Friday, October 24, 2025
spot_img
Homeताज्या‘गोकुळ’मार्फत गुणवंत कर्मचारी यांचा गौरव संपन्न

‘गोकुळ’मार्फत गुणवंत कर्मचारी यांचा गौरव संपन्न

‘गोकुळ’मार्फत गुणवंत कर्मचारी यांचा गौरव संपन्न

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाचे मार्केटींग विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दसरा व दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये तूप व श्रीखंड विक्रीमध्ये भरघोस वाढ केलेबद्दल तसेच उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच खेळाडू यांचा गौरव संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीमध्ये प्रशस्तीपत्र देऊन गौरव गोकुळ प्रकल्प येथील डॉ.कुरियन हॉल येथे करण्यात आले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले की गोकुळच्या वाटचालीमध्ये कर्मचाऱ्यांची भूमिका ही महत्वाची असून कर्मचारी वर्गाने आपले काम प्रमाणिकपणे केले पाहिजे जे कर्मचारी मनापासून काम करत आहेत. त्यांना गोकुळच्या संचालक मंडळाने तसेच व्यवस्थापनाने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. शहरापासून खेडेगावापर्यंत गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम मार्केटिंग विभाग चांगल्याप्रकारे करत आहे, मार्केटींग विभागाने दसरा व दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये गतसालच्या तुलनेत यावर्षी तूप विक्रीमध्ये सरासरी १० मे.टन व श्रीखंड विक्रीमध्ये ८ मे.टन इतकी भरघोस वाढ केली आहे. त्याबद्दल मार्केटींग विभागाचे तसेच संबंधीत सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली कामगीरीचे कौतुक केले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यानंतर सहा.महाव्यवस्थापक(मार्केटिंग) जगदीश पाटील बोलताना म्हणाले कि मार्केटींग विभागामार्फत पुणे, मुंबई व गोवा येथील दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री वाढीच्या आराखड्याची सविस्तर माहिती दिली.यावेळी श्रीखंड व तूप विक्रीमध्ये वाढ केलेबद्दल मार्केटिंग विभागाचे अधिकारी लक्ष्मण धनवडे, भगवान पाटील, शिवाजी चौगले, उल्हास पाटील, रीमा माने, सुनिल गायकवाड, शिवाजी चौगले यांचा तसेच झारखंड येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमान मिळवल्याबद्दल वैष्णव धनाजी पाटील व गोवा येथे झालेल्या ३७ व्या नॅशनल स्पर्धेमध्ये ट्रायथलॉन गोल्ड मेडल मिळालेबद्दल कौशिक विनायक मांडलकर या खेळाडूंचा तसेच गोकुळ प्रकल्प येथील विद्युत विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून संघाचे आर्थिक बचत केलेबद्दल रणजीत पांडुरंग डोंगळे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सहा.महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी यांनी मानले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरूण डोंगळे,जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील,संचालक अभिजित तायशेटे,अजित नरके,किसन चौगले,नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड,संभाजी पाटील,अमरसिंह पाटील,सुजित मिणचेकर,बाळासो खाडे, चेतन नरके, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सहा.महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, सहा.महाव्यवस्थापक(मार्केटिंग) जगदीश पाटील,मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, मार्केटिंग विभागाचे लक्ष्मण धनवडे संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments