Grid Posts

View All
माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

माय मराठी

येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

Thumbnail

View All
ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

Tile List

View All
माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक, स्थानिक कारागिरांच्या उपजिविकेची सुरक्षा निश्‍चित करण्याचा प्रयत्न कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय…

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

माय मराठी

येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

माय मराठी

गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Tile Posts

View All
My Marathi

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

My Marathi

धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

माय मराठी

आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण

सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा पुढाकार आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण  …

माय मराठी

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक भुये (ता. करवीर) : जोतिबा चैत्र…

List Posts

View All
My Marathi

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र…

My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला! कोल्हापूर/प्रतिनिधी: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड…

My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा कोल्हापूर/प्रमोद पाटील  : "चांगभलं" च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून…

माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार कोल्हापूर/प्रतिनिधी :…

Thumbnail

View All
My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शन २०२६ १३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे आयोजित

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शन २०२६ १३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी…

माय मराठी

शाश्वत विकासाला वेग देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर; कोल्हापूरी चप्पल आणि वस्त्रोद्योगास सुगीचे दिवस

  कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प आरोग्य, कृषि, उद्योग, पायाभूत…

माय मराठी

*६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘आफ्टर ओ.एल.सी’ – दमदार ॲक्शन आणि थराराची पर्वणी!*\

कोल्हापूर- मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरलेला बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट ‘आफ्टर ओ.एल.सी’ अखेर आपल्या रिलीज डेटसह सज्ज झाला आहे. अनेक…

माय मराठी

क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित दालन प्रदर्शनास प्रारंभ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

  कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ फेब्रुवारीस अपघाती निधन झाले आहे. मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण…

माय मराठी

स्वप्न मोठी ठेवा : विनायक भोसले घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत…

स्वप्न मोठी ठेवा : विनायक भोसले घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत स्वप्न मोठी ठेवा : विनायक भोसले घोडावत विद्यापीठात…

माय मराठी

औषध निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रायोगिक प्राण्यांचीयोग्य हाताळणी गरजेची – डॉ. एम. व्यंकट रमणा‘एक्स्पेरिमेंटल ॲनिमल हँडलिंग अँड एन्व्हायरन्मेंटल एनरिचमेंट’ कार्यशाळाडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : औषध निर्मिती आणि संशोधनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रायोगिक प्राण्यांची योग्य हाताळणी, त्यांचे ताणतणाव कमी करणे अत्यंत गरजेचे आहे.…

माय मराठी

अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी

सतेज पाटील : बारामतीत पवार कुटुंबांचे केले सांत्वन कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर जणू काळोख पसरला आहे.…

माय मराठी

क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित दालन प्रदर्शनास प्रारंभ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ फेब्रुवारीस अपघाती निधन झाले आहे. मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून…

माय मराठी

महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रे

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी नूतन नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांची मंगळवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात…

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शन २०२६ १३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे आयोजित

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शन २०२६ १३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे आयोजित : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित कंपन्यांचा सहभाग, शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल,
१२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय खास आकर्षण

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन येत्या १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी याही वर्षी हे भव्य कृषी प्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरविण्यात येत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. २०२६ मध्ये भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण असणार आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई येणार आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत. याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती देताना खासदार धनंजय महाडिक यांनी देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड अश्या भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने पाहावयास व खरेदी करता येणार आहेत. याचबरोबर या प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, संद्रिय गुळ, हळद विक्रीसाठी असणार आहे.
शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके, ए आय तंत्रज्ञान याची माहिती मिळणार आहे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती याठिकाणी दिली जाणार आहे. विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळणार आहेत असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मा. सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते, यामध्ये दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावतात. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली जाते. शिवाय चार दिवस भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुणका-भाकरी दिली जाते.                                  प्रदर्शनामध्ये कृषी तज्ञांची व्याख्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. यात १४ फेब्रुवारी रोजी क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर डॉ. संग्राम धर्माजी काळे सह प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. त्याचदिवशी आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे मार्गदर्शन करणार आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार हे सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडणार आहेत. डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) हे दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री. युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे श्री. शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भिमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतीभूषण ५ पुरस्कार तर शेतीनिष्ठ शेतकरी १०, जिजामाता ५ पुरस्कार, तर युवा शेतकरी ५, आदर्श शेतकरी ५ आणि शेती तंत्रज्ञ पुरस्कार ५ दिले जाणार आहेत आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धा, जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षीसे दिली जाणार आहेत.दररोज सायंकाळी ६ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत. यात १३ फेब्रुवारी रोजी कराओके गीत गायन स्पर्धा,१४ फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १५ रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहे. आणि १६ फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

विशेष सहकार्य असणाऱ्या वृंदावन फाउंडेशनविषयी

वृंदावन फाउंडेशनमार्फत महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न, ग्रामीण भागातील गरीब होतकरू शेतकन्यांकरीता अवजारे खरेदी करणेसाठी प्रयत्न व मदत, गरीब व होतकरू नवीन तरुण उद्योजकांसाठी व्यवसायासाठी प्रयत्न व मदत, भटक्या जनावरांसाठी अन्नदान व उपचार करीता प्रयत्न व मदत, अनाथ मुलांसाठी शिक्षणाकरिता मदत, ग्रामीण विकासासाठी प्रयत्न, सांस्कृतीक व आर्थिक विकास, स्वयंसेवी संस्थाना मदत, पर्यावरण प्रयत्न, समाजातील वंचित घटकांना उच्चाटनासाठी विविध कार्यक्रम राबवणे, आरोग्यविषयक सुवीधा पुरवणे तसेच शिबिरे आयोजीत करणे असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. वृंदावन फाउंडेशनची याच वर्षी नोंदणी झाली आहे. अशी माहिती वृंदावन फाउंडेशनच्या संचालिका सौ. गौरी सुजित चव्हाण व संचालिका जाई संजय भोसले यांच्या वतीने सुजित चव्हाण यांनी दिली.
यावर्षीच्या भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.तरी या प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. अजित शिंदे, डॉ. सुनिल काटकर, सर्जेराव धनवडे दादा, पृथ्वीराज महाडिक,अशोक सिधनेर्ले, इंद्रजीत जाधव,जिल्हा कृषी अधीक्षक महेश मस्तोळी,जिल्हा कृषी अधीक्षक नामदेव परिट, कृषी अधिकारी युवराज पाटील,किरण रणदिवे आदी उपस्थित होते.

शाश्वत विकासाला वेग देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर; कोल्हापूरी चप्पल आणि वस्त्रोद्योगास सुगीचे दिवस

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प आरोग्य, कृषि, उद्योग, पायाभूत सोयीसुविधांसह कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञानाला सामावून घेण्यासाठी उत्तेजन देणारा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०४७ पर्यंत देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या उद्दिष्ठाला आणि देशाच्या शाश्वत विकासाला वेग देणारा हा अर्थसंकल्प आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून देशांतर्गत उत्पादन क्षमता, उर्जा सुरक्षा आणि आवश्यक आयातीवरील अवलंबित्व कमी केले आहे. यासह रोजगार निर्मिती, कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी, घरगुती खरेदी शक्ती सुधारण्यासाठी आणि नागरिकांना सार्वत्रिक सेवा प्रदान करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सुधारणांमुळे विकास दर वाढला असून, खऱ्या अर्थाने “गरिबी हटाव” च्या दिशेने देशाने वाटचाल अधिक सक्षम केली आहे. विशेषतः चामड्यांची उत्पादने आणि कापडांची निर्यात देखील शुल्कमुक्त केली असल्याने कोल्हापुरी चप्पल आणि वस्त्रोद्योगास सुगीचे दिवस येणार आहेत. एकंदरीत पाहता देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणारा, शाश्वत विकासाची हमी देणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडिया @४७ संकल्पनेतून देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या निश्चयाला बळ देणारा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

*६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘आफ्टर ओ.एल.सी’ – दमदार ॲक्शन आणि थराराची पर्वणी!*\

कोल्हापूर-
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरलेला बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट ‘आफ्टर ओ.एल.सी’ अखेर आपल्या रिलीज डेटसह सज्ज झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला हा दमदार, ॲक्शन-पॅक्ड सिनेमा ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्यातील तगडी ॲक्शन, रहस्य आणि थरारक दृश्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रत्येक फ्रेममध्ये वेगळी ऊर्जा आणि कथा उलगडण्याची उत्सुकता निर्माण करणारा ‘आफ्टर ओ.एल.सी’ हा सिनेमा प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे.
या चित्रपटात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके, अश्विनी चवरे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची भक्कम टीम पाहायला मिळणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय देत चित्रपट अधिक प्रभावी केला आहे. थरार, रहस्य आणि जोरदार ॲक्शन यांचा उत्तम मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.कन्नड सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी ‘आफ्टर ओ.एल.सी’चे दिग्दर्शन केले असून, ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित होणार असल्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल विशेष उत्सुकता आहे.
दमदार कथा, जबरदस्त ॲक्शन आणि रहस्यमय प्रवास घेऊन येणारा *‘आफ्टर ओ.एल.सी’ ६ फेब्रुवारीपासून* आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.
थराराची ही सफर अनुभवण्यासाठी सज्ज राहा!

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदिप झांबरे यांनी केला भाजपमध्ये प्रवेश, आमदार सतेज पाटील गटाला खिंडार

क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित दालन प्रदर्शनास प्रारंभ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ फेब्रुवारीस अपघाती निधन झाले आहे. मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून आज अत्यंत साधेपणाने क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित ‘दालन २०२६’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा नव्या तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक वास्तुकलेचा मेळावा हे प्रदर्शन ठरणार आहे.
२ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन बांधकाम व्यावसायिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.आज पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी याठिकाणी आले होते.

या प्रदर्शनात, एकाच छताखाली शेकडो रेसिडेन्शिअल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. तुमच्या स्वप्नातील घर आणि भविष्यातील गुंतवणूक यांचा अचूक संगम म्हणजे क्रीडाई कोल्हापूरचे ‘दालन २०२६’ प्रदर्शन आज ३० जानेवारीपासून महासैनिक दरबार येथे सुरू झाले आहे.
क्रीडाई कोल्हापूरतर्फे आयोजित ‘दालन २०२६’ हे भव्य बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन महासैनिक दरबार मैदानावर भरणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आज साध्या पद्धतीने करण्यात आले. क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, दालन प्रदर्शनाचे अध्यक्ष महेश यादव,उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजिनदार अजय डोईजड, दालनचे व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शहा, सचिव संग्राम दळवी आणि खजिनदार अमोल देशपांडे, राजीव पारीख, संदीप मिरजकर, यांच्यासह क्रीडाईचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते.
या प्रदर्शनात एकूण १७० स्टॉल्स आहेत. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन झाल्याने जिल्ह्याबाहेरील लोकांचा ओघ वाढत आहे. अशा परिस्थितीत नवीन प्रकल्प,अत्याधुनिक तंत्रज्ञान, बांधकाम साहित्य आणि गृहकर्ज देणाऱ्या बँका यांची माहिती एकाच छताखाली या प्रदर्शनात मिळणार आहे. या प्रदर्शनादरम्यान तांत्रिक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. आज ३१ जानेवारीला प्रा. एम. जी. गाडगीळ आधुनिक स्थापत्यामधील नावीन्यपूर्ण सोल्युशन्स या विषयावर तर १ फेब्रुवारीला प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले ‘एआय आणि बदलणारे जग’ या विषयावर संवाद साधणार आहेत.या प्रदर्शनाची ब्रँड अँम्बेसीडर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे या आहेत.

स्वप्न मोठी ठेवा : विनायक भोसले घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत…

स्वप्न मोठी ठेवा : विनायक भोसले घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत

स्वप्न मोठी ठेवा : विनायक भोसले घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत

अतिग्रे/प्रतिनिधी : स्वप्न मोठी ठेवा, मेहनत करत रहा, ध्येय निश्चित ठेवा आणि सातत्याने व प्रामाणिक प्रयत्न करत राहा, हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असा सल्ला विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत विद्यापीठात आयोजित प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात दिला.घोडावत विद्यापीठात यावर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत इंडक्शन प्रोग्रॅमच्या माध्यमातून करण्यात आले.
या मध्ये इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, कॉमर्स, सायन्स, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, फार्मसी आणि कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स या विभागांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.या प्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या शैक्षणिक वातावरणाची ओळख करून दिली. उच्च दर्जाच्या शिक्षणपद्धती, जागतिक स्तरावरील संशोधन संधी आणि विद्यार्थी विकास कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.
कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी विद्यापीठातील शिस्तपालनाचे नियम, प्रशासन प्रक्रियेची पारदर्शकता व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधेबद्दल माहिती दिली.यावेळी विद्यापीठातील सर्व डीन, विभागप्रमुख आणि प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिग्रे/प्रतिनिधी : स्वप्न मोठी ठेवा, मेहनत करत रहा, ध्येय निश्चित ठेवा आणि सातत्याने व प्रामाणिक प्रयत्न करत राहा, हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असा सल्ला विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत विद्यापीठात आयोजित प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात दिला.घोडावत विद्यापीठात यावर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत इंडक्शन प्रोग्रॅमच्या माध्यमातून करण्यात आले.
या मध्ये इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, कॉमर्स, सायन्स, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, फार्मसी आणि कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स या विभागांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.या प्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या शैक्षणिक वातावरणाची ओळख करून दिली. उच्च दर्जाच्या शिक्षणपद्धती, जागतिक स्तरावरील संशोधन संधी आणि विद्यार्थी विकास कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.
कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी विद्यापीठातील शिस्तपालनाचे नियम, प्रशासन प्रक्रियेची पारदर्शकता व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधेबद्दल माहिती दिली.यावेळी विद्यापीठातील सर्व डीन, विभागप्रमुख आणि प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औषध निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रायोगिक प्राण्यांचीयोग्य हाताळणी गरजेची – डॉ. एम. व्यंकट रमणा‘एक्स्पेरिमेंटल ॲनिमल हँडलिंग अँड एन्व्हायरन्मेंटल एनरिचमेंट’ कार्यशाळाडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : औषध निर्मिती आणि संशोधनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रायोगिक प्राण्यांची योग्य हाताळणी, त्यांचे ताणतणाव कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रयोगांचे अचूक व पुनरुत्पादक निष्कर्ष मिळवण्यासाठी नैतिक मुल्ये आणि कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी. औषध निर्मिती आणि त्यांचा सुरक्षित वापर याबद्दल जनजागृती करण्यासाठी फार्मसी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडियाचे (दक्षिण विभाग) उपाध्यक्ष डॉ. एम. व्यंकट रमणा यांनी केले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्यावतीने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित ‘एक्स्पेरिमेंटल ॲनिमल हँडलिंग अँड एन्व्हायरन्मेंटल एनरिचमेंट’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय प्रायोगिक कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, डॉ. रविकांत पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.डॉ. एम वेंकट रमणा म्हणाले, डी. वाय. पाटील विद्यापीठाने या कार्यशाळेच्या माध्यमातून आव्हानात्मक आणि महत्वाच्या विषय हाती घेतला आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात भर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वतःला अपडेट करा, प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर रहा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी केले. देशभरात ५ हजार पेक्षा जास्त फार्मसी कॉलेज असून येथून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची औषध निर्माण क्षेत्रात महत्वाची भूमिका राहणार आहे. अत्याधुनिक पद्धतीचा वापर, प्रायोगिक ज्ञान, शिक्षण, संवाद, चर्चा या कार्यशाळेत होणार असून विद्यार्थी व संशोधक याना नवे ज्ञान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे म्हणाले, फार्मसी क्षेत्र हे मेडिकल क्षेत्राशी सर्वात जवळ आहे. प्राण्यांवर करण्यात येणाऱ्या प्रयोगामधूनच यशस्वी औषध निर्मिती होते. त्यानंतरच मनुष्यावर वापर केला जातो. त्यामुळे या प्रक्रियेत महत्वाच्या असलेल्या प्रायोगिक प्राण्यंची हाताळणी हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आपल्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी अधिक संपन्न बनविण्यासाठी हि कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरेल.डॉ. आर. वाय पाटील म्हणाले, निसर्गातील प्राण्यांच्या प्रत्येक जाती एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत, त्यांच्या जीवनपद्धतीचे बारकावे समजून घेणं आणि सूक्ष्म अभ्यास करणं गरजेचे आहे. कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांनी, मानवी आरोग्यासाठी प्रयोग गरजेचे आहेत, पण नियमावली काटेकोर पालन करणेही आवश्यक आहे. प्रयोगासाठी प्राण्याचा वापर करण्यापूर्वी याऐवजी दुसरा पर्याय आहे का? त्याच प्राण्याचा पुनर्रवापर करता येइल का? आणि प्रयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्याला कमीत कमी वेदना व्हाव्यात यासाठी काय करू शकतो हे तीन प्रश्न विचारा.

दोन दिवशीय या कार्यशाळेत डॉ. प्रल्हाद वांगीकर, डॉ. एन. एस. व्यवहारे, डॉ. आर. वाय. पाटील, डॉ. मिता बुरांडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. देवेंद्र शिरोडे, डॉ. स्मिता सदर, डॉ. विश्वेश डांगे यांनी प्रात्यक्षिक सादर केली. शनिवारी दुसऱ्या दिवशीच्या सत्रात डॉ. बलवंत चौरे, डॉ. ए. जी. ढवळशंख, डॉ. रविंद्र जरग, डॉ. संदीप पाटील, डॉ. चंद्रगौंडा पाटील हे मार्गदर्शन करणार असून डॉ. एन. एस. व्यवहारे, डॉ. संतोष वाळवेकर, डॉ. संदीप पाटील, डॉ. देवेंद्र शिरोडे, डॉ. स्मिता सदर हे प्रात्यक्षिक घेणार आहे.

डॉ. सोनाली दिवटे आणि स्नेहल भोंगाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार डॉ. अभिनंदन पाटील यांनी मानेल. यावेळी रिसर्च डायरेक्टर डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सी.डी लोखंडे, डॉ. अमृतकुवर रायजादे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. उमराणी जे. , रुधीर बार्देसकर, संजय जाधव, अजित पाटील, जयदीप पाटील यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, देशभरातून उपस्थित विद्यार्थी, संशोधक उपस्थित होते.

अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी

सतेज पाटील : बारामतीत पवार कुटुंबांचे केले सांत्वन

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर जणू काळोख पसरला आहे. हा धक्का इतका मोठा आहे की, राज्याच्या राजकारण आणि समाज जीवनातील पोकळी कधीही भरून निघणार नाही, या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली. आमदार पाटील यांनी शुक्रवारी बारामतीत जाऊन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, पार्थ व जय पवार, रोहीत पवार यांची भेट घेत पवार कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार पाटील म्हणाले, आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी अजित पवार यांनी वैयक्तिक संबंध सातत्याने जाेपासले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने मला वैयक्तिकरित्या बसलेला हा धक्का शब्दांच्या पलीकडचा असून, अंतःकरण सुन्न करून टाकणारा आहे. यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते

क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित दालन प्रदर्शनास प्रारंभ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ फेब्रुवारीस अपघाती निधन झाले आहे. मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून आज अत्यंत साधेपणाने क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित ‘दालन २०२६’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा नव्या तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक वास्तुकलेचा मेळावा हे प्रदर्शन ठरणार आहे.
२ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन बांधकाम व्यावसायिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.आज पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी याठिकाणी आले होते.
या प्रदर्शनात, एकाच छताखाली शेकडो रेसिडेन्शिअल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. तुमच्या स्वप्नातील घर आणि भविष्यातील गुंतवणूक यांचा अचूक संगम म्हणजे क्रीडाई कोल्हापूरचे ‘दालन २०२६’ प्रदर्शन आज ३० जानेवारीपासून महासैनिक दरबार येथे सुरू झाले आहे.
क्रीडाई कोल्हापूरतर्फे आयोजित ‘दालन २०२६’ हे भव्य बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन महासैनिक दरबार मैदानावर भरणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आज साध्या पद्धतीने करण्यात आले. क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, दालन प्रदर्शनाचे अध्यक्ष महेश यादव,उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजिनदार अजय डोईजड, दालनचे व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शहा, सचिव संग्राम दळवी आणि खजिनदार अमोल देशपांडे, राजीव पारीख, संदीप मिरजकर, यांच्यासह क्रीडाईचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते.
या प्रदर्शनात एकूण १७० स्टॉल्स आहेत. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन झाल्याने जिल्ह्याबाहेरील लोकांचा ओघ वाढत आहे. अशा परिस्थितीत नवीन प्रकल्प,अत्याधुनिक तंत्रज्ञान, बांधकाम साहित्य आणि गृहकर्ज देणाऱ्या बँका यांची माहिती एकाच छताखाली या प्रदर्शनात मिळणार आहे. या प्रदर्शनादरम्यान तांत्रिक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. आज ३१ जानेवारीला प्रा. एम. जी. गाडगीळ आधुनिक स्थापत्यामधील नावीन्यपूर्ण सोल्युशन्स या विषयावर तर १ फेब्रुवारीला प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले ‘एआय आणि बदलणारे जग’ या विषयावर संवाद साधणार आहेत.या प्रदर्शनाची ब्रँड अँम्बेसीडर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे या आहेत.

महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रे

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी नूतन नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांची मंगळवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अर्हता नियम १९८७ मधील नियम तीन नुसार काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली. यात काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रे यांची एकमताने निवड केली. विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, सहआयुक्त चंद्रकांत खोसे व उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत गटाची नोंदणी करण्यात आली. बोंद्रे हे प्रभाग ८ मधून विजयी झाले असून महापालिकेच्या राजकारणाचा त्यांना पुर्वानुभव आहे. आक्रमक अन अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. आई शोभा बोंद्रे यांनी याआधी महापौरपद भूषवले असून बोंद्रे परिवार गेल्या कित्येक दशकापासून महापालिकेच्या राजकारणावर मांड ठेवून आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन काँग्रेसने त्यांचही गटनेतेपदी निवड केली आहे. खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक ३४ नगरसेवक निवडूण आले आहेत. सत्तेपर्यंत जाण्यासाठी त्यांना काही जागा कमी पडल्या असल्या तरी महापालिकेत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला मान मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावण्याठी काँग्रेसने आक्रमक व तरुण चेहऱ्याला बोंद्रे यांच्या रुपाने संधी दिल्याचे मानले जाते.

यावेळी राजेश लाटकर संजय मोहिते अर्जून माने दुर्वास कदम प्रतापसिंह जाधव सरकार अमर समर्थ सुभाष बुचडे विनायक कारंडे विशाल चव्हाण जयश्री जाधव स्वाती यवलुजे रुग्वेदा माने रुपाली पोवार दिपाली घाटगे पुष्पा नरुटे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

कोट : खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आ जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपति, ऋतुराज पाटील, यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझी महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी केलेली निवड मी माझ्या कामातून सार्थकी लावेल. कोल्हापूरच्या विकासासाठी आम्ही प्रशासन व सत्ताधाऱ्यांना नक्की सहकार्य करु. पण जिथे चुकीचे प्रकार घडतील तेथे मात्र, कडाडून विरोध राहील. सर्वसामान्य कोल्हापुरकरांना मुलभूत सुविधा देण्यासाठी आमचा आवाज सदैव बुलंद राहील. त्यासाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका पार पाडू.

इंद्रजित बोंद्रे, गटनेता, काँग्रेस, कोल्हापूर महापालिका.