Friday, October 17, 2025
spot_img
Homeमाय मराठीराज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५ सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे ...

राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५ सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे  उत्साहात संपन्न

राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५ सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे  उत्साहात संपन्न

कनेरी मठाच्या पावन आणि त्यात विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना आणि आरोग्यदायी स्पर्धात्मकतेचा उत्सव

 

कणेरीमठ (कोल्हापूर)/प्रतिनिधी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट, कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५ या भव्य स्पर्धांचे उद्घाटन दिनांक १० व ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सिद्धगिरी मठाच्या पावन सानिध्यात अत्यंत उत्साहात पार पडल्या.
या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठाचे ४९ वे मठाधिपती परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. श्री प्रकाशराव आबिटकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर अतिथींचा सत्कार व स्वागत समारंभ पार पडला. या प्रसंगी डॉ. देवेंद्र पाटील, राजकुमार पाटील, एम डी पाटील, विजय सनगर, यशोवर्धन बारामतीकर, गुंडोपंत वड, विवेक शेट्ये, निशांत पाटील, विविध वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आरोग्य मंत्री मा. श्री प्रकाशराव आबिटकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले —क्रीडा ही केवळ जिंकण्यासाठी नसून शिस्त, मेहनत आणि संघभावना शिकवणारी जीवनशैली आहे. डॉक्टर आणि नर्सिंग विद्यार्थी म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी खेळ हा आपल्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग असला पाहिजे. या दोन दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये अॅथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, भालाफेक, उंच उडी अशा विविध प्रकारांचा समावेश होता. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपूर अशा अनेक जिल्ह्यातील वैद्यकीय व नर्सिंग संस्थांमधील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होते.या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मा. विवेक सिद्ध यांनी केले, तर आभार डॉ वर्षा पाटील यांनी मानले.उद्घाटन सोहळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जल्लोषपूर्ण उपस्थितीत विविध क्रीडा प्रकारांना प्रारंभ झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments