२०२३ वर्षात जन्माला आल्येल्या कन्यारत्न मातांचा जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मान
कोल्हापूर/प्रतिनिधी : २१ नोव्हेंबर रोजी जायंट्स गृप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थ आणि श्री अंबाबाई भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी जन्माला आल्येल्या कन्यारत्न मातांना जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच आमच्या ग्रुपतर्फे कन्यारत्नाना कपड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, अँड धनंजय पठाडे होते .यावेळेस ग्रुपचे अध्यक्ष संदीप कुंभार,भावी अध्यक्ष सुरेश बडवे, ग्रुप चे फाऊंडर अँड फेडरेशन ऑफिसर f डाॅ. आशा शितोळे , लता पाटील उपस्थित होते.या उपक्रमास ग्रुप मेंबर्स शेळके ,डाॅ काळे ,डाॅ नजिम मोमीन,सिटी ग्रुपचे उपाध्यक्ष सुभाष भाट यांचे मोलाचे योगदान लाभले.







