Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरच्या शिवाय महेशवर शितोळे यास आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड   कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास संबंधित आरोग्य निरीक्षक व मुकादमांवर कारवाई…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. शिवशंकर मारजक्के यांच्या नेतृत्वाखाली सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रेन बायपास कार्यशाळा संपन्न

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

ब्राह्मण सभा करवीर यांच्यातर्फे श्री राम कथा आणि श्री राम यज्ञाचे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कंत्राटदारांच्या  मागण्या व समस्या सोडवण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कंत्राटदार यांचे राज्यस्तरीय महाअधिवेशन १४ जून रोजी कोल्हापूरमध्ये

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा   कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना भूमीहीन करुण त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरला मेट्रो सिटी केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा  शहराचा दर्जा क वर्गातून अ अथवा ब वर्गात होईल राजू माने यांची आंदोलनाद्वारे मागणी

कोल्हापूरला मेट्रो सिटी केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा  शहराचा दर्जा क वर्गातून अ अथवा ब वर्गात होईल राजू माने यांची आंदोलनाद्वारे मागणी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून निवड

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची 'गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ' म्हणून निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज 'स्वर आशा' गीत मैफिलीचे आयोजन आशा भोसले यांना आदरांजली कोल्हापूरकरांना संगीताचा अनुभव घेण्याचे आवाहन कोल्हापूर/प्रतिनिधी :.भारतीय…

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड   कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास संबंधित…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले कोल्हापूर/प्रतिनिधी : सी वॉर्ड बिंदू चौक परिसरातील सि.स. नं. ५२५…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला तर भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणी नागरी वस्तीत…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद   कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

स्थायी समिती सभेत विरोधकांचा सभात्याग, ऐनवेळी विषय घुसविल्याबद्दल सभापतीं आणि प्रशासनाचा विरोधकांनी केला निषेध

स्थायी समिती सभेत विरोधकांचा सभात्याग, ऐनवेळी विषय घुसविल्याबद्दल सभापतीं आणि प्रशासनाचा विरोधकांनी केला निषेध   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर महानगरपालिकेची आजची…

राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा

राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाची…

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास संबंधित आरोग्य निरीक्षक व मुकादमांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिला. शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने आज स्थायी समिती सभागृहात सकाळी १०.३० वाजता सर्व आरोग्य निरीक्षक व मुकादमांची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी बोलताना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी शहरातील रस्त्यांवर कचरा साचल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. अशा स्थितीत संबंधित मुकादम व आरोग्य निरिक्षकांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल. ज्या प्रभागात कचरा अधिक प्रमाणात आढळेल, त्या ठिकाणच्या मुकादमांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांच्या तक्रारींमध्ये ५० टक्क्यांनी घट होईल. तुंम्ही काम व्यवस्थित केले नाही तर नागरीकांच्या रोषास सामोरे जावे लागते. आरोग्य निरीक्षकांनी केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष भागात फिरती करुन काम करावे असे निर्देश दिले. आठवडयामधील सहा दिवसात आपले काम व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे. मी आल्यापासून ४० ते ४५ कर्मचा-यांची लाड पागे शिफारशी अंतर्गत नियुक्तीच्या फाईल्स निर्गत केलेल्या आहेत. माझी सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे तुम्हीही काम इमानदारीने करावे हि माझी अपेक्षा आहे. आपले शहर स्वच्छ व सुंदर कसे होईल हि आपली जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे. मुकादमांनीही कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे. नागरीकांच्या व सदस्यांच्या तक्रारी ज्या दिवशी कमी होणार त्यावेळी आरोग्याचे काम चांगले झाले असे म्हणता येईल. शहर स्वच्छ व सुशोभिकरण कसे होईल यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. उन्हांळयामध्ये उन खुप असल्याने सकाळच्या व दुपारच्या सत्रात उन्हाळयापुरते कामाचे नियोजन करता येते का हे सर्वांनी सांगावे. यावेळी सर्वानुमते पहाटे 5 ते 1 या वेळेमध्ये स्वच्छतेची वेळ निश्चित करण्यात आली. मी पहाटे कधीही फिरती करुन तपासणी करणार आहे. सध्या १५७५ कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत आणखीन नविन लाडपागे कमिटीच्या शिफारशी अंतर्गत कर्मचा-यांची नियुक्ती लवकरच होणार आहे. यामध्ये महापालिकेच्या हद्दीत आलेल्या तावडे हॉटेल ते गांधी नगरचा एरियामध्ये आता आपल्याला स्वच्छता सुरु करायची आहे. त्यामुळे नव्याने नियुक्त काही कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केली जाईल. एक महिन्यात मला स्वच्छतेत बदल दिसला पाहिजे. प्रत्येकाने दररोज ८ तास प्रामाणिकपणे काम केल्यास शहर स्वच्छ व सुंदर होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्याचेही निर्देश दिले. येत्या मे महिन्यात स्वच्छ सर्वेक्षण सुरू होत असून, त्यात कोल्हापूर शहराने पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. घरोघरी कचरा संकलनासाठी लावण्यात आलेल्या क्यूआर कोडचे स्कॅनिंग सध्या ५७ टक्के असून ते ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य देण्यात आले. यासंदर्भातील अडचणी पुढील सोमवारपर्यंत दूर करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले. तसेच फेरीवाल्यांकडून कचरा संकलनासाठी शुल्क आकारण्याचेही निर्देश देण्यात आले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार तसेच सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक व मुकादम उपस्थित होते.

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले

कोल्हापूर/प्रतिनिधी : सी वॉर्ड बिंदू चौक परिसरातील सि.स. नं. ५२५ येथील एम.के. टॉवर अपार्टमेंटमध्ये दिलीप आनंदराव मोरे यांनी मंजूर नकाशाव्यतिरिक्त जादा व विनापरवाना बांधकाम केल्यामुळे आज महानगरपालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत तळघरातील बाथरूम व टॉयलेट्सचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले असून उर्वरित कारवाई उद्या करण्यात येणार आहे.
या प्रकरणी अलका यशवंत माने यांनी दिलीप आनंदराव मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३(१) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. तसेच १५ जानेवारी १९९९ रोजी मंजूर झालेल्या नकाशाव्यतिरिक्त केलेले बांधकाम ३० दिवसांत काढून टाकण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र संबंधितांनी अनधिकृत बांधकाम न हटवल्याने महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्त मागवून कारवाईचे नियोजन केले होते. पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने कारवाई रखडली होती. दरम्यान, अलका माने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या सूचनेनुसार महानगरपालिकेने आठ आठवड्यांत कारवाई करण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने आज पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले व उपशहर रचनाकार एन. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, पंकज जाधव, अदिती पोवार, मुकादम सचिन जाधव, पोलीस कर्मचारी व विभागीय कार्यालय क्र.२ कडील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स व त्याचे पदार्थ तसेच विविध फळांची विक्री होण्यासाठी महोत्सवाच आयोजन करण्यात आलेले आहे. सदर महोत्सव दिनांक २२ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये, भारत हाऊसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारूड भाप्रसे यांचे शुभ हस्ते बुधवार, दिनांक २२ एप्रिल, २०२६ रोजी, सायंकाळी चार वाजता होणार आहे. याप्रसंगी मा. श्री. सुनील फुलारी(भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र तसेच माननीय डॉ. जस्मिन मॅडम(भा. प्र. से. ) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर कृषी उत्पन्न मंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संजय कदम सरव्यवस्थापक श्री. विनायक कोकरे, विभागीय सहनिबंधक श्री. महेश कदम, विभागीय कृषी सहसंचालक श्री बसवराज मास्तोळी, जिल्हा उप निबंधक श्री. नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी श्री. जालिंदर पांगारे इत्यादी उपस्थित राहणार आहेत. सदर महोत्सवामध्ये राज्यातील विविध प्रकारच्या मिलेटचे उत्पादन घेणारे शेतकरी तसेच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू इत्यादी विविध प्रकारचे फळ उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत सदर महोत्सवाचा वेळ सकाळी ०९ ते रात्री ०९ असा आहे. तसेच विविध प्रकारचे तृनधाण्य व विविध प्रकारचे फळे पाहावयास मिळणार आहेत, त्याचप्रमाणे मानवी आरोग्याच्या दृष्टीने मिलेटचे महत्व याबाबत डॉ.सदिप पाटील, डॉ. अहिल्या वाघमोडे. डॉ.योगेस बन व डॉ. प्रतिभा थोंबरे इ. आहारतज्ञांची व्याख्याने आयोजित केलेली आहेत. तसेच मिलेट्सचे विविध पदार्थ व त्यापासून बनविण्यात येणार्या पाककृती याकरीता कोल्हापूर शहरातील महिलांकरीता मिलेट्सच्या पाककृती स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. रायपूर (छत्तीसगढ) येथील मिलेट आहार तज्ञ श्री. कृष्ण मोहन यांचे मिलेटचे विविध पदार्थ तयार करणेबाबत प्रभोदनपर रविवार दि.२६ एप्रिल रोजी सायंकाळी ६-८ कार्यक्रम असणार आहे. तरी सर्व करवीर वासियांनी सदर महोत्सवास भेट देऊन खरेदी करावी आणि मिलेट व फळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले.

००००

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

निसर्गरम्य १८ एकरांवर साकारत आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालय

उत्तूर/प्रतिनिधी : देशातील पहिले शासकीय निसर्गोपचार- योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूर ता. आजरा या गावाचे नाव देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर निरंतर राहील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. एकदा शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला परवानगी मिळाली की ते शाश्वत आणि निरंतरपणे चालणारे काम असते, असेही ते म्हणाले.उत्तूर ता. आजरा येथे इमारतीचे काम सुरू असलेल्या शासकीय योगा आणि निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या कार्यस्थळाला मंत्री श्री. मुश्रीफ यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा बैठक घेतली.
श्री. मुश्रीफ म्हणाले, निसर्गरम्य १८ एकरांवर सुरू असलेल्या या प्रकल्पासाठी सध्या रू. २५० कोटी निधी मंजूर आहे. सर्व अनुषंगिक सेवा सुविधांसह रु. १,००० कोटींच्या घरात तो जाऊ शकेल इतका व्यापक आहे. ही जागा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांशी संलग्न आहे. केरळप्रमाणे येथेही “मेडिकल हब” निर्माण होऊन “ईंटरनॅशनल मेडिकल टुरिझम” वाढणार आहे. स्थानिक अर्थकारणावर फार मोठा परिणाम होणार आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. तुषार बुरूड यांनी केलेल्या सादरीकरणांमध्ये सर्विस ब्लॉक्स, अधिष्ठाता निवासस्थान, योगा व निसर्गोपचार महाविद्यालय, योगा व निसर्गोपचार रुग्णालय, १०० क्षमतेचे मुलींचे वस्तीगृह, १०० क्षमतेचे मुलांचे वस्तीगृह, अध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांची निवासस्थाने, तांत्रिक कर्मचारी व लिपिक वर्गाची निवासस्थाने, अध्यापक व अधिकाऱ्यांची निवासस्थाने या सर्व इमारतींची पायाखुदाई पूर्ण होऊन ही कामे जोता लेवलपर्यंत आल्याचे स्पष्ट केले. संरक्षण भिंत व अंतर्गत रस्त्यांचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. परिसर सुशोभीकरणाचे कामही प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट केले. तसेच; आंबेओहोळ प्रकल्पावरून सहा किलोमीटरच्या पाईपलाईनमधून स्वतंत्र पाणी योजनेचेही काम प्रगतीपथावर आहे.
अधिष्ठाता श्रीमती भाग्यश्री खोत म्हणाल्या, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशित झालेल्या २० विद्यार्थ्यांची पहिली बॅच आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील ५७ विद्यार्थ्यांची दुसरी बॅच आहे. येत्या म्हणजेच सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील ६० ची बॅच प्रवेशित होईल. हे सर्व वर्ग बहिरेवाडी येथील आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञ जे. पी. नाईक स्मारकाच्या सुसज्ज व अद्यायवत इमारतीत भरत आहेत तसेच; तिथे ॲनाटाॅमीच्या डिसेक्शन हॉलसह फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि मायक्रो बायोलॉजीच्या प्रयोगशाळाही तयार आहेत. विशेष म्हणजे, गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात या महाविद्यालयाचा बाह्यरुग्ण कक्ष सुरू झालेला आहे.
ही सर्व कामे ऑक्टोबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना श्री. मुश्रीफ यांनी अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता बी. एल. हजारे, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती संजीवनी कट्टी, आजरा विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अ. सं. कचरे, नवनाथ बनसोडे व निं. बा. पगारे, शाखा अभियंता विक्रम कदम व राहुल पाटील, अधिष्ठाता श्रीमती भाग्यश्री खोत आदी उपस्थित होते.

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला

तर भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणी नागरी वस्तीत असू नये नगरसेवकांनी धरले प्रशासनाला धारेवर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या दुसऱ्या सुधारित मंजूर विकास योजनेतील कसबा करवीर रि.स.नं.६२५/१ व २ येथील खेळाचे मैदान वाचनालय व आरक्षण ऐवजी रहिवास विभागात बदल व्हावे या ऑफिस प्रस्तावावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये नगरसेवकांनी जोरदार चर्चा केली. नगरसेवकांनी हा विषय विरोध दर्शवत हाणून पाडला आणि यात कोणताही बदल न करता या ठिकाणी खेळाचे मैदान व वाचनालय असेच आरक्षण राहील असे जाहीर केले.सुमारे ९० गुंठे जागेची ७० कोटींची किंमत असताना हा प्रस्ताव लँड माफियांना लाभ देण्यासाठी आणला असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. हायकोर्टाच्या आदेशाची भीती दाखवत प्रशासन सभागृहावर दबाव आणत असल्याचाही आरोप करण्यात आला. संबंधित वकील सभागृहात येऊन खुलासा करेपर्यंत निर्णय घेऊ नये, अशी भूमिका सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी घेतली. वकील समाधानकारक स्पष्टीकरण देऊ न शकल्याने अखेर सद्यस्थिती कायम ठेवत वाचनालय आणि खेळाचे मैदान आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.१९८६ पासून प्रलंबित असलेल्या आरक्षणाबाबत टाऊन प्लॅनिंग विभागाने काय काम केले, असा सवाल उपस्थित करत २०२२ मधील प्रस्तावाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
आज झालेल्या सभेमध्ये झूम प्रकल्पाच्या येथे भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारणी करणे या विषयावर प्रशासनाला धारेवर धरले. आणि भटक्या कुत्र्यांचे शेल्टर नागरी वस्तीमध्ये न उभारता महानगरपालिकेच्या असणाऱ्या अधिकृत जागेवर उभारावे अशी मागणी जोर धरली.
कोल्हापूर महानगरपालिकेची आज पाचवी सर्व साधारण सभा राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये महापौर.सौ. रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेमध्ये विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
मुळात हा जागेचा विषय सभेमध्ये का काढला अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली.या सभेमध्ये नगरसेवकांनी म्हणजेच आदिल फरास, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर या सर्वांनी जागा आरक्षण असताना रहिवास विभागात केली जात असेल तर आरक्षण बदलाला आमचा विरोध कायम राहील असे ठणकावून सांगितले. महानगरपालिकेच्या ४० जागा वर्ग झालेल्या आहेत अशामध्ये टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट महानगरपालिकेला लुटत असल्याचा आरोप नगरसेवक जयंत पाटील यांनी केला. यामध्ये नियोजन करण्याची जबाबदारी या विभागाची आहे मात्र ते जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नगरसेवक जयंत पाटील यांनी केला मी आणि नगरसेवक विनायक फाळके शिवाजी विद्यापीठाच्या जागेसाठी पाच वेळा मुंबईला जाऊन आलो आहे मात्र एकाही अधिकाऱ्याने मुंबईला जाण्याचे धाडस केले नाही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. ही जागा टाऊन प्लॅनिंग विभागाच्या निष्क्रियतेमुळे हातून गेली असल्याचे जयंत पाटील म्हणाले यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदारीने काम करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा असे काँग्रेसचे गटनेते राजेश लाटकर यांनी सभेमध्ये सांगितले.
ज्या ज्या जागा महापालिकेच्या आहेत त्या सर्व जागांवर महानगरपालिकेचा बोर्ड लावा अशी मागणी लाटकर यांनी केली अधिकारी हायकोर्टाचे नाव घेऊन नगरसेवकांना पुढे करत आहेत अशा अनेक जागांबाबत योग्य भूमिका नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी घेतली असल्याचे आदिल फरास यांनी निदर्शनास आणून दिले आरक्षण हटवून वेगळे काहीतरी करणे ही भूमिका नेत्यांची नव्हती कोल्हापुरी क्रीडा नगरी आहे शाहू महाराजांनी याठिकाणी खेळांची मैदानी दिली आहेत त्या ठिकाणी वेगळा काहीतरी करण्याचा घाट घातला जात असेल तो आम्हाला कदापि मान्य नाही अशी भूमिका आदिल फरास यांनी घेतली.यावेळी सभेमध्ये नगरसेविका पूर्वा राणे यांनी लोकांचे मत विचारात न घेता रहिवास उभारणी केली जात असेल तर याचा निषेध करतो अशी भूमिका मांडली हा विषय सभागृहात का आणला असे म्हणत नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शारंगधर देशमुख यांनी अधिकारी दुकान चालविण्याचे काम करत असल्याचा आरोप केला
नगरसेविका स्वाती यवलुजे यांनी झूम प्रकल्पाच्या शेजारील जागेत भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभा राहत असेल तर त्यास मान्यता दिली जाणार नाही, या विषयावर बोलताना नगरसेवक अर्जुन माने यांनी बिगर वस्तीच्या ठिकाणी कुत्र्यांचे शेल्टर उभारावे असे सांगितले.लाटकर यांनी एक हजार कुत्र्यांचे शेल्टर तयार करा मात्र ते महानगरपालिकेच्या अधिकृत जागेवर असावे आणि नागरी वस्तीत असू नये असे सुचित केले या विषयावर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी नागरी वस्तीमध्ये कुत्र्यांचे शेल्टर असू नये असा सूर आहे. हलसवडे येथे कुत्र्यांची शेल्टर उभारण्यासाठी याआधी विचार झालेला आहे मात्र जागा निश्चिती झाली नाही असे स्पष्ट केले.कुत्र्यांचे शेल्टर कोल्हापूर शहरांमध्ये उभ्या करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत लवकरच बैठक लावली जाईल असे महापौरांनी यावेळी सांगितले. शिवाय महापौरांनी सुरुवातीलाच ‘ड’ वर्ग महापालिका ‘क’ वर्गात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगून स्मार्ट कोल्हापूरसाठी स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे घोषित केले आणि नगरसेवकांना इंदौरचा अभ्यास दौरा करण्याचे नियोजन केले जाणार आहे या अभ्यास दौऱ्याअंतर्गत त्या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाविषयी माहिती नगरसेवकांना होईल आणि त्या पद्धतीने कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये काही करता येईल का याचा विचार होईल असे सांगितले.
शिवसेना गटनेते प्रतिज्ञा उत्तुरे यांनी शहरात वैशिष्टपूर्ण कोणकोणते प्रोजेक्ट सुरु आहेत याची सभागृहात माहिती देण्याची माहिती मागितली. यावेळी प्रशासनाकडून आगामी महासभेपुर्वी याची लेखी माहिती सभागृहात द्यावी अशी महापौरांनी सूचना केली.याशिवाय, लाड समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी, तृतीयपंथीयांसाठी विशेष कोटा, तसेच दिव्यांग भवनाच्या जागी विरंगुळा पार्क उभारण्यास मंजुरी देण्यात आली. एकूणच, विविध मुद्द्यांवर प्रशासनावर टीका आणि जोरदार चर्चा होत आजची महासभा गाजली.
सभेच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका स्वर्गीय आशा भोसले आणि गौतम गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर गौरी चौगुले, तेज पाटील, झिजा फराकटे, स्मिता सावंत आणि अथर्व जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड रजेवर असल्याने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी कामकाज पाहिले.
आजच्या सभेमध्ये माजी महापौर स्वाती यवलुजे, जयश्री चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका माधुरी नकाते, पूर्वा राणे, नेहा तेंडूलकर यांनी विविध प्रश्न विचारून प्रशासनाला धारेवर धरलं.

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्याकडून बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे सोमवार, दि.20 एप्रिल 2026 रोजी विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे बालिंगा अशुध्द / शुध्द जल व नागदेववाडी अशुद्ध जल उपसा केंद्राकडील विद्युत पुरवठा बंद राहणार असून या केंद्राकडील पाणी उपसा पूर्णपणे बंद रहाणार आहे. त्यामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावर अवलंबून असणारा चंबुखडी टाकीवरून वितरीत होणा-या भागामध्ये सोमवार, दि.20 एप्रिल 2026 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवार, दि.21 एप्रिल 2026 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजे संभाजी, क्रशरचौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही. संपूर्ण सी डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालिम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज,महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवल क्लब. ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तरी या कालावधीत नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्याकडून बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे सोमवार, दि.२० एप्रिल २०२६ रोजी विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे बालिंगा अशुध्द / शुध्द जल व नागदेववाडी अशुद्ध जल उपसा केंद्राकडील विद्युत पुरवठा बंद राहणार असून या केंद्राकडील पाणी उपसा पूर्णपणे बंद रहाणार आहे. त्यामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावर अवलंबून असणारा चंबुखडी टाकीवरून वितरीत होणा-या भागामध्ये सोमवार, दि.२० एप्रिल २०२६ रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवार, दि.२१ एप्रिल २०२६ रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामीण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजे संभाजी, क्रशरचौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही. संपूर्ण सी डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालिम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज,महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवल क्लब. ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी ५,६,७,८,  वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.तरी या कालावधीत नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

स्थायी समिती सभेत विरोधकांचा सभात्याग, ऐनवेळी विषय घुसविल्याबद्दल सभापतीं आणि प्रशासनाचा विरोधकांनी केला निषेध

स्थायी समिती सभेत विरोधकांचा सभात्याग, ऐनवेळी विषय घुसविल्याबद्दल सभापतीं आणि प्रशासनाचा विरोधकांनी केला निषेध

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर महानगरपालिकेची आजची स्थायी समिती सभा चांगलीच वादळी ठरली. आज झालेल्या स्थायी समिती सभेत ऐनवेळी विषय घुसविण्यात आले आणि त्यास विरोधी सोडून बाकीच्या सदस्यांनी मंजुरी दिली यात आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी ऐनवेळी विषय घुसवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत विरोधक सदस्यांनी स्थायी समिती सभापती आणि प्रशासनाचा निषेध नोंदवत सभात्याग केला. विशेष म्हणजे, विरोधक बाहेर पडल्यानंतर विषयपत्रिकेसह ऐनवेळी मांडण्यात आलेले सर्व विषय मंजूर करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वराज्य संस्थापिका ताराराणी सभागृहात सातवी स्थायी समितीची सभा वादग्रस्त झाली.सभेमध्ये विषय पत्रिकेवरील रेसकोर्स नाका, टिंबर मार्केट येथील जीर्ण व धोकादायक झालेली कमान व जकात नाका इमारत निष्कासित करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला. तसेच नागरिक व ठेकेदारांकडून विविध कारणांसाठी जमा झालेल्या अनामत रक्कम परत करण्याबाबतचे प्रस्तावही स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. त्यानंतर स्थायी समिती मधील विरोधी पक्षाच्या सदस्यांशी कोणतेही चर्चा न करता सभापतीनी अचानक चार-पाच विषय घुसवण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी आलेल्या विषयांमध्ये सरस्वती गाळेधारकांना गाळे देणे, आरोग्य विभागासाठी जेसीबी, ट्रक्टर ट्राली यासह विविध उपकरण खरेदी करणे आणि तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूल हे विषय घेण्यात आले. पण विरोधक सदस्यांनी या विषयावर अभ्यास करून पुढच्या सभेत मंजुरी घेवू असे सांगितले. मात्र, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी “ माझा आदेश आहे, सर्व विषय मंजूर करा” असा सभेमध्ये आदेश दिला. त्यामुळे विरोधक सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी सभात्याग केला. विशेष म्हणजे, विरोधक बाहेर पडल्यानंतर विषयपत्रिकेसह ऐनवेळी मांडण्यात आलेले सर्व विषय मंजूर करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यावर माध्यमांशी बोलताना, आम्ही कोल्हापूरच्या विकासाच्या अजेंड्यावरील विषय आणले होते. मात्र विरोधी सदस्यांनी चर्चा न करता सभा त्याग केल्याचे सांगत सभापती शिराळे यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी विरोधक सदस्यांचा निषेध नोंदवला.
तर सभापती विशाल शिराळे हे नेमकं कोणाच्या हातचे बाहुले आहे. त्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठीच शहराचे महत्वाचे विषय ऐनवेळी घुसवून मंजूर का केले. त्यांचा आम्ही निषेध करतोय असे काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तर ऐनवेळी आर्थिक बजेट असलेली विकास कामं अचानक सभेत आणुन त्यांना नेमकं काय हितसंबंध जपायचे आहेत असा करत आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सभापतींचा निषेध नोंदवला.
ऐनवेळच्या विषयांवर चर्चा व्हायला हवी. कोटीचे विषय आणून मंजूर करणाऱ्या सभापतींच्या मनमानी कारभाराचा नगरसेवक अमर समर्थ यांनी निषेध नोंदवला.तर पस्तीस लाख रुपये भाड्याचे टँकर घेण्यापेक्षा महापालिकेने स्वतः टँकर खरेदी करावेत अशी आमची भूमिका आहे.म्हणून आम्ही सभात्याग केला असे नगरसेवक प्रताप जाधव यांनी सांगितले.सभेत ऐनवेळचे विषय आणण्यापूर्वी गटनेत्यांच्या बरोबर चर्चा व्हायला हवी होती. पण असे न करता आमच्यावर विषय लादण्याचा प्रयत्न केल्यामुळे नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी निषेध नोंदवला.तर विरोधक सदस्य म्हणून आम्ही ऐनवेळी आलेल्या विषयांना अभ्यास केल्याशिवाय मंजुरी देऊ शकत नाही त्यामुळे आम्ही सभात्याग केल्याचे प्रवीण सोनवणे यांनी सांगितले.
एकूणच, ऐनवेळी विषय घुसवून मंजुरी घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा विरोधकांचा आरोप असून, पारदर्शक कामकाजाची मागणी करत त्यांनी सभात्याग केला. आता या वादाचे पडसाद पुढील होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उमटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाची केली पाहणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या १ जूनपासून राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे केली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो, त्यामुळे आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार असून, खासगी कंत्राटदारांमार्फत चालवली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून महामंडळ स्वतः त्याची जबाबदारी घेणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शासन निधीतून बांधण्यात आलेल्या चार नूतन बसस्थानकांच्या उद्घाटनासाठी मंत्री सरनाईक कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छता गृह, उपाहारगृह, हिरकणी कक्ष आणि प्रवासी कक्षांची बारकाईने पाहणी केली. प्रवाशांशी थेट संवाद साधताना त्यांनी अवाजवी पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली. बस स्थानकाचा परिसर आणि स्वच्छता गृहे केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजेत; त्यासाठी दर चार तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
बस स्थानकावरील उपाहारगृहात गरजूंसाठी ३० रुपयांत चहा आणि नाश्ता देण्याची योजना कागदावरच असल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही योजना २४ तासांत पूर्ववत करून त्याबाबतचे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश त्यांनी दिले, अन्यथा संबंधित उपाहारगृह चालकांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी एम. टी. तेगनमन्नी पेपर स्टॉललाही भेट दिली. स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या पाहणी दौऱ्यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या (पुणे प्रदेश) प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक परिवहन अधिकारी अनिल मेहतर यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छतेबाबत आणि विनाशुल्क सुविधांबाबत जर कोणी हलगर्जीपणा केला किंवा प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल केले, तर विभागीय परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.