विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान
जयसिंगपूर/प्रतिनिधी : इचलकरंजी येथील लायन्स क्लबतर्फे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना ‘लायन्स गौरव’ पुरस्कार २०२५-२६ प्रदान करण्यात आला.
उगार शुगर वर्क्स लि.चे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर सोहन शिरगावकर यांच्या हस्ते विनायक भोसले व पत्नी सौ संगीता भोसले यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री भोसले यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भोसले यांचे कुटुंबीय, घोडावत शैक्षणिक संकुलातील सहकारी उपस्थित होते. पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना श्री भोसले म्हणाले, उद्योगपती संजय घोडावत यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेली साथ यावरच आत्तापर्यंतचे कार्य करू शकलो आहे.आई-वडिलांचा आशीर्वाद, पत्नी सौ संगीता यांनी उचललेली घराची व मुलांची जबाबदारी, संस्थेतील सहकाऱ्यांची मदत यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थेत काम करत असताना केवळ वरिष्ठ या भूमिकेत न राहता लीडर म्हणून कार्य करत असल्याचे समाधान व्यक्त केले.पुरस्कारामुळे औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत राहण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

