Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्याआज मतदान करा आणि आकर्षक गिफ्ट मिळवा

आज मतदान करा आणि आकर्षक गिफ्ट मिळवा

आज मतदान करा आणि आकर्षक गिफ्ट मिळवा

उत्सव लोकशाहीचा, मंगळवारी ग्राहक मतदारांवर सवलतींचा वर्षाव

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज ७ मे मंगळवारी जिल्ह्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याचबरोबरीने आता विविध कंपन्या, शोरुम्स आणि विक्रेत्यांनीही ग्राहकांसाठी विविध सवलतींचा वर्षाव जाहीर केला आहे.यात जनतेला केंद्रावर घेऊन जाणे, मतदान करण्यास आवाहन करणे हे तर आहेच. मात्र मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण दाखवल्यानंतर किंवा सेल्फी दाखवल्यानंतर मतदार ग्राहकांना या सवलतींचा लाभ घेता येणार आहे.अगदी ड्रायफ्रूटसपासून ते पेट्रोलपर्यंत विविध उत्पादनांच्या खरेदीवर ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. देवकर पाणंद परिसरातील श्रेयस ट्रेडर्स मसाले उत्पादक व ड्रायफ्रूटस् व्यावसायिकाने मिक्स ड्रायफ्रूटस गिफ्ट देण्याचे जाहीर केलेआहे. मतदानाचा अधिकार बजावून येथे या आणि सेल्फी काढून गिफ्ट घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. आज मंगळवारी (ता.७) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत हा उपक्रम सुरू राहणार आहे. पेट्रोल पंपासह काही ऑईल वितरक कंपन्यांनीही ऑफर जाहीर केल्या आहेत. त्याचे फलक शहरातील पेट्रोल पंपावर झळकले आहेत. केलेल्या मतदानाचा पुरावा म्हणून आपल्या बोटावरील शाई दाखवून आकर्षक सवलती मिळवा, असे आवाहन ग्राहकांना केले जात आहे. कुठल्याही एक लिटर ऑईलच्या डब्यावर ५० रुपमाचे पेट्रोल फ्री दिले जाणार आहे. त्याशिवाय मोफत ऑईल बदलीची सवलतही दिली जाणार आहेत. विविध शोरूम्मापासून बेकरी प्रॉडक्ट, आईस्क्रीम पार्लरपर्यंत अनेकांनी मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments