गुरुबाळ माळी यांना गुंफण पत्रकारिता गौरव पुरस्कार जाहीर
कोल्हापूर/प्रतिनिधी : सातारा येथील गुंफण अकादमीच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा पत्रकार शंकर पाटील गुंफण पत्रकारिता गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक व लेखक गुरुबाळ माळी यांना जाहीर झाला आहे.
येत्या २८ जानेवारी २०२४ रोजी करवीर तालुक्यातील वाशी येथे होणाऱ्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. साहित्य आणि पत्रकारिता या क्षेत्रातील योगदानाबद्दल गुरुबाळ माळी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या पुरस्कार वितरण समारंभास साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.






