत्रामध्ये दागिने व्यवसायातील विविध तांत्रिक पैलूंविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दागिने निर्मिती प्रक्रिया, बनावट दागिन्यांची ओळख, तसेच सोन्या-चांदीच्या दागिन्यांची शुद्धता तपासण्याच्या पद्धती, दागिने निर्मितीतील विविध टप्पे तसेच बनावट दागिने ओळखण्याचे तंत्र सोप्या भाषेत स्पष्ट केले.हॉलमार्किंग प्रक्रियेची माहिती व कालानुरूप हॉलमार्क चिन्हांमध्ये झालेल्या बदलांची सखोल माहिती त्यांनी दिली. प्रात्यक्षिक सत्रात प्रशिक्षणार्थ्यांना स्पर्शदगड चाचणी आणि घनता चाचणी यांच्या सहाय्याने सोन्याची शुद्धता तपासण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रक्रियेमुळे प्रशिक्षणार्थ्यांचे गणितीय व विश्लेषणात्मक कौशल्य विकसित झाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाच्यावतीने मूल्यमापन परीक्षा घेण्यात आली.
डॉ. डी. वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले की, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या ‘रॅम्प’ योजनेच्या माध्यमातून आणि उद्योगांच्या बदलत्या गरजांचा विचार करून विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी काळात कृषी, अन्नप्रक्रिया तसेच साखर प्रक्रिया क्षेत्रातही असे रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील.कौशल्य विकास समन्वयक राजन डांगरे यांनी उपक्रम आयोजनात महत्वाची भूमिका पार पाडली. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कुलसचिव डॉ. राजेंद्र तलवारे, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील तसेच कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.