शाही दसरा : ‘करुन गेलो गाव’ नाटकाचे 18 ऑक्टोबरला विनामुल्य आयोजन
कोल्हापूर, दि. १७ ( जिमाका ) : शाही दसऱ्यानिमित्त बुधवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता दसरा चौक येथे रंगमंचावर राजेश देशपांडे दिग्दर्शित व भाऊ कदम, ओंकार भोजने अभिनित ‘करुन गेलो गाव’नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. हे नाटक विनामुल्य असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दसरा नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.