Wednesday, October 22, 2025
spot_img
Home Blog

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

0

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

कोल्हापूर/प्रतिनिधी : उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (आधीचे न्यू पॉलिटेक्निक) ऑटोमोबाईलच्या १९९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी काॅलेज परिसरात ५० देशी वृक्षांचे रोपण केले. यासाठी सुहास वायंगणकर व वृक्षमित्र मधुकर यवलुजे यांचा तज्ञ सल्ला घेतला. काॅलेजच्या उत्कर्षासाठी माजी विद्यार्थी हातभार लावत आहेत, ही इथल्या शिक्षणाची खरी पोचपावती असल्याचे संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी यावेळी नमुद केले. या उपक्रमासाठी ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. सुहासचंद्र देशमुख यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे, प्रशासकीय अधिकारी संदीप पंडे, विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी आणि सुरजितसिंग रजपूत, सुजित सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, बलराज निकम, रणधीर मोरे, आसिफ मोमीन, प्रदीप जगताप, उमेश परमेकर, महेश जामसांडेकर, अतुल संकपाळ, राजेश रांगोळकर, निलेश नार्वेकर, संतोष पाध्ये आदी माजी विद्यार्थी उपस्‍थित होते.

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

0

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

कोल्हापूर/प्रतिनिधी : उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (आधीचे न्यू पॉलिटेक्निक) ऑटोमोबाईलच्या १९९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी काॅलेज परिसरात ५० देशी वृक्षांचे रोपण केले. यासाठी सुहास वायंगणकर व वृक्षमित्र मधुकर यवलुजे यांचा तज्ञ सल्ला घेतला. काॅलेजच्या उत्कर्षासाठी माजी विद्यार्थी हातभार लावत आहेत, ही इथल्या शिक्षणाची खरी पोचपावती असल्याचे संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी यावेळी नमुद केले. या उपक्रमासाठी ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. सुहासचंद्र देशमुख यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे, प्रशासकीय अधिकारी संदीप पंडे, विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी आणि सुरजितसिंग रजपूत, सुजित सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, बलराज निकम, रणधीर मोरे, आसिफ मोमीन, प्रदीप जगताप, उमेश परमेकर, महेश जामसांडेकर, अतुल संकपाळ, राजेश रांगोळकर, निलेश नार्वेकर, संतोष पाध्ये आदी माजी विद्यार्थी उपस्‍थित होते.

पतसंस्थांमधील एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचा विचार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

0

पतसंस्थांमधील एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचा विचार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

सहकारी पतसंस्थांच्या समस्या’ या विषयावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील सहकारी पतसंस्थांमधील एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात खासगी आणि सरकारी विमा कंपन्यांकडून प्रस्ताव मागवून योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
‘सहकारी पतसंस्थांच्या समस्या’ या विषयावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आमदार सत्यजित तांबे आणि आमदार काशिनाथ दाते उपस्थित होते. सहकार चळवळीत पतसंस्था हा महत्त्वाचा घटक असून, सर्वसामान्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या संस्थांमध्ये आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे हितसंरक्षण आणि संस्थांना शिस्त लावण्यासाठी एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नमूद केले.
सहकारमंत्र्यांनी पतसंस्थांशी संबंधित काही महत्त्वाच्या मागण्यांवरही निर्णय घेतले. ठेव, सोने गहाण किंवा कर्ज प्रकरणांसाठी ‘ब’ वर्ग सभासद होणे बंधनकारक न करता ऐच्छिक करण्याचा आणि जिल्हा बँकांप्रमाणे पतसंस्थांना ठेवी स्वीकारण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव दुरुस्तीसाठी पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासारख्या सरकारी योजनांमध्ये पतसंस्थांना सहभागी करून घेण्याबाबतही प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, कोल्हापूर पतसंस्था फेडरेशनच्या मागणीनुसार प्रशिक्षण आयोजित करण्याचेही निर्देश देण्यात आले.
सहकार चळवळीतील पतसंस्था सर्वसामान्यांचा आर्थिक कणा असल्याचे सांगत, त्यांचे योग्य व्यवस्थापन आणि मॉनिटरिंग व्हावे, तसेच चुकीच्या बाबींवर कारवाई व्हावी, असे मत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केले. सहकारी पतसंस्थांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता कायम राखणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिवाळी सुट्टीत सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरु

0

दिवाळी सुट्टीत सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरु

कोल्हापूर/प्रतिनिधी : २० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. या कालावधीत छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सोमवार, २० व बुधवार २२ ऑक्टोबर रोजी सुरु तर मंगळवार २१ व गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. या कालावधीत अपघात विभाग नेहमीप्रमाणे पूर्ण वेळ (२४X७) सुरु राहील.
जिल्ह्यातील सर्व नागरीक तसेच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी केले.

पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

0

पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी. या समितीने महात्मा फुले जन आरोग्य योजना, केंद्र शासन आणि मध्यप्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. पत्रकारांच्या आरोग्य समस्यांबाबत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, माहिती व जनसंपर्क संचालक किशोर गांगुर्डे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष यदु जोशी, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मुंबई विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष दीपक कैतके, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य विनोद जगदाळे, नेहा पुरव, संजय मलमे, संजय पितळे, जयेश सामंत उपस्थित होते.
मध्य प्रदेश मधील पत्रकारांसाठीच्या कॅशलेस आरोग्य सेवा योजनेचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे राज्य समन्वयक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि पत्रकार यांची समिती स्थापन करावी असे सांगून वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले की, या समितीने राज्य शासनाच्या आरोग्य योजना, केंद्राच्या आरोग्य योजना यांचाही अभ्यास करून सविस्तर सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करावा. त्यामध्ये ‘सीएसआर’चाही विचार करावा. मोठ्या शहरांमध्ये पत्रकारांना कशा प्रकारे कॅशलेस आरोग्य सेवा देता येतील याचा त्यात प्रामुख्याने विचार व्हावा, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरसार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर घेताना महिला पत्रकारांसाठीही विशेष शिबिर घ्यावे, महात्मा फुले जन आरोग्य योजना पत्रकारांनाही लागू आहे. त्याच्या कार्डचे पत्रकारांना वाटप व्हावे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सध्या अस्तित्वात असलेली शंकरराव चव्हाण पत्रकार सन्मान निधी योजना आणखी व्यापक करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा असेही सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य सचिव निपुण विनायक यांनी सध्या अस्तित्वात असणाऱ्या आणि पत्रकारांनाही लागू असणाऱ्या आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली. तर पत्रकार संघाचे अध्यक्ष यदु जोशी यांनी पत्रकारांची भूमिका मांडली.

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत सिने अभिनेते जॅकी श्रॉफ करणार सहकार्य

0

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत सिने अभिनेते जॅकी श्रॉफ करणार सहकार्य

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट

मुंबई/कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदी सिनेमा सृष्टीतील नामवंत कलाकार जॅकी श्रॉफ यांनी आज आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट घेतली. थॅलेसिमिया या रक्ताच्या अनुवंशिक असलेल्या गंभीर आजाराविषयी जॅकी श्रॉफ हे संवेदनशील असून त्याबाबत समाजा मध्ये प्रबोधन करण्याच्या कामात शासनास सहकार्य करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अभिनेते जॅकी श्रॉफ मागिल काही वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून थॅलेसेमिया विषयावर सातत्याने काम करत आहेत. या आजारावर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी, सेवाभावी संस्थां, संघटनांनी, प्रतिष्ठित नागरिकांनी व डॉक्टर्सनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र शासनाच्या ‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी शासनास सहकार्य करण्याबाबत यावेळी अनौपचारिक चर्चा झाली. या आजाराविषयी अधिक चांगली जनजागृती आणि या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप यावे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.या भेटीवेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम पुरी, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, गजेन्द्रराज पुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0

नियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यात कृषी समृद्धी योजनेचा शानदार शुभारंभ; तेलबिया उत्पादन प्रशिक्षण सत्राचे आयोजन

कोल्हापूर/नरतवडे/प्रतिनिधी: नियोजनबद्ध शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपली उत्पादकता वाढवू शकतात, असे ठाम मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. नरतवडे येथील जय भवानी हॉल येथे कृषी समृद्धी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत आयोजित प्रशिक्षण सत्रात ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. या मेळाव्यात प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पालकमंत्री आबिटकर यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पीक निवड करण्याचे आवाहन केले. केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, सिंचन आणि सेंद्रिय शेतीसाठी अनुदान देत आहे. तेलबिया अभियानातून सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल यांसारख्या पिकांचे उत्पादन वाढवून देशाला खाद्यतेलात स्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे. या उद्देशाने आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगातील संधींची माहिती देण्यात आली. प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच योजनेची माहिती देणाऱ्या घडीपत्रिका व पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
आबिटकर यांनी जिल्ह्यातील अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शेतीला प्रगतीपथावर नेण्याचे आवाहन कृषी विभागाला केले. शेत पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात आणि खरेदी-विक्री केंद्रांना चालना देऊन शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा जास्त दर मिळवून द्यावेत, असे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पारदर्शकपणे करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कृषी तंत्रज्ञान, यंत्रे आणि प्रक्रिया उद्योगाशी संबंधित पदार्थांचे स्टॉल्स मेळाव्याचे आकर्षण ठरले. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी मिळाली असून, तेलबिया अभियानामुळे देशाच्या खाद्यतेल स्वयंपूर्णतेचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास या मेळाव्यातून व्यक्त झाला.
विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, अरुण भिंगरदिवे उपस्थित होते. मेळाव्यात अविनाश सोळंके यांनी शेतीचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण या विषयावर व्याख्यान दिले, तर भालचंद्र मुंढे यांनी फळप्रक्रिया व विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. आयुर्वेदिक वनस्पती संशोधन आणि प्रक्रिया या विषयावर अरुण डोईफोडे यांनी उपयुक्त माहिती दिली. कृषी भूषण नाथराव कराड यांनी भविष्यातील शेतीचा वेध घेत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी व्यवस्थेकडे वळण्याचे आवाहन केले. भुईमुगाच्या सुधारित जातींबाबत डॉ. सुनिल कराड यांनी शास्त्रीय माहिती दिली, तर जयवंत जगताप यांनी तेलबिया लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले.

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याचा एनडीए २०२५ परीक्षेत भारतात १८ वा क्रमांक

0

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याचा एनडीए २०२५ परीक्षेत भारतात १८ वा क्रमांक

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षा २०२५ मध्ये संपूर्ण भारताच्या क्रमवारीत १८ वा क्रमांक मिळवत शाळेची आणि कोल्हापूरची मान उंचावली.ही परीक्षा युपीएससीतर्फे १३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आली होती. संपूर्ण भारतातून दोन लाख पन्नास हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. इयत्ता बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन केले जाते. लेखी परीक्षेत यशस्वी होत यशराजची मुलाखतीसाठी निवड झाली. त्यानंतर एसएसबी मुलाखत प्रयागराज येथे झाली. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून यशराजने लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत देशात १८ वा क्रमांक प्राप्त केला.
यशराज हा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी असून, इयत्ता ११ वीमध्ये असताना त्याला अमेरिकन सरकारच्या YES स्कॉलरशिप कार्यक्रमातून एक वर्ष अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. लहानपणापासूनच त्याने एनडीएमध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले होते.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे ही भारतीय सैन्य, नौदल आणि वायुसेना या तिन्ही दलांसाठी संयुक्त प्रशिक्षण संस्था आहे. येथे प्रवेश मिळवणे हे देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेचे मानले जाणारे यश आहे. हे यश यशराजने कोणतेही क्लास अथवा अकॅडमीमध्ये न जाता स्वतः अभ्यास करून प्राप्त केले.
यावेळी बोलताना यशराज म्हणाला, “लहानपणापासून पाहिलेले माझे भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न आज सत्यात उतरले. यासाठी कष्ट, अभ्यास, खेळाची आवड तसेच सर्व सहशालेय उपक्रमात सहभाग ह्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या. माझ्या या यशात माझी आई अर्चना पाटील हीचा मोलाचा वाटा आहे. तिचे मार्गदर्शन व प्रेरणा यामुळेच मला हे शक्य झाले.”
यावेळी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सास्मिता मोहंती म्हणाल्या, “यशराजने सातत्य, कष्ट आणि समर्पणाच्या बळावर हे यश प्राप्त केले आहे. तो शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरणारा आहे.” संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच. एम नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली, ज्यु कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे व सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी यशराजचे अभिनंदन केले व सत्कार केला. या यशामुळे यशराजचे सर्व ठिकाणी कौतुक होत आहे.

राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५ सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे  उत्साहात संपन्न

0

राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५ सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे  उत्साहात संपन्न

कनेरी मठाच्या पावन आणि त्यात विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना आणि आरोग्यदायी स्पर्धात्मकतेचा उत्सव

 

कणेरीमठ (कोल्हापूर)/प्रतिनिधी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट, कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५ या भव्य स्पर्धांचे उद्घाटन दिनांक १० व ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सिद्धगिरी मठाच्या पावन सानिध्यात अत्यंत उत्साहात पार पडल्या.
या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठाचे ४९ वे मठाधिपती परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. श्री प्रकाशराव आबिटकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर अतिथींचा सत्कार व स्वागत समारंभ पार पडला. या प्रसंगी डॉ. देवेंद्र पाटील, राजकुमार पाटील, एम डी पाटील, विजय सनगर, यशोवर्धन बारामतीकर, गुंडोपंत वड, विवेक शेट्ये, निशांत पाटील, विविध वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आरोग्य मंत्री मा. श्री प्रकाशराव आबिटकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले —क्रीडा ही केवळ जिंकण्यासाठी नसून शिस्त, मेहनत आणि संघभावना शिकवणारी जीवनशैली आहे. डॉक्टर आणि नर्सिंग विद्यार्थी म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी खेळ हा आपल्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग असला पाहिजे. या दोन दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये अॅथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, भालाफेक, उंच उडी अशा विविध प्रकारांचा समावेश होता. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपूर अशा अनेक जिल्ह्यातील वैद्यकीय व नर्सिंग संस्थांमधील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होते.या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मा. विवेक सिद्ध यांनी केले, तर आभार डॉ वर्षा पाटील यांनी मानले.उद्घाटन सोहळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जल्लोषपूर्ण उपस्थितीत विविध क्रीडा प्रकारांना प्रारंभ झाला.

डी.वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग- फिजीओथेरपी संघ विजेते डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा

0

डी.वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग- फिजीओथेरपी संघ विजेते डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट तर मुलींच्या गटात डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरपी संघाने अजिंक्यपद पटकावले. कसबा बावडा येथील अभिमत विद्यापीठाच्या हॉलमधील अत्याधुनिक मॅटवर ही स्पर्धा झाली.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अद्वैत राठोड, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे डॉ. अजित पाटील, क्रीडा संचालक शंकर गोणुगडे, डॉ. जगन्नाथ शेटे, श्री सुशांत कायपुरे यांच्यासह सर्व कॉलेजचे स्पोर्ट्स इन्चार्ज उपस्थित होते.
या स्पर्धेत मुलींच्या गटात कॉलेज ऑफ फिजीओथेरपी संघाने अंतिम सामन्यात डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघाला १९-१३ गुण फरकाने पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
मुलांच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात डी. वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट संघाने कॉलेज ऑफ फार्मसी संघाला ३०-१५ गुण फरकाने पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज एस. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज एस. पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.