Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार कोल्हापूरमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार मुंबई/प्रतिनिधी :…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमधील रस्त्यांच्या स्थितीबाबत कोणतेही समाधानकारक काम न करता आज प्रतिवादी महानगर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रासंगिक लेख मातीत जन्मलो…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन कोल्हापूर, दि. ९: राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरीबाग येथील समाधीस्थळी मुख्यमंत्री…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संगीतसूर्य…

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक;…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या ९० दिवसांच्या…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान जयसिंगपूर/प्रतिनिधी : इचलकरंजी येथील लायन्स क्लबतर्फे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड   कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास संबंधित…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले कोल्हापूर/प्रतिनिधी : सी वॉर्ड बिंदू चौक परिसरातील सि.स. नं. ५२५…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला तर भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणी नागरी वस्तीत…

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक; रखडलेल्या योजने विरोधात संताप

कोल्हापूर/प्रतिनिधी : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुधार गांधीनगर प्रादेशिक १३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील विलंब, निकृष्ट कामे आणि सतत खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ ७ मे रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, कावळा नाका येथे भव्य धडक घागर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील करणार असून तेरा गावांतील जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
कणेरी जलशुद्धीकरण केंद्र येथे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना हाकलून लावल्यानंतर ग्रामस्थांचा रोष अधिकच तीव्र झाला आहे. चार वर्षांनंतरही केवळ सुमारे ५१ टक्केच काम पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उकरलेले रस्ते, वारंवार होणारी पाईपलाईन गळती आणि १०-११ दिवस पाणीपुरवठा बंद राहणे यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. दरम्यान, सध्या सुरू असलेली जुनी पाणीपुरवठा योजना देखील वारंवार बंद पडत असून गळती, मोटार पंप बिघाड आणि दुरुस्तीस विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे “नवीन योजना रखडली तरी चालेल; मात्र जुन्या योजनेतून तरी नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवावा,” अशी ठाम मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

महिलांचा मोठा सहभाग

मोर्चात महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहणार असून अधिकाऱ्यांना घेराव घालणे अथवा ताळेबंदी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने कामे पूर्ण करून सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सीएसआर प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग (एपीटीएल) प्रणालींची स्थापना

मुंबई/प्रतिनिधी : देशातील अग्रगण्य कर्करोग उपचार व संशोधन केंद्र असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे निदान व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित ट्यूब लेबलिंग व बारकोडिंग प्रणाली (एपीटीएल) या तीन प्रगत यंत्रणांची यशस्वी स्थापना करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या नव्या प्रणालींमुळे नमुन्यांचे अचूक लेबलिंग आणि बारकोडिंग स्वयंचलित पद्धतीने होणार असून, मानवी त्रुटी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. परिणामी, निदान प्रक्रियेत अचूकता वाढणार असून रुग्णांच्या सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा होईल. तसेच, रुग्णालयातील क्लिनिकल वर्कफ्लो अधिक सुलभ आणि कार्यक्षम होणार आहे.विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांमध्ये निदानातील अचूकता आणि वेळेवर उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. एपीटीएल प्रणालीमुळे नमुने हाताळण्यातील गोंधळ, विलंब आणि चुकीची ओळख यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील. त्यामुळे डॉक्टरांना अधिक विश्वासार्ह अहवाल मिळून उपचार प्रक्रियेत गती येईल.

जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवांकडे आणखी एक पाऊल

या उपक्रमामुळे रुग्णालयातील प्रयोगशाळा व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत होऊन, जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवांकडे आणखी एक पाऊल टाकले गेले आहे. सीएसआर च्या माध्यमातून अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांची उभारणी केल्याने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मोठी मदत होत आहे. या उपक्रमासाठी इंडियन ऑइल कंपनीने सहकार्य केले आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले.

निदान प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता

याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की “टाटा मेमोरियल रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक एपीटीएल प्रणालीमुळे निदान प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता आणि गती वाढणार आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची ही दिशा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. सीएसआर च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात होणारी ही गुंतवणूक भविष्यात अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी मोलाची ठरेल.”

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या ९० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज बुधवार दि. सहा मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला.याबाबत अधिक माहिती अशी, पुंगाव ता. राधानगरी येथील श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्था आणि गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल आणि आज अशी दोन दिवस सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने पुंगावच्या श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची याचिका मंजूर केली. या याचिकेवरच गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या ९० दिवसाच्या आत पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिले. तसेच; गोकुळच्या संचालकांनी महाराष्ट्र सरकारने जो कायदा बदललेला होता, त्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोकुळच्या संचालकांना उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाद मागण्याची मुभा असल्याचे स्पष्ट केले. तसेच; या याचिकेच्या माध्यमातून संचालकांनी उपस्थित केलेले मुद्दे व हरकती न्यायास अनुसरून असल्याने त्यांचा विचार करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाला दिले आहेत.
काल व आज झालेल्या सुनावणीमध्ये गोकुळ दूध संघाच्या संचालकांच्यावतीने वरिष्ठ वकील ॲड. अभिषेक मनु सिंघवी, ॲड. आनंद लांडगे व ॲड. भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली. वरिष्ठ वकील ॲड. मुकुल रोहतगी यांनी श्री. स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची बाजू मांडली. श्री महादेव दूध संस्थेच्यावतीने वरिष्ठ वकील ॲड. श्री. तळेकर तर महाराष्ट्र सरकारच्यावतीने ॲड. श्री. धर्माधिकारी यांनी काम पाहिले.

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

जयसिंगपूर/प्रतिनिधी : इचलकरंजी येथील लायन्स क्लबतर्फे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना ‘लायन्स गौरव’ पुरस्कार २०२५-२६ प्रदान करण्यात आला.
उगार शुगर वर्क्स लि.चे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर सोहन शिरगावकर यांच्या हस्ते विनायक भोसले व पत्नी सौ संगीता भोसले यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री भोसले यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भोसले यांचे कुटुंबीय, घोडावत शैक्षणिक संकुलातील सहकारी उपस्थित होते. पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना श्री भोसले म्हणाले, उद्योगपती संजय घोडावत यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेली साथ यावरच आत्तापर्यंतचे कार्य करू शकलो आहे.आई-वडिलांचा आशीर्वाद, पत्नी सौ संगीता यांनी उचललेली घराची व मुलांची जबाबदारी, संस्थेतील सहकाऱ्यांची मदत यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थेत काम करत असताना केवळ वरिष्ठ या भूमिकेत न राहता लीडर म्हणून कार्य करत असल्याचे समाधान व्यक्त केले.पुरस्कारामुळे औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत राहण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, एल निनोच्या व आय.ओ.डी.च्या प्रभावामुळे यावर्षीचा उन्हाळा लांबणार असल्याने व पर्जन्यमानामध्ये घट होणार असल्याने धरणातील उपलब्ध पाणी साठयाचा पावसाळा सुरू होईपर्यंत काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. परिणामी, काळम्मावाडी व शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेसाठी होणारा दैनंदिन पाणी उपसा मर्यादित ठेवणे आवश्यक झाले आहे. उपलब्ध पाणी साठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवण्यासाठी महानगरपालिकेने शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, दि. ३० एप्रिल २०२६ पासून शहरातील विविध भागांमध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

ए व बी वॉर्ड तसेच सलग्नीत भाग :

दिनांक ३० एप्रिल २०२६ पासून पुढे एक दिवस आड पुईखडी जलशुध्दीकेंद्रातून वितरीत होणारा सलग्न भाग, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकर नगर, जरगनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, शिवाजीपेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, सुभाषनगर पंपिंग परिसर, शेंडापार्क टाकी परिसर, जवाहर नगर, वाय. पी. पोवार नगर, मिरजकर तिकटी आदी भागांमध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा होईल.

ई वॉर्ड व सलग्नीत भाग :

दिनांक ३० एप्रिल २०२६ पासून पुढे एक दिवस आड कसबा जलशुध्दीकेंद्रातून वितरीत होणारा सलग्न भाग, कसबा बावडा, रमणमळा, नागाळा पार्क, लाईन बाजार, हिम्मतबहाद्दुर, जाधववाडी, कारंडे मळा, ताराराणी पुतळा, न्यू शाहूपुरी, बसंत बहार टॉकीज परिसर, कलेक्टर कार्यालय, न्यू पॅलेस, ताराबाई पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, बापट कॅम्प, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, महाडीक वसाहत, टेंबलाईवाडी, माळी कॉलनी, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी (१ ते १३ वी गल्ली), मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, प्रतिभानगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन, ग्रीन पार्क, शाहूपुरी (१ ते ४ थी गल्ली), व्यापार पेठ आदी भागांचा समावेश आहे.

सी व डी वॉर्ड (दि. १ मे २०२६ पासून) :

दिनांक १ मे २०२६ पासून पुढे एक दिवस आड चंबुखडी जलशुध्दीकेंद्रातून वितरीत होणारा सलग्न भाग, आझाद गल्ली, मटन मार्केट, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी ५ ते ८ वी गल्ली, कामगार चाळ, सुभाष रोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतार वाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, साळी गल्ली, महाराणा प्रताप चौक, कुंभार गल्ली, भवानी मंडप, सब जेल परिसर, मिरजकर तिकटी, महालक्ष्मी नगर, टेंभी रोड, सावित्रीबाई फुले दवाखाना, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, ब्रम्हेश्वर बाग, तटाकडील तालीम, चंद्रेश्वर, फुलेवाडी, रंकाळा टॉवर परिसर, शिवाजीपेठ (काही भाग), गुजरी, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळा वाडा, डोरले कॉर्नर, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर, लक्षतीर्थ, बलराम कॉलनी आदी भागांचा समावेश आहे.तरी शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेच्या प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास संबंधित आरोग्य निरीक्षक व मुकादमांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिला. शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने आज स्थायी समिती सभागृहात सकाळी १०.३० वाजता सर्व आरोग्य निरीक्षक व मुकादमांची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी बोलताना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी शहरातील रस्त्यांवर कचरा साचल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. अशा स्थितीत संबंधित मुकादम व आरोग्य निरिक्षकांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल. ज्या प्रभागात कचरा अधिक प्रमाणात आढळेल, त्या ठिकाणच्या मुकादमांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांच्या तक्रारींमध्ये ५० टक्क्यांनी घट होईल. तुंम्ही काम व्यवस्थित केले नाही तर नागरीकांच्या रोषास सामोरे जावे लागते. आरोग्य निरीक्षकांनी केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष भागात फिरती करुन काम करावे असे निर्देश दिले. आठवडयामधील सहा दिवसात आपले काम व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे. मी आल्यापासून ४० ते ४५ कर्मचा-यांची लाड पागे शिफारशी अंतर्गत नियुक्तीच्या फाईल्स निर्गत केलेल्या आहेत. माझी सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे तुम्हीही काम इमानदारीने करावे हि माझी अपेक्षा आहे. आपले शहर स्वच्छ व सुंदर कसे होईल हि आपली जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे. मुकादमांनीही कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे. नागरीकांच्या व सदस्यांच्या तक्रारी ज्या दिवशी कमी होणार त्यावेळी आरोग्याचे काम चांगले झाले असे म्हणता येईल. शहर स्वच्छ व सुशोभिकरण कसे होईल यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. उन्हांळयामध्ये उन खुप असल्याने सकाळच्या व दुपारच्या सत्रात उन्हाळयापुरते कामाचे नियोजन करता येते का हे सर्वांनी सांगावे. यावेळी सर्वानुमते पहाटे 5 ते 1 या वेळेमध्ये स्वच्छतेची वेळ निश्चित करण्यात आली. मी पहाटे कधीही फिरती करुन तपासणी करणार आहे. सध्या १५७५ कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत आणखीन नविन लाडपागे कमिटीच्या शिफारशी अंतर्गत कर्मचा-यांची नियुक्ती लवकरच होणार आहे. यामध्ये महापालिकेच्या हद्दीत आलेल्या तावडे हॉटेल ते गांधी नगरचा एरियामध्ये आता आपल्याला स्वच्छता सुरु करायची आहे. त्यामुळे नव्याने नियुक्त काही कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केली जाईल. एक महिन्यात मला स्वच्छतेत बदल दिसला पाहिजे. प्रत्येकाने दररोज ८ तास प्रामाणिकपणे काम केल्यास शहर स्वच्छ व सुंदर होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्याचेही निर्देश दिले. येत्या मे महिन्यात स्वच्छ सर्वेक्षण सुरू होत असून, त्यात कोल्हापूर शहराने पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. घरोघरी कचरा संकलनासाठी लावण्यात आलेल्या क्यूआर कोडचे स्कॅनिंग सध्या ५७ टक्के असून ते ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य देण्यात आले. यासंदर्भातील अडचणी पुढील सोमवारपर्यंत दूर करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले. तसेच फेरीवाल्यांकडून कचरा संकलनासाठी शुल्क आकारण्याचेही निर्देश देण्यात आले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार तसेच सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक व मुकादम उपस्थित होते.

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले

कोल्हापूर/प्रतिनिधी : सी वॉर्ड बिंदू चौक परिसरातील सि.स. नं. ५२५ येथील एम.के. टॉवर अपार्टमेंटमध्ये दिलीप आनंदराव मोरे यांनी मंजूर नकाशाव्यतिरिक्त जादा व विनापरवाना बांधकाम केल्यामुळे आज महानगरपालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत तळघरातील बाथरूम व टॉयलेट्सचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले असून उर्वरित कारवाई उद्या करण्यात येणार आहे.
या प्रकरणी अलका यशवंत माने यांनी दिलीप आनंदराव मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३(१) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. तसेच १५ जानेवारी १९९९ रोजी मंजूर झालेल्या नकाशाव्यतिरिक्त केलेले बांधकाम ३० दिवसांत काढून टाकण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र संबंधितांनी अनधिकृत बांधकाम न हटवल्याने महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्त मागवून कारवाईचे नियोजन केले होते. पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने कारवाई रखडली होती. दरम्यान, अलका माने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या सूचनेनुसार महानगरपालिकेने आठ आठवड्यांत कारवाई करण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने आज पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले व उपशहर रचनाकार एन. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, पंकज जाधव, अदिती पोवार, मुकादम सचिन जाधव, पोलीस कर्मचारी व विभागीय कार्यालय क्र.२ कडील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स व त्याचे पदार्थ तसेच विविध फळांची विक्री होण्यासाठी महोत्सवाच आयोजन करण्यात आलेले आहे. सदर महोत्सव दिनांक २२ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये, भारत हाऊसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारूड भाप्रसे यांचे शुभ हस्ते बुधवार, दिनांक २२ एप्रिल, २०२६ रोजी, सायंकाळी चार वाजता होणार आहे. याप्रसंगी मा. श्री. सुनील फुलारी(भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र तसेच माननीय डॉ. जस्मिन मॅडम(भा. प्र. से. ) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर कृषी उत्पन्न मंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संजय कदम सरव्यवस्थापक श्री. विनायक कोकरे, विभागीय सहनिबंधक श्री. महेश कदम, विभागीय कृषी सहसंचालक श्री बसवराज मास्तोळी, जिल्हा उप निबंधक श्री. नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी श्री. जालिंदर पांगारे इत्यादी उपस्थित राहणार आहेत. सदर महोत्सवामध्ये राज्यातील विविध प्रकारच्या मिलेटचे उत्पादन घेणारे शेतकरी तसेच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू इत्यादी विविध प्रकारचे फळ उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत सदर महोत्सवाचा वेळ सकाळी ०९ ते रात्री ०९ असा आहे. तसेच विविध प्रकारचे तृनधाण्य व विविध प्रकारचे फळे पाहावयास मिळणार आहेत, त्याचप्रमाणे मानवी आरोग्याच्या दृष्टीने मिलेटचे महत्व याबाबत डॉ.सदिप पाटील, डॉ. अहिल्या वाघमोडे. डॉ.योगेस बन व डॉ. प्रतिभा थोंबरे इ. आहारतज्ञांची व्याख्याने आयोजित केलेली आहेत. तसेच मिलेट्सचे विविध पदार्थ व त्यापासून बनविण्यात येणार्या पाककृती याकरीता कोल्हापूर शहरातील महिलांकरीता मिलेट्सच्या पाककृती स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. रायपूर (छत्तीसगढ) येथील मिलेट आहार तज्ञ श्री. कृष्ण मोहन यांचे मिलेटचे विविध पदार्थ तयार करणेबाबत प्रभोदनपर रविवार दि.२६ एप्रिल रोजी सायंकाळी ६-८ कार्यक्रम असणार आहे. तरी सर्व करवीर वासियांनी सदर महोत्सवास भेट देऊन खरेदी करावी आणि मिलेट व फळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले.

००००

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

निसर्गरम्य १८ एकरांवर साकारत आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालय

उत्तूर/प्रतिनिधी : देशातील पहिले शासकीय निसर्गोपचार- योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूर ता. आजरा या गावाचे नाव देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर निरंतर राहील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. एकदा शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला परवानगी मिळाली की ते शाश्वत आणि निरंतरपणे चालणारे काम असते, असेही ते म्हणाले.उत्तूर ता. आजरा येथे इमारतीचे काम सुरू असलेल्या शासकीय योगा आणि निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या कार्यस्थळाला मंत्री श्री. मुश्रीफ यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा बैठक घेतली.
श्री. मुश्रीफ म्हणाले, निसर्गरम्य १८ एकरांवर सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी सध्या रू. २५० कोटी निधी मंजूर आहे. सर्व अनुषंगिक सेवा सुविधांसह रु. १,००० कोटींच्या घरात तो जाऊ शकेल इतका व्यापक आहे. ही जागा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांशी संलग्न आहे. केरळप्रमाणे येथेही “मेडिकल हब” निर्माण होऊन “ईंटरनॅशनल मेडिकल टुरिझम” वाढणार आहे. स्थानिक अर्थकारणावर फार मोठा परिणाम होणार आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. तुषार बुरूड यांनी केलेल्या सादरीकरणांमध्ये सर्विस ब्लॉक्स, अधिष्ठाता निवासस्थान, योगा व निसर्गोपचार महाविद्यालय, योगा व निसर्गोपचार रुग्णालय, १०० क्षमतेचे मुलींचे वस्तीगृह, १०० क्षमतेचे मुलांचे वस्तीगृह, अध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांची निवासस्थाने, तांत्रिक कर्मचारी व लिपिक वर्गाची निवासस्थाने, अध्यापक व अधिकाऱ्यांची निवासस्थाने या सर्व इमारतींची पायाखुदाई पूर्ण होऊन ही कामे जोता लेवलपर्यंत आल्याचे स्पष्ट केले. संरक्षण भिंत व अंतर्गत रस्त्यांचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. परिसर सुशोभीकरणाचे कामही प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट केले. तसेच; आंबेओहोळ प्रकल्पावरून सहा किलोमीटरच्या पाईपलाईनमधून स्वतंत्र पाणी योजनेचेही काम प्रगतीपथावर आहे.
अधिष्ठाता श्रीमती भाग्यश्री खोत म्हणाल्या, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशित झालेल्या २० विद्यार्थ्यांची पहिली बॅच आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील ५७ विद्यार्थ्यांची दुसरी बॅच आहे. येत्या म्हणजेच सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील ६० ची बॅच प्रवेशित होईल. हे सर्व वर्ग बहिरेवाडी येथील आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञ जे. पी. नाईक स्मारकाच्या सुसज्ज व अद्यायवत इमारतीत भरत आहेत तसेच; तिथे ॲनाटाॅमीच्या डिसेक्शन हॉलसह फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि मायक्रो बायोलॉजीच्या प्रयोगशाळाही तयार आहेत. विशेष म्हणजे, गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात या महाविद्यालयाचा बाह्यरुग्ण कक्ष सुरू झालेला आहे.
ही सर्व कामे ऑक्टोबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना श्री. मुश्रीफ यांनी अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता बी. एल. हजारे, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती संजीवनी कट्टी, आजरा विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अ. सं. कचरे, नवनाथ बनसोडे व निं. बा. पगारे, शाखा अभियंता विक्रम कदम व राहुल पाटील, अधिष्ठाता श्रीमती भाग्यश्री खोत आदी उपस्थित होते.

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला

तर भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणी नागरी वस्तीत असू नये नगरसेवकांनी धरले प्रशासनाला धारेवर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या दुसऱ्या सुधारित मंजूर विकास योजनेतील कसबा करवीर रि.स.नं.६२५/१ व २ येथील खेळाचे मैदान वाचनालय व आरक्षण ऐवजी रहिवास विभागात बदल व्हावे या ऑफिस प्रस्तावावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये नगरसेवकांनी जोरदार चर्चा केली. नगरसेवकांनी हा विषय विरोध दर्शवत हाणून पाडला आणि यात कोणताही बदल न करता या ठिकाणी खेळाचे मैदान व वाचनालय असेच आरक्षण राहील असे जाहीर केले.सुमारे ९० गुंठे जागेची ७० कोटींची किंमत असताना हा प्रस्ताव लँड माफियांना लाभ देण्यासाठी आणला असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. हायकोर्टाच्या आदेशाची भीती दाखवत प्रशासन सभागृहावर दबाव आणत असल्याचाही आरोप करण्यात आला. संबंधित वकील सभागृहात येऊन खुलासा करेपर्यंत निर्णय घेऊ नये, अशी भूमिका सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी घेतली. वकील समाधानकारक स्पष्टीकरण देऊ न शकल्याने अखेर सद्यस्थिती कायम ठेवत वाचनालय आणि खेळाचे मैदान आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.१९८६ पासून प्रलंबित असलेल्या आरक्षणाबाबत टाऊन प्लॅनिंग विभागाने काय काम केले, असा सवाल उपस्थित करत २०२२ मधील प्रस्तावाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
आज झालेल्या सभेमध्ये झूम प्रकल्पाच्या येथे भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणी करणे या विषयावर प्रशासनाला धारेवर धरले. आणि भटक्या कुत्र्यांचे शेल्टर नागरी वस्तीमध्ये न उभारता महानगरपालिकेच्या असणाऱ्या अधिकृत जागेवर उभारावे अशी मागणी जोर धरली.
कोल्हापूर महानगरपालिकेची आज पाचवी सर्व साधारण सभा राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये महापौर.सौ. रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेमध्ये विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
मुळात हा जागेचा विषय सभेमध्ये का काढला अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली.या सभेमध्ये नगरसेवकांनी म्हणजेच आदिल फरास, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर या सर्वांनी जागा आरक्षण असताना रहिवास विभागात केली जात असेल तर आरक्षण बदलाला आमचा विरोध कायम राहील असे ठणकावून सांगितले. महानगरपालिकेच्या ४० जागा वर्ग झालेल्या आहेत अशामध्ये टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट महानगरपालिकेला लुटत असल्याचा आरोप नगरसेवक जयंत पाटील यांनी केला. यामध्ये नियोजन करण्याची जबाबदारी या विभागाची आहे मात्र ते जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नगरसेवक जयंत पाटील यांनी केला मी आणि नगरसेवक विनायक फाळके शिवाजी विद्यापीठाच्या जागेसाठी पाच वेळा मुंबईला जाऊन आलो आहे मात्र एकाही अधिकाऱ्याने मुंबईला जाण्याचे धाडस केले नाही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. ही जागा टाऊन प्लॅनिंग विभागाच्या निष्क्रियतेमुळे हातून गेली असल्याचे जयंत पाटील म्हणाले यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदारीने काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा असे काँग्रेसचे गटनेते राजेश लाटकर यांनी सभेमध्ये सांगितले.
ज्या ज्या जागा महापालिकेच्या आहेत त्या सर्व जागांवर महानगरपालिकेचा बोर्ड लावा अशी मागणी लाटकर यांनी केली अधिकारी हायकोर्टाचे नाव घेऊन नगरसेवकांना पुढे करत आहेत अशा अनेक जागांबाबत योग्य भूमिका नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी घेतली असल्याचे आदिल फरास यांनी निदर्शनास आणून दिले आरक्षण हटवून वेगळे काहीतरी करणे ही भूमिका नेत्यांची नव्हती कोल्हापुरी क्रीडा नगरी आहे शाहू महाराजांनी याठिकाणी खेळांची मैदानी दिली आहेत त्या ठिकाणी वेगळा काहीतरी करण्याचा घाट घातला जात असेल तो आम्हाला कदापि मान्य नाही अशी भूमिका आदिल फरास यांनी घेतली.यावेळी सभेमध्ये नगरसेविका पूर्वा राणे यांनी लोकांचे मत विचारात न घेता रहिवास उभारणी केली जात असेल तर याचा निषेध करतो अशी भूमिका मांडली हा विषय सभागृहात का आणला असे म्हणत नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शारंगधर देशमुख यांनी अधिकारी दुकान चालविण्याचे काम करत असल्याचा आरोप केला
नगरसेविका स्वाती यवलुजे यांनी झूम प्रकल्पाच्या शेजारील जागेत भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभा राहत असेल तर त्यास मान्यता दिली जाणार नाही, या विषयावर बोलताना नगरसेवक अर्जुन माने यांनी बिगर वस्तीच्या ठिकाणी कुत्र्यांचे शेल्टर उभारावे असे सांगितले.लाटकर यांनी एक हजार कुत्र्यांचे शेल्टर तयार करा मात्र ते महानगरपालिकेच्या अधिकृत जागेवर असावे आणि नागरी वस्तीत असू नये असे सुचित केले या विषयावर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी नागरी वस्तीमध्ये कुत्र्यांचे शेल्टर असू नये असा सूर आहे. हलसवडे येथे कुत्र्यांची शेल्टर उभारण्यासाठी याआधी विचार झालेला आहे मात्र जागा निश्चिती झाली नाही असे स्पष्ट केले.कुत्र्यांचे शेल्टर कोल्हापूर शहरांमध्ये उभ्या करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत लवकरच बैठक लावली जाईल असे महापौरांनी यावेळी सांगितले. शिवाय महापौरांनी सुरुवातीलाच ‘ड’ वर्ग महापालिका ‘क’ वर्गात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगून स्मार्ट कोल्हापूरसाठी स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे घोषित केले आणि नगरसेवकांना इंदौरचा अभ्यास दौरा करण्याचे नियोजन केले जाणार आहे या अभ्यास दौऱ्याअंतर्गत त्या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाविषयी माहिती नगरसेवकांना होईल आणि त्या पद्धतीने कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये काही करता येईल का याचा विचार होईल असे सांगितले.
शिवसेना गटनेते प्रतिज्ञा उत्तुरे यांनी शहरात वैशिष्टपूर्ण कोणकोणते प्रोजेक्ट सुरु आहेत याची सभागृहात माहिती देण्याची माहिती मागितली. यावेळी प्रशासनाकडून आगामी महासभेपुर्वी याची लेखी माहिती सभागृहात द्यावी अशी महापौरांनी सूचना केली.याशिवाय, लाड समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी, तृतीयपंथीयांसाठी विशेष कोटा, तसेच दिव्यांग भवनाच्या जागी विरंगुळा पार्क उभारण्यास मंजुरी देण्यात आली. एकूणच, विविध मुद्द्यांवर प्रशासनावर टीका आणि जोरदार चर्चा होत आजची महासभा गाजली.
सभेच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका स्वर्गीय आशा भोसले आणि गौतम गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर गौरी चौगुले, तेज पाटील, झिजा फराकटे, स्मिता सावंत आणि अथर्व जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड रजेवर असल्याने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी कामकाज पाहिले.
आजच्या सभेमध्ये माजी महापौर स्वाती यवलुजे, जयश्री चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका माधुरी नकाते, पूर्वा राणे, नेहा तेंडूलकर यांनी विविध प्रश्न विचारून प्रशासनाला धारेवर धरलं.