क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित दालन प्रदर्शनास प्रारंभ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ फेब्रुवारीस अपघाती निधन झाले आहे. मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून आज अत्यंत साधेपणाने क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित ‘दालन २०२६’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा नव्या तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक वास्तुकलेचा मेळावा हे प्रदर्शन ठरणार आहे.
२ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन बांधकाम व्यावसायिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.आज पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी याठिकाणी आले होते.
या प्रदर्शनात, एकाच छताखाली शेकडो रेसिडेन्शिअल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. तुमच्या स्वप्नातील घर आणि भविष्यातील गुंतवणूक यांचा अचूक संगम म्हणजे क्रीडाई कोल्हापूरचे ‘दालन २०२६’ प्रदर्शन आज ३० जानेवारीपासून महासैनिक दरबार येथे सुरू झाले आहे.
क्रीडाई कोल्हापूरतर्फे आयोजित ‘दालन २०२६’ हे भव्य बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन महासैनिक दरबार मैदानावर भरणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आज साध्या पद्धतीने करण्यात आले. क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, दालन प्रदर्शनाचे अध्यक्ष महेश यादव,उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजिनदार अजय डोईजड, दालनचे व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शहा, सचिव संग्राम दळवी आणि खजिनदार अमोल देशपांडे, राजीव पारीख, संदीप मिरजकर, यांच्यासह क्रीडाईचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते.
या प्रदर्शनात एकूण १७० स्टॉल्स आहेत. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन झाल्याने जिल्ह्याबाहेरील लोकांचा ओघ वाढत आहे. अशा परिस्थितीत नवीन प्रकल्प,अत्याधुनिक तंत्रज्ञान, बांधकाम साहित्य आणि गृहकर्ज देणाऱ्या बँका यांची माहिती एकाच छताखाली या प्रदर्शनात मिळणार आहे. या प्रदर्शनादरम्यान तांत्रिक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. आज ३१ जानेवारीला प्रा. एम. जी. गाडगीळ आधुनिक स्थापत्यामधील नावीन्यपूर्ण सोल्युशन्स या विषयावर तर १ फेब्रुवारीला प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले ‘एआय आणि बदलणारे जग’ या विषयावर संवाद साधणार आहेत.या प्रदर्शनाची ब्रँड अँम्बेसीडर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *