Wednesday, November 19, 2025
spot_img
Homeताज्यापश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी पशू व पक्षी...

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शन २०२४ चे आज २६ रोजी होणार पालकमंत्री ना.हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शन २०२४ चे आज २६ रोजी होणार पालकमंत्री ना.हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात देश-विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग

विविध जातिवंत जनावरे,गोलू टू १० कोटीचा रेडा विविध कंपन्यांची उत्पादने बी.बियाणे शेतीविषयक अवजारे पहावयास मिळणार

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे *भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शन २०२४* हे आजपासून सुरू होत आहे.
येथील मेरी वेदर मैदान येथे होंत असलेल्या या प्रदर्शनाचे खास आकर्षण राष्ट्रीय पुरस्कार विजेता *हरियाणा चॅम्पियन गोलू टू १० कोटीचा रेडा* आहे. यावर्षी १५ वे प्रदर्शन होत आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन अज २६ जानेवारीस सायंकाळी ५ वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना.हसनसो मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती असणार आहे.याचबरोबर यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने,विधानसभा सदस्य विनय कोरे, मा. आमदार प्रकाश आवाडे, मा.आमदार प्रकाश आबिटकर, मा. आमदार राजेश पाटील, मा.आमदार सुरेश हाळवणकर मा. आमदार अमल महाडिक,भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ. अरुंधती महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हाध्यक्ष भाजपा विजय जाधव, पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, कोल्हापूर पूर्व भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष व सौ.रुपाराणी निकम,व्हाईस प्रेसिडेंट कार्पोरेट अफेयर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे श्री. सत्यजित भोसले आदि उपस्थित असणार आहेत.

देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून विविध जातिवंत जनावरे, पशुपक्षी, तांदूळ,मध व मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या प्रदर्शनामध्ये ४०० पेक्षा अधिक स्टॉलचा समावेश आहे.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत देण्यात आले आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे. याचबरोबर पशुपक्षी पालन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारे हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे.
या प्रदर्शनामध्ये ऑरगॅनिक बायो फर्टीलायझर मध्ये युगांतर अँग्रो, वनिता अँग्रो,पॉवर टिलर आणि रोटावेटर मध्ये डेक्कन फार्म इक्विपमेंट, पंप मध्ये बी.के.सेल्स,फ्लोटेक पंप सहभागी झाले आहेत.ट्रॅक्टर मध्ये ब याचबरोबर
कॅटल फीड मध्ये अमूल पशू आहार व्हीर बॅक अँनिमल हेल्थकेअर. सोलरमध्ये रकोर्ल्ड (कौशिक सोल्यूशन्स)श्री सद्गुरू सोलर,आदी.मिल्कमध्ये चितळे डेअरी, वारणा दुष संघ,गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आदी तर फूड मध्ये अँपीज इंडिया लिमिटेड.सवई मसाले (पीकेएम फूड) वाटण कंपनी जीजाई मसाले, आवजारांमधे विजय कृषी अवजारे,श्री महालक्ष्मी शेती अवजारे विभाग, पॉप्युलर इम्प्लिमेंट इरिगेशनमध्ये पूर्वा केमटेक प्रा.ली,जलधारा ड्रीप इरिगेशन, नेटा फिम इरिगेशन,शेतकरी ड्रिप इरिगेशन याशिवाय बळीराजा आटा चक्की यांचे बळीराजा वॉटर फ्युरिफायर हे नवीन पेटंट मार्केट मधे येत आहेत. आदी कंपन्यांचा समावेश आहे.आणि त्यांची उत्पादने पाहावयास मिळणार आहेत.
याचबरोबर तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला, ऊस, बी – बियाणे पाहाव्यास मिळणार आहेत.
शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरी दिली जाणार आहे.शिवाय तांदूळ,मध आणि गूळ व मिलेट महोत्सव भरविण्यात आला आहे.
प्रदर्शनाचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे मुख्य प्रायोजक आहेत.
शासनाच्या विविध योजनांची माहिती व याठिकाणी दिली असून कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत.

तीन दिवस होणारी व्याख्याने

या प्रदर्शनात २७ जानेवारीस पौष्टिक तृणधान्य पिके आहारातील महत्त्व व लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर योगेश बन नाचणी पैदास कार विभागीय संशोधन केंद्र कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहेत.तर भाजीपाला सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. भरत पाटील भाजीपाला पैदास कार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे मार्गदर्शन करणार आहेत. तर पीक उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फायदेशीर या विषयावर प्रा.अरुण मराठे कृषी महाविद्यालय कोल्हापूर मार्गदर्शन करणार आहेत.
२८ जानेवारी रोजी उसाचे प्रसारित नवीन वाण व लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर दत्तात्रय थोरवे ऊस पिक संशोधक मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव हे मार्गदर्शन करणार आहेत. लंपी आजार व वांधतव व निवारण या विषयावर डॉ. सँम लुद्रिक पशुधन विकास अधिकारी कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहेत. आणि ठिबक सिंचनाचा वापर काळाची गरज या विषयावर डॉ. अरुण देशमुख प्रमुख नेराफिम प्रा. लिमिटेड पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत.
आणि २९ जानेवारी रोजी जैविक खतांचा पूरक वापर फायदेशीर या विषयावर डॉ. रवी कानडे प्रा. कृषी महाविद्यालय कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहेत.तर प्लॅस्टिक कल्चर नवयुगातील शेतकऱ्यांचे आधुनिक साधन या विषयावर व्हाईस प्रेसिडेंट कार्पोरेट अफेयर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे श्री. सत्यजित भोसले हे मार्गदर्शन करणार आहेत.ही सर्व व्याख्याने दुपारी १२ ते २ या वेळेत होणार आहेत.कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. हाऊस ऑफ इव्हेंटचे सुजित चव्हाण आणि त्यांची टीम यासाठी कार्यरत आहे.तरीया प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असेआवाहन संयोजक भीमा उद्योग समूहासह खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments