Thursday, October 23, 2025
spot_img
Homeताज्यासर्वपक्षियांतर्फे आज २१ नोव्हेंबर रोजी आमदार सतेज पाटील यांचा सत्कार

सर्वपक्षियांतर्फे आज २१ नोव्हेंबर रोजी आमदार सतेज पाटील यांचा सत्कार

सर्वपक्षियांतर्फे आज २१ नोव्हेंबर रोजी आमदार सतेज पाटील यांचा सत्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : सातत्याने पाठपुरावा करून काळम्मावाडी थेट पाइपलाइनद्वारे पाणी उपलब्ध करून शहराला भेडसावणारा पाणीप्रश्न सोडविण्याबद्दल आमदार सतेज पाटील यांचा आज मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दसरा चौकात सर्व पक्षीयांतर्फे वचनपूर्ती सोहळ्यात सत्कार केला जाणार आहे. शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य सत्कार सर्वपक्षीयांच्या वतीने केला जाणार आहे
गेली दहा वर्षांहून अधिक काळ थेट पाइपलाईन प्रश्नी सातत्याने विधानसभा, विधान परिषदेत पाठपुरावा करण्याचे काम आमदार सतेज पाटील यानी केले आहे. जोपर्यंत कोल्हापूर शहराला काळम्मावाडीची योजना मंजूर होत नाही तोपर्यंत आपण आमदारकीची निवडणूक लढविणार नाही असा संकल्प आमदार पाटील यांनी जाहीर केला होता. त्यांनी या काळम्मावाडी पाणी पुरवठा योजनेचा सातत्याने पाठपुरावा करून आपला शब्द खरा करून दाखविला आहे त्यांच्या या कामाची सर्वपक्षीयांनी दखल घेऊन त्यांचा वचनपूर्तीबद्दल सर्वपक्षीयांतर्फे दसरा चौकात हा सत्कार आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात थेट पाइपलाईनसाठी गेल्या ४० वर्षांत लढा, योगदान देणाऱ्या माजी महापौर, सामाजिक कार्यकर्ते अशा सुमारे ५० जणांचा सत्कार केला जाणार आहे.वचनपूर्ती लोकसोहळाअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे संयोजन सर्वपक्षीय गौरव समितीतर्फे करण्यात आल्याचे निमंत्रक आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार आणि भाकपचे सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले आहे.यावेळी राष्ट्रवादीचे अनिल घाटगे, भाकपचे दिलीप पवार, मोहन सालपे, एस. बी.पाटील, प्रदीप चव्हाण, अरुण कदम, शेतकरी कामगार पक्षाचे संभाजीराव जगदाळे, किशोर खानविलकर, काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा संध्या घोटणे, भारती पोवार, वैशाली महाडीक, लीला धुमाळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments