Wednesday, October 22, 2025
spot_img
Homeताज्यारोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या "यामिनी" प्रदर्शनास हॉटेल सयाजी येथे प्रारंभ २१ सप्टेंबर...

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या “यामिनी” प्रदर्शनास हॉटेल सयाजी येथे प्रारंभ २१ सप्टेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन,प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन

रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या “यामिनी” प्रदर्शनास हॉटेल सयाजी येथे प्रारंभ २१ सप्टेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन,प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन

 

कोल्हापूर / प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापूरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने या ही वर्षी हे प्रदर्शन भरविले असून आज १९ रोजी या प्रदर्शनास प्रारंभ झाला आहे आज या प्रदर्शनाचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपच्या सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते फित कापून झाले. उद्घाटन प्रसंगी डिस्ट्रिक गव्हर्नर अरुण भंडारी,असिस्टंट गव्हर्नर हर्षवर्धन तायवडे पाटील, रोटरी मुव्हमेंट कोल्हापूरचे प्रेसिडेंट रो. शितल दुगे यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना डिस्ट्रिक गव्हर्नर अरुण भंडारी यांनी रोटरी क्लबचा इतिहास सांगितला.आणि रोटरी क्लब ऑफ गार्गीजने अनेक विधायक उपक्रम राबविण्यावर नेहमीच भर दिलेला आहे. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना सहकार्य केलेले आहे.आता ही आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून विधायक कामासाठी निधी दिला जाणार आहे. असे सांगून त्यांच्या या कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना क्लबच्या अध्यक्षा रो.अंजली मोहिते यांनी रोटरी गार्गीजच्या कार्याचा आढावा घेतला.आणि क्लब राबवित असलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही मुलांचे स्वास्थ्य शिक्षण आणि महिला सबलीकरन हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले आणि या यामिनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन केले.चेअर पर्सन बिना जनवाडकर यांनी यामिनी प्रदर्शनाची व्याप्ती वाढली असून यावर्षी ११० स्टॉल सहभागी झाले आहेत.आणि या स्टॉलच्या माध्यमातून महिलांना त्यांच्यासाठी उपयुक्त वस्तू खरेदी करता येणार असल्याचे सांगितले.
हे प्रदर्शन २१ सप्टेंबर २०२५ पर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे.यावर्षीच्या यामिनी प्रदर्शनाचे हे बारावे यशस्वी वर्ष असून या वर्षी प्रदर्शनात पुणे येथील एक्सकॅलुसिव्ह रिअल ज्वेलर्स विथ युनिक डिझाइन्स, मुंबई पोल्की, रिअल डायमंड्स, लॅबग्रोन डायमंड्स, संपूर्ण भारतामधील तसेच इंदोर, जयपूर, गोआ, बेंगलोर, दिल्ली येथील विविध प्रकारच्या होम डेकोर्स फॉर फेस्टीव्हस स्टॉल्स असे १०० हुन अधिक स्टॉल्स सहभागी झाले आहेत.स्वयंम,अंकुर, तनिष या शाळेतील मुलांसाठी ही स्टॉल याठिकाणी आहेत.
या प्रदर्शनाला डी.वायं.पी. हॉस्पिटॅलिटी, चंद्ररूप आणि हॉटेल सयाजी,मोहिते सुझुकी यांचे सहकार्य लाभले आहे.
आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ गार्गिजने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.अनेक गरजूंना मदत केली आहे.शिवाय समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश प्रदर्शनाचा असतो. त्यामुळे बचत गट यांनीही बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत.या प्रदर्शनातून या प्रदर्शनातून उपलब्ध निधीतून विविध सामाजिक उपक्रम, महिला सबलीकरण, गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वैक्सिंन याबाबत सहकार्य केले जाणार आहे.
या प्रदर्शनासाठी क्लबच्या अध्यक्षा रो.अंजली मोहिते,को चेअरमन डॉ.हेमलता कोटकर,चेअर पर्सन बिना जनवाडकर,सेक्रेटरी सविता पदे,रो.सौ साधना घाटगे, रो. शोभा तावडे याचबरोबर यामिनीच्या सदस्य रो. रेणुका सप्रे, रो. दीपिका कुंभोजकर,रो.कल्पना घाडगे,रो.गीता पाटील,रो.योगिनी कुलकर्णी, रो.जया महेश्वरी,रो.सुरेखा इंग्रोळे,रो.सुजाता लोहिया, रो.गिरिजा कुलकर्णी, रो.नंदिनी पटोडीया यांच्याचबरोबर सर्व क्लब मेंबर्सनी अथक परिश्रम घेतले आहेत.हे प्रदर्शन २० व २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. तरी सर्व कोल्हापूरवासीयांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.आभार सेक्रेटरी सविता पदे यांनी मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments