Thursday, October 23, 2025
spot_img
Homeताज्याकोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने "केएमए - कॉन २०२३ वैद्यकीय परिषदेचे" आयोजन

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने “केएमए – कॉन २०२३ वैद्यकीय परिषदेचे” आयोजन

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने “केएमए – कॉन २०२३ वैद्यकीय परिषदेचे” आयोजन

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या शिखर संस्थेच्या वतीने केएमए – कॉन २०२३ ही वैद्यकीय परिषद येत्या २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात होणार आहे. परिषदेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल सयाजी येथे होणार आहे.
केएमएचे शताब्दी वर्ष साजरे करत असताना केएमए-कॉन परिषदेला यंदा विशेष महत्त्व आहे. अशी माहिती मेडीकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.किरण दोशी आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. अर्जून अडनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
१०० वर्षांच्या वारशासह, केएमएने वैद्यकीय समुदायाच्या प्रगतीसाठी आणि रुग्ण उपचारासाठी खूप मोठे योगदान दिले आहे.या कार्यक्रमासाठी शास्त्रज्ञ डॉ पी.वीरमुथुवेल (प्रकल्प संचालक – चांद्रयान ३) इस्रो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते ‘चांद्रयान ३ आणि त्याचे यश’ या विषयावंर मार्गदर्शन करतील. तसेच सुप्रसिद्ध पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी हे ‘लैंगिक समस्या निदान आणि उपचार ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. नवी दिल्लीहून, मेदांता हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ.गगनदीप सिंग व म्हैसूरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजगोपाल हे ह्रदयविकारावरील आधुनिक उपचारांची माहिती देणार आहेत . लहान मुलांचे मानसिक आजार, ऍलर्जी ,आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा वैद्यकीय निदान व उपचारातील वापर, प्रतिजैविक औषधे , सर्वसमावेशक माता काळजी , वैद्यकीय कायदेशीर समस्या , मद्यपान मुळे लिव्हरचे (यकृताचे) होणारे आजार यासह अनेक विषयांवरती संपूर्ण भारतातून येणारे विशेष तज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील पाचशे हुन अधिक डॉक्टर एकत्र येऊन “आधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार” या उपचार पद्धतीच्या माहितीची देवाणघेवाण करतील.
पत्रकार परिषदेला केएमएचे सचिव डॉ. सूरज पवार, सह-अध्यक्ष डॉ. राजेंद्र चिंचणीकर, संघटन सचिव-डॉ. विनय चौगुले, वृत्त प्रवक्ते डॉ.प्रवीण नाईक यांच्यासह डॉ.आबासाहेब शिर्के , डॉ आशा जाधव , डॉ ए.बी.पाटील , डॉ गीता पिल्लाई , डॉ.अमोल कोडोलीकर , डॉ आर.एम.कुलकर्णी ,डॉ. निखिल चौगुले , डॉ.भारती दोशी , डॉ.अरुण धुमाळे , डॉ.प्रिया शाह , डॉ.महावीर मिठारी, डॉ.उन्नती सबनीस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments